Welcome to misalpav.com
लेखक: नरेंद्र गोळे | प्रसिद्ध:
आपल्या देशाला ज्या अवघड प्रश्नांचा मुकाबला गेल्या काही वर्षांत सातत्याने करावा लागत आहे त्यांत काश्मीरातील, पाक-प्रायोजित छुप्या युद्धाचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. ह्या विषयावरील, ब्रिगेडिअर हेमंत महाजन ह्यांचेसारख्या जाणकार व्यक्तीने लिहिलेले हे पुस्तक १०-०५-२०१४, शनिवार रोजी, पुण्यात प्रकाशित होत आहे. ह्या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद त्यांनी माझेकडूनच करून घेतलेला आहे. तेव्हा ह्या कार्यक्रमास अवश्य उपस्थित राहावे. हे पुस्तक विकत घ्यावे आणि वाचावे ही विनंती!

- नरेंद्र गोळे २०१४०५०६





प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

कार्यक्रम कधी आहे हे कळले कुठे आहे हे कळाले तर मित्रमंडळींनाही सांगेन

दृक श्राव्य सभागृह पहिला मजला, स.प. कॉलेज, टिळकपथ, पुणे येथे, १०-०५-२०१४ शनिवार संध्याकाळी १८०० वाजता हा प्रकाशन समारंभ होणार आहे. आशू जोग, तुमच्या प्रतिसादावरून मात्र असे वाटते आहे की सोबतची निमंत्रणपत्रिका तुम्हाला दिसत नाही आहे. काय कारण असावे? कारण मला तर ती दिसत आहे!

आता दिसू लागली आहे लिहीत होतो त्यावेळी फक्त टेक्स्टच दिसत होते

हे पुसक बुकगंगा किंवा तत्सम पुस्तके विकणार्‍या संकेतस्थळांवर उपलब्ध असेल का? कार्यक्रमाला उपस्थित राहू शकेन याची शंका आहे पण पुस्तक विकत नक्की घेणार.