Welcome to misalpav.com
लेखक: संजय क्षीरसागर | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

सर्जिंका ग्यान देखो जे जगतो ते लिखाण देखो उनकी ये मजाल देखो ओ ओ ओ प्रतिसादांची धमाल देखो आंव देखो ना तांव देखो उनका सिर्फ कमाल देखो।........... हे धत्तड तत्तड तत्तड तत्तड तत्तड तत्तड तत्तड

शेवटच्या विचारापासून बॅक ट्रॅक करत पहिल्या विचारा पर्यंत येणं हा मनाची प्रक्रिया जाणण्याचं एकमेव मार्ग आहे.
हे कोणी ट्राय केलं आहे का? खरंच विचारतोय.

हो.. मी केलय ना.. बर्‍याचदा विचारांची लिंक अचानक तुटली तर आपण नक्की काय विचार करत होतो हे आठवायला असं अनेकदा केलय मी.. पण.. हा "मनाची प्रक्रिया जाणण्याचं एकमेव मार्ग "का" आहे" ते मला माहित नाही आणि त्यासाठि मी हे लेख वाचु शकत नाही हे नक्की..

बर्‍याचदा विचारांची लिंक अचानक तुटली तर आपण नक्की काय विचार करत होतो हे आठवायला असं अनेकदा केलय मी..
त्यामुळेच या बर्‍याच वेळेला अजाणतेपणी केल्या जाणार्‍या क्रियेत एवढं काही महत्त्वाचं असेल हे वाचुन थोडं विचित्रच वाटलं होतं, पण नंतर यातलं लॉजिक तरी पटतंय. प्रत्यक्ष करुन बघेन.
हा "मनाची प्रक्रिया जाणण्याचं एकमेव मार्ग "का" आहे" ते मला माहित नाही
अर्थातच हे प्रत्येकाचं वैयक्तिक मत आहे. पण लेखात सांगितलेल्या ध्यान आणि नामस्मरण यापैकी नामस्मरणाचा मला फार काही फायदा झाला नाही, म्हणजे त्यामागचं लॉजिकच पटत नाही. पण अर्थात हे माझं व्यक्तिगत मत. आणि त्यामागचं रिझनिंग मी कोणाला शब्दात समजावुही शकत नाही.

विचारांची लिंक तुटल्यावर `शेवटच्या विचारापूर्वी कोणता विचार होता' याचा शोध घेणं आणि पुन्हा विचार करायला लागणं अशी प्रोसेस नाहीये. सांप्रत विचारापासून पहिल्या विचारापर्यंत जाऊन तो कोणत्या जाणीवेनं अ‍ॅक्टीवेट झाला हे समजणं मनाची क्रिया उलगडत नेतं. मग जाणीवेशी सतर्क राहून तुम्ही कायम स्वतःशी कनेक्टेड राहू शकता. हा स्वतःशी संपर्क शांतता आहे. मनाची रुणझुण थांबण्याचा सहज मार्ग आहे. आय विल टेक यू टू अ डीपर डायमेन्शन. भाषा शिकायला लागते, शांतता शिकता येत नाही. इट इज ऑलरेडी देअर! शांतता हा आपला स्वभाव आहे, भाषा हे संपर्काचं माध्यम आहे. स्वतःशी एकरुप व्ह्यायला ध्वनी किंवा भाषेची गरजच नाही. तस्मात नामस्मरण व्यर्थ आहे. तुम्ही समग्रतेनं बॅक-ट्रॅक प्रक्रिया केलीत तर विचारपूर्व शांतीपाशी येता. तेच आपलं स्वरुप आहे त्यामुळे तुम्ही मनाच्या कोलाहलातून मुक्त होता. ही कला एकदा साधली की मनाची प्रकिया तुमच्या काह्यात येते. मन तुम्हाला सैरभैर करु शकत नाही.

"शेवटच्या विचारापासून बॅक ट्रॅक करत पहिल्या विचारापर्यंत येणं हा मनाची प्रक्रिया जाणण्याचं एकमेव मार्ग आहे."
ही सध्या प्रचलित असलेल्या कोणत्याही प्रणाली पेक्षा सर्वात शास्रशुद्ध आणि निर्धोक आहे. जितके तुम्ही पहिल्या विचारापर्यंत येऊ शकाल तितकी जाणीव प्रगल्भ होत जाईल. You will come to know how mental activity starts and how the mind works. हे कुणीही ट्राय केलेलं नाही ते प्रतिसाद वाचून लक्षात आलं असेल. तुमचाच अनुभव तुम्हाला आत्मविश्वास देईल.

ही सध्या प्रचलित असलेल्या कोणत्याही प्रणाली पेक्षा सर्वात शास्रशुद्ध आणि निर्धोक आहे
यामागचं लॉजिक तरी पटतंय. अनुभव घेउन सांगेनच. वर पिलीयन रायडर यांना दिलेल्या प्रतिसादात मी म्हटलंय कि
त्यामुळेच या बर्‍याच वेळेला अजाणतेपणी केल्या जाणार्‍या क्रियेत एवढं काही महत्त्वाचं असेल हे वाचुन थोडं विचित्रच वाटलं होतं
बर्‍याच वेळेला हि बॅक ट्रॅक ची प्रोसेस चालु असते पण आता त्याकडे लक्ष देईन मुद्दाम. असो, या लेखाचे पुढचे भाग वाचुन त्यावर प्रतिक्रिया देईनच.

वर प्रतिसाद देणार्‍या एकालाही विषयाचं गम्य नाही. प्रत्येकाची लेखनिक कारकिर्द पाहिली तर एकूण वैचारिक आवाका लक्षात येतो. पण छपरी प्रतिसाद देण्यात अहमिका मात्र पाहण्यासारखी आहे.

खुप इंटरेस्टिंग आहे ज्या क्षणी आपल्याला ‘विचार चालू आहेत’ हे कळतं त्या क्षणी आपण मनापासून वेगळे झालेलो असतो. हा कालावधी अत्यंत अल्प असतो. या अत्यल्प कालावधीत शेवटच्या विचारापासून बॅक ट्रॅक करत पहिल्या विचारा पर्यंत येणं हा मनाची प्रक्रिया जाणण्याचं एकमेव मार्ग आहे हे तर जबरदस्तच..
कुणाला काही चांगलं वाटलं, नवं वाटलं, प्रयत्न करुन पाहावासा वाटला आणि त्यानं थोडी स्तुती करायचा अवकाश... की झाली जळजळ सुरु!