Welcome to misalpav.com
लेखक: सस्नेह | प्रसिद्ध:
आमची प्रेरणा (अनघाताई, कृपया ह घ्यावे.) बायकांचं डायेटिंग हा जसा तमाम पुरुष वर्गाचा हसण्याचा विषय आहे तसाच पुरुषांच्या वाढत्या ढेऱ्या हा पण आहे. पण याकडे तमाम पुरुष वर्ग जाणून बुजून काणाडोळा करतो. तसं बघितलं तर पुरुष हे गेली हजारो वर्ष बायकांनी केलेल्या स्वैपाकावर चरत आले आहेत. पुराणात नाही का , भोजनावळीचे आयोजन पुरुष करायचे असे उल्लेख आहेत? तरीपण अजूनही त्यातल्या ८०% पुरुषांना आहाराचे नियम हे पाळण्यासाठी असतात हे माहितीच नाहीये. अहो खोट नाही, अनुभव आहे हा माझा. गेली दिडं वर्ष मी ऑफिसला चार कप्पी डबा घेवून जातेय (अर्थात माझं डायेटिंग हा विषय परत कधीतरी), आणि या दिडं वर्षात मला जे जाणवलं आहे तेच सांगते आहे. खरतरं डब्याचे जे कप्पे असतात ते हलका आहार संयमितपणे पोटात जाण्यासाठी असतात, आणि त्यानंतर चहा-वडा इ. अबर-चबर टाळण्यासाठी असतात . पण माझा अनुभव भलतचं सांगतो. आहाराच्या शर्ती या पाळण्यासाठी नाही तर मोडण्यासाठी असतात. अन या पुरुषांना भोजन एकदाचे ढेरीत ढकलण्याची एवढी घाई असते कि ते मागेपुढे कोणी आहे कि नाही याचा विचार न करता सरळ हादडायला सुरु करतात. वय आणि ढेरी वाढत असताना चमचमीत खाणे कमी करणे, किंवा वडा, भजी या प्रकारांना फाटा देणे वगैरे प्रकार तर यांना माहितीच नसतात. आता , बुफेच्या मागच्या रांगेत असलेल्या डायेटिंगवाल्या बायकांना काही स्वप्न पडलेलं असतं का? कि हे लोक्स ढेरी फुटेपर्यंत हादडणार आहेत म्हणून? यांचा अजुन एक प्रकार म्हणजे यातले काही महाभाग लग्नघर/हॉटेल स्वता:च्या मालकी हक्काचे असल्यासारखे दणकून खातात. थोडेच, पण पोटभरीचे खाणे खाण्याची यांना कुणी बंदी तर केलेली नसते ना? पण ते सुद्धा मधल्या टेबलवरचे सामोसे, कटलेट किंवा उजवीकडील टेबलवरची बिर्याणी अन चिकन आणि कडेच्या टेबलवरचे आईस्क्रीम अन फ्रुटसॅलड सर्वांवर सारखाच हात चालवतात. जसे काही यांना घरचे खाणे खायला बंदीच केली आहे. मागून तुम्ही कितीही सिग्नल द्या , यांना काहीही फरक पडत नाही. यांच्या आणि बकासुराच्या खाण्यामध्ये इंचभरसुद्धा अंतर नसते. सर्व लोक्स डेझर्ट खात असताना मधेच यांना तंदुरी खाण्याची हुक्की येते. यात ढेरीवाले, मसल्सवाले पण आले. आपण दोन्ही प्रकारच्या खाण्याचे पोटात कॉकटेल करत आहोत हे यांच्या गावी पण नसते. व्हेज-नॉनव्हेज दोन्हीकडची महागाई आपल्यामुळे भडकली आहे याचा यांच्यावर काहीही परिणाम होत नाही. आणखी एक प्रकार म्हणजे चिकन संपल्याबद्दल बुफेवाल्या बेअराशी हुज्जत घालणे .अहो मान्य आहे यांना थोडसं नॉनव्हेज आवडत असेल, बरेचदा ते पण नसतं. पण हे खाणं जीथल्यातीथे थांबवणार, प्लेटी हातात धरणार अन्ही मागच्या बिर्याणीवाल्याशी किंवा पुढच्या रस्सावाल्याशी भांडत बसणार. यामुळे आपल्या मागे ज्या बायका आहेत त्या थांबून राहिल्या आहेत , आपण एक अक्खी पंगत थांबवून ठेवली आहे हे यांच्या गावी पण नसत. प्लेटा बाजूला ठेवून मगं भांडाना अरे , कोण नाही म्हणतं? पण नाही, हे तिथेच भांडणार. यात अजून भर टाकतात ते ज्यांना स्त्री वजन कमी करून आपल्यापुढे गेलेली चालत नाही. चुकूनही त्यांच्या जर असा लक्षात आलं, तर ते खिल्ली उडवतील , आजूबाजूच्या ढेरीवाल्यांना ना कॉम्प्लीमेंटस देतील, पण त्या स्त्री डायेटिंग वाली च्या मनोनिर्धाराला खच्ची करून टाकतील. मी असा नाही म्हणत आहे स्त्री खाद्यप्रेमीं पार्टीत गोंधळ घालत नाहीत, पण त्याला पण जबाबदार कुठतरी पुरूषचं आहेत, आजूबाजूला गर्दी माजवून इतका गोंधळ घालतात कि ती बिचारी गोंधळून जाते.
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

तुम्ही तर बर्‍याच म्हणी अनेक दिवसांपासुन सार्थ करत आहात.. पण असो.. तुमच्या एवढी पातळी सोडता येत नाही.. जमल्यास गप बसा.. (आग्रह नाही..)

तुमच्या एवढी पातळी सोडता येत नाही..
म्हणून अजून खाली रसातळाला जाता, होय की नाही? बाकी ज्याची त्याची समज वगैरे...चालायचंच!

माझी ही १ काडी/तेल्/पेट्रोल काय वाटेल ते समजा... :)
त्यांना उपदेश द्यायचे की नाही.. फुकट द्यायचे की कसे.. उपदेश एरंडेल पाजावे की अमृत.. हे आम्ही दोघं बघुन घेऊ ना..
इथे पिरा"भाईं"शी सहमत
तसंही त्यांच्या कनपटीवर बंदुक रोखुन स्वयंपाक कराच असा आग्रह करत नाहीये ना कुणी..
नैच्च करत आहे कुणी...पण जो सल्ला आहे तो यापेक्षा जालीम आहे त्याचे काय :)
इथे लोक काय वाट्टेल ते लिहीतील, सल्ले देतील.. एकमेकांचे गळे धरतील.. तुमचे काय जाते? तुमचा संबंध असेल तिथेच याना...
हेच पिरा"भाईं"नासुध्धा लागु पडते...पण दिलाच ना आगव सल्ला =))
बाकी तुम्ही "आक्रस्ताळेपणा (किंव रडिचा डाव वगैरे वगैरे) आम्ही फाट्यावर मारतो.." असले नेहमीचे पांचट प्रतिसाद टाकालच..
ब्याट्या"भाय"...२-४ साल से मिपापे हय...आज्तक इत्तें लोगां सुनके/सुनाके गये...आपकी कुच इज्जत है यारों...ये खाला लोगां आके इज्जत बैंगन मे मिलादी यारों... साभार - इस्माईल"भाय" चार्मिनारांवालें ;)

ब्याट्या"भाय"...२-४ साल से मिपापे हय...आज्तक इत्तें लोगां सुनके/सुनाके गये...आपकी कुच इज्जत है यारों...ये खाला लोगां आके इज्जत बैंगन मे मिलादी यारों...
अर्रे टवाळभाई, इत्ते साल मिपामिनार पे बैठे तो क्या खाला लोगांका टेन्शन लेनेकु? हमारी इज्जतां सस्ती नै होती कि कोई बी आये आउर बैगन मे मिलाकर भुर्ता बनाके खाये! ऐसा नै होता टवाळभै, पूरी प्लॅनिंग करनी पडती! अब हम लोगां रहते मुद्देपे, वो लोगां रहते फाटेपे! अब ह्यांसे व्हां जाना बोले तो पूरा एक मेगाबायटी प्रतिसाद होता यारो =))

कहर.. =)) अर्रे संक्षीभाईं..अर्रे हमारे ब्याट्याभाईंकी लडाईं हो गयीं भाई खालालोगांसे...जर्रा कुच उप्परनीचे हुआ तो आप संभालल्येओ खालांलोगोंको ....अर्रे भ ब्याट्याभाईं...संक्षीभाई बोलरेले है तुम्हारे लिये खालालोगां क्या पुरा संमं संभाललेंगे... (आल लाईन बीजी आ रहा है ;) ) संक्षींनी ह.घे. हि विनंती :)

परसो मिपापुरेमें क्या लडाई हुवी मालूम...चिंध्या लडाई हुई..मै टवाळ, बुवा, वल्ली, सूड, धन्या पूरे गये थे लोगां..मैं क्या करा बोले तो कंपुटरपे बोटां दबादबाके वो लिखा वो लिखा, घाप घीप घाप घीप घाप घीप =))

हे असं होतं बघा स्नेहातै, आता आवडला ना एखादी गोष्ट की त्याचा पार भुगा केल्याशिवाय पुरुषांना चैन पडत नाही... मग समोर 'स्माईल'भाई असो, की आईसक्रीम असो की तंदूरी असो की आणखी काही .... (चाणाक्ष वाचक ओळखतीलच ;) ) डायेट कोलमडते ते असं. ;)

तुम लोगां सिरेस कायकु लेते यारों ...मिपा के पठ्ठे हैं...१-२ साल से मिपा पे बैठा हुवा हु...मेरी कुच इज्जत हैं यारों ...तुम लोगां क्यातोबी संमझे रे मेरेकू

खल्लास =)) मेरेकु बोर मार्रा पार्टी मे, लांग ड्राईव्ह पे जाना बोली. अम मै क्या करां, उने बोल री बोल के ले गया. पयले पाकृ के धागे में फटु देखे, फिर जिलब्या देखा हाउर फिर ह्यां आये सीद्धाइच प्रतिसाद-प्रतिसाद खेलते. उन्हे बोली, बॅटू, मेरेकु जिलबी होना. वहीं फिर 'मोकलाया' वाली जिल्बी खिलाया उसकू, पाच-पाच डब्बा भरके जिलब्या खाये. फिर मेरेकु बोली, तुम किधर जानावाना मत, ऐसा कैसा होता? अब उने बोल री बोल के मै गया रूमपे, अब रातभर क्या हुवा नक्कॉ पूछू =))

हैट्ट आहे =)) अर्रे जिल्बी जिल्बी करके कित्ता बोला तुम्कू ...अबी क्या पुरें सौ करनेका इरादा है?

तुम लोगांको सुपारी दिया क्या स्नेहाबै?

अरे वो २-३ पेज में कौन किसकू प्रतिसाद दिया मेरेकु कुछ नै समझा रे...जबतर उसी एक पेजपे उनकू प्रतिसाद नै देता तबतक मेरा टंकनकंडु शांत नै होयेगा रे ;)

कोणता ? एकदा प्रतिसाद देवुन झाल्यावर सहसा माझ्या लक्षात रहात नाही ... शॉर्ट टर्म मेमरी लॉस *wacko* एकदोन वेळा तर मीच माझ्या जुन्या प्रतिसादांशी कॉन्ट्रॅडिक्टरी बोललोय ...एकाच धाग्यावर *biggrin*

तुम्हाला एका चारचाकीवाल्या म्याडमनी दोन वाहनांच्या फटीतून नो असे म्हणत जाऊ दिले नाही तो प्रतिसाद विडंबायचा प्रयत्न केला हो, पण जम्या नै.

भीतीदायक धागा आहे! *ROFL* मात्र अनघाच्या धाग्यावर सुपारी घेतल्यासारखे प्रतिसाद देणारे या धाग्यावर कधी सुरू होतात याची वाट बघत आहे! *blum3* लिखाण नेहमीप्रमाणेच खास स्नेहांकिता स्टायल!

ढेरी सुटलेल्या अल्पसंख्यांक (खरंच अल्पसंख्य आहेत?, अभ्यास वाढवला पाहिजे.) पुरुषांच्या भावना दुखावल्यामुळे ह्या धाग्याचा सौम्य निषेध. विशेषतः खालील वाक्ये... १) पुरुष हे गेली हजारो वर्ष बायकांनी केलेल्या स्वैपाकावर चरत आले आहेत. २) या पुरुषांना भोजन एकदाचे ढेरीत ढकलण्याची एवढी घाई असते कि ते .... ३) हे लोक्स ढेरी फुटेपर्यंत हादडणार आहेत म्हणून? ४) जसे काही यांना घरचे खाणे खायला बंदीच केली आहे. ५) यांच्या आणि बकासुराच्या खाण्यामध्ये इंचभरसुद्धा अंतर नसते. हि वाक्ये तर माझ्यावर वैयक्तिक हल्ला आहे असाच भास झाला. खरं पाहता सुटलेल्या पोटाला, स्वच्छ शब्दात, 'सुटलेले पोट' म्हणण्याऐवजी 'ढेरी' असा अपमानकारक, हिणकस शब्द ठायी ठायी वापरून पोट सुटलेल्या पुरुषांच्या मानसिक (आणि सामाजिक) जखमेवर (फुंकर घालण्याऐवजी) मीठच चोळले आहे. आजकालच्या स्त्रीप्रधान समाजात पुरुषांना सन्मानाने जगणे मुश्किल झाले आहे. बायकांच्या सुटलेल्या पोटावर (आणि काय काय अवयवांवर) लेख लिहायचा विचार होता पण संमच्या उंचावलेल्या भुवया नजरेसमोर येऊन (आपली नजर जमिनीकडे वळवून) साळसूद भुमिकेत जात आहे. हा संपूर्ण प्रातिसाद हलकेच घ्यावा ही नम्र विनंती. *smile*

अगदी अगदी. पुरुषांची ती ढेरी, स्त्रियांची ती कंबर. असे तर इतके अवयव आहेत ज्यांच्या बेढबपणाबद्दल गिगाबायटी निबंध लिहिता येतील, पण ते इथे पचणार नाही कुणाला. सत्य कटु असते. (ह. घ्या किंवा नका घेऊ. सत्याला त्याने फरक थोडीच पडणारे?)

एक सहस्त्र वेळा सहमत ! खात्या- पित्या घरचे लोक , जरा समृद्धीच्या खुणा बाळगऊ म्हटले तर त्याला " ढेरी" असा हिणकस शब्द वापरावा? येते थोडेसे पोटं बाहेर , शर्टच्या बटणांची उभी काजी आडवी दिसतात म्हणून लगेच ढेरी????? णिषेद !!!! नजर बदला , जग बदलेल ..अंमळ असा विचार करा ना की या सम्रूद्धीच्या पाउल(पोट्)खुणा आहेत म्हणून ! एखाद्याचे असे खाणं काढणं शोभतं का भारतीय संस्कृतीत ?

एखाद्याचे असे खाणं काढणं शोभतं का भारतीय संस्कृतीत ?
न शोभायला काय झालं? फक्त ते पुरुषांचं काढायचं इतकंच लक्षात ठेवलं तरी झालं.

एकदा पोट सुटले की फक्त पाठीवर नाहीतर कुशीवर झोपावे लागेल. >>> अगदीच तसं काही नाही ... पोटावरही झोपता येते पण मग पाठीवरउलट्या पडलेल्या कासवा सारखी अवस्था होते *biggrin*