रेल्वेच्या प्रवासात, पूर्वी, शेजारी बसलेल्याच्या वृत्तपत्रात फार नजर जायची. त्यातल्या बातम्या आपण कधी वाचायला लागलो हे देखिल लक्षात यायचं नाही. सध्या वृत्तपत्रांची जागा 'स्मार्टफोन्स'नी घेतलीय, इतकंच....
लोकांचं - सहप्रवाशांच्या खासगी जीवनाचे धागेदोरे नकळत आपल्याला कळत जातात - नको असले तरीही! खूप साऱ्या प्रवासात ( बस ट्रेन ) खूप लोकांचे खाजगी धागेदोरे आहेत मनाच्या कुपीत ....
पण कधी कधी त्रास होतो खूप ....
मागच्या आठवड्यात बँकेत गेलो होतो एका फॉर्मवर स्टँप घ्यायला. शेजारच्या काऊंटरवर एक जोडपं कर्मचार्याशी बोलत होतं. मला ज्याच्याकडून स्टँप घ्यायचा होता तो काहीश्या कारणाने प्रिंटरपाशी गेला आणि तो येईपर्यंत शेजारचं जोडपं निघून गेलं. मी जिथे होतो तिथला कर्मचारी परत येताच ते जोडपं जिथे बसलेलं होतं तिथल्याने त्याला विचारलं,
"ये कौन थे पता है क्या"..
"मेरे को हजबंड-वाईफ लगे, क्यों ऐसा नही था क्या?"..
"सून..ये जो बंदा बैठा था उसकी ये गर्लफ्रेंड थी..ये बंदा ऑलरेडी शादीशुदा है"..
"और गर्लफ्रेंड?"
"डिव्हॉर्सी...एक बच्चा है तीन साल का!!"
माझ्या फॉर्मवर स्टँप घेतला आणि निघालो, निघता निघता मेघना पेठेंचं नातिचरामि आठवल्याशिवाय राहीलं नाही.
रीटा वेलणकर्/वेलीणकर वाचताना-पाहाताना अशा मुलींची तगमग खूप खोलवर जाणवायची. मी कॉलेजमध्ये असताना कधी वसतिगृहात राहिले नाही परंतु नोकरी लागल्यानंतर वर्किंग वुमन्स होस्टेलवरती काही वर्षे गेली. तिथल्या काही मुलींकडे पाहाताना खरंच वाईट वाटे. लग्न झालेल्या माणसाशी प्रेमसंबंध ठेवणारी म्हणजे काही चांगले नाहीच. अशा वेळेस कर्तीसवरती, नोकरी करत असलेली अथवा वय वाढून मॅच्युरिटीपर्यंत पोचलेली मुलगी असं करतेय म्हणजे काही पौगंडावस्थेतलं प्रेम नव्हे. तरीही सगळं समजून उमजून चाललेलं असतं. एक दोघींनी मन मोकळं केलं तेव्हा प्रथमतः त्यांना पुढे जाऊन इतकं त्रांगडं होईल असं वाटलंच नव्हतं. एकतर १४ फेब, नाताळ किंवा ३१ डिसेंबर हे त्या हॉस्टेलवरचे सगळ्यात डिप्रेसिंग दिवस असायचे. बॉयफ्रेंडस असलेल्या मुली नटून थटून भुर्र निघून जात. त्यादिवशी हॉस्टेलवर असलेल्या मुली म्हणजे सिंगल हे न बोलता कळायचं. इतरांचे बॉयफ्रेंड्स पाहून थोडा कॉम्प्लेक्स आलेल्या, कुणी छान बोललं की थोड्या विरघळलेल्या, मग हळूहळू फ्लर्टिंग, भेटीगाठी इत्यादीमधून आधी अपेक्षा नसायच्या. आणि नंतर मग प्रेमात पडल्यावर हक्काचं माणूस हवं असे. त्या माणसाचं घरी अगदीच वाईट चाललेलं असे असं नाही. निदान मी ऐकलेल्या उदाहरणात तर नाहीच. दोघांच्याही बायका दिसायला बर्यापैकी, चांगल्या उच्चपदस्थ, करिअरमध्ये उत्तम अशा होत्या. अशा वेळेस यांना या तरूण मैत्रिणी -ज्या त्यांच्यासोबत भंकस करायला मोकळ्या होत्या आणि बायकोला करिअर-जब्बदार्या यातून तिला असल्या छचोरपणासाठी वेळ नव्हता. घरचं कार्य, परदेश वार्या किंवा इतर सोशल इव्हेंटसना बायको आणि फक्त लाँग ड्राईव्हला जायला की जिथे यांना दुसरं कुणी पाहणार नाही तिथे या मुली. भेटणं तर दूर, पण एकदा घरी पोचल्यावर फोनवर सुद्धा बोलायची मारामार. रात्री कॉरीडॉरमधून फिरताना खिडक्यांशी मुली फोनवर बोलताना दिसायच्या.
एक अगदी आत्महत्येपर्यंत पोचली होती. तिच्या बाबतीत तर ती एकटीच मजेत होती. ही अशी खेळकर सुंदर मुलगी पाहून हा माणूस तिच्या मागे जवळजवळ वर्षभर होता. तेही इरिटेटिंग फ्लर्टिंग नाही तर छान मौजमजेचं. तिने त्याला सर्वतोपरी हे चांगलं नाही, मी इंटरेस्टेड नाही असं सांगत राहिली. फॅमिली फ्रेंड होता म्हणे. नंतर कधीतरी अपसेट असताना त्याने खांदा दिला आणि पुढचं रामायण घडलं. नंतर बरीच भांडणानंतर नात्यात कडवटपणा आला. घरच्यांनी तिचं जुळलेलं लग्न या माणसाने मोडलं तेव्हा तिने आत्महत्येचा प्रयत्न केला. प्रकरण पोलिसांपर्यंत गेलं होतं. पुढे काय झालं माहित नाही.
यात पूर्ण चूक अशा एकट्या मुलींची नसली तरी ऐकलेल्या गोष्टींमधून अशा नात्यांत अडकलेले पुरूष अधिक निर्ढावलेले वाटले. अपवाद असू शकतील.
अवांतरः प्रतिसाद विस्कळित झालाय. अधिक तपशील न देता आणि चांगल्या ओळखीतल्या मुली या प्रसंगातून गेल्या असल्याने प्रतिसाद एकांगी होईल का, असे वाटून हात आखडता घेतलाय.
>>अशा नात्यांत अडकलेले पुरूष अधिक निर्ढावलेले वाटले.
बर्याच अंशी खरं आहे!! जवळच्या नात्यात असं घडलं तर आपलं नाणं खोटं आहे म्हणून सोडून देण्याशिवाय पर्याय नसतो. कधीतरी या सगळ्यावर लिहायचा विचार आहे. बघू कसा आणि कधी वेळ मिळतो.
सगळे प्रकार याच आकाशाखाली! यातला पुरुष नेहमीच सेफ असतो. बायकोला कळलंच तर सॉरी, तीच गळ्यात पडली म्हणून वेळ मारून नेतो. बायकोही बिचारी मुलांकडे बघून आणि समाजाच्या भीतीने गप्प बसते. दुसरी असते तिचे हाल तर विचारू नयेत. आपण दोघींवर अन्याय करतो आहोत, दोघींच्या आयुष्यांशी खेळतो आहोत असं एकदाही या लोकांच्या मनात येत नसेल का?
प्रतिक्रिया
चांगलंय !!!
डिलीट काबरं केलं?
हेच विचारणार होतो....
उत्तर लेखातच आहे - स्पष्ट आहे
खूप दिवसांनी...
होतं खरं असं!
आवल्डे !! शेवटची कलाटणी मस्त.
रेल्वेच्या प्रवासात, पूर्वी,
हम्म..
हम्म्म!
दणकेबाज!
मागच्या आठवड्यात बँकेत गेलो
रोचक!!
>>अशा नात्यांत अडकलेले पुरूष
प्रतिसाद पटला. अशा केसेस
वाचतोय
http://www.maayboli.com/node
हम्म