Welcome to misalpav.com
लेखक: माधुरी विनायक | प्रसिद्ध:
भडकमकर या आडनावाचा भडक मकर असा उच्चार करणाऱ्या सरदारजीचा विनोद फार जुना झाला, नाही का. उच्चारातल्या या आणखी काही गमती-जमती.. कार्यबाहुल्यामुळे - या शब्दाचा उच्चार कार्यबाहु ल्ल्या मुळे असा केला जातो. (ल वर आघात) नवख्या /अमराठी माध्यमात शिकलेल्या मुलांकडून कार्य बाहुल्या मुळे (बाहुला?) असा उच्चार ऐकून मौज वाटली. 'काटकसर' -काही वर्षांपूर्वी शेजारची पाचव्या इयत्तेत शिकणारी मुलगी लोकसत्ता घेऊन आली. मला एका पानावरची गोष्ट, खरं तर शीर्षक दाखवलं. ते होतं, 'काटकसर'. तिची तक्रार - ताई, या गोष्टीत कोणीच काटक सर नाहीत... क्वात्रोची - हे प्रकरण प्रसार माध्यमांमध्ये गाजत होतं, तेव्हाची गोष्ट. शिकाऊ पत्रकार बराच वेळ अनेक शब्दकोश ( अवांतर - शब्दकोशाला आमच्या एका वरीष्ठ अधिकाऱ्याने शब्देश्वरी असा सुरेख शब्द बहाल केलाय) घेऊन बसला होता. त्याला विचारलं, कोणत्या शब्दाचा अर्थ शोधतोयस? तो उत्तरला, खूप मोट्ठ स्पेलिंग आहे. थांबा, बातमी दाखवतो. तो शब्द होता... Ottavio Quattrocchi. अवांतर - त्याला हे दोन्ही शब्द समजले नव्हते. संदर्भाने हे नाव आहे, इतकं समजू शकलं असतं कदाचित, पण चुकीच्या पद्धतीने मजकुराचा अनुवाद करायचा प्रयत्न केला, अर्थात आधी शब्द नंतर प्रत्येक शब्दाचा अर्थ, नंतर वाक्य... त्यामुळे... असो. इथे मी चुकीच्या पद्धतीने अनुवाद करायचा प्रयत्न असं म्हटलंय. त्याचा अर्थ काय? तर इंग्रजी मजकुरावरून बातमी करायची असेल तेव्हा आमच्या आकाशवाणीतल्या वयाने, मानाने आणि अनुभवानेही ज्येष्ठ असणाऱ्या वरीष्ठांच्या शब्दात सांगायचं तर... 'इंग्रजी मजकूर पूर्ण वाचून घे. किमान पदवीधर इतकी शैक्षणिक पात्रता असणाऱ्या व्यक्तीला त्या मजकुरातला महत्वाचा आशय कळावा, इतकी माफक अपेक्षा आहे. कदाचित खूप शब्द समजणारही नाहीत. पूर्ण मजकूर दोन वेळा वाचून घे. आता तो कागद बाजूला ठेव आणि त्यात काय म्हटलंय, ते मला सांग. तू मला जे सांगशील, तीच बातमी. आकडेवारी, महत्त्वाची नावं वगळता, नेमकं काय झालं, ते सांगता आलं पाहिजे. तो कागद समोर ठेवून बातमी करायची नाही' हाच नियम भाषांतर अथवा अनुवादाच्या सर्व प्रकारांना लावता येईल, नाही का? विषय थोडा भरकटला का? पण एका ओघात लिहून गेले हे सगळं... उच्चारांच्या आणखीही गमती असतील तुमच्याकडे, तर वाचायला आवडतील...
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

हॅ:! फारच लवकर आवरतं घेतलंत हो! आत्ता कुठे मी सरसावून बसायला लागलो होतो वाचायला एव्हढ्यात संपलंही? :-( पण जे लिहिलयत ते एकदम झकास! उच्चाराने अर्थ कसा बदलतो त्याचे जुने उदाहरण- शाळेत जाउन ये X शाळेत जाऊ नये!

आपल्या माजी राष्ट्राध्यक्षा स्वातन्त्र्यदिन वगैरे राष्ट्रीय महत्वाच्या दिवशी राष्ट्राला उद्देशून जे सन्देश प्रसारित करत, ते सन्देश सगळ्या भारताबाहेरील भारतीय वकिलातीत वाचून दाखवले जाताना अनेक वेळा त्यान्चे नाव "प्रतिभादेवी सिन्गपाटील" असे वाचले गेलेले ("प्रतिभा देवीसिन्ग पाटील" च्या ऐवजी) ऐकलेले आहे.

खाडीदेशांत काम करताना माझ्या एका मराठी सहकारी मित्राचे "बामणीकर" हे आडनाव मल्याळी मंडळी "बाम पणिक्कर" असे उच्चारीत असत याची आठवण आली :) नाना पळशीकर या नावावरचा पांवि तर प्रसिद्धच आहे ;)

नाना पळशीकर या नावावरचा पांवि तर प्रसिद्धच आहे
=)) माझ्या मित्राचे आडनाव "धामोरीकर" आहे...कट्ट्यावर सगळे त्याला "धाव मोरीत कर" बोलवतात :)

आमच्या फडके नांवाच्या मित्राला कुरियर घेऊन आलेला अमराठी माणूस 'ये फाडके कहाँ रहते है?' विचारत आला होता.

वर भडकमकर आडनावाच्या तोडफोडीतून घडलेला एक विनोद दिला आहे. याच आडनावावरील दुसरी एक कोटी ऐकण्यात आली आहे. एक थोड्या तापट स्वभावाच्या बाई एका सरकारी दप्तरात काम करत असत. त्यांच्याशी संपर्क येणारी काही माणसे त्यांना भडक कम कर असे सांगत.

पुर्वी एके ठिकाणी काम करताना कंपनीत शॄंगारपुरे नावाचा माणूस होता. त्याच्याकडून काहीही चुक झाली तर त्याचा बॉस गंमतीने "आहो शॄंगारपुरे... आता शॄंगार पुरे करा, आणि काम करा लवकर" असे म्हणायचा. अर्थात तो शॄंगारपुरेही हे गंमतीनेच घ्यायचा...!! कोठेतरी वाचनात आलेला विनोद : एक माणूस "एडवर्ड द अत्रे" कोठे आहे असे विचारत होता. नंतर काहीच्या लक्षात आले की ते "edward theatre" असे आहे. "theatre चे the atre" अशी तोडफोड केली होती. बाकी नतुरे आणि फुटुरे चा विनोद सर्वांना माहित असेलच...

आता "राण्डे" आपल्याला मार्गदर्शन करतील, असे भर सभेत म्हणून आमच्या "रानडे" ला एकाने जागीच झोपवला होता.. :)

एक ऐकीव कथा, पण त्यातल्या प्रमुख पात्रांना भेटलो असल्यामुळे शक्यतेच्या कोटीतली: --------------- एका कारखान्यात आरपीआय-शिवसेनेची कामगार यूनियन होती. युनियन चांगलीच ष्ट्राँग असल्याने मॅनेजमेंट दबकून असे. कारखान्याच्या फायनान्स कंट्रोलरपदी एक मल्लू गृहस्थ आले. सुरस आणि चमत्कारिक कथा ऐकल्या असल्याने त्यांनी युनियनपासून चार हात लांबच रहायचं असं ठरवलं. तसाही अकाऊंट्समध्ये असल्याने त्यांचा कामगारांशी थेट संबंध येत नसे. पण डोकेबाज युनियन प्रत्येक खात्यात आपला एकतरी माणूस पेरतेच. तसा त्यांनी अकाऊंट्समध्ये एक भालेराव नामक इसम बसवला होता. कंट्रोलरसाहेबांनी त्याच्याशी पंगा घ्यायचा नाही असं ठरवलं. जपून जपून वागायचे. शक्यतोवर भालेरावला कामं सांगायचे नाहीत. तरी एक दिवस असा उजाडला की भालेरावला काम सांगणं कंट्रोलरसाहेबांना भाग पडलं. कामही काही ग्रेट नव्हतं - स्टँप व्हेंडरकडून काही कागद आणायचे होते (फ्रँकिंगपूर्व जमाना). कंट्रोलरसाहेब स्वतः उठून भीत भीत भालेरावच्या टेबलाशी गेले. कंट्रोलरसाहेब: भालेराव, आर यू बीसी? आख्खं ऑफिस दचकलं. टाचणीस्फोट शांतता पसरली. भालेरावही अवाक! कंट्रोलरसाहेब: आय हॅड सम वर्क फॉर यू. टेल मी, आर यू बीसी? भालेरावचा चेहेरा संतल्त व्हायला लागला होता. चारचौघांत जात काढतो म्हणजे काय! कंट्रोलरसाहेब: (भालेराव काहीच बोलत नाही हे पाहून) डोंट वरी. इफ यू आर बीसी, आय विल आस्क समवन एल्स. भालेराव संतापाने थरथरायला लागला होता. "बीसी" आहे म्हणून काम देत नाही? भेदभाव? अ‍ॅट्रोसिटी? इतक्यात एकाच्या डोक्यात बल्ब पेटला. "भालेराव, अरे बीझी आहेस का तू, असं विचारताहेत. बीझी." खुदकन सगळे हसले. वातावरणातला ताण एकदम सैलावला. भालेराव स्वतः हसला, आणि कंट्रोलरसाहेबांकडून काम समजून घेऊन स्टँप आणायला गेला. कंट्रोलरसाहेबांना शेवटपर्यंत आपण काय गोंधळ केला हे कळलं नाही!

*lol* मल्लूंच्या इंग्रजी उच्चारांविषयी काय बोलावं. या इसी, बिसीशिवाय आणि काही खास उच्चार मी स्वतः ऐकले आहेत. "भोत बॉर हो गया" "रॉड भोत हॉट था" "मै णा कल होर्स राईड किया"... आणि मग बास्स आम्ही त्याला चारचौघात ओळख देणं बंद केलं. :D

माझ्या एका क्लायंटचं आडनाव "होर" होतं. बंगाली गृहस्थ. त्याच्याकडून बिलाचे पैसे आले, की सहकारी म्हणायचे "ही इज द ओन्ली वन आय हॅव सीन हू गेट्स पेड बाय द होर." ;)

एकदा अशीच उच्चारातली गंमत माझ्या मुलानेही केली होती.मराठी पुस्तकातल काहितरी वाचत होता आणि एक शब्द काही त्याला समजेना.मला येउन विचारल की, आई सुतक ताई कोण ग?मलाही संदर्भ लागेना.शेवटी पुस्तक वाचल्यावर कळले.तो शब्द 'सुतकताइ' असा होता.महात्मा गांधी सुतकताइ करत.असे वाक्य होते.आणि हा भलत्याच ठीकाणी शब्दफोड करत होता.

हा माझ्या एका कामात घडलेला खरोखर खरा किस्सा आहे.. मी आणि एक गुर्जी एक लगिन लावायला गेलो होतो. पोरगी आपली आणि पोरगा आम्रविकेतला! आधि त्यानी आंम्हाला,तिथे गेल्या गेल्या ण्हःमॅस्क्कार - केला. आणि दुभाषा मार्फत मला(मंजे त्याला) मंत्रोच्चार करवून घ्यायला संकोचू नका..आरण त्यानी आपल्या उच्चारांची सवय केल्ये असं सांगितलं. कन्यादान,कंकणबंधन होइपर्यंत फार प्रश्न आला नाही.पण मंगळसूत्रा..वेळी उभौ गणपति-पूजनाचा संकल्प सांगायची वेळ आली..आणि मला काहि पूर्वानुभव अठवून बरचस भ्यायला झालं. तो दुभाषा म्हणून जो नेमलेला होता..त्याला पण मेल्याला..त्यादिवशी भारी आग आलिवती. मी त्याला फक्त "मम" म्हणायला लाऊन पुढला संकल्प ऐकायला लावायच्या बेतात होतो..पण "हा" ऐके ना! म..म्हटलं मरा आज हसून हसून... आणि मग मी मख्ख चेहेरा ठेऊन सुरवात केली.. :- मम आत्मनः श्रुति:स्मृति पुराणोक्त फलप्राप्त्यर्थं (त्याचं डायरेक्ट उच्चा रण ऐकू आपण अता!)>>> ममा..आट् मुणः (इथे फोटोग्राफर "पडला!") शूतीत..मुति... (अख्खा मांडव अडवा....सलग १० मिनिटं!) फुल्नोख्त् फॅलाह्प्प्रा .. थॅर थम (आणि मी यमसदनाला पोहोचलो....!)

हा वरील किस्सा घडला..ते ठिकाण मंजे एका थ्री स्टार हॉटेलातला ,बँक्वीट का कसलासा म्हणतात तो HiFi हॉल होता. त्यामुळे स्टेजवरची माइक व्यवस्था प्रचंड अपडेट होती..परिणामी..त्या फॉरे नरानी उच्चारलेलं अक्षर अन् अक्षर ..गर्दित शेवट पर्यंत प्रत्येकाला ऐकू जात होतं! =))

बँक्वीट का कसलासा म्हणतात तो HiFi हॉल होता.
अर्रे...ब्लांकेट हाल यारों...ब्लांकेट हाल मे घूसते ही पूरा लोगां नाचरेले... साभार - "द" अंग्रेझ :)

हा वरील किस्सा घडला..ते ठिकाण मंजे एका थ्री स्टार हॉटेलातला ,बँक्वीट का कसलासा म्हणतात तो HiFi हॉल होता. त्यामुळे स्टेजवरची माइक व्यवस्था प्रचंड अपडेट होती..परिणामी..त्या फॉरे नरानी उच्चारलेलं अक्षर अन् अक्षर ..गर्दित शेवट पर्यंत प्रत्येकाला ऐकू जात होतं! =))

हा वरील किस्सा घडला..ते ठिकाण मंजे एका थ्री स्टार हॉटेलातला ,बँक्वीट का कसलासा म्हणतात तो HiFi हॉल होता. त्यामुळे स्टेजवरची माइक व्यवस्था प्रचंड अपडेट होती..परिणामी..त्या फॉरे नरानी उच्चारलेलं अक्षर अन् अक्षर ..गर्दित शेवट पर्यंत प्रत्येकाला ऐकू जात होतं! =))

मिपाची व्यवस्थाही तितकीच अपडेट असल्याने बुवांचा प्रतिसाद तीन लाटांत प्रत्येक मिपाकरामार्फत गेलेला आहे ;) (पळा पळा मेलो)

आमच्या ऑफीसमधे घडलेला किस्सा. अमेरीकेत आमच्या कंपनीचे हेडऑफीस आहे. तिकडून वीई हू नावाचा चिनी माणूस पुण्याच्या ऑफीसला भेट दयायला आला होता.एके दिवशी त्याच्या बायकोचा अमेरीकेवरून फोन आला. रिसेप्शनिस्ट जागेवर नसल्यामुळे सिक्युरीटीने फोन उचलला. त्याला तिचे उच्चार कळले नाहीत म्हणून त्याने आमच्या फॅसिलिटी मॅनेजरकडे फोन ट्रांस्फर केला. फॅसिलिटी मॅनेजरला कुणी चिनी पाहुणा आलाय याची कल्पना नव्ह्ती. अमेरीकेवरुन वीई हू ची पत्नी बोलत होती " हेल्लो, आय अ‍ॅम हूज वाइफ स्पीकिंग..." "हाऊ डु आय नो हुज वाइफ इज स्पीकिंग?"- फॅसिलिटी मॅनेजर. "नो नो, आय अ‍ॅम हूज वाइफ स्पीकिंग" ती. मग त्या मॅनेजरला कुणीतरी सांगितले की वीई हू साठी फोन असेल. चूकून तुमच्याकडे ट्रांस्फर केलाय :-)

वस्कन ओरडलास्की
सोबतच उभा काबस्की, हे हुंग ते हुंग, इ. रशियन आणि चिनी व्यक्तिमत्त्वे आठवली.

अजूनेक जबरी किस्सा... एका पेट्रोलियम कंपनीत एक ओडिया पोरगा. स-श-ष मध्ये काही फरक म्हणून असतो हे गावीच नाही. आडातच नाही तिथे पोहर्‍यात कुठून येणार? तर एक प्रयोग केला, त्यात करड्या रंगाची राख नंतर काळी झाली असे सांगायचे होते. तर साहेब सुरू झाले: "माय अ‍ॅ$$ वॉज ब्राऊन, देन इट गॉट ब्लॅक". सहकारी पोरे हसूनहसून मरायच्या घाईला. त्याला वाटलं आपल्यावर विश्वास ठेवेनात कोणी, मग परत म्हणतो कसा, "नो नो, आय अ‍ॅम नॉट जोकिंग, इट रियली हॅपन्ड!!" =)) =)) =)) =)) =))

Mattomme. व आणि ब एकच असल्याने >> १ भन्नाट किस्सा आमच्या ऑफिसात घडला होता. एका बंगाल्याला विचारले की तुला यायला उशीर का झाला बाबा? त्याला म्हणायचे होते I got my walls painted today. (अर्थातच घरच्या भिंती) फक्त व चा ब केला त्याने.

एक सर्वसाधारण निरीक्षण आहे की महाराष्ट्रातील मराठी मातृभाषा असणार्‍या (आणि मराठी तसेच इंग्रजी माध्यमात शिकलेल्या) व्यक्तींचे इंग्रजी उच्चार भारतातील इतर प्रांतातील लोकांच्या तुलनेने फारच सफाईदार असतात.

पंजाबी लोकांचे उच्चार तर अजूनच विचित्र असतात मारुती = मृत्ति बारीक = ब्रिक एक विनोद - एका महिलेने सरदारजींना वेळ विचारली तर त्यांनी त्यांच्या उच्चारात १२:३५ सांगतिले आणि मार खाल्ला. का ते तुम्हीच बघा :)

एका मराठी सरांनी कालेजात anna नावाच्या मुलीची हजेरीबुकात बघून "अण्णा, प्लीज स्टॅंड अप" म्हणून विकेट घेतलेली बघितली आहे. *biggrin*

बापरे! हसून पुरेवाट झालीये. हैदराबादेस एक संपूर्ण तेलुगु महिला (हिंदीचा गंध नसलेली) काहीतरी विचारायला आली. अशा महिला नेहमी माझी कामवाली बाई असतानाच येत असत कारण ती आमची दुभाषी असे. ते धुणे भांड्यापेक्षा वेगळे काम करताना मजाही वाटत असे, कारण इथे ती आमची बॉस! तर ही येऊन काहीतरी विचारती झाली बहुतेक "अम्मा आहे का?" यावर पद्माने उत्साहाने हातातील ओले फडके बाजूला टाकले व हसत हसत त्या बाईंना "रंडी, रंडी" व आणखी काहीतरी म्हणू लागली. मी घाबरून एकाजागी गप्प उभी. त्यावर त्या बाई हसत हसत येऊन बसल्या. थोडावेळ दुभाषीगिरी करून पद्माने त्यांना काम विचारले तर त्यांच्याकडचा कढीपत्ता संपल्याने आमच्या झाडाचा थोडा नेऊ का हे विचारायला आल्या होत्या. नंतर तिनेच माझा गैरसमज दूर केला व या, बसा असे म्हणताना रंडी म्हणावे असे सुचवले. तसेच शेजार्‍यांना सांगून मी पालेभाज्या विकणारी बाई आली की पाठवा म्हणून सांगितले. एक बाई येऊन अककुरा पाहिजे का असे विचारून गेली. मी नको म्हणून सांगितले. नंतर ती शेजार्‍यांना घेऊनच आली मग समजले. माझ्या मुलाने सध्या अभ्यासातला एक प्रश्न विचारताना कांड्रगप्ट मोरया कोण हे विचारले. तो इंडियन आहे व असोका त्याचा ग्रँडसन आहे वगैरे विचारले. आता मला काही लक्षात नाही म्हणून पाहिले तर (पुस्तकातील स्पेलींग चुकल्याने)चंद्रगुप्त मौर्य व अशोका यांचा एक धडा होता.