इस्पीकचा एक्का
@परत एकदा (तरी) लग्न करावसं वाटायला लागलंय >>> अर्र्रे... लै वेळा लावणार! =))
मृत्युन्जय
@अजुन येउ द्यात>>> जी सर!
सूड
@ 'ठेवणीतले' उखाणे द्यायचे की बुवा !! >>>या सामन्याच्या शेवटच्या १५ ओव्हर बाकि आहेत अजून! ;)
मला ही सर्व मालिका कैच्याकै आवडलेली आहे. फारच मस्त आणि मिस्किल लिहिता तुम्ही. मायबोलीवरची अन्न वै प्राणा ही मालिका जेवण म्हटले तर हे चटपटीत मस्त मधल्यावेळचे खाणे आहे. परत परत वाचणार. :)
माझा एक परश्न आहे. मुलीचे वडील वारलेले असल्यास हे सर्व विधी कोण करणार? मला ते लग्न समारंभात कारुण्या फारुण्य नकोय. दणक्यात लगिन झाले पाहिजे.
@मुलीचे वडील वारलेले असल्यास हे सर्व विधी कोण करणार? >>> मी या बाबतीत २ निर्णय यजमानां समोर ठेवतो.
१) मुलिच्या आईची 'इच्छा' असल्यास ...तिच्याकडुन.
२) मुलिच्या वडिलांच्या भूमिकेतुन,जो कोणी विधिंना बसायला तयार असेल..त्याच्याकडून!
@आई नसल्यास??>>> एकट्या वडिलांकडून..किंवा त्यांची एकट्यानी विधी करायची इच्छा नसल्यास..ज्याला ह्यात सहभागी होण्याची मनापासून इच्छा आहे..अश्या दुसर्या कुणाकडुनही..!
___/\___ मस्त हो गुरुजी!
असेच विचार समाजाला पुढे नेतील.
बहुतेकदा विधवा स्त्रीला तिचा नवरा नसणं हा तिचा स्वतःचा काही गुन्हा असल्यागत मागे थांबावं लागतं. आयुष्यभर राबून, कधीतरी एकटीनं खस्ता खाऊन मुलामुलीच्या कार्यात बिचारीला काहीही करता येत नाही. त्या मंगल प्रसंगी पूर्वी ह्या स्त्रीला नि मुलांना दारात उभं न केलेले काका कन्यादान करतात नि मिरवतात. अगदी सगळं केलेलं असलं तरी तो अधिकार आईपासून हिरावून घेतला का जातो हे समजत नाही. विधुरांची परिस्थिती आपल्या पुरुषप्रधान समाजाकडून तितकीशी वाईट झालेली नाही असं वाटतंय.
मी या बाबतीत २ निर्णय यजमानां समोर ठेवतो.
१) मुलिच्या आईची 'इच्छा' असल्यास ...तिच्याकडुन.
२) मुलिच्या वडिलांच्या भूमिकेतुन,जो कोणी विधिंना बसायला तयार असेल..त्याच्याकडून!
असेच म्हणतो. अप्रतीम लेख. आमच्या लग्नाची आठवण आली. त्यात गुरूजींना मी 'पुत्रप्राप्त्यर्थ' ऐवजी 'कन्याप्राप्त्यर्थ' असे मुद्दाम म्हणायला लावले होते. :-)
@त्यात गुरूजींना मी 'पुत्रप्राप्त्यर्थ' ऐवजी 'कन्याप्राप्त्यर्थ' असे मुद्दाम म्हणायला लावले होते. Smile>>> अतिशय कौतुकास्पद! आपण यजमान लोकांनीच आंम्हाला अश्या गोष्टी करायला सांगितल्या तर धर्म काळाबरोबर रहायला मदत होइल.
या निमित्तानी...आज..आणखि काही थोडेसे:-
मी चालू विवाह संस्कारात काहि बदल केलेले आहेत,ते मांडतो.
१) मुलिचे वडील मुलाच्या वडिलांना आमची मुलगी दहा प्रकारच्या दोषांनी रहित असल्याची खात्री देणारा,अभिवचन वजा श्लोक वदवून घेण्याचा विधी, मी काढून टाकलेला आहे.
अव्यंगे,अक्लीबे,अपतिते(इत्यादी प्रकारचे..) दशदोष विवर्जिते
इमां कन्यां प्रदास्यामी देवाग्नि द्विज संन्निधौ
२) शचीपूजनातला श्लोक मुलिला समजाऊन सांगून,बदलवून म्हणवुन घेतो.
देवेंद्राणी नमस्तुभ्यं देवेंद्रप्रीय भामिनी
विवाहभाग्यमारोग्यं संतती* लाभं च देही मे (हा शब्द बदल, व्याकरण दृष्ट्या बरोबर की चूक..हे मला माहित नाही..पण परिणाम-कारक आहे,हे मात्र नक्की!)
*मूळ श्लोकातः- पुत्र लाभं च देही मे..असं आहे!
३)तसेच... विवाहाच्या अदल्या दिवशी संध्याकाळी केला जाणारा, वांङ्निश्चय..हा विधी निरर्र्थक असल्याचं मी सांगून पहातो.ऐकलं..तर फक्त व्याही भेट/सिमांत पूजन आणि नंतर मुलिची पूजा करवून वस्त्र/ओटी/औक्षण..इत्यादी करवून विषय संपवतो. पण याला फारसा पाठिंबा मिळत नाही. हीच गोष्ट रुखवताचे भोजन ह्या संपूर्ण दिखाऊ विधीच्या बाबतीतही घडते.तो तर गैरलागू झालेला विधी आहे.पण तो फोटोत-जाऊन बसलेला असल्यानी...उष्टावण केल्यासारखा करावाच लागतो!
मागे तुम्ही एका प्रतिसादात तुमच्या मित्राचे लग्न तुमच्या घरीच कसे फक्त प्रतिज्ञा म्हणायची एवढाच विधी करवून लावले होते त्याची आठवण झाली. तुम्हांला आमच्याकडून जोरदार पाठींबा.
हौसेच्या नावाखाली हे सगळं करवून घेतलं जातं. लग्नात नवरा-नवरीचं कुणीच काही ऐकत नसतं. ज्यालात्याला आपला अजेंडा पुढे दामटायचा असतो. आमच्या लग्नात आमचं फक्त त्या काकांनी ऐकलं आणि 'पुत्रप्राप्त्यर्थ' ऐवजी 'कन्या तरी का? अपत्यप्राप्त्यर्थ असे म्हणूया.' असे केलं. तरी आम्ही 'कन्याप्राप्त्यर्थ' असेच म्हणायला लावले. :-) म्हणालो, कन्याच झाली पाहिजे. नाही झाली तर दत्तक घेणार. :-)
रच्याकने - हे सगळं काय करायचे आहे? कशाला हवी ती औपचारिकता, गडबडगोंधळ, निरर्थक विधींचा गुंता, श्रेष्ठ-कनिष्ठपणा... मियाँबीबी राजी तो क्यूँ कुछ करे काझी? दोघांनी एकमेकांना पसंत केलं, शपथपूर्वक परस्परांचा आयुष्याचा जोडीदार म्हणून स्वीकार केला की बास. झालं लग्न. बाकी दुनिया गेली खड्ड्यात. :-)
खरच. आपल्याला सगळे नाही तरी थोडेफार आपल्या मनात आहे त्या पद्धतिने लग्न करता आले तर किती मजा येईल पण तसे होत नाही. उदा. उग्गीच तासन् तास डोळ्यातून पाणी काढत होमकुंडासमोर बसणे, नको तेवढे मानपान, शेकडो लोकांच्या जेवणावळी वगैरे. मुलीला सासरी पाठवताना गडगडाटी गर्जना करत रडायलाच पाहिजे का? मी अज्याबात रडले नव्हते म्हणून सगळ्यांची पंचाईत झाली होती. बाबा तर म्हणाले की बाई गं, निदान शास्त्रापुरते दोन अश्रू डोळ्यातून काढ! ;) नंतर बरेचजण चिडवत होते की तुझ्या लग्नात आमचा रडायचा चान्स गेला म्हणून! ;) पण काही लग्नांमध्ये लोक धाय मोकलून रडताना पाहिलेत आणि मुलगी पलिकडच्या बिल्डींगमध्ये सासरी चालली होती. एका केसमध्ये तर ती वरील मजल्यावरून खालच्या जमल्यावर रहायला जाणार होती पण (म्हणूनच की काय) सासरचेही रडत होते.
@ह्याचे कॉपीराईट्स चुचू यांचेकडे आहेत.>>> नाsssssssssssही! :-/ चुचू बिचू जुनी लोकं झाली. :-/ नव्या काळात ते हक्क आहेत फक्त आमच्या किच्चू तै कडे! *biggrin* तिच्या सारखं टायपो-बोब्लं लेकन कुनीच करु शकत नै!!! *lol*
.
.
.
.
पण किच्चू तै पण अता गायब झाली...येतच नै मिपावर! :-/
वाचतीये हो गुरुजी! सगळी फिल्म डोळ्यासमोरून सरकतीये. माझ्या मुलानं आपल्या पद्धतीनं लगीन करायचं ठरवलं तर तुम्हाला संपर्क करीन पण त्याला खूप वर्षे आहेत अजून. आम्ही इतर आया बायांचे ड्वायलॉग मात्र म्हणणारच! ;) तुमच्या मालिकेचा निमित्तानं सगळ्यांना आपापल्या लग्नातलं काहीबाही आठवत राहतं.
फॅन आपण तुमचे. हा ऑप्शन लक्षात आला नव्हता. धन्यवाद. मला विधी करता आले तर छानच. आणि तुम्ही गुरुजी असणार हे नक्कीच. बघा साताठ वर्षे आधीच सांगते आहे. सध्यातरी मराठी पद्धतीने लग्न आणि मग एक मोठी पार्टी असा अंधुक प्लॅन आहे. नवरदेवही कुठेतरी दहावी बारावी करत असणार.
मस्त चाललीये लेखमाला.
वर आलेले काही प्रतिसाद देखील आवडले, जसे की आईने लग्नात विधी करणे आणि कन्या/अपत्य
प्राप्त्यर्थम आणि इतर. या निमित्ताने अजून एक, पौरोहित्य करणाऱ्या दोन महिला देखील ओळखीच्या आहेत. माझे लग्न लावणाऱ्या त्यांच्यापैकीच एक होत्या. इतरही धार्मिक कार्यात या काकू पौरोहित्य करतात आणि त्यांच्या मते देखील स्त्रिया इच्छा असल्यास ही कार्ये करू शकतात. ह्याबाबत तुमचे मत आणि अनुभव वाचायला आवडेल. तुमच्या ओळखीत आहेत का कुणी?
१)रेवती
@माझ्या मुलानं आपल्या पद्धतीनं लगीन करायचं ठरवलं तर
तुम्हाला संपर्क करीन पण त्याला खूप वर्षे आहेत अजून.>>> नक्कीच! आत्मूगुर्जी हाजिर है। :)
@आम्ही इतर आया बायांचे ड्वायलॉग मात्र म्हणणारच! >>> *biggrin* नाही म्हणलेत,तर मी म्हणवेन..अहो,कढीत आलं हवच हो!!! *biggrin*
२)पेट थेरपी
@मला विधी करता आले तर छानच. आणि तुम्ही गुरुजी असणार हे नक्कीच.
बघा साताठ वर्षे आधीच सांगते आहे.>>> नोंद घेतल्या गेली आहे! :)
=================
मि.पा.करां-कडची लावितो लग्ने।आत्मूगुर्जी आत्ममग्ने॥ - अशी सही घ्यायला लागणार..आता! =))
३)स्वॅप्स
@अहो ते गुरुजीच आहेत.>>> =))
हो की नाही ओ आत्मूगुर्जी?>>> व्हय..व्हय! *biggrin*
४)मधुरा देशपांडे
@ह्याबाबत तुमचे मत आणि अनुभव वाचायला आवडेल.तुमच्या ओळखीत आहेत का कुणी?>>> आहेत.>>>महिला पुरोहितांच्या बाबतीत माझे मत असे,की पौरोहित्याचे काम त्या त्या धर्म समाजातल्या कुणालाही करता आलं पाहिजे..करू दिलं पाहिजे.अता फक्त,हे होतं असं,की मक्तेदारी मोडून काढताना,जुनं मोडतं आणि नवं जुन्याहून जुनं होऊन अंगावर येतं.मग मोडलं काय? आणि मांडलं काय? असा प्रश्न येतो. दुर्दैवानी सध्या महिला पुरोहितांच्या बाबतीत असच काहिसं होत आहे. त्यांना आपण नविन क्षेत्रात मुसंडी मारली,याच्या आनंद होण्यापेक्षा उन्माद येतो आहे...की काय अशी शंका येते.ज्या लग्न कार्यात त्या समोरुन/दुसर्या बाजूकडून येतात..त्यात काहि ठिकाणी-"तुमचं जुनं कसं चुकिचं होतं,आणि आमचं नवं(?) कसं जास्ती बरोब्बर आहे"..असा भाव असतो.ज्या संयमी असतात..त्या कामाशी काम म्हणून रहातात.त्यांच वेगळं..पण काहि महिला पुरोहित मी म्हटल्या सारखा व्यवहार करताना मला अढळल्या आहेत.पुण्यात ज्ञानप्रबोधिनी नावाची जी नवी वैदिकधर्मीय महिला पुरोहित शाखा आहे. त्यांच्यात हा प्रकार विशेष अढळतो. त्या करातात ,ते पौरोहित्य आमचं परंपरागतच आहे.फक्त त्याला लोकांना भावेल असा नवा टच दिलाय. (एखाद्या जुन्या पदार्थात थोडी फेरफार करून नविन नाव द्यावं..तसा!) (शिवाय,ज्ञानप्रबोधिनी वाल्यांनी त्यांना वेदोक्त मंत्र हे स्वर-रहित का शिकविले आहेत???-याचंही मला कोडं आहे,आणि त्याबद्दल शंकाही आहे!)
त्यांच्यातली चांगली गोष्ट म्हणजे धर्मविधितल्या काही लोकपरिणामकारक गोष्टींचं त्यांनी केलेलं मराठीकरण, आणि काहि ठिकाणी ,आलेल्या आप्तेष्टांचापरिणामकारक लोकसहभाग! (ह्या दोन्ही गोष्टी मलाही अवडल्या/योग्य वाटल्यामुळे मी त्या त्यांच्याकडून उचलल्या आहेत.)
मला चांगल्या वाटलेल्या गोष्टी मी वर नोंदवलेल्या आहेतच.पण आक्षेप आहे..तो समाजमनामधे, नविन पेरणी करताना काहिच नविन न आणल्याबद्द्ल!...काहि विधी/क्रीया तर जुन्याहूनी जुने म्हणावे अश्याही दिसून येतात. धर्मातल्या विषम आणि चुकिच्या मुल्यांचं गोग्गोड समर्थनही केलं जातं(हा प्रकार आमच्याकडेही होतो)... माझं म्हणणं असं आहे,की जुन्या/चुकिच्या गोष्टी सोडताना..(पुरोहित/यजमान-दोघांनिही)त्या आपल्याच चुका आहेत,अशी जाहिर कबुली देऊन सोडल्या पाहिजेत.किमान...उल्लेख तरी आला पाहिजे.आणि मग त्या जागी नवमुल्यांची/विधिंची प्रतिष्ठापना केली पाहिजे...आणि नेमकं हेच होत नाही,कारण या नव्यांनाही जुन्याचच कौतुक अधिक आहे.
मी कन्यादानाचा विधी ज्यांना नको असतो,त्यांना त्या विधीची निर्मिती..त्याची योग्या.योग्यता सांगून त्या जागी वधु/वर-स्विकाराचा नविन विधी करवून घेतो...( या उप्पर..एके ठिकाणी वादविवादामधे पैज मारून,मी घट्स्फोटाचाही विधी ,,,एकांना रुपकामधे सांगितला होता..आणि करवून घेण्याची तयारीही दर्शविली होती..पण बेगडी/दिखाऊ पुरोगामित्वा-सारखे..ते ही,बरोब्बर वेळेला मागे हटले..असो!) या सगळ्या चर्वितचर्वणाचा मतितार्थ नवापंथ किंवा नवमत आणताना..ते खरच नव आणि आधुनिक असलं पाहिजे,जुन्या भांड्याला गुपचुप केलेलं पॉलिश नको...!!! :)
या शिवाय,-महिलांना आमच्यातल्याच काहि गुरु-जनांनी,जसे धर्मविधी शिकवले..ती परंपरा समाजानी उचलुन धरून,पुढे चालु ठेवायला सहाय्य केलं पाहिजे,ब्राम्हण मुलं ज्या लहान वयात वेदपाठशाळेत दाखल होतात,त्याच वयात मुली दाखल करवून त्यांना संपूर्ण वेदोक्त (दशग्रंथी) शिक्षणाचा आग्रह आणि कृती केली पाहिजे.(म्हणजे खर्या महिला पुरोहित तयार होतील,आणि धर्मातली स्त्रीविषयक विषमता मिटायला..खरी मदत होइल)..तसेच.. हिंदुसमाजातील सगळ्यांनी,ब्राम्हणेतर-मुला/मुलिंना(ही) वेदपाठशाळांमधे वेदोक्त शिक्षणासाठी प्रवेश देण्याची इच्छा/प्रयत्न केले पाहिजेत.(यामुळे धर्मातली सगळीच विषमता मिटायला एक फार मोठ्ठी सुरवात होऊ शकते,फक्त त्या दृष्टीनी सकारात्मक आणि खरेखुरे नवे दृष्टीकोन बाळगून..योग्य कार्यक्रम आखले गेले पाहिजेत.) हे मी सगळं हिंदूसमजाच्या अंगावर ढकलून मोकळा होत नाहीये,तर.आज जसा मी,माझ्या मतिनी तयार झालेलो आहे,तसे हजार तयार व्हावे,ही इच्छा अहे म्हणून हे मत मांडतो आहे..आणि या इच्छेस्तव,प्रचलीत धर्मव्यवस्थेवर समाजाचा आवश्यक असा रेटा पडला,तरच हे घडू शकेल..असं(आज तरी) वाटतं..म्हणून!
प्रतिसाद आवडला!!!
ज्ञानप्रबोधिनी विषयी फारशी माहिती नाही. तुम्ही म्हणताय तसा अनुभव असेलही. असे व्हायला नको हेही खरे. मी ज्यांना ओळखते त्या ज्ञानप्रबोधिनी किंवा पुण्यातल्याही नाहीत. त्या जेव्हा पौरोहित्य करतात तेव्हा बरेच प्रश्नार्थक/आश्चर्यकारक चेहरे दिसतातच पण हळूहळू का होईना बुलढाण्यासारख्या लहानगावात त्यांच्यामुळे काही प्रमाणात तरी प्रबोधन होत आहे. लोकांचा दृष्टीकोन बदलायला हवा हेच महत्वाचे.
@ त्या जेव्हा पौरोहित्य करतात तेव्हा बरेच प्रश्नार्थक/आश्चर्यकारक चेहरे दिसतातच>>> ते बायका स्कूलव्हॅन/रिक्षा चालवायला लागल्या,तेंव्हाही दिसले होते.पण ते केवळ आपल्या नजरेला सवय होइपर्यंतच असतं
@ पण हळूहळू का होईना बुलढाण्यासारख्या लहानगावात त्यांच्यामुळे काही प्रमाणात तरी प्रबोधन होत आहे. लोकांचा दृष्टीकोन बदलायला हवा हेच महत्वाचे.>>> +१
प्रचलीत धर्मव्यवस्थेवर समाजाचा आवश्यक असा रेटा पडला,तरच हे घडू शकेल. "समाजाचा आवश्यक असा रेटा" हीच खरी लाखाची गोष्ट... मग ती धर्मव्यवस्था असो वा राजकारण !
प्रतिक्रिया
धमाल !
+१
पुर्वार्धात पहिलं लग्न होऊन
मस्त हो गुरुजी!
फुल्टू धमाल.............!!!!!
मस्तच हो गुर्जी. वाचतोय.
मस्त!! आणखी एकदोन 'ठेवणीतले'
इस्पीकचा एक्का
>>>> अर्र्रे... लै वेळा
हाहा , बुव्या पेटलाय
:-)
मस्तच.
मला ही सर्व मालिका कैच्याकै
@मुलीचे वडील वारलेले असल्यास
आई नसल्यास??
@आई नसल्यास??>>> एकट्या
___/\___ मस्त हो गुरुजी!
१) मुलिच्या आईची 'इच्छा'
मी या बाबतीत २ निर्णय यजमानां
+१
@त्यात गुरूजींना मी
या निमित्तानी...आज..आणखि काही थोडेसे:-
मी चालू विवाह संस्कारात काहि बदल केलेले आहेत,ते मांडतो. १) मुलिचे वडील मुलाच्या वडिलांना आमची मुलगी दहा प्रकारच्या दोषांनी रहित असल्याची खात्री देणारा,अभिवचन वजा श्लोक वदवून घेण्याचा विधी, मी काढून टाकलेला आहे. अव्यंगे,अक्लीबे,अपतिते(इत्यादी प्रकारचे..) दशदोष विवर्जिते इमां कन्यां प्रदास्यामी देवाग्नि द्विज संन्निधौ २) शचीपूजनातला श्लोक मुलिला समजाऊन सांगून,बदलवून म्हणवुन घेतो. देवेंद्राणी नमस्तुभ्यं देवेंद्रप्रीय भामिनी विवाहभाग्यमारोग्यं संतती* लाभं च देही मे (हा शब्द बदल, व्याकरण दृष्ट्या बरोबर की चूक..हे मला माहित नाही..पण परिणाम-कारक आहे,हे मात्र नक्की!) *मूळ श्लोकातः- पुत्र लाभं च देही मे..असं आहे! ३)तसेच... विवाहाच्या अदल्या दिवशी संध्याकाळी केला जाणारा, वांङ्निश्चय..हा विधी निरर्र्थक असल्याचं मी सांगून पहातो.ऐकलं..तर फक्त व्याही भेट/सिमांत पूजन आणि नंतर मुलिची पूजा करवून वस्त्र/ओटी/औक्षण..इत्यादी करवून विषय संपवतो. पण याला फारसा पाठिंबा मिळत नाही. हीच गोष्ट रुखवताचे भोजन ह्या संपूर्ण दिखाऊ विधीच्या बाबतीतही घडते.तो तर गैरलागू झालेला विधी आहे.पण तो फोटोत-जाऊन बसलेला असल्यानी...उष्टावण केल्यासारखा करावाच लागतो!आपल्यासारखे पुरोहित जास्त नसतात हो
खरच. आपल्याला सगळे नाही तरी
अवांतर
धाय धाय
कुंतुन कुंतुन अथव्न
अच्रत बव्लत
अच्रत बव्लत
@ह्याचे कॉपीराईट्स चुचू
अत बल्गम्दल्व येतत
एक नंबर विचार आणि उपाय !
मस्त !!!
जबराट लिहिलंय! बुवांचा
बुवेश्वर भटजी.
वाचतीये हो गुरुजी! सगळी फिल्म
खरेच छान समजावून सांगितले आहेत तुम्ही.
सन्माननीय संमं
अहो त्या त्यांच्या मुलीसाठी
अर्रर्र
मस्त चाललीये लेखमाला
मस्त लेखमालेतील
गुर्जी लै तयारीचे हैत.
१)रेवती
प्रतिसाद आवडला
@ त्या जेव्हा पौरोहित्य करतात
+१
प्रचलीत धर्मव्यवस्थेवर समाजाचा आवश्यक असा रेटा पडला,तरच हे घडू शकेल."समाजाचा आवश्यक असा रेटा" हीच खरी लाखाची गोष्ट... मग ती धर्मव्यवस्था असो वा राजकारण !मस्त!