Welcome to misalpav.com
लेखक: विवेकपटाईत | प्रसिद्ध:
गेल्या २७ तारखेला सकाळी लाल रंगाच्या बस (एसी बस) मधून कार्यालयात जाताना कळले, हृदयाच्या राजमार्गावर ठीक ठिकाणी ट्रफिक जाम झाल्यामुळे शरीराच्या अर्थव्यवस्थेवर दुष्परिणाम झाला आहे. ताड्ताडीने शरीराच्या मंत्रिमंडळाची मिटिंग घेण्यात आली. ट्रफिक जाम दूर करण्यासाठी यथाशीघ्र ह्रदयाच्या राजमार्गावर बाय पास बांधावे लागतील, असा निर्णय घेण्यात आला. तूर्त काही काळ लेखणीला विश्रांती द्यावी लागेल. असो.
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

लवकर बरे व्हा...उत्तम आरोग्याच्या शुभेच्छा!!!!

लवकरात लवकर खणखणीत बरे व्हा. काळजी घ्या. तुमच्या प्रकृतीच्या सर्व तक्रारी दूर होऊन तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो याच शुभेच्छा!

आजाराला सुद्धा मिश्किलपणे व्यक्त करण्याच्या तुमच्या वृत्तीला माझा नमस्कार... लकवर बरे व्हा... शुभेच्च्छा .. बायपासच करून घ्या, या परिस्थितीत आयुर्वेदावर विसंबू नये असे माझे वैयक्तिक मत आहे..

लवकर बरे व्हाच आणि ट्रॅफिक जॅम च्या कारणांचाही शोध घेउन परत जॅम होणार नाही याची काळजी घ्या.

लवकर बरे व्हाच आणि ट्रॅफिक जॅम च्या कारणांचाही शोध घेउन परत जॅम होणार नाही याची काळजी घ्या.

उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा. शस्त्रक्रिया वगैरे उत्तम होईलच. त्यानंतरच्या काळात मात्र अतिशय काळजी घेणे आवश्यक.

राजमार्गावरचा ट्रफिक-जाम लवकरात लवकर दुर होऊन सगळं सुरळीत चालू होण्यासाठी शुभेच्छा. लवकर बरे व्हा आणि लिहिते व्हा.. योग्य ती सर्व काळजी घ्या. घरातील अनुभवात हृदय मार्ग तज्ञांनी सांगितले की बाह्यमार्ग किंवा बोगदे बांधले तरी योग्य ती काळजी / औषधे घेतल्याने आणि व्यायाम केल्याने असंख्य छोटे रस्ते (पक्षी: कॅपिलरीज) तयार होतात ज्यामुळे राजमार्गावरचा ताण कमी होतो तरीही गरजेइतके ट्रॅफिक व्यवस्थित पार होते. अर्थात आत्ता गरजेप्रमाणे बायपास बांधाच. उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा!

वाहतूक अव्यवस्था निवारण समिती च्या सल्ल्यानुसार आपली गाडी हाकून पुन्हा लवकरच मार्गस्थ होण्यासाठी शुभेछा !

विश्रांती घ्या.काळजी घ्या... आपल्या प्रकृती स्वास्थ्यासाठी प्रार्थना करतो. मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- ऐका दाजिबा... :- वैशाली सामंत

लवकरच आपला राजमार्ग खुला होवो व आपली लेखणी सुरु होवो हीच प्रार्थना.

विवेकपटाईतसाहेब, योग्य ते उपचार घेऊन लवकरात लवकर खडखडीत बरे व्हा हीच शुभेच्छा! इतक्या महत्वाच्या आणि साध्या धाग्यावरही खडाजंगी व्हावी याला काय म्हणावे? मराठी बाणा? :-) खरं तर विवेकपटाईतसाहेब सगळे उपचार व्यवस्थित करून घेतच आहेत. उत्तम वैद्यकीय सेवा आणि उपचार ते घेतीलच. त्यांनी घाबरून किंवा गोंधळून जाऊन कुठल्याच प्रकारचा सल्ला, मत, मदत, किंवा माहिती मागीतलेली नाही. मिपावरच्या जिव्हाळ्यापोटी त्यांनी आपल्याला आपल्या मनातली गोष्ट मोठ्या मिश्कील थाटात सांगीतलेली आहे. योग्य ती वैद्यकीय खबरदारी ते घेतीलच. अशा धाग्यावर सल्ला देण्याची काही आवश्यकता आहे असे मला वाटत नाही. इतक्या महत्वाच्या धाग्यावर सगळे निर्णय घेऊन झाल्यानंतर विविध सल्ले देणं त्या व्यक्तीला गोंधळात टाकू शकतं, अशा सल्ल्यांमुळे आपण घेतलेले निर्णय चुकीचे तर नाहीत ना अशी भीती वाटायला लागते. हृदयविकारासारख्या अत्यंत नाजूक बाबतीत असे अगदी निराळे सल्ले रुग्णाने सगळे निर्णय घेतल्यानंतर देणे कदाचित मानसिकदृष्ट्या तणाव निर्माण करणारे आणि क्वचित धोकादायकही ठरू शकते. त्यामुळे आपल्या सदिच्छा व्यक्त करून रुग्णाच्या मनाला उभारी येईल अशा निर्भेळ भावना व्यक्त करणे जास्त महत्वाचे आहे असे वाटते. बारकी पोरं बी अशा म्हत्वाच्या गोष्टीवरून भांडत नाई राव...अशे सगळेच सोताला पेशवे समजायला लागले तर युद्ध आन लढाईच होनार की...अजून काय होनार? ;-) विवेकपटाईतसाहेब, तुम्ही टेंशन घेऊ नका. ये तो रोज का नाटक हैं! ऐसा (सिर्फ) वैचारिक, तात्विक झगडा नही किया तो हम खुद को मराठी कैसे बुलायेंगे? ;-) आणि सगळ्या मिपाकरांना १००% खात्री आहे की आपले सगळे उपचार अगदी व्यवस्थित होतील आणि आपण लवकरच मिपावर आपली लेखणी घेऊन याल! :-)

शीव रुग्णालयात जगातील दुर्मिळ शस्त्रक्रिया...टाक्याशिवाय दूर केला हृदयविकार...४८ वर्षांपासूनचा हृदयरोगी ठणठणीत. मुंबई, दि. ८ (प्रतिनिधी) - हृदयाच्या धमन्या आकुंचन पावल्या किंवा त्यामध्ये ब्लॉक निर्माण झाला तर अँजिओप्लास्टी किंवा बायपासशिवाय पर्याय नसतो. अशावेळी सामान्यत: हृदय उघडूनच शस्त्रक्रिया करावी लागते. मात्र जन्मापासून ४८ वर्षे हृदयरोगी असलेल्या हमीद शेख याच्यावर हृदय कोणत्याही प्रकारे न उघडता विनाटाका शस्त्रक्रिया करून त्याला ठणठणीत करण्यात आले. जगात अत्यंत दुर्मिळ मानली जाणारी अशी दुसरी शस्त्रक्रिया करण्याचे आव्हान शीव रुग्णालयातील हृदयरोगतज्ज्ञांनी लीलया पेलले. या शस्त्रक्रियेनंतर रुग्ण अवघ्या चार तासांत घरी पोहोचून आपली दैनंदिन कामेही करू लागला आहे. हमीद शेख याच्या हृदयाला रक्तपुरवठा करणारी धमनी बंद झाली होती आणि त्याचप्रमाणे हृदयातून शरीराला रक्तपुरवठा असणारी धमनी बारीक झाली होती. यामुळे त्याच्या शरीराला कमी रक्तपुरवठा होत होता. जन्मापासूनच हा आजार असलेल्या हमीदला पंचेचाळिशीनंतर हा तास अधिक जाणवू लागला. त्याला शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा त्याची प्रकृती अत्यंत नाजूक होती. टूडी इको तपासणीमध्ये त्याच्या आजाराचे निदान झाले. हृदय कोणत्याही प्रकारे न उघडता त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि अवघ्या चार तासांत रुग्ण चालू-फिरूही लागला. यामुळे ओपन हार्ट सर्जरीचे होणारे दुष्परिणामही टाळता आले. दोन धमन्यांमध्ये एकाच वेळी स्टेंट हृदयरोगतज्ज्ञ डॉ. उदय महाजन यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांनी ४ जुलै रोजी हमीद शेख याच्यावर विनाटाक्याची हृदयशस्त्रक्रिया केली. कोणत्याही प्रकारे ओपन हार्ट सर्जरी न करता एकाच वेळी दोन धमन्यांमध्ये स्टेंट टाकून त्या खुल्या करण्यात आल्या. जगामध्ये दुसर्‍यांदा अशा प्रकारची शस्त्रक्रिया करणारे शीव हे एकमेव रुग्णालय ठरले आहे. याआधी २०१२ मध्ये पहिल्यांदा ही शस्त्रक्रिया करण्याचे आव्हानही शीव रुग्णालयानेच पेलले होते.

हृदयाच्या धमन्या आकुंचन पावल्या किंवा त्यामध्ये ब्लॉक निर्माण झाला तर अँजिओप्लास्टी किंवा बायपासशिवाय पर्याय नसतो. अशावेळी सामान्यत: हृदय उघडूनच शस्त्रक्रिया करावी लागते.
ह्या विशीष्ट केसबद्दल काही भाष्य करीत नाही. पण अँजिओप्लॅस्टीतही हृदय उघडावे लागत नाही, तसेच छातीवर कसलाही छेद करावा लागत नाही.थोडक्यात अँजिओप्लॅस्टी ही रूढार्थाने शस्त्रक्रिया नाही.

आपण ज्यांना ओळखत ही नाही अशा लोकांना ही आपली काळजी आहे, प्रतिसाद वाचून आनंद ही झाला आणि धीर ही आला. हृदयात आधीच्या स्टेन च्या मागे १००% आणि इतर तीन ठिकाणी ही जवळपास शंभर टक्के ब्लोकेज असल्या मुळे बाय पास चा निर्णय घेण्यात आला. दिनांक ३.७.२०१४ दिल्लीतील escort हॉस्पिटल मध्ये डॉक्टर मेहारवाल यांनी बाय पास सर्जरी केली, सर्व सुरळीत पार पडल, १०.७.२०१४ ला सुट्टी मिळाली. आता टाके १८.७.२०१४ उघडतील. कसले ही कॉम्प्लिकेशन नाही. काळजी नसावी. आयुर्हीत साहेब, जर हृदयात एक दोन ६०-७० टक्के ब्लोकेज असते तर पर्यायावर निश्चित विचार केला असता. पण सद्य परिस्थितीत हिम्मत झाली नाही. बाकी हॉट-स्पिटल म्हणजे नर्सेस आल्याच, *air_kiss*

वा..वा.. पटाईत साहेब आम्हा सर्व मिपाकरांच्या, तुमच्या मित्र-नातेवाईकांच्या, कुटुंबियांच्या प्रार्थनांना आणि डॉक्टर मेहरवाल ह्यांच्या अनुभवी हाताला यश आलेले वाचून अत्यानंद झाला. ह्या पुढे काळजी घ्या. तुम्हास आयुरारोग्य चिंतितो.

अरे वा वा, चांगली बातमी, तुम्ही ठणठणीत आहात याची शेवटच्या वाक्यावरुन खात्री पटली. हॉस्पिटल मधल्या अनुभवांबद्दल जरुर लिहा. *man_in_love* जे बोर्डावर लिहिण्या सारखे नसेल ते व्यनि करा. *secret* डॉक्टरांच्या सल्ल्यांचे काटेकोर पणे पालन करा. *smile* आरोग्यपुर्ण आयुष्यासाठी तुम्हाला अनेक अनेक शुभेच्छा. *give_rose*
आपण ज्यांना ओळखत ही नाही
या बाबतीत मात्र असहमत पैजारबुवा,

वा! पटाईतसाहेबांचा ट्राफिकजाम यशस्वीरीत्या निस्तरला गेला हे पाहून आनंद वाटला. विश्रांती घ्या आणि या पुनरेकवार नव्या जोमाने मिपावर!

+३, तुम्ही व्यवस्थित बरे होणार याची खात्री होतीच. आता काळजी घ्या.