Welcome to misalpav.com
लेखक: mohite jeevan | प्रसिद्ध:
समोर खिडकीतुन त्या पुस्तकवाल्या बाबुकडे पाहत होतो,काय करावे काय नको वाटत होते?हे त्याचे पुस्तक दहा रुपयाचे आसले तरी ते त्याची रोजी रोटी होती. दोन दिवसानी आम्ही ते घर सोडले,बाबाची जेथे बदली झाली तेथे आम्ही गेलो.खुपच आठवणी घेऊन गेलो,शिला जीला मी नेहमी पुस्तक वाचायला देत होतो,तेच पुस्तक ज्याच्यावर तीने मी लिहलेल्या 'आय लव्ह यु' च्या पुढे 'टु' लिहले होते.त्यामुळे ते पुस्तक आज ही माझ्याजवळ ठेवले. आज त्या शहरात मी बर्याच वर्षानी आलो,काही कामानिमित्त. त्या शहरात व परिसरात खुप बदल दिसला, पण त्या पुस्तकवाल्या बाबुच्या चेहर्यात काहीच बदल दिसत नव्हता,तो मला ओळखत नसेल पण मी त्याला चांगला ओळखतो.त्यच्या केसात व चेहर्यात बदल झाला आसला तरी त्याच्या कामा वरुन मला जसा मी खिडकीतुन पाहत होतो तसाच वाटत होता. तो पुस्तके लावण्यात गुंग होता, शिलाचे लग्न झाले आसे मला कळाले पण मला त्याचे दु:ख वाटले नाही.ते माझ्या बालपणाचे प्रेम होते.त्यावेळी दोघेही आम्ही बालक होतो. पण आज मी ठरविले की त्या पुस्तकवाल्या बाबुचे पुस्तक परत करायचे,पण कसे? पंधरा सोळा वर्षापुर्वीचे पुस्तक तो ओळखणार ही नाही आपणाला? मग मीच ठरिवले.सध्याची परस्थिती पाहता त्याला दहा रुपये देण्या ऐवजी शभंर रुपये द्यायचे. मी त्या बुक स्टाँलवर गेलो,मी एकटाच होतो त्यामुळे मी कोणत्या पुस्तकाला हात लावतो ते पाहत होता. मी त्याची नजर ओळखली व मीच म्हणालो,'काय राव पुस्तकाबरोबर पैसे ही वाटता की काय?,' तो गोधंळलेल्या नजरेन माझ्याकडे पाहिले,व म्हणाला,'म्हणजे?,' 'माझे एक मित्र येथुन पुस्तक घेतले व त्या पुस्तकात त्याना शंभर रुपये मिळाले,तेच त्यानी तुम्हाला परत करायला सांगुन गावी गेलेत,'मी म्हणालो, 'हे कसं काय?,'बाबु म्हणाला, 'ते मला माहीत नाही पुन्हा जेव्हा येतील तेव्हा त्याना विचारा,' आसे म्हणुन मी त्यच्या हातात शंभराची नोट ठेवली, 'आहो पण कोण ती व्यक्ती? नाव तर सांगा?,' आता मात्र मी सापडलो,काय सांगावे प्रश्न मला पडला, 'तेच तुम्हाला येऊन सांगतील,' आसे म्हणुन तेथुन मी निघालो, मला पुस्तक काही परत करता आले नाही पण पैसे दिल्याचे मला समाधान वाटु लागले. दुसर्या सकाळी मी ते शहर सोडुन निघालो, खुप वेळ होता,रेल्वेला म्हणुन त्या सकाळी सकाळी बाबु बुक स्टाँल कडे लाबुनच पाहीले, आज बहुतेक तो गडबडीत पुस्तकाची पाने पलटत होता, त्याची मुलगी ही पुस्तके चाळत होती. एक तासानी मी रेल्वे स्टेशनकडे जाण्यास रिक्षा केली,शेवटची एक नजर मी त्या बुक स्टाँलच्या बाबु कडे पाहिले,तर आजुन ही तो पुस्तकाची पाने पलटत होता. *
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

आज मी ठरविले की त्या पुस्तकवाल्या बाबुचे पुस्तक परत करायचे,
शेवटची एक नजर मी त्या बुक स्टाँलच्या बाबु कडे पाहिले,तर आजुन ही तो पुस्तकाची पाने पलटत होता.
वरील वाक्यांत पुस्तकवाल्याचे नाव जर बाबू असेल तर वाक्यरचना चुकलेली आहे. मराठीत नुसते "पुस्तकवाला " म्हंटले असते तरी चालले असते. हिन्दीचे मराठीत रूपाम्तर करायचे असेल तर स्वैर करा शब्दशः नको
दोन दिवसानी आम्ही ते घर सोडले,बाबाची जेथे बदली झाली तेथे आम्ही गेलो.खुपच आठवणी घेऊन गेलो,शिला जीला मी नेहमी पुस्तक वाचायला देत होतो,तेच पुस्तक ज्याच्यावर तीने मी लिहलेल्या 'आय लव्ह यु' च्या पुढे 'टु' लिहले होते.त्यामुळे ते पुस्तक आज ही माझ्याजवळ ठेवले.
जिमो साहेब तुम्ही हिन्दी चे सरळ सरळ शब्दशः भाषांतर केलेले आहे. किंवा तुम्हीच अगोदर हिंदीत कथा लिहून ती नम्तर मराठीत केली. असो. एक प्रश्नः "आय लव्ह यू " असे लिहीलेले पुस्तक बाबूला देऊन टाकण्यामागे नक्की काय उद्देश असेल?

बिचारा बाबू, सोरट सारखे आता प्रत्येक पुस्तक बघत बसला... एक प्रश्न (शंका) - पुस्तक वाचायला म्हणून घेतले असले तरी मग त्याचे डिपॉजिट घेतले जाते ना?

डिपॉझीटच जप्त झालं असण्याची शक्यता आहे! त्यावर शीलानं टू असं लिहिल्यानं तिचं सभासदत्व रद्द झालं. या बालपणीच्या कटू आठवणींचा बदला, म्हणजे बाबूला जन्मभर पुस्तकाची पानं पलटत राहाण्याची शिक्षा!

जीवनभौ परत आल्याचे पाहुन डोळे पाणावले. त्यांची तीच पुर्वीची हिट्ट्ट्ट्ट्ट लेखनशैली टिकुन आहे हे बघुन तर भडभडुन आले. जीवनभौ तुम्ही लिखो हम तुम्हारे साथ हय

>>> जीवनभौ तुम्ही लिखो हम तुम्हारे साथ हय नाही म्हणजे भावना पोचल्या खर्‍या पण थोडं कटू सांगायचं झालं तर जीवन भौंच्या साथ मध्ये आपण कुणीच असू शकत नाही. हमारी सोच जिधर संपती हय उधरसे उनकी सोच चालू होती हय! त्यामुळं घोषणा बदलने के सिवाय पर्याय नही हय.

वाटण्याइतपत, (गेल्या १५/१६ वर्षात) प्रगती झाली आहे, हे आडवळणानं सांगण्याचा प्रयत्न.
२) `शिला जीला मी नेहमी पुस्तक वाचायला देत होतो, तेच पुस्तक ज्याच्यावर तीने मी लिहलेल्या 'आय लव्ह यु' च्या पुढे 'टु' लिहले'
याचा अर्थ `तू दोन नंबरवर आहेस', हे न समजल्यानं निष्कारण भावना उर्देक झाला... आणि शंभर रुपये वाया गेले.
३) शिलाचे लग्न झाले आसे मला कळाले पण मला त्याचे दु:ख वाटले नाही.ते माझ्या बालपणाचे प्रेम होते.त्यावेळी दोघेही आम्ही बालक होतो.
थोडक्यात `अल्पवयीन मुलीला फूस लावणे' हा गुन्हा आहे, याची अगदी बालपणीच कल्पना होती.
३) 'तेच तुम्हाला येऊन सांगतील,' आसे म्हणुन तेथुन मी निघालो,
न जाणो, शीला तिथे मिस्टरांबरोबर उगवली तर काय? ही खरी भीती.
४) सकाळी सकाळी बाबु बुक स्टाँल कडे लाबुनच पाहीले, आज बहुतेक तो गडबडीत पुस्तकाची पाने पलटत होता, त्याची मुलगी ही पुस्तके चाळत होती.
ला वरचा अनुस्वार, तरंगत तरंगत, स्टॉ वर गेला आहे, पण तो केवळ डोळे पाणावल्यामुळे.
५) एक तासानी मी रेल्वे स्टेशनकडे जाण्यास रिक्षा केली,शेवटची एक नजर मी त्या बुक स्टाँलच्या बाबु कडे पाहिले,तर आजुन ही तो पुस्तकाची पाने पलटत होता.
थोडक्यात, आयुष्याची पानं पलटत राहा. शंभरी आली तरी नाद सोडू नका. शीला एक दिवस नक्की येईल!

ही कथा नसून मुक्तक आहे अशी शंका आहे. तथापि जीवनाच्या सखोल तत्वज्ञानाचा सकस अविष्कार इथे व्यक्त झाला आहे. भावनिक स्तरावरून तार्किक स्तरावर येताना कथानायकाच्या मनोवस्थेत जी स्थित्यंतरे झाली त्यांचे धारदार चित्रण कथेच्या शब्दाशब्दात उतरले आहे. झालंच तर पुस्तकवाल्या प्रती जी अथांग करुणेची भावना साकार झाली आहे, त्यास तोड नाही... इत्के बोलून मी माझ्या तीन ओळी संपवते. जै हिंद जै म्हाराष्ट्र !

@कथानायकाच्या मनोवस्थेत जी स्थित्यंतरे झाली त्यांचे धारदार चित्रण कथेच्या शब्दाशब्दात उतरले आहे.>>> आणि स्थित्यंतरांच्या चित्रणाची प्रतिबिंबे कथेतील विरामचिन्हांमध्ये पडली आहेत. ;-)

समोर खिडकीतुन त्या पुस्तकवाल्या बाबुकडे पाहत होतो,काय करावे काय नको वाटत होते?
ठ्ठो!!!!!!! ते लुनावाले ब्रम्हे तुम्हीच काय हो?

खफ वरुन @खटपट्या: "त्यात मोजीना १० रुपये सापडले." हे चुकिचे वाचले आपण. १)शिला जीला मी नेहमी पुस्तक वाचायला देत होतो,तेच पुस्तक ज्याच्यावर तीने मी लिहलेल्या 'आय लव्ह यु' च्या )पुढे 'टु' लिहले होते.त्यामुळे ते पुस्तक आज ही माझ्याजवळ ठेवले. २)हे त्याचे पुस्तक दहा रुपयाचे आसले तरी ते त्याची रोजी रोटी होती. ३)पण आज मी ठरविले की त्या पुस्तकवाल्या बाबुचे पुस्तक परत करायचे,पण कसे? पंधरा सोळा वर्षापुर्वीचे पुस्तक तो ओळखणार ही नाही आपणाला? मग मीच ठरिवले.सध्याची परस्थिती पाहता त्याला दहा रुपये देण्या ऐवजी शभंर रुपये द्यायचे. वाचण्या वाचण्यात देखिल कसा फरक पडतो नाही? त्याला डेल्टा म्ह्णतात का? @अरुण जोशी सर सांगतीलच याचा स्थिरांक व एकक काय असेल ते. @माऊ सांगेलच परस्परसंबंधही तसेच तितकेच रहाणार कि नाही आणि केवढा मोठा स्टॉल लागेल ह्या डेल्टाला!

अहो मी एकटाच नाहीये. बऱ्याच लोकांच्या डोक्यावरून (का डोक्यात ?) गेली आहे हि कथा. खुलाशा बाद्दल धन्यवाद. पण खुलासाही डोक्यावरून गेलाय

पुस्तकाची अ‍ॅप्रीसिएशन व्हॅल्यू कशी काढायची हा नायकाला पडलेला प्रश्न आहे. शीला ने आय लव्ह यू च्या पुढे २ आकडा लिहून त्या प्रेमकथेचा सीक्वेल काढायचे सुचवले होते. लेखकाने त्या सिक्वेलवर पुढे नक्की काय काम केले ते समजले नाही. बहुतेक रश प्रिन्ट्स बघितल्यावर कल्पना निगेटीव्हसह सगळे हक्क दुसर्‍या डारेक्टरला हस्तांतरीत केले असावेत.

जीवनाविषयीचादॄष्टीकोनामुलाग्रबदलणारीएकजबरदस्तआशयघनकथामीहीकथाप्रिंटकरुनफ्रेमकरुनमाझ्याघराच्याहॉलमधेलाउनठेवणारआहेवरोजसकाळदुपारसंध्याकाळवाचणाराअहेयामहानकथेच्यामहानलेखकालाशिरसाष्टांगनमस्कारपैजारबुवा

अरेअरेअरेमिपाकरांनोकायकळतंयकीनैधागाकायकथाकशीगंभीरआणिप्रतिक्रियाकशादेतायएकमिपाकरम्हणूनमानशरमेनेखालीगेलीतीपरतझोपआल्यामुळेतशीचराहिलीzzzzzzzzzzzzzzzz..........

अवघड आहे . ही कथा इयत्ता दहावीच्या अभ्यासक्रमातील नरेन्दबासां भेटि अनुसरण ह्या धड्या इतकी अवघड आहे समजायला ! मोजींचिये दादुलेपनाचा उबारा| न साहावेचि मिपा-माबो-करा|| ....

अथ पूर्वाख्यानम् मिपावरी अनेक लेखक-कवी: येकदा बहुत वादु जाहला: त्वां चांगला की म्यां याजवरोनि: बहुत गदारोळु माजला: तेव्हा मिपावाणी जाहाली: आक्रंदो नका, नका जनहो: येकचि आहे वादा: नाम तयासी जीवनदादा: तेहाची कथा वाचोनु: मगच ठरवा उत्तम कोणु: मिपाकरें 'हां' भणितले: मग तेणे जीवने आनेक कथामंडित कथाख्यान नाम ग्रंथु लिहिला: तो आपुलाले मिपाकरांपुढा टाकिजला: वाचोनी तेथ जें ही बैसले होते: येकसरिसे मूर्च्छित पावले: तेव्हा गोडबोलियांचिया प्रसादे भणितले: मोजींचिया दादुलेपनाचा उबारा: न साहावेचि मिपा-माबो-करां: भेण वोसरोनि धीर करा: वाचाल तर्‍हीं परौते:: यावरि जनलोकें भणितले: या ग्रंथाचा अभंगु मज देयावा: म्या जेतुकीया कथा तेतुकी विडंबने आणिक चौथरीया प्रतिसादू देईनः त्यासि जीवनभावू उत्तरले: 'ना मिपाकरहो: आमुचेया जीवनकुळा बोलु लागैलः' मिपाकरांचा गर्वु हरिला: तयांसी थोर चमत्कारू जाहला: येकच कोलाहलू जाहला: ग्रंथाचा अभंगुही न घेता: पदरी वोवाळणि घातली असे: समस्त मिपानगरीचिया ढवळारी येकचि शब्दु: सकळा लेखकांपरीस, हा लेखकू चतुरः -इति जीवनभाऊंचा दृष्टांतु: मूळप्रत पानशेत-पुरी: गेली चिरकालिक अंधारी:

@-इति जीवनभाऊंचा दृष्टांतु: मूळप्रत पानशेत-पुरी: गेली चिरकालिक अंधारी:>>> http://www.smileyvault.com/albums/CBSA/smileyvault-cute-big-smiley-animated-013.gif अरे खाटुक! मेल्या,मारशील एखाद दिवस हसवून हसवून!!! =))

@-इति जीवनभाऊंचा दृष्टांतु: मूळप्रत पानशेत-पुरी: गेली चिरकालिक अंधारी:>>> http://www.smileyvault.com/albums/CBSA/smileyvault-cute-big-smiley-animated-013.gif अरे खाटुक! मेल्या,मारशील एखाद दिवस हसवून हसवून!!! =))