दांडेकर पुलावरुन जाताना एका मोसा वाल्याने एका बाईचे मंगळसुत्र चोरले.... हिसक्याने बाई स्कुटरवरुन खाली पडली व तिला चांगलेच लागले..ह्या प्रसंगाचा धसका घेतला व हिला म्हटले मंगळ सुत्र निदान बाहेर जाताना घालु नकोस..व तिने मान्य केले...
घरापासुन थोड्या अंतरावर नुक्कड आहे तिथे किराणामाल जनरल स्टोर बेकरी अशी दुकाने आहेत आठवड्यातुन ३-४ वळा तिथे जाणे असतेच,,सारे मित्र झाले आहेत..
मधे आजारी होतो डॉक्स ने १ महिना घराबाहेर पडु नका पुर्ण विश्रांति घ्या असा सल्ला दिला...व मी तो पाळला तब्बेत पण बरी नव्हतिच..
त्या काळात सौ बाजार हाट करत असे.
बरे वाटले अन जनरल स्टोर च्या दुकानात गेलो..
मला पहाताच मालक आश्चर्य चकित होवुन म्हणाला..."आयला तुम्हि आहात हो अजुन?"
मला कळेना.. मी म्हणालो आहे ना..असे का विचारता?
त्यावर तो म्हणाला परवा वहिनी येवुन गेल्या होत्या गळ्यात मंगळसुत्र नव्हते..तुम्हि पण दिसला नाहित.. विचारणार होतो पण त्या घाईत होत्या..त्या मुळे मला वाटले......
मला हसु आले..घरी आल्यावर तिला किस्सा सांगितला.
तिने कपाटातले मंगळसुत्र काढले व गळ्यात घातले.
प्रकार:
विषय:
प्रतिक्रिया
गळ्यात की मसनात
आदि खु खु लहाव
हा हा हा सहिये ..
एका मोसा वाल्याने ??
खरंच मजेदार.
च्यायला खरेच मजेदार किस्सा
संपली .. एकदाची... वाचता
मस्त
अकु, मंगळसूत्र सुरक्षेसाठी कुत्रा पाळा!