आमची प्रेरणा
(अनघाताई, कृपया ह घ्यावे.)
बायकांचं डायेटिंग हा जसा तमाम पुरुष वर्गाचा हसण्याचा विषय आहे तसाच पुरुषांच्या वाढत्या ढेऱ्या हा पण आहे. पण याकडे तमाम पुरुष वर्ग जाणून बुजून काणाडोळा करतो. तसं बघितलं तर पुरुष हे गेली हजारो वर्ष बायकांनी केलेल्या स्वैपाकावर चरत आले आहेत. पुराणात नाही का , भोजनावळीचे आयोजन पुरुष करायचे असे उल्लेख आहेत? तरीपण अजूनही त्यातल्या ८०% पुरुषांना आहाराचे नियम हे पाळण्यासाठी असतात हे माहितीच नाहीये. अहो खोट नाही, अनुभव आहे हा माझा.
गेली दिडं वर्ष मी ऑफिसला चार कप्पी डबा घेवून जातेय (अर्थात माझं डायेटिंग हा विषय परत कधीतरी), आणि या दिडं वर्षात मला जे जाणवलं आहे तेच सांगते आहे.
खरतरं डब्याचे जे कप्पे असतात ते हलका आहार संयमितपणे पोटात जाण्यासाठी असतात, आणि त्यानंतर चहा-वडा इ. अबर-चबर टाळण्यासाठी असतात . पण माझा अनुभव भलतचं सांगतो. आहाराच्या शर्ती या पाळण्यासाठी नाही तर मोडण्यासाठी असतात. अन या पुरुषांना भोजन एकदाचे ढेरीत ढकलण्याची एवढी घाई असते कि ते मागेपुढे कोणी आहे कि नाही याचा विचार न करता सरळ हादडायला सुरु करतात. वय आणि ढेरी वाढत असताना चमचमीत खाणे कमी करणे, किंवा वडा, भजी या प्रकारांना फाटा देणे वगैरे प्रकार तर यांना माहितीच नसतात. आता , बुफेच्या मागच्या रांगेत असलेल्या डायेटिंगवाल्या बायकांना काही स्वप्न पडलेलं असतं का? कि हे लोक्स ढेरी फुटेपर्यंत हादडणार आहेत म्हणून?
यांचा अजुन एक प्रकार म्हणजे यातले काही महाभाग लग्नघर/हॉटेल स्वता:च्या मालकी हक्काचे असल्यासारखे दणकून खातात. थोडेच, पण पोटभरीचे खाणे खाण्याची यांना कुणी बंदी तर केलेली नसते ना? पण ते सुद्धा मधल्या टेबलवरचे सामोसे, कटलेट किंवा उजवीकडील टेबलवरची बिर्याणी अन चिकन आणि कडेच्या टेबलवरचे आईस्क्रीम अन फ्रुटसॅलड सर्वांवर सारखाच हात चालवतात. जसे काही यांना घरचे खाणे खायला बंदीच केली आहे. मागून तुम्ही कितीही सिग्नल द्या , यांना काहीही फरक पडत नाही. यांच्या आणि बकासुराच्या खाण्यामध्ये इंचभरसुद्धा अंतर नसते.
सर्व लोक्स डेझर्ट खात असताना मधेच यांना तंदुरी खाण्याची हुक्की येते. यात ढेरीवाले, मसल्सवाले पण आले. आपण दोन्ही प्रकारच्या खाण्याचे पोटात कॉकटेल करत आहोत हे यांच्या गावी पण नसते. व्हेज-नॉनव्हेज दोन्हीकडची महागाई आपल्यामुळे भडकली आहे याचा यांच्यावर काहीही परिणाम होत नाही.
आणखी एक प्रकार म्हणजे चिकन संपल्याबद्दल बुफेवाल्या बेअराशी हुज्जत घालणे .अहो मान्य आहे यांना थोडसं नॉनव्हेज आवडत असेल, बरेचदा ते पण नसतं. पण हे खाणं जीथल्यातीथे थांबवणार, प्लेटी हातात धरणार अन्ही मागच्या बिर्याणीवाल्याशी किंवा पुढच्या रस्सावाल्याशी भांडत बसणार. यामुळे आपल्या मागे ज्या बायका आहेत त्या थांबून राहिल्या आहेत , आपण एक अक्खी पंगत थांबवून ठेवली आहे हे यांच्या गावी पण नसत. प्लेटा बाजूला ठेवून मगं भांडाना अरे , कोण नाही म्हणतं? पण नाही, हे तिथेच भांडणार.
यात अजून भर टाकतात ते ज्यांना स्त्री वजन कमी करून आपल्यापुढे गेलेली चालत नाही. चुकूनही त्यांच्या जर असा लक्षात आलं, तर ते खिल्ली उडवतील , आजूबाजूच्या ढेरीवाल्यांना ना कॉम्प्लीमेंटस देतील, पण त्या स्त्री डायेटिंग वाली च्या मनोनिर्धाराला खच्ची करून टाकतील.
मी असा नाही म्हणत आहे स्त्री खाद्यप्रेमीं पार्टीत गोंधळ घालत नाहीत, पण त्याला पण जबाबदार कुठतरी पुरूषचं आहेत, आजूबाजूला गर्दी माजवून इतका गोंधळ घालतात कि ती बिचारी गोंधळून जाते.
प्रकार:
विषय:
प्रतिक्रिया
'चोर तो चोर वरती शिरजोर' ही
तुम्ही तर बर्याच म्हणी अनेक
तुमच्या एवढी पातळी सोडता येत
माझी ही १ काडी/तेल्/पेट्रोल
माँ की किरकिरी ....
ब्याट्या"भाय"...२-४ साल से
कहर..
पुढे चालू..
हे असं होतं बघा स्नेहातै,
तुम लोगां सिरेस कायकु लेते
रास्तेके कडेसे बोले तो...
अर्रे इदर लोगोंकू नरम बोटी
खल्लास
हैट्ट आहे
मामू
हल्लू बोलो रे...लोगां सुनते.
अब्बा, पैसाक्का को भी पता चल
आवलु मियां
हा हा हा हा =))
हैला !
चिंता नक्को, काश्मीर सुंदर हय
चारमिनार के बाजूवाली गली में
चारमिनार के बाजूवाली गली में
सौ तो हो गये रे भै
स्नेहाभै...खुश?? बिर्यानी
जरूर !
अरे वो २-३ पेज में कौन किसकू
भोत गलत जगा पे दम है भाई...
बाकी सगळे राहुदे, कनपटीवर हा
हॅ हॅ हॅ ..
==))
अग्गायायाय! मस्त गं, मस्त! ए
गिर्जाकाकांचा प्रतिसाद
कोणता ?
तुम्हाला एका चारचाकीवाल्या
जुन्या आठवणी
ट्रकवरील नवघोषवाक्य-- "हमारी
पूर्वी माणसे फार दिवसांनी
याला +१
भयानक!
हिहिहि .. मज्जा आली बै !
ढेरी सुटलेल्या अल्पसंख्यांक
+१
सत्याला त्याने फरक थोडीच
हम्म, तेही आहेच म्हणा.
+१०००
एखाद्याचे असे खाणं काढणं
हा हा हा
घे..घे.. मजा करून.
एकदा पोट सुटले की फक्त पाठीवर
Pagination