Welcome to misalpav.com
लेखक: डॉ. दत्ता फाटक | प्रसिद्ध:
. काली फॉस उर्वरीत भाग.आणखी काही औषधे मस्तिष्का संबंधीची याचं संदर्भातील विशेष +++++ ४ ) Aethusea-------- Fool”s Parsley या औषधाविषयी थोडंस डॉ. क्लार्क यांनी “डिक्शनरी ओफ़ प्रेकटीकल मटीरि-यल मेडीका मध्ये म्हटलं आहे, या औषधाचे दुसरे नाव एवढे सार्थ आहे की “”हे औषध मुर्खाचे”च आहे, परमेश्वराने मेंदूत अक्कल भरली तेंव्हा हा पाल्य गैरहजर असावा, कारण काहीं म्हणता कांहीही आकलन करण्याची, समजून धेण्याची पात्रताच या मुर्खाकडे नसते. शरीर नि मन दोन्ही अशक्त, ना याचे लक्ष केंद्रित ( Concentrate ) होऊ शकत किंवा सुसंगत विचार करू शकत”” वर्गात शिक्षक शिकवीत असले तरी त्याचे लक्ष लागत नाही, वाचनाचा मनस्वी कंटाळा, डोकंच दुखू लागतं, डोक्यात गोंधळच फार,अभ्यासात लक्षच नसतं, पण इतर उठाठेवी फार. पालक थंड मिजाजीचा असेल तर काहीतरी करायला हवे म्हणून खटपटीला लागेल, सणकू असेल तर पाल्याच्या पाठीचं धिरडे होऊल. डॉ. क्लार्क यांनी वारंवार नापास होणा-या पदवीधराला दिले; व तो विध्यार्थी पदवीधर झाला, प्रत्येक परीक्षेच्या वेळी तो विध्यार्थी डॉ. क्लार्क यांचे कडून औषध घेवून जाई. ५ ) Argentnum Nitricum ------ नावाचे दुसरे एक औषध आहे, त्या बद्धल म्हटलं आहे “” Does Foolish Things” त्यांच्या मस्तकात फार मोठा गडबड – घोटाळा झालेला असतो, समर्पक नि तर्कबुद्धीला धरून त्याचे विचार चाललेले नसतात, स्वतःला विचार करणं जमत नाही, फारकाय मन म्हणजे “what is maind,? its nathing but Bunch of Tho-ughtes “ असो, तर त्यात तर्क विसंगतीच जास्त असते, मनाचा कमकुवत, कितीही समजावलं, वाचलं, ऐकलं तरी त्यांच्या बुद्धीवर उमटत नाही, त्याचा कसलाही परिणाम होत नाही. बोलताना त्याला योग्य शब्द आठवत नाहीत त्यामुळे भांबावलेला, त्याला जेकाही वाटत असत ते बोलून दाखवणेही जमत नाही. धंदेवाईक रुग्ण असला तर त्याला धंद्यानिमित्त भेटण्याचे झालं तर दिव्य वाटत, भेटण्याची वेळ साधायची हीबाब सुद्धा भयभीत करते, माझ्या पाह्ण्यात असे आसामी आले आहे की अगदी बाहेर निघण्यावेळी सगळा जामानिमा उतरून शौचगृह गाठावं लागतं. शंकाच जास्त, विध्यार्थ्याबाबतीत असंच घडतं, यशाची खात्री नसते, आत्मविश्वासच नव्हे तर कसलीच महत्वाकांक्षा उरत नाही, हेटाळणी होण्याची खंत वाटते, त्याचा परिणाम दुस-याना फसविण्याच्या प्रवृत्तीत होतो, त्यात आपलीच फसगत आहे हे समजण्यापलीकडे ही वृत्ती गेलेली आढळते. आतून अभ्यासाच्या नावे शून्य, पण बाहेर मात्र फुशारक्या हवेत इमले बांधण्या सारख्या. ६ ) काली फॉसची आणखी मानसिक लक्षणे आपल्या संसारी जीवनात पदोपदी जाणवणारी, अल्पशा मानसिक तणावाचा शरीरावर होणारा परिणाम, मामुली कामं ओझं वाटू लागतं, बोलताना लिहताना शब्द गाळतो किंवा सामगायचं असत एक पण बरळून जातो भलतंच परिणामी प्रमाद घडतात, नुकसानीचा भयगंड झोप लागत नाही, पैशाबध्दल अकारण भीती हेही एक कल्के फ्लुओर सारखे लक्षणं या क्षाराच आहे, या व्यवहारातील वागण्याच्या प्रमादामुळे सगेसोयरे, नातेवाईक, जोडलेली माणसं दुरावत आहेत, एकाकी पडल्याची भावना त्यामुळे भवितव्याची चिंता, त्यामुळे येणारा स्वभावातील चिरचीरेपणा, तापटपणा वाढीस लागतो झोप स्वस्थ न लागल्याने ( काली फॉस ३०—फेरम फॉस ३० किंवा २०० ) हा सकाळी उठतो तोच करवादलेला, कांहीही मनास भावत नाही, डोकं चढलेल स्त्रीयांच्या बाबतीत हे खूपच त्रासदायक असतं, अनेक कारणानी आलेला थकवा, चिडकी मनस्थिती, उघड बोलताही येत नाही, कामाचा रेटा सांभाळावा लागतो, त्यामुळे कुणाशी बोलणं नको की कुणी बोलायला आलेले चालत नाही, नको नकोसं वाटतं, मन एवढे हळूवार होतं की मुक्तपणे रडावंसं वाटतं, दुखीः जीवनात सुख-समाधान आनंदापेक्षा वैफल्यच जास्त आहे अशी भावना जोर धरते, नको जीव असं अंतरी वाटत पण धीर होत नाही, आपली कहाणी सांगताना घळाघळा अश्रू गाळते, वर्णन कधी राई पर्वता सारखं करून सांगते, संशयी वृत्ती याचा परिपाक भूतोन्माद ( HYSTERIA ) होण्यात होतो, अशी अवस्था कुण्या घरात थोडयाफार फरकाने असेल तर वेळीच आपल्या वृध्द मातेची आणि गृहिणीची काळजी घ्या, तिच्या भावनांची कदर करा सन्मान द्या तसं न केल तर विचार करा. साधी औषधे अमाप गुण देतील, सल्ला अवश्य घ्या काली फोस १२ ++ कल्के फ्लुओर १२ आणि फेरम फोस १२ असो. मला एखाद्याला एखाद्या विषयावर बोलण्याचा अधिकार तेंव्हाच असतो जेंव्हा त्याचा त्या संबंधी अभ्यास नव्हे तर व्यासंग असेल तेंव्हा, काहीतरी ऐकून आपलं मत बनवणं हया औषधीच्या लक्षणात बसत नाही. आपल्या भारतभूमीत कणाद नावाचे मुनिवर्य होऊन गेले, त्यांनी पदार्थांच्या अणु विच्छेदना संबंधी सांगताना असं सांगितलं आहे की अणु विच्छेदनातून अंतिम छेदनातून अनर्थ ओढवेल, प्लेटीनम किंवा अन्य धातूच्या विभाजनातून अणु बॉम्ब सारखं विध्वंसक अस्त्र आपण वाचतोच, फारकाय थोड्याफार फरकाने रोजच्या भोजनात आपण जे अन्नाचं चर्वण करतो ते त्या पदार्थांच अण्विकरणच करत असतो, तेव्हा ते पचते, अण्विकरणाने पदार्थाची ताकद वाढते, आणि ते लिलया रसधातूत विलीन होते, जेवढे ते सूक्ष्म तेवढे पचन सुलभ होते, काली फॉसची खासियत हीच की त्याला एक शहाणा व्यासंगी भावतो किंवा ठारवेडा कारण त्या वेड्यावर उपचार करून सुधारता येतं पण मधले जे त्रिशंकु असतात त्यांची अवस्था केविलवाणी असते, “Empty Vessel Makes Noise” तसं, ते धड ना इसपार ना उसपार, शहाणा जो ज्याला समजतं पण समजल्याचा आव आणत नाही, समजून नव्हे उमजून घेतो, हाच ह्या औषधाचा स्थायी भाव आहे, अशा महान असामीना ख-या अर्थाने सुजाण बनवणं. प्रज्ञा - विशेष ज्ञान, प्रतिभा – विशेष आभा – ओज, तेज या ईश्वरदत्त किंवा जन्मजात देन असलेल्या, ज्ञान, विद्वत्ता, पांडित्य हे सर्व आगोम आहे. दुसरी कडून सशक्त विचारधन, चांगले वाईट याचा चिंतन मनन करून ते पचनीय मधुकण आपल्या विचारांची भर घालून सोप्प करून सांगण्यात आपल्याला त्यात आपले विचार धालावेच लागतात, पण हे सारं ते समजून घेणा-यासाठी वायफळासाठी खास नव्हे, याशिवाय काली फॉसचे इतर औषधी गुण आहेतच पण मानसिकतेवर, बुद्धीमांद्यावर, मेंदू, ग्रे मेंटर, संवेदक मज्जातंतू, ज्ञानतंतू, कर्मतंतू,--( नाड्या ) आपल्या ऐच्छिक, – इच्छेनुरूप चालना-या, अनैच्छिक स्वयंसंवेद्य क्रिया, जसं श्वसन, र्हुदयाचं पंपिंग, अन्नपचन, पतंजली – पापण्यांची उघडझाप, या आणि अशाच सुप्त प्रक्रियां घडवून आणणा-या शरीरस्थ संगणकाला सुव्यवस्थित ठेवणारा हा बहुमोली क्षार. इति आलम !!!
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

घाबरणे घाबरवणे ह्या कल्पनाही माझ्या मनात नव्ह्त्या. आपल्याला घाबरवण्यात मला काय रस असणार? कृपया वैयक्तिक टिप्पणी करू नका ही परत एकदा नम्र विनंती...

माझी अत्यंत त्रासदायक दुखणी, ज्यांच्यापैकी एक MRI वगैरे करूनही निदान न होऊन, बरी होऊ शकली नाहित, ती या औषधांनी बरी झाली असे मी म्हणतो, तर मी तसं का नाही म्हणायचं? याचा अर्थ तुमची दुखणी संपूर्णपणे मानसिक होती. :)

आपण मॉडर्न मेडिसिनवाले डॉक्टर आहात हे मला कळलंय का असं जर आपण म्हणत असाल, तर उत्तर आहे "हो". पूर्वी कुठ्ल्या तरी धाग्यावर मी आपला एखादा प्रतिसाद वाचलेला आहे. बहुतेक "कुठली तरी माहिती नक्की द्या, त्या डॉ.चे रेजिस्ट्रेशन रद्द करवतो" असं आपण म्हणाला होतात असं वाटतं....जर माझा गैरसमज होत असेल तर क्षमस्व. पण मुळात माझं दुखणं मानसिक असल्याचं आपल्याला कळलंय हे मात्र माझ्या डोक्यावरून जातंय! तुम्ही म्हणालात तर मी विश्वास ठेवू का?

विज्ञानाला अनेक प्रश्नांची उत्तरे अजून सापडलेली नाहियेत
हे विधान येथे अस्थानी आहे. नैसर्गिक घटनांची उकल करण्याच्या संदर्भात ते ठीक आहे पण होमियोपाथीने याचा आधार घेणे अयोग्य वाटते. होमियोपाथी ही मानवाने शोधलेली औषध्व्यवस्था आहे, तेव्हा त्यात पूर्ण अभ्यासाअन्ती सर्वांना समजेल असे स्पष्टीकरण अपेक्षित आहे.
एक सॉफ्ट टारगेट शोधायचे आणि धोपट धोपट धोपटायचे?
सर्व आक्षेपात विरलीकरण हे सहाजिकच सॉफ्ट टारगेट आहे. मग इतर सर्व ते धोपटताना दिसत असताना एकही होमियोपाथी तज्ञ (?) / समर्थक त्यावर भाष्य का करत नाही?? बाकीचे दुय्यम मुद्दे का धोपटत आहेत..

अ. तुमची अपेक्षा तशी योग्य आहे. पण असे काही सर्वमान्य स्पष्टीकरण नाहिये. होमिओपॅथीने प्रयोग करून रोगी बरा होत अस्ल्याचा अनुभव घेतला, आणि मग त्या अनुभवावरून त्याचा प्रसार झाला. त्या दृष्टीने बघितले, तर ती एक नैसर्गिक घटनाच आहे. ब. सर्व आक्षेपात? साहेब मूळ दोन आक्षेप आहेत- १. डबल ब्लाइंड रँडमाइज्ड प्लासिबो कंट्रोल्ड टेस्ट निर्णायक नसणे २. विरलीकरणानंतर मूळ औषधाची थोडीही मात्रा न सापडणे. हे आक्षेप गेली कित्येक वर्षे काढले गेले आहेत. दोन्ही आक्षेपांना जगात कुठेही पुरेसे उत्तर दिले गेलेले नाहिये. वर हे प्रश्न उपस्थित करणार्‍या सर्वांनाही ते मुळात माहित आहे, हे उघड आहे. उत्तराची खरोखर अपेक्षा नसताना, पुन्हा पुन्हा तेच तेच प्रश्न विचारून काय मिळवणे अपेक्षित आहे? आम्हाला होमिओपॅथिक औषधांचा गुण आलेला आहे, जे आमच्या दृष्टीने या आक्षेपांचे निराकारण होण्यापेक्षा जास्त महत्वाचे आहे. आणि आपल्याला दुय्यम वाटले तरी अनेक डॉक्टर सहमत होतील की दुखणेकर्‍याचे दुखणे बरे होणे हे सर्वाधिक महत्वाचे. होमिओपॅथिक औषधांच्या मर्यादा आहेत हे मलाही जाणवतं. कुणाला अपघात झालेला असताना होमिओपॅथीक डॉ.कडे जा असं मी तरी सुचवणार नाही. पण कुठलेतरी शास्त्रीय तर्क देऊन आमच्या अनुभवालाच खोटे पाडले जात असेल, तर आम्ही काय म्हणणार? चुलीत गेले ते शास्त्रीय तर्क अन काय? आपली आमच्याकडनं हीच अपेक्षा आहे ना?

(वर एका साहेबांनी अशीही पूस्ती जोड्ली की, उद्या भुते खेते असतील असेही सिद्ध होइल? खवचटपणा अन काय!)
वर म्हणजे इथे नव्हेच, पण धागा क्र. १ (प्रथम अध्यायात) मीच हे लिहिले असल्याने उत्तर देणे आवश्यक वाटते. "उद्या भुते खेते असतील असेही सिद्ध होईल" हे विधान मी खवचटपणे केलं आहे? मुळात ते विधान या शब्दात आणि टोनमधे आहे? पूर्ण प्रतिसाद इथे संदर्भासाठी पेस्ट करतो. तो कोणीही वाचला तर काय ते समजेलच. तरीही.. माझं मूळ वाक्य असं आहे:
त्याउपर पुढे कधीतरी काहीतरी शोध लागेल, गृहीतकं बदलतील आणि भूत आत्मा या गोष्टीही सत्य आहेत हे सिद्ध होईल म्हणून आजच त्या खर्‍या मानणे हा प्रकार माझ्या समजुतीबाहेरचा आहे.
आज अज्ञात असलेल्या गोष्टींची आपण त्या अस्तित्वातच नाहीत असं म्हणून वासलात लावू शकत नाही असा काहीसा मुद्दा जो आधी उपस्थित झाला होता त्याला उत्तर देताना अनेक संदर्भांना जोडून भूत, आत्मा अशा आज अनाकलनीय असलेल्या गोष्टीचं उदाहरण दिलं आहे. विज्ञानाची गृहीतकंही बदलतात, उद्या ती बदलून या गोष्टीही आपल्या आकलनाच्या कक्षेत येतील आणि तेव्हा त्यांचा उलगडा होईलही. त्याच चालीवर भविष्यात होमिओपथीचे तत्व कध्धी कध्धी सिद्ध होणार नाहीच मुळी असं मी म्हणू शकत नाही. असा उल्लेख तिथे आहे. हा भाग दिसला नाही का? आरोग्यासारख्या बाबतीत पूर्ण माहीत नसलेल्या पद्धतीपेक्षा पारदर्शी माहिती आणि कार्यकारणभाव सांगणारी पद्धती अनुसरावी असा सल्ला दिला. त्याच्याही वर स्वतःला वैयक्तिक अनुभव आलेल्यांनी जरुर ही औषधे घ्यावी, आणि त्यांच्यापुरते हे प्रश्न मागे घेत आहे असंही म्हटलं. कारण एकेका अनुभवावर आधारित मतांचे जनरलायझेशन करता येत नाही. त्या प्रतिसादात अगदी विज्ञानातही बरेच काही अज्ञात आहे हे कबूल करुनच मताची मांडणी केली आहे. तरीही त्यात खवचटपणाच दिसत असल्यास खेद व्यक्त करुन थांबणे योग्य समजतो. केवळ संदर्भासाठी तिथला मूळ प्रतिसाद इथे आणतो आहे.
"औषधी" द्रव्य टप्प्याटप्प्याने विरळ करताना ते जोराजोराने हलवण्याच्या प्रक्रियेमुळे त्या औषधातले गुण स्पिरिट लाईक इफेक्टने द्रावकात (पाणी / अल्कोहोल इ) उतरतात आणि मूळ पदार्थ नाहीसा झाला तरी टिकून राहतात, अशी स्पेसिफिक थिअरी होमिओपथीच्या प्रवर्तकाने मांडली आहे. भौतिकशास्त्र / रसायनशास्त्र या सध्या जास्तीतजास्त परिपूर्ण कारणे देऊ शकणार्‍या शास्त्रांच्या नियमानुसार पाण्यात / अल्कोहोलमधे मूळ पदार्थ शिल्लक न राहिल्यावर असा कोणताही "गुणधर्म" अथवा "छाप", अथवा "आत्मिक तत्व" तरंगत अथवा विरघळून राहात नसते. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र यांचेही नियम /गृहीतके बदलतात, ते कदाचित पूर्ण बदलतील किंवा नष्ट होतील. पण आजरोजी मूळ पदार्थ अस्तित्वातच नसताना त्याचे गुण जणू चैतन्याच्या किंवा आत्म्याच्या रुपात पाण्यात टिकून राहतात हे मानणे म्हणजे मानवी कक्षेपलीकडले काही मानून स्वतःवर उपचार करणे असे आहे. एखादी गोष्ट सिद्ध होईपर्यंत ती नाहीच असं म्हणता येत नाही..अगदी कबूल.. हवा दिसत नाही पण असते.. पण आपण रोजच्या जगण्यात रस्त्यात धोंडा दिसत नसतानाही तो असेलच असं म्हणून मिनिटामिनिटाला वळसे घालत जात नाही. तदनुसार आपल्या आरोग्याशी संबंधित निर्णय घेताना बेनिफिट ऑफ डाउटवर आधारित शास्त्रांकडे न वळता खणखणीत वाजवून सिद्ध होणार्‍या शास्त्राकडे जाणं हिताचं आहे. त्याउपर पुढे कधीतरी काहीतरी शोध लागेल, गृहीतकं बदलतील आणि भूत आत्मा या गोष्टीही सत्य आहेत हे सिद्ध होईल म्हणून आजच त्या खर्‍या मानणे हा प्रकार माझ्या समजुतीबाहेरचा आहे. तत्वतः उद्या काय सिद्ध होईल ते सांगता येत नसल्याने होमिओपथी ही कध्धी कध्धी सिद्ध होणारच नाही असं आचरट प्रतिपादन मी करु इच्छित नाही. पण आजरोजी ते जी थियरी ढळढळीतपणे मानताहेत ती म्हणजे : क्वांटिटी नसलेलं "औषध" घेऊन "स्पिरिट लाईक" गुणधर्म पाण्यात उतरलेले असणं- या थिअरीवर विश्वास ठेवून मग होमिओपथी जरुर घ्यावी. फक्त इन दॅट केस, त्यात पुरेसा जादूवाद आहे याची जाणीव असावी इतकंच अधोरेखित करतो. अंगारा, नजर सुरक्षा कवच इ इ हे अशा तर्कापलीकडल्या गोष्टीवर विश्वास ठेवून स्वीकारले जातात. शरीराला रोगापासून मुक्त करणारी औषधोपचार पद्धती स्वीकारताना आपण नेमके काय स्वीकारतो आहोत याची जाणीव ठेवून स्वीकारले तर कोणाचीच काहीच हरकत नसावी. माझा इनफॅक्ट अंधश्रद्धेलाही विरोध नाही. नजर सुरक्षा पेंडंट योग्य वाटल्यास जरुर घालावे पण माझी इच्छा इतकीच असते की आपण काय घालतोय ते किमान तर्कदृष्ट्या माहीत असावं. न कळलेलं बरंच काही आहे म्हणून काहीही खरं मानणं योग्य आहे का? अधिक स्पष्ट करायचं तर नजर सुरक्षा कवचाच्या मटेरियलमधे असलेल्या गुणामुळे वाईट नजरेतली "निगेटिव्ह" एनर्जी दूर लोटली जाते (रिफ्लेक्शन किंवा तत्सम प्रक्रियेने..) किंवा समोरच्या वाईट नजरवाल्यावरच उलट रोखली जाते अशी जी काही थियरी असेल ती तुम्हाला माहीत असेल आणि पटली तर जरुर वापरा. पण पेंडंटचा प्रवर्तक काय तर्काने असा दावा करतोय ते तुम्हाला माहीत पाहिजे. उगीच अमुक पेंडंट देणारे गुरुजी फार थोर आहेत किंवा तमुकला पेंडंटचा चांगला अनुभव आला.. मग त्यामागच्या थियरीला मारो गोली असं नसावं असं माझं मत आहे. होमिओपथीचं मूळ तत्व काय आहे ते ती घेणार्‍या बर्‍याच जणांना माहीत नसतं. ते नीट माहीत असेल आणि तरी घेत असतील त्यांच्याबाबतीत काही म्हणणं नाहीच. तरी, तुम्हाला होमिओपथी लागू पडते अशी तुमची खात्री आहे ना? मग तुम्ही जरुर घेत चला. माझी सर्व विधाने आणि प्रश्न तुमच्यापुरते रद्दबातल समजा (जशी होमिओपथी तुमच्यापुरती काम करतेय तसं..) हा प्रतिसाद राघांच्या प्रतिसादाच्या निमित्ताने मूळ प्रश्नाला आहे. राघांना नाही.

तेव्हा वाचताना १००% खात्री होती की आपण खवचटपणे बोलत आहात. आता एवढ्या दीर्घ प्रतिसादावर म्हणवत नाही की आपण खवचटपणे बोलत होतात. माझा गैरसमज झाला असे कबूल करून- जाहिर माफी. (पण माझा गैरसमज विनाकारण नव्हता. वर काही लोक अनेक अंधश्रद्धांना जोडूनच होमिओपॅथिचे नाव घेत होते. त्यासोबतच आपलाही प्रतिसाद आल्याने, माझी ती प्रतिक्रिया तशी नैसर्गिकच म्हणावी लागेल.)

तुमच्या़कडून अशा उत्तराची अपेक्षा नाही तुम्ही तज्ञं म्हणून इथे लिहीता आहात तर त्या लेखा बद्दल विचारलेल्या शंकांचे समाधान करणे जरूरी आहे ना? माझा अनुभव , ज्ञान मी तुम्हाला देतो आहे त्या बद्दल स्वताला नशीबवान न समजता शंका विचारणारे ते पाखंडी अशा अभिनिवेषात वावरणारे इथे काही आहेत आपण त्यात सामील होउ नये . होमिओपॅथी मधे पथ्यं खूप काटेकोर पणे सांभाळावे लागते .औषधाचा गुण आला नाही तर कुपथ्यं केले म्हणुन ... असे सांगीतले जाते त्यात किती तथ्यं आहे ?

हे "स्वच्छन्द मकरंद" हे काय प्रकरण आहे? टोपणनाव का?
१) `घेई छन्द मकरंद - होमिओपॅथीचा' असं टायटल आहे.... थोडक्यात कोणताही मकरंद होमिओपॅथीचा छंद करु शकतो. २) (पुढचा) स्वच्छंद अजून जमलेला (दिसत) नाही. ३) डॉ. हे नांवाच्या अलिकडचं टोपण आहे. पण ते नक्की कसलंय ते गुलदस्तात आहे!

माझा एक प्रश्न होमिओपॅथी डॉक्टरांसाठी आहे. नुकत्याच एका नेत्रविशारदांच्या भेटीसाठी गेलो होतो. सध्या मी मुलीच्या त्वचेवरील रॅशसाठी तिला होमिओपॅथी औषध देत आहे. हे ऐकल्यावर त्या अ‍ॅलोपॅथी नेत्रविशारदांनी ताबडतोब औषध थांबविण्याचा सल्ला दिला. त्यांच्या सांगण्यानुसार होमिओपॅथी औषधांमध्ये स्टेरॉईड्स असतात. यावर माझा विश्वास बसला नाही. परंतु येथील एखाद्या होमिओपॅथी डॉक्टरांनी याविषयी योग्य तो खुलासा करावा.

'स्टिरॉईड' म्हणजे काय, वगैरेंवर माहिती द्यावी. डॉ. ने लिहून दिलेले एकादे औषध आपण बाजारातून घेतो, त्यावेळी त्यात स्टिरॉईड असल्याचे आपल्याला माहीत करून घेता येते का? (त्यावर तसे लिहिलेले असते का)?

अनेकदा होमियोपाथी डॉक्टर 'मदर टिंक्चर' देतात, यात मूळ औषध आणि कमी प्रमाणात अल्कोहोल असते. औषधाचा रंग त्या त्या मूळ वस्तू प्रमाणे कमी-अधिक गडद असतो. या औषधांच्या शुद्धतेबद्दल खात्रीलायकपणे तपासणी केली जाऊ शकते. . वनस्पती वा जीव-जंतुंपासून काढलेला (यात अत्यंत विषारी कीटकही असतात) अगदी शुद्ध अर्क हा बहुतेकदा विषारी असल्याने तो खूप सौम्य (डायल्यूट) करणे गरजेचे असते. पेशंटास औषधाची खरोखर कितपत गरज आहे, (आणि प्लासिबोची कितपत आहे), हे विविध प्रश्न विचारून स्पष्ट झाले, की होमियोपाथ योग्य ते मदर टिंक्चर, आणि अन्य पोटन्सीवाली (३०, २०० वगैरे) औषधे देतात. उदाहरणार्थ एक थेंब मदर टिंक्चर तीन दिवसासाठी पुरेसे असेल, तर ते सौम्य करून दिवसातून चारदा, वा दोन-दोन तासांनी असे विभागून तीन दिवस दिले जाऊ शकते. होमियोपाथी औषध कसे बनते, याबद्दल एक आकृती: .

आता ही आकृती चर्चेत आलीच आहे तर मूळ विरलीकरणाविषयीच्या प्रश्नांखेरीज अजून एक प्रश्न विचारुन पाहतो. माझे गृहीतक असे आहे की एका टप्प्यात थेट हवे ते विरलीकरण (एक भाग औषध थेट अमुक लाख लीटर अल्कोहोलमधे मिसळणे असे अपेक्षित / योग्य नसून जितकी पोटेन्सी तितके टप्पे (उदा. ३०, १००, २०० इ) होणे आवश्यक आहे. मला व्यावसायिक तत्वावर फक्त एक लीटर फायनल औषध (२००C) बनवायचे असल्यास माझे द्रावण प्रत्येक स्टेपला १०० पट विरल करणे आवश्यक असून ही प्रक्रिया २०० वेळा केली पाहिजे. करेक्ट मी इफ राँग. म्हणजे शेवटच्या २००व्या आवर्तनाचा आउटपुट १ लीटर असला पाहिजे. म्हणजे मधल्या सर्व २०० स्टेप्स १ लीटरच्या प्रमाणातच केल्या पाहिजेत. १० मिली औषध + ९९० मिली. अल्कोहोल = टप्पा क्र. १ द्रावण =१ C १० मिली टप्पा क्र. १ द्रावण + ९९० मिली अल्कोहोल = टप्पा क्र. २ द्रावण = २ C १० मिली टप्पा क्र. २ द्रावण + ९९० मिली अल्कोहोल = टप्पा क्र. ३ द्रावण = ३ C ... ... ... १० मिली टप्पा क्र. १९९ द्रावण + ९९० मिली अल्कोहोल = टप्पा क्र. २०० द्रावण = २०० C आता यात प्रत्येक टप्प्याला जादाचे ९९० मिली अल्कोहोल औषधाने युक्त झाले. २०० व्या टप्प्याला आपल्याला १ लीटर पोटंट द्रावण मिळाले. आता प्रत्येक टप्प्याला औषधाने ग्रस्त झालेले ९९० मिली अल्कोहोल पुन्हा दुसर्‍या किंवा त्याच औषधाच्या निर्मितीत वापरण्यायोग्य राहिले नाही (कारण त्यात कमीजास्त प्रमाणात औषधाचे मिश्रण झाले) ९९० गुणिले २०० टप्पे म्हटल्यास किमान १,९७,००० (अंदाजे एक लाख सत्त्याण्णव हजार मिलीलीटर = १९७ लीटर) अल्कोहोल एक लीटर फायनल औषधासाठी वापरले गेले. हे एक लीटर द्रावण काही ठराविक क्वांटिटीमधे गोळ्यावर टाकून मिसळून पेशंटना दिले जाईल. प्रश्नः १. उपरिनिर्दिष्ट एक लाख सत्त्याण्णव हजार मिलीलीटर औषधमिश्रित निरुपयोगी अल्कोहोलचे काय केले जाते? फेकून दिले जाते का? कारण त्याच्या अलीकडल्या टप्प्यात त्यात बदकाचे लिव्हर, किंवा कीटकजन्य पदार्थ किंवा तत्सम काही मिसळले गेले असल्याने ते अन्य मेडिकल यूजसाठीही अयोग्यच ठरावे. २. हे एक लीटर २००C द्रावणाचे झाले. अशा अनेक औषधांसाठी लागणारी (३०C ते १M पर्यंत पोटेन्सीज धरुन) हजारो - लाखो लीटर अल्कोहोल ही क्वांटिटी साठवण्यासाठी प्रचंड स्टोरेज क्षमता लागत असणार. अशा फॅक्टरीत / प्रयोगशाळेत अशी अनेक औषधे मोठ्या प्रमाणात बनत असणार. तेव्हा इतके अल्कोहोल / पाणी / साखर यांचा साठा करण्यासाठी तितके प्रचंड आकाराचे कारखाने असतात का? ३. एक लीटर औषधामागे जवळजवळ दोनशे लीटर शुद्ध अल्कोहोल लागत असेल तर अल्कोहोलच्या बाजारभावाने त्या एक लीटर औषधाची किंमत किती होत असावी ? ४. म्हणजे अल्कोहोलऐवजी पाण्यातच औषध बनवणे परवडणेबल असावे का? ५. इतक्या सूक्ष्मातिसूक्ष्म द्रव्याच्या क्वांटिटीने पोटेन्सीत फरक पडत असल्याने पाण्यात धूळ, जंतू, मिनरल्स, किंवा इतर कोणत्याही द्रव्याचा एकही रेणू आधीपासून असता कामा नये. अन्यथा त्या प्रदूषिताची मात्रा जास्त होईल. इतके शुद्ध पाणी इतके हजार्/लाख लीटर बनवणे आणि ते सतत तितकेच शुद्ध राहील अशा रितीने स्टोअर करुन ठेवणे यासाठी कोणत्या प्रकारचे टँक / बॅरल इ वापरतात. प्रत्यक्ष औषध बनवणार्‍यांसाठी हे प्रश्न आहेत. (टीपः आधी नजरचुकीने मिलीलीटर ऐवजी लीटर लिहिले गेलेले सुधारले आहे)

ही सगळी होमिओपॅथीची थिअरी इतकी किचकट असल्याने औषधनिर्माते चक्क मूळ औषध देत असावेत .. म्हणूनच काही ठीकाणी गुण येत असावा.. जिथे औषधापेक्षा अल्कोहोल स्वस्त असेल तिथे फक्त अल्कोहोल दिल्याने गुण येत नसावा.. अशी माझी श्रद्धा आहे :-)

१ लीटरसाठी १९७ लीटर हे थोडं चुकीचं गणित वाटतं. १०० पट डायल्यूशन करायचं असेल तर दर वेळी शंभर मिलिलीटर वापरून त्यातला एक मिलिलीटर काढला तर 'फुकट' जाणारं अल्कोहोल १९.७ लीटर व्हावं. शेवटून दुसऱ्या टप्प्याला जे शंभर मिलिलीटर येतात, त्यापासून दहा लीटर द्राव तयार होऊ शकतो. त्यामुळे एका लीटरसाठी दोन लीटर फुकट घालवणं, असा हिशोब होतो. आणि त्यासाठी प्रचंड जागा, खर्च वगैरे येत नाही. बरं, या एका लीटरमध्ये अक्षरशः लाखो गोळ्या बुडवून ठेवता येतात. आणि त्या गोळ्या दिवसाला अमुक इतक्या दिल्या जातात.

डायरेक्ट डायल्यूशन चालत नाही ना. प्रत्येक स्टेप वेगळी होणे आवश्यक असते. नपेक्षा थेट कॅल्क्युलेशन करुन एकदाच द्रावण करता आले असते.

डायरेक्ट डायल्युशन म्हणत नाहीये. फक्त दर वेळी शतांशाचं डायल्युशन करण्यासाठी एक लीटरमध्ये दहा मिली घालण्याऐवजी शंभर मिलीमध्ये एक मिली घातलं तर दहापट कमी वेस्ट होईल. शेवटचे शंभर मिली दहा लिटरमध्ये घालायचे.

अल्कोहोल कधीच निरुपयोगी होत नसतं! ;) असो, बाकी चर्चेत (वाचनमात्र) सहभागी आहेच!

हे कोण डॉक्टर आहेत? एकाही तर्कशुद्ध प्रश्नाचे उत्तर त्यांनी दिलेले दिसले नाही. मंडळी, उगाच वेळ नी टंकन करून उर्जा का दवडताय?

एकुणच काय तर होमिऑपॅथी डॉक्टरांचा अ‍ॅटीट्युड हा ज्योतिषविशारदांसारखाच आहे असे परत एकदा जाणवले आहे !

आणि होमिपदीसमर्थकांचा अ‍ॅटिट्यूड ज्योतिषसमर्थकांसारखाच =))

जगद्विख्यात जादूगार आनि स्केप्टीक (मराठी शब्द ???) जेम्स रँडी यांनी होमिओपाथी संदर्भात एक मिलियन डॉलरचे आव्हान दिले आहे.
In his message, Randi issued a one-million-dollar challenge to the manufacturers of homeopathic products to prove their claims, and challenged major drug retailers like CVS, Rite-Aid, and Walgreens to stop tricking consumers into paying real money for fake medicine.

गवि यांनी अत्यंत महत्वाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे. अगदी सुरुवातीला समजा एक थेंब (म्हणजे किती मि.ली. असावे?) मूळ अर्क आणी नव्याण्णो थेंब अल्कोहोल अशी सुरुवात केली, तरी ३० वा २०० पोटन्सी पर्यंत हजारो लीटर निरुपयोगी अल्कोहोल (खरेतर होमियोपाथी औषध) शिल्लक राहील. त्याचे काय करतात? मला तेंव्हाही प्रश्न पडायचा, की फक्त ३०, २०० आणि १००० पोटन्सीच का वापरतात? २७, ४२, १३८ वगैरे का नाही? हे कश्यावरून ठरवले जाते ? धागाकर्त्याने या सर्व गोष्टींवर प्रकाश पाडावा. बाकी अमूक औषधाचा अमूक उपयोग वगैरे मटेरिया मेडिका वा अन्य लहान पुस्तकात दिलेले असतेच.

मागणी तितकी तगडी असेल, तर शिल्लक रहायला नको. भारतातलं दरसाल अल्कोहोलचं मेडिकल कंझम्प्शन किती लिटर होतं हे कळलं, तर या पोटेन्स्या खर्‍या असतात की दुकानदार टोप्या लावतात हे कळेल.

सदर लेखमालेत असलेले वर्णन वाचून ही बारा क्षार वापरुन केली जाणारी योजना आहे असे वाटले. (मला वाटते हा होमिओपथीचा एक व्हेरियंट आहे.) धागाकर्त्याच्या लिखाणावरुन हे क्षार ब-यापैकी क्वांटिटीत दिले जातात असे वाटून त्या भागापुरते शंकासमाधान झाले. माझा पहिला प्रतिसाद हेच व्यक्त करणारा होता ( वा वा. औषध पोटात जातेय.. पण मग ही ही होमिओपथीच ना ?) ,,, पण त्यातही विरलीकरण आहेच हे रा.घा. यानी tithechस्पष्ट केल्याने पुढील रास्त शंका आल्या.

उर्फ MRI वाले डॉक्टर, पदार्पणानंतर फिरकलेच नाहीत. आणि आता हे दुसरे व्यासंगी, स्वच्छंद मकरंद! पीच सोडून भलतीकडेच बॅटींग करतायंत.

मी असं कोठेतरी वाचलं होतं की केजरीवाल हे अ‍ॅलोपॅथी पेक्षा होमिओपॅथी, आयुर्वेदिक उपचार, निसर्गोपचार इ. वर जास्त भर देतात. तुम्हाला याची कल्पना आहे का?