Welcome to misalpav.com
लेखक: प्रसाद गोडबोले | प्रसिद्ध:
'संतसूर्य तुकाराम' व 'लोकसखा ज्ञानेश्वर' ही पुस्तके फाडून टाका http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/Saint-Tukaram-Dnyaneshwar-Anand-Yadav-Court/articleshow/36343839.cms आत्ताच ही बातमी वाचनात आली , वाचुन अत्यंत आनंद झाला ! जरा कुठे हिंदु अस्मितेचा उदय होत आहे असे वाटले :) (आता हा अब की बार ... चा इफेक्ट आहे की नाही देव जाणे ) पण काही का असेना हिंदुंनाही , अल्पसंख्य नसले तरीही , भावना असतात आणि त्याचा आदर करायला शिकले पाहिजे हळुहळु लोकांना कळायला लागले आहे . नाही तर उगाच कोणीही यावे टीकली मारुनी जावेटाईप जो उठसुट धर्मावर टीका करतोय हे पाहण्याचा कंटाळा आला होता ! कोणी हिंदुंच्या देवी देवतांची नग्न चित्रे काढतो तर म्हणे व्यक्तीस्वातंत्र आणि कोणी इंग्लंड मधे पुस्तक प्रकाशित केले तर त्याचावर पहिला बॅन आमच्या देशात ...तेव्हा व्यक्तिस्वातंत्र नाही तेव्हा अल्पसंख्यांच्या भावना दुखावणारे लेखन ! हिंदुंची मंदीरें ताब्यात घ्या ...अन इतरांना फंडींग करा आम्ही "हिंदुराष्ट्र" म्हणले की देषद्रोह आणि तिकडे मेघालय , नागालॅन्ड जाहीरपणे स्वतःला ख्रिश्चन स्टेट डीक्लीयर करतात तर ते देशप्रेमी ! कश्मीरमधे लाखो पंडीतं देशोधडीला लागले त्यांची काळजी नाही पण बांग्लादेषातुन आलेल्या बिच्चार्‍या घुसखोरांचे काय होणार ह्याची सरकारला चिंता !! ह्या धर्मातल्या अंधश्रध्दांविरुध्द बिनधास्त कायदे करा आणि महाराष्ट्रातील एक प्रख्यात "फादर" सेन्ट बनण्याच्या प्रक्रियेतल्या 'चमत्कारांचे' समर्थन करतात ते गुपचुप ऐकुन घ्या !! बस्स . बस्स . बस्स. आता असा दुटप्पीपणा चालणार नाही ...आता सगळ्यांना समान कायदा ...आता हिंदुंच्या भावनांचाही विचार करावा लागेल... उचलली जीभ आणि लावली टाळ्याला हे चालणार नाही आणि वाकडेतिकडे बोललात तर त्याची संपुर्ण जबाबदारी घ्यावी लागेल ! आणि हळु हळु लोकांच्या लक्षात येईल स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे ... स्वातंत्रासोबत जबाबदारीही येत असते. Freedom comes with responsibility .....or Consequences !
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

सहमत! बाकी विषय '(इतर पंथांच्या तुलनेनं) हिंदू अस्मितेचा उदय' असा काहीसा असावा का की '(स्वधर्मीयांच्या विचारांच्या खंडनाच्या स्वरुपात) हिंदू अस्मितेचा उदय' असं अपेक्षित आहे असं लेखकाला नम्रपणं विचारु इच्छितो. ;)

हा महत्वाचा प्रश्ण विचारलात प्यारेजी ... आणि उत्तर आहे (इतर पंथांच्या तुलनेनं) हिंदू अस्मितेचा उदय' हिंदु लोक ऐकुन घेतात म्हणुन त्यांच्या संतांवर कैच्याकै टीका करा , त्यांच्या देवी देवतांची नागडी उघडी चित्रे काढा , "मंदीरांपेक्षा शौचालये महत्वाची" , "वारी बंद करा ", असली कैच्याकाइ विधाने करा , हिंदुंच्या अंधश्रधांविरुध्द कायदा करा अन इतरांना बिन्धास्त सोडुन द्या , गणपती आले की पाणी प्रदुषणाच्या गप्पा , दिवाळी आली की वायु प्रदुषण थोडक्यात काय तर येन केन प्रकारेण हिंदुंचे कसे चुकते अन हिंदु धर्म कसा बावळटांचा धर्म आहे हे ठसवत रहाणे ...सतत तेजोभंग करत रहाणे.... भले मग हिंदुंच्या भावना दुखावल्या तरी चालतील ... कारण ते अल्पसंख्य नाहीत ना !! हे आता बस्स झाले. "भले तरी देवु कासेची लंगोटी | नाठाळाची माथी काठी हाणु ||" " धटासी व्हावे धट | उध्दटासी उध्दट | खटनटासी खटनट | कैसा शोभे ||" आणि वितंडवाद्यांनी वाट्टेल तसा अर्थ काढु नये म्हणुन हे स्पष्टीकरण "हिंदु धर्मात वाईट प्रथा परंपरा आहेतच त्या निंद्यच आहेत आणि त्यांचे निर्मुलन व्हायलाच पाहेजे " पण ज्यांना हिंदु धर्माविषयी आस्था नाही , धर्माचा प्रसार प्रचार व्हावा अशी इच्छा नाही अशा लोकांनी आता बोलु नये. हिंदु लोक त्यांचे प्रॉब्लेम्स स्वतःच्या बळावर सोडवतील... सावरकरांसारख्यानी हिंदु धर्मावर टीका केली तर चालेल पण ना.वा. टिळकांसारख्यानी केली तर ती अजिबात खपवुन घेवु नये !!

"मंदीरांपेक्षा शौचालये महत्वाची"
मंदिरांपेक्षा शौचालये जास्त महत्वाची आहेत...भारतात ५०% पेक्षा जास्त जनता उघड्यावर शौचाला जाते...आणि त्यातल्या स्त्रीयांचे प्रमाण बघता .... जौदे जोपर्यंत तुमच्या ओळखितल्यापैकी कोणी या परीस्तिथीतुन जात नाही तो पर्यंत नाही कळणार
"वारी बंद करा "
असे कोण , कोणास, कधी, कुठे, कशासंधर्भात बोलले??? काही विदा आहे का? असला तर मला बघायला आवडेल...आणि पटले तर मी सुध्धा तुमच्या बाजुला
गणपती आले की पाणी प्रदुषणाच्या गप्पा , दिवाळी आली की वायु प्रदुषण
हे खरेच आहे...८०% लोकांनी सण साजरा करताना हजारो टन प्लास्टर ओफ ऑफ प्यारिस पाण्यात सोडले जाणे...४-५ दिवस हवा धुराने भरुन जाणे हे प्रदुषणच आहे आणि उरलेल्या २०% मधे...त्यांचे कान घरच्या सोनारानेच टोचले पाहिजेत (हे वाक्य समजले नाही तर हा प्रतिसाद वाचला नाही तरी चालेल)

१. तुम्ही कीती सार्वजनिक शौचालयं बांधुन दिलीत ? किंव्वा कितीवेळा तुमच्या नगर सेवकाकडे अर्ज केलात ? कितीवेळा ग्रामविकासमंत्री / मुख्यमंत्री / पंतप्रधान ह्यांना ह्या विषयी पत्र पाठवले ? २.पॅस्टर ऑफ पॅरीस नको म्हणुन किती वेळा समाज प्रभोधन केले ? किती मातीच्या मुर्तीकारांना समर्थन दिलेत ? दिवाळी हा दिव्यांचा उत्सव आहे म्हणुन किती प्रचार केलात ? किती वेळा फटाक्याच्या स्टॉल शेजारी उभेराहुन लोकांना तुमचे मत समजावलेत ? तुम्ही खरंच काही सकारात्मक काम केले असेल तर तुम्हाला मी सावरकरांच्या कॅटेगरीत घालतो आणि तुमच्या विषयी आदर व्यक्त करतो पण तुम्हचे स्वतःचे क्लाहीच योगदान नसेल आणि तुम्ही 'हिंदुं मधील प्रथा किती फालतु आहेत , हिंदु धर्म किती बावळट अंधश्रध्दांना चिकटुन रहातो ' असला प्रचार करीत असाल तर मी तुम्हाला ना.वा.टिळक कॅटेघरीत घालतो अन तुमचा निशेध करतो !

रेव्हरंड टिळक. यांनी हिंदू धर्म त्यागून क्रिस्टियन धर्म स्वीकारला. यांची पत्नी लक्ष्मीबाई टिळकांचे 'स्मृतीचित्रे' हे पुस्तक अतिशय सुरेख आहे आणि ह्यात हा सर्व घटनाक्रम वर्णिला आहे.
लेखक: एस वेळ: गुरुवार, 06/12/2014 - 15:39 Permalink

१. तुम्ही कीती सार्वजनिक शौचालयं बांधुन दिलीत ? किंव्वा कितीवेळा तुमच्या नगर सेवकाकडे अर्ज केलात ? कितीवेळा ग्रामविकासमंत्री / मुख्यमंत्री / पंतप्रधान ह्यांना ह्या विषयी पत्र पाठवले ? २.पॅस्टर ऑफ पॅरीस नको म्हणुन किती वेळा समाज प्रभोधन केले ? किती मातीच्या मुर्तीकारांना समर्थन दिलेत ? दिवाळी हा दिव्यांचा उत्सव आहे म्हणुन किती प्रचार केलात ? किती वेळा फटाक्याच्या स्टॉल शेजारी उभेराहुन लोकांना तुमचे मत समजावलेत ?
आपण या सगळ्या गोष्टी केल्या आहेत, करत आहात आणि त्यामुळे तुम्हांला इतरांना ह्या नाही तर त्या क्याट्येगरीत घालण्याचा अधिकार आहे असे गृहीत धरू.
तुम्ही खरंच काही सकारात्मक काम केले असेल तर तुम्हाला मी सावरकरांच्या कॅटेगरीत घालतो आणि तुमच्या विषयी आदर व्यक्त करतो पण तुम्हचे स्वतःचे क्लाहीच योगदान नसेल आणि तुम्ही 'हिंदुं मधील प्रथा किती फालतु आहेत , हिंदु धर्म किती बावळट अंधश्रध्दांना चिकटुन रहातो ' असला प्रचार करीत असाल तर मी तुम्हाला ना.वा.टिळक कॅटेघरीत घालतो अन तुमचा निशेध करतो !
धर्माच्या बाबतीत सकारात्मक काम करणे किंवा योगदान देणे म्हणजे काय? आपल्याच धर्माच्या निंदनीय व माणुसकीला काळिमा फासणार्‍या रूढीपरंपरा धर्मातून हद्दपार करणे हे सकारात्मक नाही काय? आणि समजा एखाद्याने काहीच न करता स्वतःच्या धर्माबद्दल काही मत - मग ते नकारात्मक का असेना - व्यक्त केले तर त्याला तुमच्या दृष्टीने अजिबात किंमत नाही. का बरं? धर्म, जात, सामाजिक परिस्थिती इत्यादी बाबी मनुष्याच्या जन्मापासून त्याला चिकटतात. कोणी असे म्हणत नाही की माझे मूल सुजाण वयाचे झाल्यावर त्याचे त्याला ठरवू दे कुठला धर्म स्वीकारायचा ते. मी आत्तापासूनच माझ्या संततीला अमुक धर्माच्या पद्धतीनुसार वाढवणार नाही. मला असे म्हणायचे आहे की, समजा माझ्या धर्माबद्दल असे काही योगदान मी दिले नसेल तर त्याचा अर्थ मला माझ्या धर्मावर टीका करण्याचा हक्क नाहीये का? आहे. जरूर आहे. कारण मला माझा धर्म आहे तसा फॉलो करायचा नसला तरी जन्मापासूनच माझा धर्म निश्चित झाल्यामुळे त्याचा बरावाईट परिणाम माझ्यावर होतो. त्यापासून सुटका केवळ धर्मांतरामुळेच काही प्रमाणात शक्य आहे. त्याचेही ना घर का ना घाटका असं होऊन बसतं. एकूणच मानवसंस्कृतीत संपूर्ण धार्मिक निरपेक्षता प्रत्यक्ष व्यवहारात शक्य होत नाही. अशी परिस्थिती असताना मी गप्प का बसायचं? केवळ स्वयंघोषित संस्कृतीरक्षकांच्या हुल्लडबाजीला घाबरून? बादवे, ज्याला तथाकथित हिंदू धर्म म्हणलं जातं त्याबद्दल प्रबोधनकारांचे जे मत आहे तेच माझंही मत आहे.

१. तुम्ही कीती सार्वजनिक शौचालयं बांधुन दिलीत ? किंव्वा कितीवेळा तुमच्या नगर सेवकाकडे अर्ज केलात ? कितीवेळा ग्रामविकासमंत्री / मुख्यमंत्री / पंतप्रधान ह्यांना ह्या विषयी पत्र पाठवले ?
म्हणजे शौचालयांची गरज आहे ...ते सुध्धा खुप मोठ्या जनसमुदायासाठी हे तुम्ही(सुध्धा) मानता...मग मंदिरांची गरज आणि शौचालयांची गरज यातील कोणती गरज लवकर पुर्ण झाली पाहिजे??? १. लोकांनी उघड्यावर शौचास जाणे चालेल पण सर्व सार्वजनिक ठिकाणी मंदिर असले पाहिजे २. उघड्यावर शौचास जाणार्या लोकांची संख्या झपाट्याने कमी झाली पण लोकांनी घरातल्या देवाच्या तसबीरीपुढे हात जोडले तरी चालतील शाळेत गेलेले एखादे शेंबडे पोरसुध्धा यातला २ पर्याय निवडेल
२.पॅस्टर ऑफ पॅरीस नको म्हणुन किती वेळा समाज प्रभोधन केले ? किती मातीच्या मुर्तीकारांना समर्थन दिलेत ? दिवाळी हा दिव्यांचा उत्सव आहे म्हणुन किती प्रचार केलात ? किती वेळा फटाक्याच्या स्टॉल शेजारी उभेराहुन लोकांना तुमचे मत समजावलेत ?
हे सगळे शाळेत्/कॉलेजात असताना केलेले आहे...आतासुध्धा जमेल तसे करतो आणि मी हे केले तरच माझा मुद्दा बरोबर ठरतो असा जर तुमचा समज असेल तर मग मलापण विचारावेसे वाटते की तुमच्या घरात शौचालय असले पाहिजे की देवघर???
तुम्ही खरंच काही सकारात्मक काम केले असेल तर तुम्हाला मी सावरकरांच्या कॅटेगरीत घालतो आणि तुमच्या विषयी आदर व्यक्त करतो पण तुम्हचे स्वतःचे क्लाहीच योगदान नसेल आणि तुम्ही 'हिंदुं मधील प्रथा किती फालतु आहेत , हिंदु धर्म किती बावळट अंधश्रध्दांना चिकटुन रहातो ' असला प्रचार करीत असाल तर मी तुम्हाला ना.वा.टिळक कॅटेघरीत घालतो अन तुमचा निशेध करतो !
मला कोणत्याही क्याटेगरीत टाकायची गरज नाहिये ... तितका तुमचा "अभ्यास" आणि "अधिकार" दोन्ही नाहिये
'हिंदुं मधील प्रथा किती फालतु आहेत , हिंदु धर्म किती बावळट अंधश्रध्दांना चिकटुन रहातो '
अशाबाबतीत मी अजुन कुठेही आणि काहिही लिहिलेले नाही...हे तुमचे "मनचे श्लोक" आहेत
असला प्रचार करीत असाल तर मी तुम्हाला ना.वा.टिळक कॅटेघरीत घालतो अन तुमचा निशेध करतो
आधी मी कधी कुठे कोणाचा कशासाठीही "प्रचार" केला आहे त्याचा "अभ्यास" करा आणि मग जर त्यावर विचार केलाच तर आधी समोरच्याचे मतपरिवर्तन विचारानेच करता येते का ते पहा ...हे सगळे झाल्यावरच माझा निषेध करा उगाचच उंटाच्या.... (म्हण माहित नसेल तर अभ्यास करा)

१. तुम्ही कीती सार्वजनिक शौचालयं बांधुन दिलीत ? किंव्वा कितीवेळा तुमच्या नगर सेवकाकडे अर्ज केलात ? कितीवेळा ग्रामविकासमंत्री / मुख्यमंत्री / पंतप्रधान ह्यांना ह्या विषयी पत्र पाठवले ?
>>> ह्या प्रस्नाला तुम्ही व्यवस्थित बगल दिली आहेत , त्या मुळे तुम्ही ह्यातले काहीच केलेले नाहीत असा संशय येत आहे .
२.पॅस्टर ऑफ पॅरीस नको म्हणुन किती वेळा समाज प्रभोधन केले ? किती मातीच्या मुर्तीकारांना समर्थन दिलेत ? दिवाळी हा दिव्यांचा उत्सव आहे म्हणुन किती प्रचार केलात ? किती वेळा फटाक्याच्या स्टॉल शेजारी उभेराहुन लोकांना तुमचे मत समजावलेत ?
>> ह्या बद्दल अभिनंदन ... हे कार्य वाढवावे , गणेशोस्तव बंद करा असे म्हनण्यापेक्षा मातीच्या मुर्ती वापरु असे जर तुम्ही समाजाला संदेश देत असाल तर तुम्हाला ह्या विषयावर बोलण्याचा अधिकार प्राप्त होतो ...मला हेच म्हणायचे होते :)
अशाबाबतीत मी अजुन कुठेही आणि काहिही लिहिलेले नाही...हे तुमचे "मनचे श्लोक" आहेत
इथे तुम्ही प्रतइकात्मक आहात हो ... काहीच न करता उगाच नुसती भाषणे झाडणारी १०० माणसे मी तुम्हाला भेटवुन देईन ह्या येत्या गणेशोत्स्वात !!
मला कोणत्याही क्याटेगरीत टाकायची गरज नाहिये ... तितका तुमचा "अभ्यास" आणि "अधिकार" दोन्ही नाहिये
बरं ! सध्या तुम्हाला अभ्यास आणि अधिकार ह्यातील फरक समजला , मला जो मुद्दा मांडायचा होता तो कन्वे झालाय , ह्यात आनंद मानतो ... बाकी माझ्या अभ्यासावर आणि अधिकारावर भेटल्यावर निवांत चर्चा करु :)

छे छे छे! किती तरी हिंदु व्यक्ती हिंदु धर्माबद्द्लच कस्सं कस्सं वैट्ट वैट्ट बोलताहेत. काही पोच्च राहिलेला नाही! हजारोवर्षांपूर्वीचा व जुना का असेना इतक्या पवित्र धर्माबद्दल असं बोल्लात तर नरकात जाल (ते शक्य नसेल तर जेल मध्ये जाण्याचेही दिवस दूर नाहित)

मी तर आता भारतात कॉन्संट्रेशन क्यांप कधी सुरु होतात आणि त्यासाठी जमीन अधिग्रहण कधी सुरु होतय त्याची वाट बघतोय.

तुम्ही पुस्तकं बरीच वाचली असतील पण स्वतःचा योगशास्त्राचा अभ्यास किती आहे? न्युटनचा किवा कुठलाही भौतिक शास्त्राचा नियम लावण्याचं तात्पर्य काय ?
मला योगशास्त्रामधलं काहीही कळत नाही. मात्र विज्ञानाचा विद्यार्थी म्हणून एव्हढं कळतं की या विश्वात निसर्गनियमांपलिकडे जाऊन काहीही घडत नाही. निसर्गाच्या नियमांचं आकलन किंवा विशेष ज्ञान म्हणजे विज्ञान. न्युटनचा गतिविषयक पहिला नियम हाही निसर्गाचाच नियम. न्युटनने त्याला फक्त त्याची पडताळणी करुन विधान स्वरुपात मांडणी केली. तर हा नियम असं म्हणतो की कोणतेही बल लावले नसेल तर अचल अवस्थेतील वस्तू चलमान होऊ शकत नाही. हे जगाच्या पाठीवर कुठेही शक्य नाही.
अध्यात्मशास्त्राचा नियम भौतिक शास्त्राला लावलेला चालेल का?
अतिशय हास्यास्पद विधान. मुळात अध्यात्मशास्त्र म्हणून काही नाही. जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी शास्त्रामध्ये एकवाक्यता असते. भारतातला शास्त्रज्ञ एक बोलतोय, अमेरिकेतला शास्त्रज्ञ वेगळं बोलतोय असं होत नाही. अध्यात्माला फारतर विचारसरणी किंवा आयुष्याकडे, जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोण म्हणता येईल. हा दृष्टीकोण व्यक्तीगणिक बदलू शकतो. नव्हे, तो बदलतोच. एकवाक्यता अशी नसतेच. अध्यात्मामध्ये प्रत्येकाचा "अनुभव" वेगळा, प्रत्येकाची "अनुभूती" वेगळी. काय प्रमाण आणि कोण अधिकारी हे कसं ठरवणार? आणि मुळात जे समोरच्या व्यक्तीला प्रमाण वाटतंय ते मला मान्यच नसेल तर? ज्ञानदेव काहींना विष्णुचे अवतार वाटतात, मला मात्र ते एक महान तत्वज्ञ, श्रेष्ठ दर्जाचे कवी पण तरीही तुमच्याआमच्यासारखे माणुसच वाटतात. कोणाचं म्हणणं प्रमाण मानायचं?

कोणाचं म्हणणं प्रमाण मानायचं? >> ज्यांना ज्ञानोबांमधलं विष्णुत्व दिसतं त्यांनी ते मानावं, आणि ज्यांना ते कवी, तत्वज्ञ म्हणून भावतात, त्यानी ते अंगिंकारावं. जो जे वांछिल अशी प्रार्थना खुद्द ज्ञानोबांनीच केली आहे, हे विसरु नये, म्हणजे झालं. :)

आम्हीही केव्हाचं तेच म्हटलंय. :)
आता कुणी जर म्हणत असेल की ज्ञानदेवांनी आपल्या योगसामर्थ्याने भींत चालवली तर म्हणोत बापडे.

फरक इतकाच असावा की ज्ञानदेवांनी जेह्वा ते म्हटलंय तेह्वा कोणाला 'बापडे' समजलेल नाही वा तसा भाव मनात बाळगलेला नाही. लै लै मोठठाल्ला फरक है बाप्पा!

फरक इतकाच असावा की ज्ञानदेवांनी जेह्वा ते म्हटलंय तेह्वा कोणाला 'बापडे' समजलेल नाही वा तसा भाव मनात बाळगलेला नाही.
एकदम मान्य. म्हणून तर त्यांना माऊली म्हणतात. मी वापरलेला "बापडे" हा शब्द "एकविसावे शतक चालू असताना, विज्ञान ईतके प्रगत झाले असताना लोक नको त्या गोष्टींचा अभिमान बाळगून फुरफुरतात त्याबद्दल वाईट वाटते" अशा अर्थी होता.

>>> एकविसावे शतक चालू असताना, विज्ञान ईतके प्रगत झाले असताना लोक नको त्या गोष्टींचा अभिमान बाळगून फुरफुरतात त्याबद्दल वाईट वाटते :)

धन्या तेच तर. प्रत्येकाला आपल्याला काय अधिक महत्वाचं वाटतं ते ठरवायचा मूलभूत हक्क आहेच की. मग जर एखाद्याला विज्ञान तुझ्याइतकं महत्वाचं वाटत नसेल तरीही त्यात काही चुकीचं नाही. आहे का? तुझी श्रद्धा विज्ञानावर, एखाद्याची अध्यात्मावर आणि कोणाची, आणि कुठे. :)

तुझी श्रद्धा विज्ञानावर
एव्हढं सोडून बाकीचं पटलं. श्रद्धा म्हणजे एखादया व्यक्तीचा एखादया गोष्टीवरील ठाम विश्वास. ज्या गोष्टीवर माणसांची श्रद्धा असते त्या गोष्टी वास्तवात सत्य असतातच असं नाही. उदाहरणार्थ सतराव्या शतकात गॅलिलिओने पृथ्वी सूर्याभोवती फिरते असे ठाम प्रतिपादन करेपर्यत लोकांची पृथ्वी विश्वाच्या केंद्रस्थानी आहे अशी श्रद्धा होती जी खोटी होती. सध्या अतिशय प्रसिद्ध असलेला "अंधश्रद्धा" हा शब्दच मुळी चुकीचा आहे. श्रद्धा असते किंवा नसते. त्यात अंध आणि डोळस श्रद्धा असं काही नसते. ज्याची श्रद्धा असते त्याला कुठल्याही पुराव्याची आवश्यकता नसते. विज्ञान हा श्रद्धेचा विषय नाही. तो पडताळून पाहण्याचा विषय आहे. जे पुराव्यांनी सिद्ध करता येत नाही ते विज्ञान नसते.

ओके. >>सध्या अतिशय प्रसिद्ध असलेला "अंधश्रद्धा" हा शब्दच मुळी चुकीचा आहे >> हे मला मान्यच आहे पण अवांतरः कितीश्या "विज्ञानवाद्यांना" हे मान्य असतं? जिथे धर्म आणि रुढी (ज्या चुकीच्या असू शकतात) ह्यातला फरकही न समजावून घेता, हिंदू धर्माच्या निरर्थकपणाबद्दल स्यूडो सुधारक टाहो फोडत राहतात ( ह्या धाग्यावरच उदाहरण आहे! ;) ) तिथे पुढे कशाला काही बोलायचं? (असंही वाटत.) :) असो. :)

मला योगशास्त्रामधलं काहीही कळत नाही. मात्र विज्ञानाचा विद्यार्थी म्हणून एव्हढं कळतं कि विश्वात निसर्गनियमांपलिकडे जाऊन काहीही घडत नाही. . मुळात अध्यात्मशास्त्र म्हणून काही नाही.
तुम्हीच तुमच्या मतावर ठाम नाही आहात . एकीकडे तुम्ही म्हणताय मला एका शास्त्रातल काही काळात नाही. दुसरीकडे म्हणताय दुसरीकडे म्हणताय त्यात हे नाही आणि त्यात ते नाही . काय हास्यास्पद विधान आहेत . हे म्हणजे engineering मध्ये हुशार असलेल्यांनी medical मधलं काही कळत नसताना त्यात हे नाही आणि त्यात ते नाही हे म्हणण्यासारख आहे .
जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी शास्त्रामध्ये एकवाक्यता असते. भारतातला शास्त्रज्ञ एक बोलतोय, अमेरिकेतला शास्त्रज्ञ वेगळं बोलतोय असं होत नाही.
साधकाला त्याच्या तयारीप्रमाणे आणि पुर्व कार्मान्नुसार आलेले अनुभव वेगळे असले तरी अंतिम ज्ञान एकाच असतं . जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी त्या सत्यात एकवाक्यताच असते . सत्य थोडीच बदलतं ? तुकाराम महाराज वेगळं बोलतात आणि ज्ञानेश्वर महाराज किवा कुठलाही'साधक वेगळं बोलतोय असं होत नाही
एकविसावे शतक चालू असताना, विज्ञान ईतके प्रगत झाले असताना लोक नको त्या गोष्टींचा अभिमान बाळगून फुरफुरतात त्याबद्दल वाईट वाटते
अभिमान असणं आणि अहंकारी असणं वेगळं आहे . आम्ही विज्ञानाला कधीच नावं ठेवत नाही किवा विज्ञानाच्या विरोधात अजिबात नाही . विज्ञानात हे नसतं आणि ते नसतं अशी फुकाची फुरफुर करत नाही आम्ही . विज्ञानाच्या पलीकडे काही आहे ह्याचा आम्ही स्वतः अनुभव घेतलेला आहे त्यामुळे आम्ही अभिमानी अहोत. अहंकारी नाही.

तुम्हीच तुमच्या मतावर ठाम नाही आहात . एकीकडे तुम्ही म्हणताय मला एका शास्त्रातल काही काळात नाही. दुसरीकडे म्हणताय दुसरीकडे म्हणताय त्यात हे नाही आणि त्यात ते नाही . काय हास्यास्पद विधान आहेत .
इथे विज्ञान म्हणजे भौतिकशास्त्र. न्युटनच्या नियमांचा अभ्यास भौतिकशास्त्रात होतो. आणि शाळेत गेलेला प्रत्येकजण भौतिकशास्त्र आणि न्युटनचे गतीविषयक नियम शिकलेला असतो. योगशास्त्र हा सर्वत्र शिकवला जाणारा विषय नाही. त्यामुळे त्याबद्दल एखादया व्यक्तीला त्याचे ज्ञान नसेल तर त्यात हास्यास्पद काय आहे? बाकीचे चालू दया. :)

प्लीज नोट : अधिकारावरुन , मी लोहगावातल्या आठवडी बाजारामध्ये सार्वजनीक शौचालयाचा प्रस्ताव आणला, ग्रामसभेमध्ये मंजुर झाल्यावर , निधी आणि त्याचा योग्य वापर करुन बांधुन ही घेतले, अर्थात, देखरेखी खालीच, लवकरच, अजुन पाच एक आठवड्याने ते निशुल्क ही होईल, लोहगावातच जगदगुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या मंदीराच्या सुशोभीकरण्याचा प्रस्ताव ही तीन वर्षांपुर्वी माझ्याच तोंडुन निघाला, त्यात फक्त वर्गणीदारम्हणुनच नव्हे , वर दोन महिने उन्हातान्हाची वर्गणी मागत फिरणार्या कार्यकरणीत ही माझा सहभाग होता. धन्यवात !! वैयक्तीक मत सांगायचे तर हल्ली कुठेतरी कायतरी झाल म्हणुन अस्मितेचा उद्य कसा होतो हा प्रश्न मला पडला आहे ? अस्त झाला होता म्हणायचे की काय ? मग घाशीराम कोतवाल हे काल्पनिक आहे असे तेंडुलकरांनी डिक्लेयर केल्यावर अस्मिता झोपी गेली होती का थोडी वर्ष ( असो .. पुस्तक वाचलं नाही तरी संदर्भ समजण्याईतपत अक्कल आली आहे लोकांना म्हणजे काही ही होवु शकते ) मोरेंच्या वकीलांना विचारले तर कसली आलीये म्हणे अस्मिता ( कसला हिंदु - बांधव, भोंदु-बांधव सगळे ) !! नेमके काय आहे ? s s गेल्या २००९ पासुन हा वाद चालु आहे, आणि त्यामध्ये यादवांना अटक आणि जामीन जोस्जीशी, पेताड मोहन जोशी संमेलनाध्यक्ष चालतात, राष्ट्रीय पुरस्कार मिळालेळा लेखक मात्र चालत नाही, अस्मितेला मात्र २०१४ उजाडल ? ते ही नेमके सरकार आल्यावर असे ज्यांना वाटत असेल, तर ते तसे नाही , वकीलांनी पटवुन दिले की ज्या प्रकारे विटबनेमुळे गेली काही दिवस पुणे पेटतय त्या अनुषंगाने या पुस्तकांवर बंदी आणावी , निकाला त कुठे ही असे म्हटलेले नाही की ही पुस्तके फाडुन टाका , अश्या प्रकारची सामाजिक मानहानी ( मग ती कुठली का असेना ) सर्व च प्रकारची पुस्तके फाडुन टाका ..मला आश्चर्य याचे वाटते की दोघांना दंड कश्यासाठी ? पुस्तक खपलय आणि वर काही जणांनी लिहीलय सुध्दा की आक्षेपार्ह असे काही नाही , मी ही वाचलय ! भक्त असुनही मला आक्षेपार्ह वाटल नाही, एक सरळ साधा लेखन विस्तार.मग त्यात अस्मिता कुठुन आली ? त्या त इथे काही उगा टाळ्या घेण्यासाठी प्रतिसाद उठाठेव करताहेत त्यांची तर कीव करावी तेव्हढी थोडीच आहे .ज्यांचे डोळे उघडे आहेत त्यांनी पान क्रमांक ९३ ९४ नकी वाचावे , बाकीच्यांना अस्मिता लखलाभ होवो अस्मिताच शोधायची असेल तर मोहसिन च्या ब्रुटल मर्डर मध्ये का शोधत नाहीत ? असो ...वेळ थोडा कमी आहे.. त्यामुळे थांबतो

अस्मितेला मात्र २०१४ उजाडल ? ते ही नेमके सरकार आल्यावर असे ज्यांना वाटत असेल, तर ते तसे नाही , वकीलांनी पटवुन दिले की ज्या प्रकारे विटबनेमुळे गेली काही दिवस पुणे पेटतय त्या अनुषंगाने या पुस्तकांवर बंदी आणावी ,
सुहासजी आपण न्यायालयाचा निकाल वाचून हे लिहिले आहेत ? न्यायालयाच्या निकालाचा सध्याच्या घटनांशी संबंध आहे असे म्हणावयाचे आहे का ? संजय सोनवणींनी त्यांच्या ब्लॉगवर न्यायालयाचा निकाल वाचल्याचे म्हटले आहे त्यांच्या पोस्टशी आपला उपरोक्त मजकुर जुळतो असे वाटत नाही. संजय सोनवणींचे बरोबर असेल तर भादवि अंतर्गत येणार्‍या Defamation संबंधातील दोन कलमांतर्गत पुर्वज बदनामीचा खटला वंशजांनी टाकला, कादंबरीस काल्पनिक म्हणण्या एवजी संशोधनपुर्वक लिहिल्याचे लेखकाने म्हटल्यामुळे पुरावे देण्याची वेळ आली असावी, पण तेव्हा हाताशी पुरावे असणे शक्य नव्हते. आनंद यादवांचा वकील कच्चा पडला की आनंद यादव माहीत नाही,(लोक आनंद यादवांना दोष देत आहेत) पण संशोधन या शब्दाचा शब्दशः अर्थ घेतला गेला का की संशोधन शब्दास साहित्यिक अर्थछटा असु शकते हे (आनंद यादवांचा वकील आणि) माननीया न्यायालयाने लक्षात घेतले असावे का ? माझा तुकाराम गाथेचा अभ्यास नाही त्यातील सर्व शब्द समजत नाहीत पण काही गाथांकडे नंतर निर्देश करेन. पण त्यापुर्वी येथे प्रथम एक गोष्ट लक्षात घेतली जावयास हवी ती भारतीय संस्कृतीत इश्वर मानवी अवतार घेतो हे या करताही गृहीत धरले जाते की या जगातल्या सर्व अडी अडचणी तो स्वतः भोगतो आणि मग उपाय देतो. श्रीकृष्ण बालपणी लोण्यावर हात मारतो हे ठिक पण तिरूपती बालाजीची एक कथा विचारात पाडणारी आहे. ज्या देशात इश्वरी अवतार चुकू शकतात आणि नंतर मोठे होतात, वाल्मिकी सारखे ऋषि असतात साहित्यिक एका व्यक्तीत सामान्य गुण होते पण तो नंतर असामान्य झाला हे एवढ्या करता दाखवू इच्छितो की सामान्यगुणांची व्यक्तीही असामान्य पातळी गाठू शकते हे दाखवायचे असते आणि अशी साहित्यिक वर्णने भारतीय साहित्यात आणखीही असतील. तुम्ही लेखकाच्या भूमीकेचे समर्थन करा अथवा न करा, न्यायालये कायद्यांतर्गत काय तो निकाल देतील, तरीपण एका साहित्यिकाच्या लेखना मागे काही चांगलीही भूमीका असू शकते हे समजून घेण्याचा प्रयत्न न करता घेतल्या जाणार्‍या टोकाच्या भूमीका भारतीय संस्कृती समजलेल्यांच्या म्हणवता येतील का हे पाहता यामुद्यावर वारंवार साशंक व्हावयास होते. तुकारामांच्या गाथा अभंग नोंदवतो आहे चुकत असल्यास सांगावे आणि संपादकांकडून उडवावेत. गाथा क्रमांक ओळ तिसरी आणि चौथी मध्ये संत तुकाराम म्हणतात .....नीचवृत्तिकाम । परी मुखीं तुझें नाम ॥२॥ तुका म्हणे सेवे । माझे संकल्प वेचावे ॥३॥ येथे संत महोदय स्वतःकडे कमीपणा घेतात (म्हणजे ते वृत्तीने तसे असतात असे नव्हे). आउट ऑफ काँटेक्स्ट असल्याचा आरोप नको म्हणून आता संपूर्ण अभंग देतो "मज दास करी त्यांचा । संतदासांच्या दासांचा ॥१॥ मग होत कल्पवरी । सुखें गर्भवास हरी ॥ध्रु.॥ नीचवृत्तिकाम । परी मुखीं तुझें नाम ॥२॥ तुका म्हणे सेवे । माझे संकल्प वेचावे ॥३॥ " अठ्ठावनाव्या अभंगात संत तुकाराम म्हणतात "सदा तळमळ । चित्ताचिये हळहळ ॥१॥ त्याचें दर्शन न व्हावें । शव असतां तो जिवे ॥ध्रु.॥ कुशब्दाची घाणी । अमंगळविली वाणी ॥२॥ नेणे शब्द पर । तुका म्हणे परउपकार ॥३॥ " याचा अर्थ पुर्वाश्रमीचे संत तुकाराम आंनद यादव कादंबरीत दाखवतात तसे होत नाही पण माझा म्हणण्याचा उद्देश एक संत माणूस स्वतःकडे स्वतःच्या शब्दा सामान्यपण घेऊ शकतो, एक सामान्य व्यक्ती असामान्य होऊ शकते असा दाखवण्याचा साहित्यिक आनंद यादवांचा प्रमाद पुराव्यांच्या पातळीवर टिकणारा नसेल परंतु साहित्यिकाचा इथे मूळ हेतू चांगला नसण्या पेक्षा चांगला असण्याचीच शक्यता अधीक असावी. अर्थाचे अनर्थ आणि कायद्याची कैची लागण्यास एकच वेळ झाली असे दिसते. आनंद यादवांवर टिकाकरणार्‍यांनी टिका जरूर करावी पण तुम्हाला काळ्या वाटणार्‍या त्या ढगांना असलेली चांगल्या उद्देशाची चंदेरी कडा न पाहता टिका एकांगी तर नाही ना अशी शंका येते आणि संतनिंदा नेमके कोण करते आहे असा प्रश्न पडतो. यामुळे आनंद यादव आणि त्यांचे समकालीन साहित्यिकांच्या कच खाऊ भूमिके बद्दल संजय सोनवणींचा खेद समजून घेता येतो. आपण म्हणता तसा हा खटला न्यायालयात काही वर्षांपासून चालू आहे. त्याचा निकाल लागण्याची वेळ आणि वेगळ्या पक्षाचे सरकार निवडून येणे हा केवळ योगायोग त्याचा बादरायण संबंध लावून भाजपा सरकार निवडून आले नसते काँग्रेसचेच सरकार असते तर खटल्याचा निकाल काही वेगळा लागला असता का ? काँग्रेस सरकारे असतानाचे निकाल न्यायालयांनी दबून दिले होते का ? तसा इतिहास नाही उलटपक्षी सर्वसाधारणपणे भारतीय न्यायालयांची निष्पक्षतता निर्विवाद आहे. धागालेखकाने अप्रत्यक्ष असे निर्देश करणे कदाचित न्यायालयाचा अवमानाच्या कायदेशीर कचाट्यात येणार नाही, पण न कळतका होईना न्यायालयीन प्रक्रीयेस कमी लेखणे संतनिंदेपेक्षा अधीक चुकीचे नाही ना असा प्रश्न पडतो आहे.

सर्वसाधारणपणे भारतीय न्यायालयांची निष्पक्षतता निर्विवाद आहे.
>>> निष्पक्षतता ? 'सॅटॅनिक' वर बॅन आणायला कितीवर्ष घेतली न्यायालयाने ? आणि संतसुर्यवर ? आणि हिंदु किंग इन इस्लामिक इन्डियावर वर ? तुर्तास फक्त वर्षंची आकडेवारी टाका , मग आपण निवांत चर्चा करु निष्पक्षतेवर !
पण न कळतका होईना न्यायालयीन प्रक्रीयेस कमी लेखणे संतनिंदेपेक्षा अधीक चुकीचे नाही ना असा प्रश्न पडतो आहे
न्यायलीन प्रक्रिया किंव्वा न्यायालयाचे निर्णय ह्यांना कमी लेखणे हे अगदी १९४७ पासुन सुरु आहे , गांधीहत्येत संघाचा हात नाही असे न्यायालयाने म्हणल्यावर्ही पटेल म्हणाले होते की 'संघाचा हात नसला तरी संघाचीच विचारसरणी आहे' , सावरकरांना निर्दोष मुक्त करुनही आजही त्यांच्यावर चिखल फेक होतेच की ! मोदींना सर्वोच्च न्यायालयाने क्लीनचीट दिली तरी माझ्या लेखी मोदी खुनीच आहेत असे लोक स्पष्टपणे मिडीयावर बोलत होते . न्शिवाय न्यायालय दरवेळी योग्य "न्याय" निर्णयच देते असे नाही , अयोधेत वादग्रस्त जागी १४ शतक्या पुर्वी मंदीर होते असा स्पष्ट निकाल आर्किऑलॉजिस्ट ने दिल्या नंतरही त्या प्रकरणातला न्यायालयाचा निर्णय आपण पाहिलाच ! शिवाय न्यायालयाच्या निर्णयाचा मान न राखण्याचे आदर्श राजीव गांधींनीच "शहाबानो" प्रकरणा पासुन घालुन दिले आहेत ! जाऊन दे ... खुप विषयांतर झाले !

या प्रतिसादाच्या सुरवातीसच माझी भूमीका स्पष्ट नमूद करतो की पुस्तकांसहीत कोणत्याही कलाकृतीस कोणत्याही समाजाच्या आग्रहास बळी पडून बंदी घालू नयेच सर्वच ग्रंथ आणि कलाकृतींना विद्यापीठ प्राध्यापकस्तरीय समीक्षण बंधनकारक करून विरोधी मुद्यांचे खंडन करणारी समीक्षा प्रस्तावनेसोबत छापणे बंधनकारक करावे, त्या खंडनास प्रतिसाद देण्याची मोकळीक कलाकृती निर्मात्यास/प्रकाशकास द्यावी. मग त्या कलाकृतीतून काय घ्यावयाचे आणि नाही घ्यायचे ते रसिक ठरवेल. शासनास वाटल्यास अपवादात्म स्थितीत कलाकृती समीक्षणासाठी अधिक विद्यापीठीय तज्ञांकडे अधिक काळा साठी पाठवावी. आता आपल्या बाकी काही मुद्यांकडे येतो. :) मान्यवर आपला धागा लेखच अंशतः विषयांतराने झालेला नाही ना, ते असू द्यात ते फार महत्वाचे नाही. या धाग्यावर अथवा इतरत्र लोक विषया वरील अधिकाराच्या गोष्टी करत असताना पाहीले आपण कायद्याच्या सर्व बाजू माहित असून लेखन करत असल्यास त्या कायद्याच्या बाजू जाणून घेणे आणि माझ्या ज्ञानात भर घालणे मला नक्कीच आवडेल. कायद्याच्या पैलूंबाबत आपली काही गल्लत होत नाहीएना अशी सध्या तरी मला अल्पशी शंका येते. संतसूर्य बद्दल सरकार न्यायालयात गेले असल्या बाबत माझी माहिती नाही, संतसूर्यचा खटला एका व्यक्तीच्या वंशजाने टाकलेला खासगी व्यक्तीने टाकलेला आणि तोही भादवि च्या वेगळ्या कलमांनी; सामाजिक अशांतता पसरू नये म्हणून सरकार वेगळ्या कलमांचा आधार घेते म्हणून आपली तुलना किमान संतसूर्यबाबत लागू होऊ शकणार नाही. सामाजिक अशांतता पसरेल हा भिती घालणारा मुद्दाही न्यायालये नेहमी ग्राह्य धरत नाहीत, उलटपक्षी तुम्हाला परिस्थिती नियंत्रणात ठेवता येत नसेल तर वेगळा विचार करावा लागेल अशी तंबी काही वेळेस न्यायालयांनी संबंधीत प्रशासनांना दिलेले आहेत. अर्थात सामाजिक अशांतता या विषयावर सरकारने विनंती करणे आणि न्यायालयांनी त्या विषयास तौलनीक प्राधान्याने वेळ देणे हे समजण्या सारखे आहे पण इथे मुलतः जबाबदारी लोकशाही सरकारांची, आणि आपले उत्पातमुल्य दाखवू इच्छित भारतातील सर्वच समाजगटातील विवीध बेजबाबदार समाज घटकांची आहे, न्यायालयांचा यात दोष नाही, सामाजिक दोषांकरता न्यायालयांच्या माथी खपार फोडणे योग्य नव्हे हे लक्षात घेतले पाहीजे. सध्या अके-निग बदनामी खटल्याच्या एका प्रसंगी अके गटा कडून सरकार बदलल्याने निकाल असा आला अशा टिके बद्दल न्यायालयात न्यायालयीन अवमानाचे आक्षेप दाखल झाले आहेत आपण आपल्या धागा लेखात "(आता हा अब की बार ... चा इफेक्ट आहे की नाही देव जाणे ) हे वाक्य मोघम स्वरूपात लिहिल्याने कायदेशीर दृष्ट्या सुखरूप ठरण्याची शक्यता आहे हे कायद्याची बाजू लक्षात यावी म्हणून लक्षात घ्यावे. संतसूर्य तूकाराम केस मध्ये काही शतकांपुर्वीच्या पुर्वजाबद्दल बदनामीचा खटला दाखल होऊ शकतो तर आपण म्हणता त्या अनेक केसेस मध्ये बदनामीचे खटले दाखल करता येण्याची शक्यता असू शकते. अर्थात त्या केसेस दाखल करणे ज्याची बदनामी झाली त्याची स्वतःची जबाबदारी आहे. चुकीची चिखलफेक आणि नकारात्मक मार्केटींग हे समोरची व्यक्ती उत्तरे देण्यात नेमकी असेल तर इफेक्टीव्ह असू शकत नाही उलट चिखलफेक आणि नकारात्मक मार्केटींग करणार्‍यांचेच नुकसान होते हे मोदींच्याच वि़जयाने सिद्ध झाले आहेच. इतर काही समाज घटक पुरोगामी नाहीत म्हणून पुरोगामी राहण्याची क्षमता असलेल्या घटकांनी स्वतःकरता पुरोगामी असू नये का हा जरा विषयांतराचा मुद्दा असल्याने नंतर कधी चर्चा करूयात. हे जरी खरे असले तरी शासनाचे निर्णय (अगदी कोणत्याही परिस्थितीत) उत्पात मुल्य वापरणार्‍या समाज घटकांना दबून होऊ नयेत याच्याशी मी सहमत आहे अर्थात हि जबाबदारी लोकशाही नेतृत्वांची आहे त्याचे खापर न्यायालयांवर फोडणे हे वड्याचे तेल वांग्यावर ठरते असे माझे व्यक्तीगत प्रांजळ मत आहे.

हे जरी खरे असले तरी शासनाचे निर्णय (अगदी कोणत्याही परिस्थितीत) उत्पात मुल्य वापरणार्‍या समाज घटकांना दबून होऊ नयेत याच्याशी मी सहमत आहे अर्थात हि जबाबदारी लोकशाही नेतृत्वांची आहे त्याचे खापर न्यायालयांवर फोडणे हे वड्याचे तेल वांग्यावर ठरते असे माझे व्यक्तीगत प्रांजळ मत आहे.
आपला प्रतिसाद ३ वेळा वाचल्यावर व्यवस्थित कळाला , बहुतांश पटलाही . वरील वाक्य अत्यंत आवडले . आजवर भारतसरकारचे धर्म समाज विषयक नियम कायदे हे काही विषिष्ठ समाजांच्या उत्पात मुल्याला घाबरुन केलेले नजरेस येतात (पक्षी : सॅटीनिक ...शाहबानो...इशानेतील काही राज्यांनी स्वतःला ख्रिश्चन राज्य घोषित करणे वगैरे वगैरे ), फक्त हिंदु तसे झुंडशाहीने आजवर हम करे सो कायदा करीत नव्हते , आता लोकांना हळु हळु कळायला लागले आहे की हे फक्त आपल्यालाच चेपत आहेत अन इतरांना ठील देत आहेत (ह्याचे क्लासिक उदाहरण म्हणजे जेव्हा एक विशिष्ठ समाज फाळणी व स्वतंत्र देशाची मागणी करतो तेव्हा ती कबुल करणे अन जेव्हा दुसरा समाज करतो तेव्हा त्यांना दहशतवादी ठरवुन त्यांच्या प्रार्थनागृहात घुसुन मारणे ! एका धर्मियांची प्रार्थना स्थळे ताब्यात घेणे अन दुसर्‍यांच्या बाबत चुकार शब्दही न काढणे , वगैरे वगैरे). आपणजर आपले उत्पात मुल्य दाखवले नाही तर हे असेच चालु ठेवतील ,सो ..... तेव्हा सर्वच समाजामधे अस्मिता प्रखर झाल्याचे दिसुन येत आहे , उशीरा का होईना पण हिंदुंचीही अस्मिता जागी झाली आहे इतकाच माझा निषकर्ष आहे :)

त्यामुळे त्याबद्दल एखादया व्यक्तीला त्याचे ज्ञान नसेल तर त्यात हास्यास्पद काय आहे?
एखादया व्यक्तीला त्याचे ज्ञान नसेल तर त्यात हास्यास्पद किवा चुकीचं काहीच नहिये. पण ते नसताना चुकीची विधानं करून त्या विषयाबद्दलची स्वतःची आणि इतरांचीही मतं कलुषित करण हे चुकीचं आहे . ज्ञान घ्यायला ज्ञानाचे दरवाजे सदैव उघडे आहेत . नसेल घ्यायचं तरी काही हरकत नाही . पण विनाकारण त्याबद्दल नकारात्मक विचार पसरवण्याच काहीच कारण नाही असं मला वाटतं

नवीन बातमी : आत्ताच ही बातमी वाचनात आली ... http://maharashtratimes.indiatimes.com/nation/sakshi-maharajs-ode-to-modis-wife-surprises-crowd/articleshow/45429029.cms बहुत संतोष जाहला . थोरल्या महाराज साहेबांची आठवण जाहली . अशा अनेक घटना घडत राहिल्यास खर्‍या अर्थाने हिंदु अस्मितेचा उदय होत आहे हे सिध्द होईल :)

हिंदू धर्मात मुस्लीम आले ते ठीक आहे परंतु हिंदू धर्मातून लोक मुळात दुसर्या धर्मात का जात असावेत हाच मुख्य प्रश्न आहे नि तो चिंतनीय आहे जाती व्यवस्था, उच्च नीचपणाची भावना ह्याने हा धर्म पोखरून निघालाय. २०० जन आले म्हणून आपण खुश होतोय तिकडे ओबीसी सेवासंघाचे हनमंत उपरे हे जवळपास १० लाख लोकांना बुद्ध धर्मात घेवून चाललेत.जातीव्यवस्थेतची कीड गेल्याशिवाय हिंदू धर्माला भविष्य नाही.

जातीव्यवस्थेतची कीड गेल्याशिवाय हिंदू धर्माला भविष्य नाही.
अतिशय सहमत आहे. ही गोष्ट नीट कळल्यामुळे , मी माझ्या स्वतःकडून जात पाळणे पूर्ण बंद केलेले आहे.

जातीव्यवस्थेतची कीड गेल्याशिवाय हिंदू धर्माला भविष्य नाही.
हिंदु धर्मातील जातीव्यवस्था कधीच जाणार नाही . पुर्वी ब्राह्मण मराठा महार मांग वगैरे 'धर्मोक्त' जाती होत्या , आता अनारक्षित , एस्सी , एस्टी , ओबीसी , एबीसी वगैरे सरकारोक्त जाती आहेत सामाजिक न्यायासाठी . थोडक्यात हे कोंबडी आधी की अंडे आधे सारखा न सुटणारा प्रश्न आहे , कीड लागली म्हणुन कीटक नाशक मारले अन कीटक नाशक मारले म्हणुन कीड इव्होल्युशन होवुन आधी पेक्षा गंभीर झाली असे काहीसे !! तेव्हा आपण जातीव्यवस्थेविषयी चर्चा करत बसण्यापेक्षा ती असुनही हिंदु धर्मोदय कसा होईल ह्याचा विचार करत राहिला पाहिजेल . जातीनिर्मुलनाचे काम सरकारने हाती घेतले आहेच , आपण धर्मोदयाचे काम हाती घेणे अपेक्षित आहे . आणि बुध्द/ जैन धर्म परका नाही हे मी वारंवार म्हणत आलो आहेच त्यामुळे जर आमच्या काही बांधवांना हिंदु धर्मातुन बौध्द / जैन धर्मात गेल्याने जातिव्यवस्थेच्या बेड्यातुन सुटल्याचा आनंद होत असेल तर त्याचे मी कौतुकच करतो :) यं शैवा समुपासते शिव,इति ब्रमहोति वेदांतिनौ । बौदधा बुद्रधि प्रमाण पटवः ,कर्तैति नैयायिकाः। अर्हनित्यथजैन शासनरथाः कर्मति मीमांसकाः । सोयं नो वि्दघातु वांछित फलम्र् त्रैलोक्रय नाथौ हरि।।

आणि हो एक महत्वाचे सांगायचेच राहिले इथे उपरोक्त हिंदु धर्म आणि आर्य सनातन वैदिक धर्म हे दोन पुर्णपणे भिन्न धर्म आहेत असे आमचे ठाम मत आहे. आणि आम्ही नुकतीच हिंदु धर्मातुन आर्य सनातन वैदिक धर्मात उडी मारली असल्याने हा धागा आमच्या नल & व्हॉईड होतो . :D हिंदुधर्मीयांना भावी उत्कर्षासाठी शुभेच्छा :) लेखनसीमा _____________________________________________________________________________