Welcome to misalpav.com
लेखक: बबन ताम्बे | प्रसिद्ध:
thakre
बाळासाहेब ठाकरे
shammi
शम्मी कपूर
pran
प्राण
dev
देव आनंद
rajesh
राजेश खन्ना
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

प्राणसाहेब आणि शम्मी कपूर यांची रेखाटने आवडली. राजेश खन्ना व देव आनंद यांची थोडी अजून चांगली करता आली असती.

राजेश खन्ना आणि देव आनंद ही माझी स्टार्टींग फेज होती. त्यामुळे तितकीशी सफाई नाही आली.

प्राण आणि शम्मी ... मस्तच जमलेत त्या पार्श्वभूमीवर देवानंद आणि काका मग आणखी फिके वाटले. आव्हान म्हणून त्या दोघांना पुन्हा रेखाटू शकता, हवे असल्यास वेगळे फोटो घ्या ..

संपादक मंडळांस विनंती. क्रुपया कलादालन या विभागात हा धागा हलवणे. सध्या कलादालन या विभागात नवीन काही टाकताना एरर येत आहेत. प्रॉब्लेम असेल तर क्रुपया दुरुस्त करणे. -बबन तांबे

प्राण चे चित्र हुबेहुब जमले आहे. पहिल्या भागातली मधुबालाही दिलके तार छेड गयी थी. बाळासाहेबांचे पण चित्र बरेच चांगले झाले आहे पण बाळासाहेबांच्या डोळ्यातच खरी मजा आहे आणि ते डोळेच या चित्रात निट जमलेले दिसत नाहीत. पैजारबुवा,

अगदी असेच म्हणतो. शम्मी अन प्राण लैच जबर्‍या जमलेत. बाळासाहेबही मस्तच, फक्त डोळ्यांना तितका वाव मिळालेला नाही दिसत.

बाळासाहेबांच्या चित्रातले बाकी तपशील चांगलेच जमले आहेत पण डोळ्यांमुळे जरा रसभंग होतो आहे. मूळ फोटो अस्पष्ट असल्याने तसं झालं असेल पण डोळ्यांमुळे प्रचंड फरक पडतो. मधुबालाच्या चित्रात डोळ्यांपुढे इतर बारीक उणीवेकडे लक्षही जात नाही.

हं...! तुमच्या हाती कला आहेच, त्या बद्दल मनापासून अभिनंदन. थोडाफार सराव गरजेचा आहे असे वाटते आहे. चित्रगुप्त साहेबांचे मार्गदर्शन लाभेलच.

पहीली तीन चित्रे सुरेख जमली आहेत. देवसाहेबांचे चित्र त्यांच्या उतारवयातील फोटोवरुन काढले आहे असे वाटते.(चित्राबद्दल आक्षेप नाही पण देवानंदला पाहावे ते त्याच्या उमेदीच्या काळातल्या चित्रपटातच.)

आता उगाच काही तरी सांगायचं म्हणुन मी पण सांगितलं असतं की ते तेवढे बाळासाहेबांचे डोळे... पण तेवढ्यात स्वत:ची चित्रकला आठवली..!! ते ही एक असोच.. पण तुमच्या हातात उत्तम कला आहेत हे मात्र खरं.. जलरंगात काम करायला हे उपयोगी ठरेल - http://www.maayboli.com/node/47426

एक काम करा, मा. बाळासाहेब गॉगल घालायचे बर्‍याचदा. चष्म्याची फ्रेम थोडी मोठी करुन काचा काळ्या करा. झाला गॉगल. गेट अप भारी येईल. :) राजेश खन्ना सोडून इतर चित्रे आवडली.

कहर आहे गणपा!! मलाही प्राण आणि शम्मीचे जास्त आवडले, बाळासाहेबांच्या करड्या नजरेची सगळ्यांनाच अपेक्षा असेल.

बुरा ना मानो बबनजी... चित्रकलेत यापुढली वाटचाल करायची असेल, तर फोटो बघून चित्रे काढणे बंद करणे आवश्यक. १९६८ साली मी जेंव्हा आर्ट्स्कूलला प्रवेश घेण्यासाठी गेलो, तेंव्हा साधना, मुमताज वगैरेंची मी काढलेली (तेंव्हा माझ्यामते अप्रतिम कलाकृती होत्या त्या) चित्रे घेऊन गेलो होतो, आणि आपल्याला उत्तम चित्रे काढता येतात, काय थोडेबहुत आर्ट्स्कुलात शिकवत असतील, तेही बघून येऊ, असे समजून गेलो होतो. पहिल्याच दिवशी प्रिन्सिपाल किरकिरे सर यांनी आता यापुढे चित्रे वा फोटो बघून चित्रे काढणे बंद करा, असे सांगितले, आणि मी ते त्याच दिवसापासून पाळले. त्यानंतर अनेक वर्षे चित्रकलेतले एकाहून एक अद्भुत असे अनुभव गाठीशी जोडत गेलो.... .... तुमची इछा असेल, तर मी मार्गदर्शन करू शकेन.

चित्रगुप्तजी, तुमच्या बहुमोल सल्ल्याबद्द्ल आभारी आहे. वाईट बिलकुल वाटले नाही. उलट तुमचे मार्गदर्शन मिळाले तर मला हवेच आहे. मी केलेल्या पेन्सिल स्केचेस बद्द्ल - आमच्या ऑफीसमधे मला सहका-यांनी एक छानसे स्केच बूक भेट दिले होते. त्यावर काय काढावे असा विचार करत होतो. त्याचवेळी सुपरस्टार राजेश खन्ना यांचे निधन झाले होते. माझे ते आवडते कलाकार होते. त्यांना श्रद्धांजली म्हणून मी त्यांचे महाराष्ट्र टाईम्समधील फोटोवरून पेन्सिल शेडींग केले. त्यानंतर देव आनंद, प्राण, शम्मी कपूर , बाळासाहेब ठाकरे यांचे पण निधन झाले. मग मी विचार केला की आपल्या आवडत्या व्यक्तीमत्वांना श्रद्धांजली म्हणून त्यांची चित्रे या स्केच बूक मधे काढू या. अशा रीतीने ही सिरीज सुरू झाली. केवळ आनंदासाठी मी फोटोवरून कॉपी करून शेडींग चित्रे काढतो. पण तुमचा मुद्दा बरोबर आहे. कॉपी करणे म्हणजे कलाकारी नव्हे. स्वत:चे काहीतरी असावे म्हणून मी दुस-या एका स्केच बुक मधे काळ्या जेल पेनने काही निसर्ग चित्रे काढली आहेत. आमच्याजवळ लोहगावजवळ अजून थोडाफार निसर्ग टिकून आहे. तिकडे बसून मी ग्रामिण घरे, झाडे, डोंगर चित्रबद्ध केली आहेत. मिपावर कधीतरी टाकीनच. जलरंगाच्या क्लासला देखील मी जात होतो. पण त्यात मला अजून मार्गदर्शनाची गरज आहे. अजुन एव्ह्ढे काही जमत नाही. ऑइल पेन्टींग, अ‍ॅक्रॅलिक पेंटींग पण शिकायची इच्छा आहे. तुम्हाला मी भेटु इच्छीतो. मी पुण्यात असतो. आपला फोन नंबर मिळेल काय ? - बबन तांबे

तुम्हाला मी भेटु इच्छीतो. मी पुण्यात असतो. आपला फोन नंबर मिळेल काय ?
अवश्य. परंतु सध्या मी अमेरिकेत आहे, नोव्हेंबरमधे भारतात परतेन. मी दिल्ली आणि इन्दौर मधे रहातो. सध्या सर्व फोन बंद करून ठेवलेले आहेत. बाकी मिपाच्या मार्फत चित्रकलेचे कसे करता येईल हे बघतो. या दरम्यान तुम्ही तुमची लोहगाव वगैरेंची चित्रे टाका. माझे यापूर्वीचे चित्रकलेवरील लेख वाचले आहेत का? माझे मिपावरील लेखनः http://www.misalpav.com/user/9160/authored

चित्रे आवडली. अवांतर : चित्रगुप्त खरेच गंडा बांधणार असतिल तर आम्हीही दोन्ही पायांवर तयार आहोत !!

चित्रगुप्त साहेब आणि बबन तांबे साहेबाना एक विनंती चित्र कसे बघावे आणि समजावे( आस्वाद आणि आनंद कसा घ्यावा) याचे धडे दिलेत तर उपकृत होऊ. ( या जन्मी तरी चित्रकला जमण्यातली नाही -उजवा मेंदू अधू असल्याने). जसे वृक्ष पाने फुले कशी पहावी याचे प्राथमिक धडे नूलकर साहेबांनी दिले तसे

सुबोध खरे साहेब, अज्ञानात सुख असते. आज मी चित्रे पाहतो आणि वाखाणतो कारण मी चोखंदळ अभ्यासक नाही. एकदा ते ज्ञान आले तर किती कलाकृतींमधून मी आनंद मिळवू शकेन शंकाच वाटते. ह्या साठी अजून एक उदाहरण देईन ते असे की 'मला कांही सांगायचे आहे' नाटकात नायिकेला रक्ताचा कर्करोग होतो. आई डॉक्टर असल्याकारणाने तिला ते समजतं शिवाय आपली मुलगी हळू हळू मृत्यूसमीप जाते आहे हेही जाणवतं. त्या मानाने कुटुंबातील बाकीच्या माणसांना वैद्यकिय ज्ञान नसल्याकारणाने ते नॉर्मल असतात, आई सर्वात जास्त दु:खी असते. तेंव्हा आईच्या तोंडी एक वाक्य आहे. 'ज्ञानाने माणूस कमकुवत होतो.' असो. तुम्ही व्यक्त केलेली इच्छा आणि वरील प्रसंगाचा कांही संबंध नसेलही. नुसतेच प्रत्येक चित्राला वाहवा करण्यापेक्षा त्यातील खाचाखोचा माहिती असतील तर कदाचित उत्तम कलाकृती, जाणकाराला, जास्त आनंद देऊन जाईल. तरीपण, रसिकापेक्षा परिक्षकाला मान जास्त आणि आनंद कमी मिळत असावा.

श्री. सुबोध खरे साहेब, याबाबतीत श्री. चित्रगुप्त साहेब आपल्याला चांगले मार्गदर्शन करू शकतील. मी अजुन या क्षेत्रात अ‍ॅप्रेंटीस आहे. :-) -बबन तांबे (क्रु. मला साहेब संबोधू नये ही विनंती. :-) )

फार छान काढली आहेत चित्रे.. त्यातही प्राण आणि बाळासाहेबांचे जास्त आवडले. या चित्रांमध्ये मधुबालाच्या चित्रापेक्षा जास्त सफाई आहे. आणि मला अवघड वाटणारा एक भाग - डोळ्यांपेक्षाही केस अतिशय क्लिष्ट आणि किचकट असतात पेन्सिल शेडिंग मध्ये ते तुम्ही अतिशय अप्रतिम काढले आहेत. त्यांचा पोत, रंगछटा, वळणे, विरळपणा फार छान जमला आहे. उदा बाळासाहेबांचे केस आणि दाढी, राजेश खन्नाचे केस, मधुबालेचेही छानच आले आहेत. एके काळी हा छंद होता आणि केवळ माधुरीचेच चित्र काढत होतो :) त्यामुळे तुमच्या कष्टांची कल्पना आहे.

हो, केशरचनेत स्किल्ड झालोय. अजुनही तुम्ही माधुरीचे चित्र काढु शकता. की त्या नेने झाल्यानंतर तुमचा इंटरेस्ट संपला ? *lol*