Welcome to misalpav.com
लेखक: rakhee | प्रसिद्ध:
माझी आजी माझी आजी जिने नुकतीच वयाची ९६ वर्षे पूर्ण केली. हि माझ्या वडिलांची आई ,तिच्यासाठी हा लेख . गोदु आजी म्हटलं कि माझ्या मनात एक करारी व्यक्तिमत्व उभं राहत . लहानपणापासून आजीचा एक दरारा वाटत आला आहे .तिचं व्यक्तिमत्वच तसं आहे. तिचि या वयातही स्वतःची कामं स्वतः करण्याची सवय, वाचनाची आवड ,सतत कामात गुंतवून ठेवण्याची आवड सगळंच थक्क करणारं आहे . या वयातही तिने स्वतःला ताज तवानं ठेवलेलं आहे . आम्हा सर्व तरुण मंडळींसाठी ती एक मोठी प्रेरणाच आहे. ती एक fighter आहे . Cancer बरोबरची लढाई तिने सहज जिंकली . आणि आम्हा सर्वांना एक सकारात्मक मेसेज दिला . ती खूप चांगली manager आहे . सर्व नाती गोती तिने एका हाती सांभाळली . सर्वांना तिने एकत्र बांधून ठेवले.सुखाच्या दुःखाच्या प्रसंगांना हसत मुखाने सामोरी गेली . मला वाटतं ती जर आजच्या काळात जन्मली असती तर ती नक्कीच एखाद्या कंपनीची CEO असती . ती आजी असली तरी ती पारंपारिक जुनाट विचारांची नाही . नवीन जुन्याची सांगड घालून काय उत्तम आहे ते ती करते . नवीन उत्तम विचार , नवीन आत्मसात करण्याची तिची प्रवृत्ती आहे . ती नवीन युगाची आहे . मुलीनी खूप शिकावं , नोकरी करून स्वतःच्या पायावर उभे राहावं यासाठी ती कायम ठाम राहिली . अश्या माझ्या आजीला माझा प्रणाम . तिला उत्तम आरोग्य आणि आयुष्य लाभो हीच देवाजवळ प्रार्थना . तिच्यासाठी एक छोटीशी कविता . आजी ग आजी करतेस पुरणपोळी मऊसूत तुझ्या हातापरी चवदार इतकी आठवली की चव रेंगाळे जीभेवरी तुझ्या ग गोष्टी मोलाच्या किती देई शिकवण जगण्यावरी तुझी ग लढाई जिद्द जिंकण्यापरी देई उभारी आम्हासही …
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

तुझ्या आज्जीला उत्तम आरोग्य आणि आयुष्य लाभो हीच देवाजवळ प्रार्थना . माझ्या आजीची फार आठवण येतेय्...खूप मायाळू होती.

राखीताई, या धाग्यामधे २ मुद्दे दिसले १. आजीचा वाढदिवस २. आजीबद्दलचा निश्कर्ष ती CEO बनली असती वगैरे पण यातून काहीच अंदाज येत नाही असं का वाटतं याबाबतचे काही अनुभव लिहीले असत तर धाग्याला अधिक अर्थ आला असता आपल्या आजीला शतायुषी होण्यासाठी शुभेच्छा पण ती इतर आज्यांपेक्षा वेगळी का आहे याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे