Welcome to misalpav.com
लेखक: डॉ. दत्ता फाटक | प्रसिद्ध:
आपलं शरीर हे मुख्यतः पाणी, सेंद्रीय पदार्थ तथा बारा निरींद्रीय क्षार युक्त असंख्य पिंडपेशींनी तयार झालेले आहे, निरींद्रीय क्षारांमुळे या पेशी तयार होत असतात, अन रक्ताभिसरणाने पोसल्या जातात, याशिवाय साखर, चरबी, पांडूर- Albumin, हे कर्बयुक्त सेंद्रीय पदार्थ असून चुना-Calcium, लोह-Iron, potashium, Natrum, Scical, हे ख-निज क्षार निरींद्रीय – कार्बन विरहित असतात.निरींद्रीय क्षारांचे प्रमाण अल्प असलं तरी अचेतन सेंद्रीय पदार्थापासून लक्षावधी विशिष्ठ पिंडपेशीसमुह निर्माण करत असतात. याचं कारणामुळे या बारा क्षारांना अनन्य साधारण महत्व आहे, त्याचाच अभ्यास करणें आहे. त्यात लक्षणं, त्रुटी, आणि रोग याचा धावता आलेख काढायचा आहे. काली फोस्फोरीकम – Kali Phosphoricum K2 H PO4. सर्वात महत्वाचा क्षार,शरिराच्या सर्व घटकांचे, अवयवांचे, ऐच्छिक, अनैच्छिक संतुलन, संचलन, आणि अनुशासन करणा-या मेंदू, ज्ञानतंतू, कर्मतंतू या सर्वांशी याचा निकटचा संबंध आहे, आपल्याला भौतिक ज्ञान होतं ते शब्द,रस, रूप, स्पर्श, गंध, या संवेदना कां, जिव्हा-जीभ, डोळे, त्वचा, आणि कांन या पांच ज्ञानेंद्रीयामुळेच होते अन त्याचा घनिष्ट संबंध मेंदूशी आहे.सध्याचे गतिमान, बौधिक्तेची कास धरून चाललेलं स्पर्धात्मक विकृत सांस्कृतिक जीवन आणि असंतुलीत समाजव्यवस्था, आवाज, प्रदूषण,शांत- निवांत-पणा याचा अभाव या सर्वांमुळे मेंदूवर आणि शरीरावर प्रमाणाबाहेर ताण पडतो आहे. याचा संबंध मानसिकते शीही आहेच, बघा, असा दिवस आपल्या आयुष्यात कधीतरी उगवतो, जाग आल्यावर काहीं करू नये, स्वस्थ पडून राहवे, थकलाभागला शीण येतो, अनामिक वैताग आलेला असतो, मन उगाचंच प्रक्षुब्ध बेचैन असतं, कपाळा हात लावून जरा चेपलं तर बरं वाटत, मग ध्यानी येत अरे डोकंही जरा जड झालं आहे त्यात बारीकसा ठणका आहे, कालझोपेपर्यंत तर सगळं उत्तम होतं, मग!! कारण अज्ञात आहे. फ्रान्सिस बेकन यांनी तीनशे वर्षापूर्वी लिहून ठेवलं आहे जसं माणसाचे मन तसा तो माणूस, मनानी घेतले मी आजारी आहे की तो आजारी पडतोच, मी तब्बेतीत आहे तर तो तब्बेतीत असतो. माणसाचे माणूसपण त्यांच्या बुध्दिवैभावाचा ओज-प्रकाश पाडणा-या मेंदूत आहे त्यांचं रक्षण, पोषण करणारा हा काली फॉस क्षार महत्वाचा आहे. याचा आणि मेम्दुमध्ये, आणि भोवती असलेल्या करडया पदार्थाचा ( Grey matter ) यांचा फार घनिष्ट संबंध आहे.कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे केसांपेक्षा बारीक पण अत्यंत चिवट असं तंतूमय जाळं असते त्याला इग्रजीत Arachnoid असं नाव आहे. हा क्षार शरीर-घटक-धातू ( Tissues ) निर्माण करणारा आहे याचं संतुलन बिघडलं की शरीर घटकच तयार होणार नाहीत. स्नेहाचे घट्ट रूपांतरण होणे, प्राणवायुचा योग्य उपयोग अडून बसेल. बुद्धी काम करेनाशी होते, त्यांच्या वागण्यात सुसंगती राहत नाही, शरीर-मन खचतात, एक तर्हेची भीती ६ न्युनगंड उत्पन्न होतो, चारचौघात बुजतो त्याला एखादेवेळी समोरच्याचे नांवही आठवत नाही, कसलाही निर्णय घेऊ शकत नाही, भावनाविवश होतो, लहानसं कारण ही रागवा चिडायला पुरते तर्कट स्वभाव हेसर्व या क्षाराच्या अभावाने होतं त्यांच्या जोडीला आणखी एक क्षार नैट्रम मूर या सर्व क्षारांचे कोऑरडीनेशन आणि कोऑ- परेशन चांगलं असतं त्यामुळे एखाद्धया क्षाराच संतुलन बिघडलं की काहीना काही शारीरिक व्याधी सुरू होतेच. काली फॉस अल्ब्युमिन व प्राण वायूशी संमिलीत होऊन ग्रे मेटर निर्माण करतो. १ ) काली फॉस-६- + कल्के फ्लुऑर-६ + सिलिका-६ तीन तीन गोळ्या एक / दोन वेळा ----- ------------------- वयत्परत्वे शरीराची झीज आणि थकवा झपाट्याने वाढत असतो, मानसिकता बिघडते, मन काळजी-ग्रस्त होतं, झोपेवर परिणाम होउन स्वभाव चिडचिडा होतो, मेंदू काम करीनासा होतो, विस्मरण होतं अशावेळी उप-रोक्त क्षार दिले तर आवश्यक ग्रे मेंटर मेंदू भोवती राहते, शिथील झालेल्या नसा नर्व्हज कल्के फ्लुओरने हव्या तेवढया लवचिक अथवा ताठ राहतात नि सिलिका सर्वाना आवर घालतो. 2 ) काळी फॉस ६, ३० -------------- खास विध्यार्थ्यासाठी हया क्षारासारखा दुजा हितचिंतक नाही, परीक्षार्थी परीक्षा अगदी जवळ आली की रात्रीचा दिवस करून अभ्यासानिमित्त वह्या-पुस्तकात बुडालेला, वाचन चालू असताना वाचनात एकाग्रता हवी, लक्षात राहयाला हवं, परिणामी पोट रिते वाटायला लागते, पोटात गोळा येतो, या क्षाराचे हे महत्वाचे लक्षणं आहे, काली फॉस मेंदुच्या पेशींची तैनात उत्तम राखतो. ग्रे मेटरवर पडणारा ताण वाढला की त्याचा पुरवठा तोकडा पडतो, त्यामुळे गंभीर व्यथा निर्माण होतात, त्यासाठी याक्शाराच्या गोळ्यांची बाटली जवळ बाळगून मधून-मधून घेत गेले की सारी थकावट गायब, एकाग्रता साधते, चांगला अभ्यास होतो जाग्रणे करावी लागत नाहीत, झोप शांत लागते, पोटात गोळा येत नाही, भूक चांगली लागते. वृद्धांसाठी तर हा क्षार जीवनामृत ४) काली फॉस ६ आणि १२ + नैट्रम मूर ३० च्या पाच ग्रेनच्या वडया अर्धा ग्लास पाण्यात टाकून १०—१० मिनिटांनी एकएक चमचा मिश्रण नंतर १५—१५ मिनिटांनी त्सेक चमचा मिश्रण सातत्याने दिले यामुळे र्हुदय विकाराचा रुग्ण हॉस्पिटल मध्ये जाण्यासाठी आलेली रुग्णवाहिका परत पाठवण्या एवढा स्वस्थ झाला, त्या मुळे काली फोसला प्राण रक्षक म्हणूनही ओळखले जाते. - ४ ) काली फॉस हा अत्यंत महत्वाच्या क्षारा अभावी शरीराची किती दयनीय अवस्था होते ते त्याचं वर्णन त्याच महत्व ध्यानीनी आणून देईल, ही माहिती खूप पडताळे जमवून विचार करून जमविलेली आहे एखादे वेळी मनाला न पटणारीही असू शकेल, पण सत्य आहे, प्रयोग, अनुभव घेण्यास काय हरकत आहे. नुकसान तर अंशात्मकही नाही झालाच तर अमोघ फायदाच होईल काही गोष्टी अनकलनिय, अघटीत असतात त्यावर फक्त विश्वासच ठेवावा लागतो. ५ ) तंतू शूळ न्युरोल्जीया अत्यंत अस्वस्थ करणारी व्याधी, असह्य वेदना, खाणं-पिणं सुचत नाही, ६ ) रूग्णाचं वास्तव वर्णन ---१ )- चेह-याचा वर्ण फिक्कट पिवळा, तर कधी पांढराफटक रक्तक्षीणतेची जाणीव करू देणारा, डोळे दु:खी-कष्टी, ओढलेले, खोल गेलेले, भवती काळी वलयं असलेले, अकाली वृद्धत्व आल्या सारखा काळजी ग्रस्त सुरकुतलेला चेहरा, काहीवेळा चेहरा ओठ तांबूस काळपट निळे, शिरा ताणलेल्या, थकवा, अस्वस्थपणा, २ ) BRAINFAG किंवा CEREBRAL ASTHENOA -- मेंदूची अपरिमित थकान, व्यापारी, उच्चभ्रू लोक, कर्मेंद्रीयापेक्षा ज्ञानेंद्रीयांवर ज्यास्त ताण देणारे सुखवस्तू लोक. यांच्यासाठी या सारखे काली फॉस सारखे औषध नाही. ३ ) स्मृतिभ्रंश – यावर हा क्षार उत्तम कार्य करतोच पण त्याच्याच जोडीला मला आणखी नाव डोळ्यासमोर येतं ते अति गुणी औषध ANACARDIUM ( म्हणजे बिब्बा ) याची खास औषधी लक्षणे म्हणजे आयत्यावेळी आठवणीने दगा देणे, विध्यार्थ्यांच्या बाबतीत सातत्याने घडणारी गोष्ट प्रश्नपत्रिका लिहताना आयत्यावेळी काही आठवत नाही, बरं त्या-ने सडकून अभ्यास केलेला असतो, बुद्धीने तल्लख असतो, घरी आल्यावर सर्व उत्तरे धडाधड देता येतात, फक्त पेपर लिहताना आयत्यावेळी मात्र स्मृतीने दगा दिलेला असतो. या स्थितीला इग्रजीत Examination Funk असे म्हणतात. – थोडे विषयांतर करून खास विध्यार्थ्यासाठी, Examination Funk, Loss of Concentration,आणि जबाबदारीचे ओझं त्यामुळे मेंदूवर पडणा-या मानसिक ताणामुळे स्मृतिभ्रंश, शारीरिक मानसिक निरुत्साह- Neuras Thenia, Brainfag, or Cerebral Astthenia, Tic Doulou Reux, Agorphobia, वृद्धत्वामुळे आलेले मानसिक कमीपण,किंवा जन्मजात बथ्थड अशांसाठी खास औषधी व उपचार यासाठी हा लेखाचा उपभाग लक्षणासह सादर करतो. लक्षणामुळे हे सदर वस्तृत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विध्यार्थ्यांसाठी व्यवस्थित अभ्यास करूनही ऐन परीक्षेत मनाचा गोंधळ होउन प्रश्नपत्रिका नीट सोडवता आली नाही, असं का होतं एक मनावर दडपण, परीक्षा जवळ आली की विध्यार्थ्या चा Nervous पणा वाढू लागतो, मनाची घब-राहट होते, अभ्यास पुरेसा झाला असं वाटत नाही, रात्रंदिवस जागरणं करून, खेळ, गप्पाष्टक, भटकंती सगळं बंद, काहींच्या मनात वर्षभर अभ्यास न केल्याची खंतसुद्धा असते, खास कृउन १२वी च्या परीक्षेत घवघवीत यशाचा वडिलांकडून तगादा असतो कारण त्यांनी क्लाससाठी, इतर गोष्टींसाठी खूप खर्च केलेला असतो, पुढच्या भविष्याचा विचार सुप्तपणे टोकत असतो, या सगळ्याचा परिपाक मेंदूतील ग्रेमेटरवर व नसां शिथील होतात,अशावेळी अभ्यास चांगला झाला असूनही आत्मविश्वासाच्या अभावामुळे पेपर सोडवताना आठवणीनी, स्मृतीने दगा दिल्यामुळे उत्तरे नीट लिहता येत नाहीत, यालाच एक्झामिनिशन फंक म्हणतात, औषधे calc. Fluorica fuorica -12 or 30 2) kali phos 30 & ३) silica 30 कल्के फ्लुओर शिथिल नसा-शिरांचा लवचीकपणा टिकवून योग्यतो ताठरपणा आणतो, २ ) काली फॉस आलेला नर्व्हसनेस घालवतो, ३) सिलिका विचा-रातील सैरभैरपणा नाहीसा करून, एकाग्रता वाढवितो,- ग्रहणशक्ती वाढते. उपरोक्त लिखाण हे गाईड लाईन आहे,त्यात अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. परस्पर औषध घेउ नये. २ ) काली फॉस आणि सिलिका -- वकील, डॉक्टर, मोठेले एक्झीक्यूटिव्ह ऑफिसर्स यांच्यात जबरदस्त आत्मवि-श्वास असतो, एक अत्युच्च वैचारिक पातळी असते, पण कारणवशात एखाद्या कामात नको तेवढया घेतलेल्या बौद्धिक मेहनतीचा परिणाम मेंदू आणि नसा याना थकान येते, शैथ्य येते, मनात येतं एवढी मेहनत घेतली आहे, काय होईल हाविचार मनात येणं हेच मेंदूच्या थकावटीचे लक्षणं आहे, उपरोक्त औषधांनी थकान दूर होउन अशा प्रकांड पंडिताना सहज दिलासा मिळतो. ३ ) लाय्कोपोडियम खास करून अतिशय तल्लख बुद्धीचा, उत्कृष्ट वक्तृत्व, अमोघ वाणी असलेला शरीराने कृश, कुठल्याही विषयात पारंगत, सखोल, पण एकलांडा, त्याच्यावर प्रेम- आदर करणा-यांत बसेल,उठेल, त्याचं बोलणं एकणा-याला ज्ञानाची मेजवानी वाटेल, इतक्या सहजपणे तो अवघड विषयावर बोलेल, त्याच्या विद्वत्तेबध्दल आदर असेल अशाच लोकांच्यात तो रममाण होतो, त्याचा एक समज-गैरसमज आपल्याला समजून घेणारी, आपल्या वि-षयाची गोडी असणारी तर राहोच पण सांगोपांग अभ्यास करू इच्छिणारी व्यासंगी माणसंच नाहीत, अशा लोकांसमोर एखाद्या विषयावर बोलणंच नको, वकील, न्यायाधीश, राजकारणपटू, प्रथितयश अभ्यासक,उद्योजक,डॉक्टर, अशा लोकां-साठीच हे औषध नैराश्य कमी करून मानसिकबल- आत्मविश्वास वाढविणारं चांगल्या वक्त्यासाठींच.
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

डॉ. हनिमन, डॉ. शुस्लर किंवा जे कोणी होमियोपाथी/बायोकेमिकचे मूळ प्रवर्तक होते, त्यांनी एवढ्या तपशीलात जाऊन शेकडो औषधांचे नेमके परिणाम कसे काय शोधून काढले, याबद्दलही माहिती या धाग्यातून मिळावी, अशी अपेक्षा करतो. प्राचीन ग्रीक वैद्य (याक्षणी त्याचे नाव आठवत नाहीये) त्या त्या वनस्पतीजवळ शांतपणे ध्यान लावून बसत असे, आणि ती वनस्पतीच त्याला स्वतःचे वैद्यकीय गुण 'सांगत' असे (वा अंतःप्रज्ञेने ते कळत असे म्हणा) आणि ते तो लगेच लिहून घेत असे, असे वाचल्याचे आठवते. मला स्वतःला हे पूर्णपणे शक्य वाटते. अर्थात त्या व्यक्तीची तेवढी क्षमता असायला हवी. होमियोपाथीच्या बाबतीत असे काही झाले होते का?

होमिओपॅथी एक धादांत खोटा प्रकार आहे व खुद्द होमिओपॅथीच्या डॉक्टरांनाच आपण 'ठग' आहोत हे ठाऊक असते हे विशेष.

ह्यावेळी चक्क नेफळे रावांशी सहमत आहे आजवर होमिओपॅथी हे सुडो सायन्स आहे असेच ऐकत आलोय , ह्या लेखमालेतुन काही प्रभाव झाल्यास एखाद्या होमिऑ पॅथी डॉक्टरला सदिच्छा भेट देवुन काही प्रयोग करवुन (मायनर आजारांच्या वेळेला) घ्यायला हरकत नाही . अवांतर : बाकी होमिओपॅथी चे दुष्परिणाम नसतात हे मात्र धाधांत असत्य आहे हे अनुभवाने सांगतो ... आमची मेव्हणी होमिऑपॅथी डॉक्टर आहे तिला एकदा म्हणालो होतो की " होमिऑपॅथी सुडोसायन्स आहे ... माझ्यालेखी ज्योतिषशास्त्र, फेंगशुई , वास्तुशास्त्र , रेकी आणि होमिऑपॅथी हे सारे एकाच माळेतले मणी आहेत " त्यानंतर बोलायचीच बंद झाली :( ... छ्या केवढा हा साईड इफेक्ट =))))

ज्ञानाच्या कक्षा रुन्दावण्यास मदत करणारे अनुभवयुक्त लेखन व आपले मिपावर स्वागत असो! होमिओपॅथीवरील येवु घातलेल्या विस्त्रूत माहितीबद्दल आधिच मनापासुन धन्यवाद.

होमिओपथी हे स्यूडोविज्ञान आहे असं म्हणतात. त्या गोळ्या मात्र मस्त गोड असतात, तेव्हा काही साईड इफेक्ट्सची चिंताच नाही

काली फॉस ६ आणि १२ + नैट्रम मूर ३० च्या पाच ग्रेनच्या वडया अर्धा ग्लास पाण्यात टाकून १०—१० मिनिटांनी एकएक चमचा मिश्रण नंतर १५—१५ मिनिटांनी त्सेक चमचा मिश्रण सातत्याने दिले यामुळे र्हुदय विकाराचा रुग्ण हॉस्पिटल मध्ये जाण्यासाठी आलेली रुग्णवाहिका परत पाठवण्या एवढा स्वस्थ झाला, त्या मुळे काली फोसला प्राण रक्षक म्हणूनही ओळखले जाते.
उत्तम ... पाच ग्रेन म्हणजे ०.३२ ग्रॅम हे बरोबर असेल तर अर्ध्या ग्लासात एक तृतीयांश ग्रॅम द्रव्य विरघळवलेले..(विरघळत असल्यास) म्हणजे पोटात खरोखर काली फॉस आणि नॅट्रम मूर ही द्रव्ये जाणार.. फायदा होत असेल किंवा नसेल हा अनुभवाचा / केमिस्ट्रीचा / जीवशास्त्राचा भाग झाला. पण पदार्थाची डिटेक्टेबल क्वांटिटी पोटात जातेय हे पाहून आनंद झाला. पण.. मग.. ही नक्की होमिओपथीच ना? धन्यवाद.

म्हणजे पोटात खरोखर काली फॉस आणि नॅट्रम मूर ही द्रव्ये जाणार..
कैतरीच आपलं तुमचं. होमिओपथीमध्ये असला धोका बिलकुल पत्करला जात नाही. त्या औषधाच्या नावांपुढे ६ आणि १२ लिहिलं आहे ते दिसलं नाही का? ६ म्हणजे ६ वेळा शतांशाचं डायल्युशन. म्हणजे सुमार एक टनाचं एक मायक्रोग्रॅम करायचं.... १२ वेळा डायल्यूशन म्हणजे एक रेणूही नाही. त्या पाच ग्रेनमध्ये काय असतं कोण जाणे.

होमिओपॅथी म्हटल्यावर मिपाकर एकदम तुटुन पडतात. पुणेकर, मोदीसमर्थक आणि आस्तिक या तिघांइतकीच होमियोपॅथी देखील मिपासाठी टिंगलीच विषय झाली आहे असे दिसते. यापैकी जे कोण डॉक्टर्स असतील त्यांचे किमान मत तरी विचारात घेता येइल. ओकार्‍या काढणारे इतर मात्र डोक्यात जातात. असो. होमिओपॅथी ने बरे झालेले लोक मला माहिती आहेत. त्यामुळे माझा होमिओपॅथीवर राग नाही. मी स्वतः वेळ आल्यास अ‍ॅलॉपॅथी औषधे घेतो ही गोष्ट वेगळी.

होमिओपॅथीला शिव्या घालणारे अनेक लोक मिपावर आहेत. त्यातले किती जण स्वतः डॉक्टर आहेत, किती जणांचा होमिओपॅथी आणि अ‍ॅलोपथीचा सखोल अभ्यास आहे हे त्यांनाच ठाऊक. उगाच कुठलं तरी काही तरी वाचून मत बनवायचं आणि फुकट देता येतात म्हणून सल्ले देत सुटायचं. टिका तर इतक्या खालच्या पातळीला जाऊन करतात की मिपाकर असल्याची शरम वाटते.

होमिओपॅथी औषधांचा मला स्वतःला व सर्व कुटुंबियांना गेली अनेक वर्षे अत्यंत चांगला अनुभव आला आहे. होमिओपॅथी थोतांड आहे किंवा ते छद्मविज्ञान आहे असे पूर्वग्रहदूषित मत मांडणार्‍यांशी मी अजिबात सहमत नाही.

एक तर अ‍ॅलोपाथी असे काहीही नाही. MBBS ही Modern Medicine ची पदवी आहे. ह्यात जे शास्त्रियरीतीने सिद्ध करता येइल असे कुठलेही औषध चालु शकते. आयुर्वेद, युनानी, चिनी औषधे जर क्लिनिकल ट्रायलच्या मार्गाने सिद्ध केली तर ती पण Modern Medicine मधे दिली/घेतली जातील. पण बुवाबाजी पद्धतीने कोणी दावे करत असेल तर त्याकडे खरे तर दुर्लक्ष केले पाहीजे.

होमियोपाथीचा अत्यंत चांगला अनुभव मला आहे, १९८४ साली अगदी भयंकर परिस्थितीत मी असता होमियोपाथीच्या दोन-तीन दिवसाच्या औषधाने मी वाचलो होतो. माझ्या पत्निलाही लहानपणी आलोपाथी डॉक्टरांनी हात टेकल्यावर होमियोपाथीमुळेच मोठ्या संकटातून बाहेर येता आले होते. माहितीतल्या आणखीही लोकांना झालेला लाभ मला ठाऊक आहे. परंतु त्याचबरोबर होमियोपाथीच्या सैद्धांतिक अंगाविषयी --- म्हणजे अमूक औषध अमूक पोटन्सीचे घेतल्याने अमूक परिणाम होतो वगैरे--- याबद्दल शंका घेण्यासारखे अनुभव पण भरपूर आहेत. पूर्वी माझ्या वडिलांचे स्वतःचे होमियोपाथीचे दुकान असून मी अनेक वर्षे ते चालवण्यात सहभागी होतो--- एक दुकानदार म्हणून जे अनुभव माझ्या गाठीशी आहेत, ते अकल्पनीय आहेत, आणि फारच कमी जणांना ठाऊक असतील, असे आहेत... ते इथे उघड करावेत की नाही, याबद्दल मी अजून ठाम होऊ शकलेलो नाही. खुद्द होमियोपाथीचे औषध निर्माते यातील अगदी खास गुपीते सांगू शकतील, पण ते तसे कधीच करणार नाहीत... या अनुभवामुळेच मी माझ्या पहिल्या प्रतिसादात धागाकर्त्यांना काही प्रश्न विचारले आहेत, त्यांची उत्तरे यावर प्रकाश टाकू शकतील.

आणि त्यावर होमिओपॅथीच्या नक्की कोणत्या औषधाचा किती दिवसात परिणाम झाला हे सांगाल काय?
एक दुकानदार म्हणून जे अनुभव माझ्या गाठीशी आहेत, ते अकल्पनीय आहेत, आणि फारच कमी जणांना ठाऊक असतील, असे आहेत... ते इथे उघड करावेत की नाही, याबद्दल मी अजून ठाम होऊ शकलेलो नाही.
कशामुळे?
खुद्द होमियोपाथीचे औषध निर्माते यातील अगदी खास गुपीते सांगू शकतील, पण ते तसे कधीच करणार नाहीत...
पुन्हा उपरोक्त शंका!
या अनुभवामुळेच मी माझ्या पहिल्या प्रतिसादात धागाकर्त्यांना काही प्रश्न विचारले आहेत, त्यांची उत्तरे यावर प्रकाश टाकू शकतील.
लेखक साहित्याचे डॉक्टर असावेत (असं ब्लॉगवरुन वाटतं) त्यामुळे ते बहुदा उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉक्टर सगळं ठीक आहे ना? गायबलेत तिथे यांची काय कथा!

१९८४ साली मला अमेरिकेला तीन महिन्यासाठी जायचे होते. त्याकाळी अशी संधी फार दुर्मिळ होती. परंतु 'अमीबॉयसिस' ने ग्रस्त होऊन मी अगदी दुर्बळ झालेलो होतो. चालणे-फिरणेही कठीण झालेले होते. अमेरिकेचे तिकीट एकदा काही दिवसांसाठी पोस्टपोन केले, मात्र पुन्हा तसे करता आले नसते, आलोपाथीने काहीच लाभ होत नव्हता. कुणीतरी सांगितले, त्या होमियोपाथी डॉ. कडे गेलो, त्यांनी फी न घेता औषध दिले, ते २-३ दिवस घेतल्यावर प्रवास करण्याइतपत बरे वाटले. तरी अशक्त पणा बराच काळ राहिला. तीन महिन्यांनंतर मी परत येईपावेतो ते डॉ. वारले होते. तसेच माझ्या पत्नीला वयाच्या अठरा की विसाव्या वर्षी अचानक चालता येईनासे झाले होते, पायातील शक्ती गेली होती. बरेच दिवस गावातील सर्वात मोठ्या इस्पितळात राहून सर्व प्रकारची परिक्षणे , औषधोपचार करुनही काहीही फरक पडत नव्हता. मात्र होमियोपाथीने ती व्याधी कायमची बरी झाली. औषधांविषयी अगदी थोडक्यात सांगायचं म्हणजे सिद्धांत काहीही असो, औषध निर्माते, एजंट आणि विक्रेते, यांच्या माध्यमातून आलेले औषध नेमके काय, कसे असेल, मुळात ते औषध तरी असेल की नुस्तीच मिल्कशुगर/साखरेच्या गोळ्या किंवा साधे अल्कोहोल असेल, हे कोणत्याही टेस्ट द्वारे सांगता येत नाही. याचा फायदा निर्माते, एजंट आणि विक्रेते घेत असतात, आणि बिना औषधाचे औषध विकतात. तरीही बरेचदा गुण येतो (बरेचदा येत सुद्धा नाही) याचे कारण 'प्लासिबो इफेक्ट' असावा, असे वाटते. एवढे सर्व ठाऊक असूनही अजूनही आम्ही होमियोपाथिक डॉ. कडे जातो, आणि ती घेऊन बहुतेकदा फायदाही होतो.
लाय्कोपोडियम खास करून अतिशय तल्लख बुद्धीचा, उत्कृष्ट वक्तृत्व, अमोघ वाणी असलेला शरीराने कृश, कुठल्याही विषयात पारंगत, सखोल, पण एकलांडा, त्याच्यावर प्रेम- आदर करणा-यांत बसेल,उठेल, त्याचं बोलणं एकणा-याला ज्ञानाची मेजवानी वाटेल, इतक्या सहजपणे तो अवघड विषयावर बोलेल, त्याच्या विद्वत्तेबध्दल आदर असेल अशाच लोकांच्यात तो रममाण होतो, त्याचा एक समज-गैरसमज आपल्याला समजून घेणारी, आपल्या वि-षयाची गोडी असणारी तर राहोच पण सांगोपांग अभ्यास करू इच्छिणारी व्यासंगी माणसंच नाहीत, अशा लोकांसमोर एखाद्या विषयावर बोलणंच नको, वकील, न्यायाधीश, राजकारणपटू, प्रथितयश अभ्यासक,उद्योजक,डॉक्टर, अशा लोकां-साठीच हे औषध नैराश्य कमी करून मानसिकबल- आत्मविश्वास वाढविणारं चांगल्या वक्त्यासाठींच.
मटेरिया मेडिका मधील असली वर्णने म्हणजे कल्पनेच्या भरार्‍या असाव्यात, असे मलातरी वाटते. खरे-खोटे डॉ. हनिमन जाणोत. अश्याच प्रकारचे उलट-सुलट अनुभव मला भविष्यकथनाबद्दलही आलेले आहेत, त्याविषयी पूर्वी काही धाग्यांमधून लिहिलेही आहे.

ते सांगता येणार नाही कारण :
मी परत येईपावेतो ते डॉ. वारले होते.
आणि
पत्नीला वयाच्या अठरा की विसाव्या वर्षी अचानक चालता येईनासे झाले होते, पायातील शक्ती गेली होती. बरेच दिवस गावातील सर्वात मोठ्या इस्पितळात राहून सर्व प्रकारची परिक्षणे , औषधोपचार करुनही काहीही फरक पडत नव्हता. मात्र होमियोपाथीने ती व्याधी कायमची बरी झाली.
याचंही डायग्नॉसिस आणि औषध सांगणं शक्य नसावं कारण घटना जुनी आहे. तस्मात गुण आला हे खरं पण औषध कोणतं हे कळायला मार्ग नाही. पॅथी सिद्ध होण्यासाठी तीन गोष्टी आवश्यक आहेत : औषधाच्या परिणामांची: १) कन्सिसटंसी २) व्यक्ती निरपेक्षितता आणि ३) स्थल-काल निरपेक्षितता.

पॅथी सिद्ध होणे वा न होणे, याबद्दल काही म्हणणे नाही मात्र 'व्यक्ति तितक्या प्रकृती' या न्यायाने औषधोपचार हा व्यक्तिनिरपेक्ष असू शकत नाही. अ‍ॅलोपाथीत सुद्धा अमूक औषधाची वा वस्तूची अ‍ॅलर्जी आहे का, ही व्यक्तिसापेक्ष माहिती घेतली जाते. अवांतरः माझ्या ओळखीचे एक वैद्य केवळ नाडिपरिक्षा करून जे सांगतात, ते मी बघून थक्क झालेलो आहे. शारीरिक व्याधीच नव्हे, तर मानसिक स्थिती सुद्धा त्यांना नाडिवरून कळते. नाडिपरिक्षा ही एक कठीण विद्या असून ती सर्वांनाच साध्य होत नसते, असे ते सांगतात.

असे एक वैद्य अशोक भट पुण्यात पूर्वी मुंजाबाच्या बोळापाशी होते. खुन्या मुरलीधराच्या मंदीरातले खरे वैद्य कावीळवाले देखील नाडीपरिक्षेवरून उपचार करत.

नाडीपरीक्षेबद्दल माझाही अनुभव अतिशय चाम्गला आहे. पण नाडिपरिक्षा ही एक कठीण विद्या असून ती सर्वांनाच साध्य होत नसते, हे जरा जास्त झालं. ज्याची निरिक्षणशक्ती आणि चिकित्सक्बुद्धे उत्तम असेल असा कुणीही माणूस नाडीपरीक्षा व्यवस्थित करु शकेल. आणि मूळातच डॉक्टर होण्यासाठी या गोष्टी आवश्यक आहेतच. माझ्या ओळखीचे एक वैद्य अत्ता केवल ३२ वर्षाचे आहेत. त्यांची नाडीपरीक्षा देखिल अशीच उत्तम आहे. अगदी मानसिक स्थितीचेदेखिल तंतोतंत वर्णन करतात. आणि औषधाचा परीणामदेखिल ताबडतोब होतो. ...पण होमिओपॅथीबद्दल धागा असताना नेहमी तिथे आयुर्वेद का येतो बरं? लोकांना खरोखरच होमिओपॅथीबद्दल काहीही माहित नाहीये हेच खरं.

होमिओपाथी ला बुवाबाजी म्हणुन जाहिर करुन, अंधश्रद्धा निर्मुलन विधेयका नुसार कारवाई केली पाहिजे.
संपुर्ण सहमत !

होमिओपाथी ला बुवाबाजी म्हणुन जाहिर करुन, अंधश्रद्धा निर्मुलन विधेयका नुसार कारवाई केली पाहिजे.
होमियोपाथीने कधीच, कुणालाच फायदा झाला नसता, तर ती केंव्हाच आपोआपच नामशेष झाली असती. फायदा तर होतो, पण त्याबद्दल जो सिद्धांत सांगितला जातो, तो कितपत खरा आहे, हा प्रश्न असू शकतो. अंधश्रद्धा निर्मुलन विधेयक हे सुद्धा विवेकाने वापरले गेले पाहिजे. एकदम टोकाची भूमिका घेणे योग्य नव्हे. आम्हाला तर आलोपाथीने जेवढे नुकसान झाले, तेवढे आयुर्वेदिक वा होमियोपाथीने कधीच झालेले नाही. एकदा आरोग्य बिघडले, की तो विषय फार गुंतागुंतीचा आणि जटिल झालेला असतो. कुणाला कश्याने बरे वाटेल हे सांगणे कठीणच. आलोपाथीमुळे एक व्याधि बरी होते, तर दुसरी उद्भवते, असे बरेचदा घडत असते.

होमियोपाथीने कधीच, कुणालाच फायदा झाला नसता, तर ती केंव्हाच आपोआपच नामशेष झाली असती.>>>>>>>>>> अहो गंडेदोरे, काळी जादू, वेगवेगळे ग्रहांचे खडे, वास्तुशास्त्र ह्यांनी पण कोणाचा कधी फायदा झाला नाही, तरी पण शतकानुशतके चालू च आहे ना. पुन्हा एक दुरुस्ती, अ‍ॅलोपाथी अशी कुठलीही पॅथी नाही.

अ‍ॅलोपाथी अशी कुठलीही पॅथी नाही.
मग कोणता शब्द वपरावा म्हणता? गंडेदोरे, काळी जादू, वेगवेगळे ग्रहांचे खडे, वास्तुशास्त्र वगैरेंच्या वाटेला मी स्वतः कधी गेलेलो नाही, परंतु यांचा कधीच कुणालाच फायदा झालेला नाही, याचा कोणताही विदा वा पुरावा माझ्याकडे नाही. हा माझा एक वैयक्तिक तर्क असू शकतो, त्या आधारावर टोकाचे विधान करण्याचा, या गोष्टींना 'अंधश्रद्धा' या प्रकारात मोडण्याचा अधिकार मला नाही, एवढे मला कळते. समर्थांनी सांगितलेल्या 'सावधपण सर्वविषयी' आणि 'विवेक' यांचा उपयोग केला, तर अनेक अनिष्ट व्याधि-उपाधिं पासून आपण स्वतःला वाचवू शकतो. होमियोपाथी औषधांचा व्याधिनिवारणासाठी उपयोग होतो, याचा भरपूर अनुभव मला आहे, आणि असे अन्य अनेक लोक माझ्या परिचयात आहेत.

मग कोणता शब्द वपरावा म्हणता?
Modern Medicine हा सध्याचा प्रचलित शब्द आहे. ह्याला कुठलेही बंधन नाही, जे जे शास्त्रिय कसोट्या लावुन सिद्ध होउ शकते ते सर्व उपचार ह्यात चालतात.

या प्रतिसादासारखेच माझे काहीसे मत आहे. होमिओपाथी हे शास्त्र नसेल पण ते उपयुक्तच नाही असे म्हणणे खरे नाही. गंडे दोरे शास्त्र नाही पण ते उपयुक्तच नाही हे खरे नाही. श्रद्धा हे शास्त्र नाही पण ती उपयुक्तच नाही हे खरे नाही. शास्त्र हे नेहमीच अपुरे असते. पण त्यातील काही कसोट्यामुळे त्याबद्द्लची खात्री ही नक्कीच जास्त असते.

ज्यांना होमिओपॅथीच्या उपयुक्ततेविषयी शंका आहे ते स्वतः औषधे घेऊन पडताळणी का करत नाहीत? संजय क्षीरसागरांच्या मुद्द्यांतले २ आणि ३ तर अत्यंत भंपक मुद्दे आहेत. व्यक्ती निरपेक्षितता आणि स्थल-काल निरपेक्षितता नसणे म्हणजे ढोबळ जनरलायझेशन आहे. दुकानात शर्टाच्यासुद्धा कैक साईझ सापडतात, हिमालयात घालायचे कपडे मुंबईत घालून फिरता येत नाही म्हणून ते ते कपडे हे कपडे म्हणण्यायोग्य नाहीत का? तसंच प्रत्येक होमिओपॅथीक डॉक्टरला औषधांचं केमिकल कंपोझेशन कसं माहिती असेल. ते प्रश्न शास्त्रज्ञांना विचारायचे. अकलेचे तारे तोडायचे ठरवली की त्याला मर्यादा नसते. अ‍ॅलोपथीचा कैवार घेणार्‍यांना १० मिली ग्लायकोडीन मधे किती मायक्रोमिली खरे औषध असते ही माहीती आहे का? अँटीबायोटीक घ्या त्यातून निर्माण होणारी हीट कमी करायला रँटॅक घ्या आणि मोशन पातळ होतील म्हणून आहार कंट्रोल करा, हे असले आचरट प्रकार होमिओपॅथी मधे होत नाहीत. इथे होमिओपॅथीक शास्त्रज्ञ नाहीत म्हणून शंकानिरसन होणार नाही हे लक्षात ठेवा. उद्या मी अणूउर्जेवर प्रश्न विचारीन आणि उत्तरं नाही मिळाली की अणूउर्जा हे थोतांड आहे असं म्हणेन, असले प्रकार चाललेत.

मी लिहीलेले तीन नियम हे वैज्ञानिक सत्यतेचे जगनमान्य निकष आहेत. अर्थात याची तुम्हाला कल्पना नाही हे तुमच्या प्रतिसादातल्या भोंगळपणावरुन कळतं. शर्टाचे साइज आणि हिमालयातले कपडे यांचा वैज्ञानिक सत्याशी (इथल्या संदर्भात औषधाला मान्यताप्राप्त होण्याशी) काडीमात्र संबंध नाही. मी चित्रगुप्तना आजार आणि औषध यांची माहिती विचारली होती. इथे मी कैवार वगैरे घेण्याचा (तुम्हाला होमिओपॅथीचा असला तरी) प्रश्नच नाही. ते बहुदा त्तुमच्या अगाध बुद्धीमत्तेचं आकलन असावं! अर्थात तुमच्या या वाक्यानं :
तसंच प्रत्येक होमिओपॅथीक डॉक्टरला औषधांचं केमिकल कंपोझेशन कसं माहिती असेल. ते प्रश्न शास्त्रज्ञांना विचारायचे.
कमालीची हाईट गाठली आहे! म्हणजे डॉक्टरला तो काय औषध देतोयं याचीच माहिती नाही. शाब्बास!

मी लिहीलेले तीन नियम हे वैज्ञानिक सत्यतेचे जगनमान्य निकष आहेत
ते तीन नियम तुम्ही लिहिल्यामुळे जगन्मान्य झालेत की त्यांचा कोणीच प्रतिवाद करु न शकल्याने जगन्मान्य झालेत =))

उदा. गुरुत्वाकर्षणाचा नियम. पृथ्वीवर कुठेही (स्थल निरपेक्षितता), कुणीही टाकली तरी (व्यक्ती निरपेक्षितता), केव्हाही (काल निरपेक्षितता) आणि नेहमी (वारंवारिता) वस्तु खालीच पडेल. हाच निकष मेडिकल सायन्समधे औषध प्रमाणित होण्यासाठी लावला जातो.

अ‍ॅलोपथीचा कैवार घेणार्‍यांना १० मिली ग्लायकोडीन मधे किती मायक्रोमिली खरे औषध असते ही माहीती आहे का? जोशी साहेब आपण ग्लायकोडीनचे नाव घेतलेत म्हणून त्यात असलेली औषधे काय आहेत (ती बाटलीवर लिहिलेली असतात) पण आपल्या माहितीसाठी खाली देत आहे. अशी माहिती सर्व आधुनिक वैद्यकशास्त्राच्या औषधांबद्दल उपलब्ध http://www.alembic-india.com/cough-cold.php Glycodin Cough Syrup Each 5 ml contains Terpin Hydrate USP 10 mg, Dextromethorphan Hydrobromide IP 10 mg, Menthol IP 3.75 mg, Syrup Glycerin Base q.s. Bottle 100 ml 50 ml यातील प्रत्येक औषध काय शुद्धतेचे आहे ते USP united states pharmacoepial convention आणि IP म्हणजे indian pharmacoepia यात प्रमाणित केलेली असतात त्याप्रमाणे असतात तसे नसेल तर एफ डी ए त्यांच्यावर खटला भरते आपण USP मध्ये terpin hydrate शोध म्हणजे त्याची शुद्धता काय आहे आपल्याला कळेल. आधुनिक वैद्यकात प्रत्येक औषधाचे घटक कोणते आहेत हे त्या बाटलीवर किंवा पैक वर लिहिणे कायद्याने अनिवार्य आहे.त्यमुळे जर संशय असेल तर डॉक्टर सरळ ती बाटली पाहून खात्री करू शकतात. इतके काटेकोर नियम इतर कोणत्या पाथीला आहेत काय ते मला माहित नाही. बर्याच वेळेला होमियोपथी शास्त्रीय कसोटीवर उतरत नाही हि वस्तुस्थिति आहे. तरीही बर्याच लोकांना गुण येतो असा त्यांचा अनुभव आहे.माझे म्हणणे एवढेच आहे कि ते शास्त्र आहे असे न म्हणता ते एक तत्वज्ञान आहे. ज्याने त्याने आपल्या श्रुती स्मृती आणि बुद्धीप्रमाणे ठरवावे कि आपण काय करावे शेवटी आपण ज्या पाथीवर विश्वास आहे त्याचे औषध त्याने घ्यावे असे मला वाटते. कुणाच्या का कोम्बड्याने, उजाडल्याशी कारण

काही आयुर्वेदिय औषधांवर यात कुठल्या कुठल्या वनस्तपी आहेत हे त्यांच्या मराठी आणि शास्त्रीय नावासकट लिहिलेले पाहिलेले आहे. आता हा नियम आहे का फक्त त्या मन्युअफॅक्चररनी केलं होतं ते नाही माहित.

वनस्पती कुठल्या आहेत हे लिहुन काय उपयोग? ते मिश्रण गरम केल्यावर, गाळल्यावर, दुसर्‍या कशाशी मिक्स केल्यावर आत काय शिल्लक रहाते आणि कीती रहाते ते महत्वाचे आहे. आणि वनस्पती म्हणजे काय? मुळ, खोड, साल, फुल , फळ नक्की काय? इतकेच काय फुल, फळ कीती पिकले आहे त्याप्रमाणे केमिकल बदलतात. तेंव्हा वनस्पती म्हणजे नक्की काय?

ते मिश्रण गरम केल्यावर, गाळल्यावर, दुसर्‍या कशाशी मिक्स केल्यावर आत काय शिल्लक रहाते आणि कीती रहाते ते महत्वाचे आहे.
सहमत. त्या झाडाचं जे काही नाव असेल ते. त्याचा नक्की कुठला भाग वापरला आहे त्याचा उल्लेख शास्त्रीय नावात होता का नाही ते नाही आठवत. पण मराठीमध्ये लिहिलेल्या भागात तरी नक्की मूळ का फळ ते लिहिले होते.

ढेरे साहेब, अडुळसाचा काढा/ रस/ कफ सिरप घेतात तेंव्हा त्यात अडुळसा अर्क असे लिहिलेले असते पण मुळ अडुळसा पानात किती टक्के रस आहे आणि आणि त्याचा अर्क कशा पद्धतीने काढलेला आहे याचे अचूक परिमाण कोणत्याही आयुर्वेदिक औषधात लिहिलेले नसते.तो भैषज रत्नावली,भाव प्रकाश किंवा रत्नाकर आयुर्वेद नीघंटू अशा मान्यता प्राप्त ग्रंथात दिल्याप्रमाणे काढलेला असतो. पण थोड्या फार प्रमाणात फरक असतोच. दुर्दैवाने आयुर्वेदिक औषधांचे मानकीकरण आणि संशोधन आधुनिक विज्ञानाच्या काटेकोर पद्धतीप्रमाणे होताना सहसा आढळत नाही त्यामुळे त्या औषधांचे परिणाम वैद्याच्या अनुभवावर जास्त अवलंबून राहतात. याच विरुद्ध अडुळसा वनस्पतीतून व्हासिसीन नावाचे द्रव्य वेगळे केले कि किती मिलीग्राम आहे ते स्पष्ट पणे मोजून तेवढाच डोस रुग्णाला नवीन डॉक्टर सुद्धा काटेकोर पणे देऊ शकतो. आमच्या सदाफुलीमध्ये कर्करोगावर परिणामकारक औषध आहे म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेण्यात काहीच हशील नाही. त्यातून व्हिनब्लास्टीन नावाचे औषध् विलग करून Vinblastine 6 mg/m2 IV on days 1 and 15 अशा काटेकोर पणे देत येत नाही असे मानकीकरण आणि संशोधन आधुनिक विज्ञानाच्या काटेकोर पद्धतीप्रमाणे आयुर्वेदिक औषधांवर होणे आवश्यक आहे तरच हे प्राचीन ज्ञान आधुनिक जगात मानवाच्या कल्याणासाठी वापरता येईल.

+१ डॉक..!
असे मानकीकरण आणि संशोधन आधुनिक विज्ञानाच्या काटेकोर पद्धतीप्रमाणे आयुर्वेदिक औषधांवर होणे आवश्यक आहे तरच हे प्राचीन ज्ञान आधुनिक जगात मानवाच्या कल्याणासाठी वापरता येईल.
अगदी अगदी.. हळदीच्या गोंधळानंतर खरेतर या संदर्भात आपल्याकडे काही सुरुवात देखील झाली होती सरकारी पातळीवर. ती टी के डी एल च्या या संकेत-स्थळावर पाहता येईल. पण पुढे काय झाले हे नेहमीच्या सरकारी पद्धतीने ठाऊक नाही. ही तरी वेब-साईट तरी तीन चार वर्षे अद्ययावत केलेली नाहीये. पुढे काही झाले तर पाहुयात.

आयुर्वेदिक औषधांचे मानकीकरण
निर्मिती प्रक्रियेचं हे होणं जरूरी आहे असं वाटतं म्हणजे एखाद्याला गुण आला नाही तरी चालेल पण औषधाचा त्रास होउ नाही

(किंवा प्रतिसाद देत असावेत) कारण ही गोष्ट:
प्रत्येक औषधाचे घटक कोणते आहेत हे त्या बाटलीवर किंवा पैक वर लिहिणे कायद्याने अनिवार्य आहे
अगदी उघड आहे!

औषधाचं नाव तर होमिओपॅथीच्या बाटल्यांवरही असतं. पण अमुक औषध घेतल्याने सर्दी बरी होते, पण ती कशी होते कुणाला ठाऊक आहे? त्या औषधाची शरीरात गेल्यावर काय केमिकल रिअ‍ॅक्शन होते हे किती जणं सांगू शकतात? अशा अर्थाने ते वाक्य होतं. उदा. काली फॉस ह्या औषधाच्या नावातच त्यातल्या क्षाराचं / औषधाचं वर्णन आहेच की.

त्या औषधाची शरीरात गेल्यावर काय केमिकल रिअ‍ॅक्शन होते हे किती जणं सांगू शकतात?
मग मेडिकल सायन्स काय आहे? तिथे काय खोक्यावर छापलेली लक्षणं बघून मेडिसिन प्रिस्काइब करायला शिकवलं जातं का? डॉक्टरला औषधाचा शरीरावर नक्की काय परिणाम होईल हे माहिती नसतांना तो औषधं लिहून देतो आणि इंजेक्शनं ठोकतो का?
अकलेचे तारे तोडायचे ठरवली की त्याला मर्यादा नसते.
हे तुमचंच वाक्य आता तुम्हाला कसं वाटतं?

उगाच बोंबाबोंब नका करू. इथे किती जणं ह्याचा अर्थ आपल्यापैकी किती जणं असा आहे. किती डॉक्टरांना असा नाही. तसं वाटण्याइतपत मी बाळबोध नाही. इथे चर्चा करणार्‍यालोकांपैकी किती असा अर्थ आहे.

इथे किती जणं ह्याचा अर्थ आपल्यापैकी किती जणं असा आहे.
वॉट अ ज्योक! मग पेशंट आणि डॉक्टरमधे फरक काय राहिला? उगीच भंकस करण्यापेक्षा पहिल्यांदाच संयमित प्रतिसाद दिला असता तर ही वेळ आली नसती.