Welcome to misalpav.com
लेखक: सतीश आंबेरकर | प्रसिद्ध:
३२० दिवसांची ती सायकल सफर मी जेव्हा पूर्ण केली तेव्हा एका स्वप्नपूर्तीचे समाधान मला लाभले . ह्या सफरीने मला बरेच काही शिकवले ,अनुभव दिले. तो नुसताच प्रवास नव्हता तो एक अभ्यास होता ह्या जगाचा आणि त्यातील वैविध्याचा. त्या परीक्रमेतले माझे अभुभव मी व्याख्यानामधून किंवा मित्र प्ररीवारासोबत बरेचदा बोलण्यातून मांडले. हे अनुभव पुस्तकरूपाने मांडण्याची इछा फार काळ मनात घर करून होती. काही ना काही कारणामुळे त्या इच्छेला मी बगल देत होतो. गेली २ वर्ष मात्र मी त्या इछेचा पाठपुरावा केला आणि तो जगप्रवास आज "दोन चाकं झपाटलेली " ह्या पुस्तकामध्ये शब्धबद्ध झाला आहे. १ जून २०१४ ला हे पुस्तक प्रकाशित होत आहे , मिपा वरती बरेच मराठी लेखक आणि वाचक सक्रिय असल्यामुळे येथे ही बातमी आवर्जून जाहीर कराविशी वाटली. तुमच्या प्रतिसादाची मी अपेक्षा करतो . सतीश आंबेरकर
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

स्थळ : नवदीप विद्यालय , जयप्रकाश नगर ,गोरेगाव (पू ) मुंबई ४०० ०६३ रविवार १ जून ,२०१४ संध्याकाळी ६

अभिनंदन, तसा मि पुस्तके कमी वाचतो पण तुमचे हे पुस्तक मी नक्की वाचण्याचा प्रयत्न करेन

माहिती नका देवु थोडेफार लिहा इथे पुस्तकाबद्दल. किंवा शॉर्टकट मधे एखादे प्रकरण टाका.

इरसालशी सहमत. दोन चाक झपाटलेली यातलं स्वत:च्या आतलं पहिलं चाक केव्हा झपाटलं गेलं. सफर कोणती होती, स्वप्न कोणतं होतं. प्रवास कुठे सुरु झाला. प्रवासवर्णनातील काही आठवणी. आणि अशाच काही आठवणीसाठी माझं पुस्तक जरुर वाचा असं काही तरी. आम्हा वाचकांना काही उत्कंठा लागेल असं...! -दिलीप बिरुटे

जाहिरात झाली आता इतर वेळेस पण मिपावर येत चला ! पुस्तकासाठी अभिनंदन आणि शुभेच्छा

बर्‍याच वेळा किंचीत विचार करून आणि वैयक्तिक नसलेले प्रतिसाद जास्त शिकवून जातात. अर्थात, नाना प्रकारे गहन विचारी माणसांच्या नादी लागून, मिपा वर येणे ज्यांनी बंद केले असेल, तर त्यांच्या सारखे अभागी तेच.

विचारांना किंचीत विचार , गहन विचार , अथवा नुसता विचार अथवा इतर कसल्याही क्याटेगॉरी मधे न अडकवण्याची... आणी ते समजुन घ्यायची इछ्चा शक्ती निर्माण करण्याची. शुभेच्छा. प्रतिसाद आवडला. - धन्यवाद.

वो क्या बोल रयेलाय , तुम क्या बोल रये हो... ( ह घ्या) पुस्तक प्रकाशनासाठी शुभेच्छा ! उतम विषय आहे. लिहिते रहा. पुस्तकातील काही पाने इथे टाकलीत तरी , सूज्ञ मिपाकर विकत घेऊनच वाचतील. जे घेणार नाहीत ते तसे ही घेणार नाहीतच ! अवांतर - मिपावरील कुणाच्या , कोणत्या प्रतिसादाची कदर करावी आणि कोणते फाट्यावर मारावेत या विषयांवर एका प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करावे अशी मी मा. संपादक मंडळाला नम्र विनंती करतो. याच प्रशिक्षण वर्गात मिपा शब्द्कोषाचे एक स्वतंत्र मोड्युल असावे आणि व्यक्ति व कार्य अशी एक कार्यशाळा असावी. बाकी जाणकार सद्स्य भर घालतीलच. यानिमित्तने मिपाचे प्रायमर म्हणून, "मा.संपादक,मिपावर मी काय वाचू?" अशी पुस्तिकाही प्रकाशित करावी ही विनंती !

वो क्या बोल रयेलाय , तुम क्या बोल रये हो...
मै सिर्फ इत्ताच कहरयेलाय.. की प्रतिसाद पडके कै लोग उस्का क्याटेगरी बनाके कंपुबाजी करेलाय. अगर वो रुक जाता हय.. तो लोगोंके खुली हवा मे लिखनेका मौका मिल सकता हय.. ये समजना मंगता. औ इस्के लिये मय तमाम अंतरजालकर लोगांनु बेस्ट विशेश देरैला... इत्ताच्य.

वैच .. बराब्बर बोला. उस्के वास्ते लोगोन्को ट्रेनिंग देना पड्ता.फिर कित्तीभी क्याटेगरी बन्ने दो.. कुच फर्क नै पडेगा. वर्ना लोगा नाराज होके चला जाता. इत्ताच मय बोल्ताय.

बेवखुपां छोडदे तो बहुत अच्छे अच्छे लोगां इधर लेखनेको आ सकता हय. अभी क्या होरेलाय ? लिचींग कल्चर की वजह से आप नये लेखकोंको पुरेसा प्रोत्साहीत नही कर रहे हो. उनको ये लग रहा हय की अगर आप अमुक तमुक लिचर नही हो तो आपको प्रतिसाद नही मिलेंगे. अगर आप लिचर बन गये तोही लिखाण कर सकेंगे. यह एक वास्त्वीकता है. पर बेवखुपां गुमराह करेले हय. अ‍ॅज अ मेटर ऑफ फेक्ट अगर कोइ लिचींगी नही करन चाहता तो आप उसको "गहन" भी कह डालते हो. आज ऐसी बिमारी यहा पर हय की एक की गहन बात आपको गहन लगती हय तो दुसरेकी गहन बात रॉक्सं बन जाती हय. मय ऐसी दोमुही फुक्टबिहारी प्रव्रुत्ती की कडी शब्दोमे आलोचना मंगता हुं...

रोचक विषय. रच्याकने: कुणी अरुण वेढीकर यांचे 'मुंबै ते काश्मीर सायकल प्रवास' हे पुस्तक वाचलेय का? जबर्‍या आहे एकदम.