Welcome to misalpav.com
लेखक: यश पालकर | प्रसिद्ध:
नियती कधी कशी वागेल तुम्ही सांगू शकत नाही ती तुमच्या आयुष्यासोबत समांतर चालत असते. वाऱ्यासारख तीच अस्तित्व जाणवत असत. कधी रणरणत्या उन्हात वाऱ्याची झुळूक मनाला तृप्त करून जाते तर कधी सोसाट्याचा वारा सुटल्यावर घर उध्वस्त करून जातो. नियती पण रंकाला राजा बनवते आणि कधी क्षणात होत्याचे नव्हते करून जाते. आपण सारी स्वप्न सजवतो पण नियतीच्या मनात काय चाललं आहे ह्याचा आपणास मागमूसही नसतो. सार काही सुरळीत चालू असताना नियतीच वागण आपल्याला जाणीव करून देत कि ह्या विश्वापलीकडे सुद्धा एक शक्ती आहे ज्याच्या तालावर आपल आयुष्य चालू आहे.असं जरी असल तरी ह्याचा अर्थ हा नाही कि आयुष्याचा खेळ खेळायचाच नाही. उलट नियतीच्या खेळाला धैर्याने ,संयमाने तोंड द्यायचं आणि विस्कटलेला डाव सावरायचा आणि पुन्हा उभं राहायचं.कधी न कधीतरी नियतीचे फासे आपल्या बाजूने नक्कीच पडतील .... यशवंत
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

नियती म्हणजे काय? नियती कधी कशी वागेल? ह्या प्रश्नांची उत्तरे हवी असतील तर क्रुपया "कर्माचा सिद्धांत" हे पुस्तक वाचावे.

तुमच्याकडे मधुमेहापासून नियतीपर्यंत सर्व प्रश्नांची उत्तरे असलेली पाहून फार्फार कवतिक वाटतं. एक मिपाकर म्हणून तुमचा आमाला अभिमान वाटतो.! *biggrin* (ऊर भरून येतो.. मान उंचावते.. इत्यादि इत्यादि बाकी घ्या समजून. )

अहो.. सुप्राकॉन्शसच्या लेव्हलवरुन ऑकल्ट एक्सपिरियन्सेस घेताना.. बरं का.. नाही.. तुम्ही "इन ट्यून विथ द ट्यून" वाचाच..

ते कॉस्मॉस म्हंजे काय हो ? नै आमाला किस्मीस माहीती आहे ..आणि "इन ट्यून विथ द ट्यून" या पुस्तकाचा लेखक कोण ?

तुम्ही इन ट्यून विथ द ट्यून वाचाच...अन हा ब्रदर अरुणाचलम-बोगस माणूस आहे साहेब-पण गुरुदेवांचा गाववाला पडला. सगळीकडे वशिलेबाजी आहे!!!! बाकी कायकिणी गोपाळरावांनी नंतर समाधीतून जागं केलं की नाही ;)

>>हे पुस्तक कुणाचे आहे? अहो कुणाचं आहे म्हणजे काय? मीच लिहीलंय. एकदा गुरुदेव स्वप्नात आले आणि म्हणाले लिहा !! ;)

यू सी द को-इफिशियंट ऑफ द लिनीयर इज जक्स्टापोझिशन्ड बाय द हिमोग्लोबिन इन द अ‍ॅट्मोस्फेरिक प्रेशर इन द कंट्री!!

ह्या विश्वापलीकडे सुद्धा एक शक्ती आहे ज्याच्या तालावर आपल आयुष्य ......... साफ चूक ! मना त्वाचि रे पूर्वसंचित केले | तयासारखे भोगणे प्राप्त झाले || संचित म्हणजे काय ? वाचा " कर्माचा सिद्धांत " आमेन!

संचित म्हणजे काय ? वाचा " कर्माचा सिद्धांत "
कर्माचा सिद्धांत माणसावर प्रचंड अन्याय करतो. या जन्मात मला ज्या वाईट प्रसंगांना, दु:खांना सामोरं जावे लागत आहे त्या माझ्या मागच्या जन्मातील नेमक्या कोणत्या वाईट कर्माचे फळ आहे हे मला माहिती नाही. मी या जन्मी सुखी असेन तर माझ्या मागच्या जन्मातील नेमक्या कोणत्या सत्कृत्याचे फळ आहे हे ही मला कळत नाही. हा कसला न्याय ज्यात मला शिक्षा किंवा बक्षिस मिळते मात्र ते कोणत्या गोष्टीसाठी मिळते हेच मला माहिती नाही. बाकी हीराभाई ठक्कर यांचे "कर्माचा सिद्धांत" हे पुस्तक अफलातून आहे. दु:खितांना प्रचंड दिलासा या पुस्तक वाचनाने मिळतो.

@बाकी हीराभाई ठक्कर यांचे "कर्माचा सिद्धांत" हे पुस्तक अफलातून आहे. दु:खितांना प्रचंड दिलासा या पुस्तक वाचनाने मिळतो. >>> अगदी अगदी...! माझ्यासारख्या आळशी माणसाला,स्वतःला प्राप्त झालेल्या दु:ख्खांना अनेक बचावात्मक आणि काल्पनिक गोष्टींना हताशी धरून वाट द्यायला मिळते! लबाड्या लपवायचा चान्स मिळतो. फक्त एकदा असं झालं,की- जे काहि होत आहे,ते गेल्या जन्मीच्या कर्माचं फळं आहे.या मझ्या समजुतिमुळे मी माझ्या मित्राच्या खिशातनं त्याला न विचारता पेन घेतलं. त्यावर तो निर्बुद्ध माणूस , चोर..चोर असे ओरडला! मी त्यास म्हणालो,अरे मित्रा-ही चोरी नाही..हे फक्त कर्म-फलित आहे. तुझ्या नशिबात होतं पेन चोरिला जावं.माझ्या नशिबात होतं,मी ते चोरावं. तेंव्हा..तक्रार करू नकोस..हे आपल्या दोघांच्याही गेल्या जन्मातल्या कर्माचं फळ आहे. तेंव्हा ते गपचूप खा बरं!!! त्यावर त्यानी माझ्याकडून पेन हिसकाऊन घेतलं,आणि मला एक चापट मारून म्हणाला- हे ही आपल्या दोघांच्या गेल्या जन्मातल्या कर्माचं फळ आहे! मग मात्र मला त्या दुष्ट माणसापुढे काहिच बोलता येइ ना! :-/ हे ही "गेल्या जन्मातल्या कर्माचं फळ!" आता मी या सगळ्या फळांचं फ्रुटसॅलेड तयार करून भगवंताला पुढं जाणार आहे. आणि,त्याच्या फळांचा त्यालाच नैवेद्य दाखवून, जाब विचारणार आहे.... अर्थातच माझ्या गेल्या जन्मात असं काहि माझ्या हातून घडण्याचं कर्म,मी केलं असेल तर........................आणि तरच...........................!!!!!!!!!!!!!!!!

पाठीमागच्या अपार्टमेंट्च्या चौथ्या माळ्यावरच्या चिकनिसांची मधली कार्टी ? असेल बै ! ती जरा आगावच आहे . काय करेल सांगता येत नाही ! *wink*

चिकनीस??? नक्की आडनाव आहे की "प्रेयसीस पत्र" सारखे "चिकनीस" असे नाव दिलेय =)) तदुपरि आगाव हा शब्द अगदी बोलीभाषेतल्यागत लिहिला म्हणताना बरं वाटलं. :) (दक्षिणमहाराष्ट्रदाक्षिण्यवादी) बॅटमॅन.

हे सगळं नियती करते? मी तर ऐकलं होतं की जन्म झाल्यापासून सहाव्या दिवशी सटवी येते आणि भाळी नशिब लिहून जाते. त्यापुढचे सारे सटवीच्या लेख्याप्रमाणे घडते.

तू टाईप केलेले दोन्ही मला 'र्‍या' असेच दिसतायत. ते सांगतायत तो पायमोडका 'र्' स्पेसल लिनक्समधे टाईप केला असेल तर दिसतो.

>>पायमोडका 'र्' स्पेसल तांच म्हणतांय गे मिया. माका हंयसर IE त पायमोडको 'र्' दिसतांहा नि क्रोमात '-या'!! (हो '-या' मियां हायफन देवान लिवलोहां). :)

तांच म्हणतांय गे मिया
आता हा गे मिया कोण?
माका हंयसर IE त पायमोडको 'र्' दिसतांहा
अँड आय थॉट थेअर इज़ ओन्ली हडपसर इन पुणे.
मियां हायफन देवान लिवलोहां
मियां एकदम "हाय फन" आहे हे कळ्ळं , पण पुढं देव कुठनं आला 'मरे' ;)

BOSS (Bharat Operating System Solutions) अशी काहीतरी सरकारी लिनक्स आहे जी उबंटू प्लॅटफॉर्म ला C-DAC ने बनवलीये. त्यात मी chrome टाकू शकलो नाही. फक्त Firefox आहे.

vaaRyaa चं वार्‍या होतंय >>> vaaRyaa चं "वार्‍या " नाही, तर काय टार्‍या होईल??

कर्माचा सिद्धांत ह्या पुस्तकात लेखकाने इकडून तिकडून वाचलेले किवा स्वताचे opinions टाकलेले आहेत. कर म्हणे मारताना तो माणूस त्याच्या मुलाला नारायण नारायण अश्या हाक मारत होता म्हणून त्याला मुक्ती मिळाली. मागच्या जन्मातली माणसं ह्या जन्मात प्राण्यांच्या स्वरुपात तुमच्या समोर आली तर त्याला तुम्ही मिठी मारली असती वगेरे . कैच्या काही.
कर्माचा सिद्धांत माणसावर प्रचंड अन्याय करतो. या जन्मात मला ज्या वाईट प्रसंगांना, दु:खांना सामोरं जावे लागत आहे त्या माझ्या मागच्या जन्मातील नेमक्या कोणत्या वाईट कर्माचे फळ आहे हे मला माहिती नाही. मी या जन्मी सुखी असेन तर माझ्या मागच्या जन्मातील नेमक्या कोणत्या सत्कृत्याचे फळ आहे हे ही मला कळत नाही. हा कसला न्याय ज्यात मला शिक्षा किंवा बक्षिस मिळते मात्र ते कोणत्या गोष्टीसाठी मिळते हेच मला माहिती नाही.
ते माहित नसण्याचं कारण असं आहे कि , कुठल्या कृत्याबद्दल काय शिक्षा होतीये किवा कुठल्या कृत्याचं काय बक्षीस मिळतंय हे समजलं असतं तर माणसं बक्षिसाच्या लोभाने किवा शिक्षेच्या भीतीने कर्म करत राहिली असती . ज्याला काहीही अर्थ नाहीये . एखादी गोष्ट शिक्षेच्या भीतीने न करण आणि मुळातच प्रेम , करुणा ह्या गुणांमुळे न करण ह्यात फरक आहे . दुसरी गोष्ट म्हणजे जन्मोजन्मीची प्रत्येक गोष्ट जर माणसाच्या लक्षात राहिली असती तर त्याच्या डोक्यात प्रचंड गोंधळ माजला असता. त्याच त्याच आठवणींमुळे जीवन खूप कठीण झाला असतं. म्हणून विस्मृती हि माणसाला मिळालेली देणगी आहे .
जन्म झाल्यापासून सहाव्या दिवशी सटवी येते आणि भाळी नशिब लिहून जाते
ते काही माहित नाही. पण हे नशीब आपल्याच पुर्वकर्माची फलं असतं