आजकाल बर्याचश्या कार्यक्रमांमधे जेवणाच्या वेळी बुफे ही पद्धत रुड झालेली आहे . सोयीच्या दृष्टीने,अन्न वाया ना जाण्याच्या दृष्टीने ती निश्चीतच चांगली आहे.पण तरीही मला मात्र पुर्वी पासूनच पंगत हाच प्रकार खूप आवडतो .
आमच्याकडे आजही जेवायला जमिनीवर मांडी घालून बसतात.घरात डायनिंग टेबल असूनही.एक तर सगळ्यानाच ते आवडत आणि दुसर महणजे इतके दिवसानंतर आता तस बसल्याशिवाय जेवण पोटभर होत नाही असाच वाटत.कदाचित हे वाटण मानसिक सुध्हा असेल . पण अलीकडेच ऋजुता दिवेकर च्या एक पुस्तकात तिने हेच सांगितलाय तेव्हा मात्रा मला खूप बर वाटल .
आमच्याकडे अजूनही कोणी पाहुणे आले तर पूर्वीसारख पुरुषांची पंगत आधी आणि मग बायकांची असाच असत.काहीजनाना हे मागासलेल् वाटेल पण मला मात्रा सवय झालीए.आधी पुरुषांची आणि पाहुण्यांची पंगत (मग बायका असतील तर त्याही)आणि मग घरातील बायकांची पंगत.पाहुणे नसतील आणि घरतीलच काही कार्यक्रम असेल तर मग पुरुष आणि मूळ आधी आणि मग बायका . पण आमच्यकडे कधीच अस वाटल नाही की पुरुषांची जेवण झाल्यवर उरल सुरल बायका खात आहेत.कारण आमच्या आजीच्या थोड्या पण कडक नियामांमुळे घरात मुळातच जास्त जेवण केलेल असायच की कधी ते कमी पडून उरल सुरल खायची वेळ यावी.कोकणातली सगळीच भात प्रिय असल्याने बायकांच्या पंगतीला भात मात्र नवीन ताजा टाकून गरम गरम आणला जायचा.पुरुषांची पंगत आधी म्हणून पुरुष जेवण झाल की पण खात गप्पा मारत बसलेत अस मात्र कधी व्ह्यायच नाही.बायकांच्या पंगतीला वाढायला पुरुष आपणहून यायचे.वाढताना थोडा गोंधळ व्ह्यायचा पण ते मनापासून केलेल असे.कोणीही कुणाशीही बरोबरी करण्याचा प्रयत्ना नसे .
पंगत वाढायचे पण काही नियम असतात.जेवण अगदी कितीही साध का असेना ते त्या जागीच वाढल गेल पाहिजे.म्हणजे वाढण्यारयाची परीक्षाच ना ?भाजी आमटी हे प्रकार जेवनार्याच्या उजवीकडे तर कोशिंबीर चटणी हे प्रकार डावीकडे.लिंबू दही बरोबर समोर वरच्या बाजूला.समोर खालच्या बाजूला वरण भात,त्याच्यावर मधल्या बाजूला मसाले भात,वरण भाताच्या शेजारी डावीकडे गोडाचा पदार्थ , तिथेच बाजूला पापड अस साग्रसंगीत वाढला आल पाहिजे.घरगुती पंगतीत सगळे पुरुष बसताना शर्ट काढून बसतात.श्लोक म्हणतात.जेवताना ४ लहान घास बाजूला काढून ठेवतात.जेवताना खाली वाकून जेवाव लागत,बाहेर कुठे ना सांडता, दुसर्याला हाट ना लागता.जेवनार्यप्रमाणेच वाढनर्यानेही काय क्रमाने वढायचे हे ठरलेल असत.साधारण पणे सुरवातीचा वरण भात हा अगदीच नैवेध्य पुरता असतो त्यामुळे मग आधी भात,त्यापाठोपाठ वरण आणि तूप हे क्रमाने वढायाल आणायचे.आमटी असेल तर ती आणायची.आणि मग हळूहळू भाजी,कोशिंबीर. साधारण भात संपत आला अस दिसल की मग जे पक्वान्न असेल ते वाढायला आणायच.आग्रह करून झाला की परत एकदा भात विचारायचा.या वेळेस भाताबरोबर आवर्जून ताक न्यायच.वाढताना पानात एका वेळी भरपूर वाढल नाही गेल पाहिजे तसाच अगदी कमिही नाही वाढता कामा हे अशा अंदाजाने वढायच.आमटी,ताक हे द्रव पदार्था वाढताना वाटीच्या बाहेर सांडणार नाहीत ना याकडे लक्षा द्याव लागत .वाढताना कुठे साडी पायात येत नाही की कुठे ड्रेस चा गळा खाली येत नाही याही गोष्टीची काळजी घ्यावी लागते . जेवणारा एखाद्या पदार्थाची वाट बघत बसलाय असाही होऊन नाही चालत.ज्या भांड्यात जेवण केल ते भांड घेऊन कधीही वध्याला जायच नाही अस आजी सांगायची.कारण जर चुकून कमी असेल तर जेवनर्याचया ते लक्षात येऊन तो कमी जेवेल,जे आपल्या आचार विचारत बसत नाही.तसाच ज्या भांड्यतून वाढणार त्या भांड्यात वेळीच तो पदार्थ काढून घ्यावा.पदार्थ संपताना जो भांड्याचा आवाज येतो तसा आल्यास पाहुण्यना आणखी घेताना अवघडल्यासाखे होते जेवनार्याने पण शक्यतो सगळे पदार्थ खावेत आणि पान स्वच्छ करावे जेणेकरून खरकट उचलताना त्या माणसाला घान वाटू नये . जे काही टाकायचे असेल (आमसूल, मिर्ची वगैरे ) शक्यतो आमटीच्या वाटीत गोळा करून ठेवावे .
हे आणि असेच आणखीही बारीक सारीक अलिखित नियम पंगतीत पाळावे लागतात .आणि हे नियम स्वच्छता आणि नीटनेटेकपाणा यावर आधारित आहेत म्हणजेच आपल्याला आपसूकच या नियमाची सवय होते आणि आपल्या जडणघडणीत यांचा अजाणतेपणी का होईना हातभार लागतो
प्रकार:
विषय:
प्रतिक्रिया
मी
कुठल्या जमान्यातील लेख आहे हा
म्हणजे माझ्या लक्षात नाही आलं
एकतर जुनाट माल विकायचा
डायरिया.
ठ्ठो
डायरी भेट द्या कुणीतरी.
डायरी दिलीये ना!
नाही हो सर,
लेखात बराच पंक्ती-प्रपंच
पंगत वाढायचे पण काही नियम
पंगत वाढायचे पण काही नियम असतात.जेवण अगदी कितीही साध का असेना ते त्या जागीच वाढल गेल पाहिजे.म्हणजे वाढण्यारयाची परीक्षाच ना ?भाजी आमटी हे प्रकार जेवनार्याच्या उजवीकडे तर कोशिंबीर चटणी हे प्रकार डावीकडे.लिंबू दही बरोबर समोर वरच्या बाजूला.समोर खालच्या बाजूला वरण भात,त्याच्यावर मधल्या बाजूला मसाले भात,वरण भाताच्या शेजारी डावीकडे गोडाचा पदार्थ , तिथेच बाजूला पापड अस साग्रसंगीत वाढला आल पाहिजे.जर मी चुकत नसेल तर .... आमच्या कोकणात चपाती अलीकडे ठेवतात आणि भाजी पलीकडे, याउलट देशावरचे चपाती पलीकडे ठेवतात आणि भाजी अलीकडे. अश्यावेळी अश्या मित्रांकडे गेल्यावर वाढलेले ताट १८० अंशात फिरवून घ्यावे लागते.ईंटरेस्टींग !
घरगुती पंगतीत सगळे पुरुष बसताना शर्ट काढून बसतात.ईंटरेस्टींग ! खास करून दुपारचे जेवण, स्वतालाच उकडले तर गरमागरम जेवण खायची मजा नाही असे काही लॉजिक आहे का यामागे ? चहा पिताना मी दरवेळी पंख्याचा स्पीड असा अॅडजस्ट करतो की चहा थंड होऊ नये, त्याचबरोबर मलाही गरम होऊ नये जेणे करून गरम पेय पिण्याचा आनंदच गंडेल.मस्त लेख...
पंगत..
आम्ही अद्याप
मालविका
मस्त
पंगत
:)