आपण ज्याला जमेतही धरत नाही अशा अनेक गोष्टी आपल्याला नेमक्या वेळी कामास येतात आणि मजा येते जगण्याला..आपलचं आपल्याला हसू येत राहतं..
आज सकाळचीच मजा..९.३०चं ऑफिस..घरातच ९.२०वाजलेले..आता अशा घाई गडबडीच्या वेळी ट्राफिकमध्ये अडकायला नको म्हणून आवरायची गडबड.. आणि अशावेळी माझं नेहमीप्रमाणे स्वगत चालू. “नशीब आज विकेंड आहे..फोर्मल घालायची गरज नाही..” जीन्स चढवली..बेल्ट लावायला लागलो..आणि ‘कट्ट्’ असा आवाज झाला आणि बेल्टच्या बक्कलची स्प्रिंग तुटून खाली पडली.. “आईचा घो याच्या”. आता आली का पंचाईत.. दुसरी जीन्स धुतलीच नव्हती..आणि आज फोर्मल घालायची इच्छा नव्हती.
काय करावं असा विचार करत असताना भावाच्या बेल्टचं बक्कल कुठतरी पाहिलं असल्यासारखं आठवलं..बरीच शोधाशोध केली.. पण च्यामारी नाहीच सापडलं. आता काय करायचं?? गेल्या काही दिवसात बारीक झाल्यामुळे जीन्स पण घसरत होती. एवढ्यात.. सुतळीनं जीन्स बांधावी आणि वरून नुसताच बेल्ट लावल्यासारखं करावं असा विचार आला.. सुतळी हुडकली, ती पण बिचारी कुठही सापडली नाही.
घड्याळ तर ऑलिम्पिक मध्ये पळत असल्यासारखं वाटत होतं, “अरे आवरा रे त्याला कुणीतरी”. आणि आज उशिरा पोहोचून बॉसचं ऐकून घ्यायचं नव्हतं. “सगळा विकेंड खराब करतो स्साला” असं काहीतरी डोक्यात चालू असतानाच अचानक “युरेका..युरेका”.
समोर दोन रबरं दिसली आणि डोक्यात ट्यूब पेटली.. कुठल्यातरी पुडीला बांधून आलेली नाहीतर आईनं दिलेल्या लाडवाच्या बॉक्सची असणार, पण वेळेवर दिसली हे महत्वाचं.. त्यांची अवस्था पण माझ्यासारखीच दयनीय झालेली दिसत होती. पहिलं घेतलं..बेल्टला दोन वेढे मारून बसवलं, बेल्ट फिट करायला लागलो आणि ते रबर पण तुटलं.. “दुष्काळात तेरावा महिना” दुसरं काय?? आता मात्र आणीबाणीचा प्रसंग होता..“जर दुसरं रबर पण तुटलं तर मात्र फोर्मल शिवाय पर्याय नाही”..सावकाश दुसऱ्या रबरचा वेढा बेल्टला मारला.. आणि तेवढ्याच सावकाशपणे बेल्ट हलकाच लावला. हुश्श..निम्मी लढाई तर जिंकली होती..पण निदान दुकानापर्यंत पोहोचून नवीन बक्कल घेईपर्यंत तरी खिंड लढवायची होती. त्यात पुण्याचे सगळे दुकानदार पेशवेच जणू. अकरा वाजायच्या आधी दुकान उघडतील तर शपथ..“एवढा पैसा कमावून काय अंबानी व्हायचं कि काय राव” असा यांचा तोरा, त्यामुळ अजून तासभरतरी श्वाससुधा जोरात घेऊन चालणार नव्हतं. पण बाकीच उरकून ऑफिसमध्ये पोहोचलो. एरवी, “चार मजले चढायला लिफ्ट कशाला??” असं म्हणणारा मी आज मात्र लिफ्टची वाट बघत थांबलेला पाहून एक दोघांनी विचारलं पण, “इकडं कुठ आज??”. आता काय सांगायचं त्यांना?? “काही नाही असचं..लिफ्ट नीट चालते का ते चेक करतोय..हेहेहे” असं काहीतरी फालतू बोलून सटकलो. कामाला सुरुवात झाल्यावर मात्र एक वाजेपर्यंत काही डोक्यातच आलं नाही पण जेव्हा लक्षात आल तेव्हा मात्र, “अरे..बच्चन सावकाश, फजिती व्हायला वेळ लागणार नाही.. खिशात हात घालूनच चालाव लागेल नाहीतर..” हे जाणवलं. लंचब्रेक मध्ये जेवायच्या आधी दुकानात घुसलो आणि बक्कल घेतलं, तिथच लावलं आणि एकदाची जीन्स घसरती का काय अशी भावना थांबली. आणि नंतर ऑफिसमध्ये शेजारच्या मुलीच्या डोक्यात रबर बांधलेलं बघून माझं मलाचं हसू येत होतं.
शाळेत कागदाचे बोळे, रिफील मारण्यासाठी, बेंचमध्ये अडकवून आवाज काढण्यासाठी; फार तर फार पिशवी, पुडी बांधण्यासाठी वापरलेलं रबर आज माझ्या एवढं कामी येईल, कि अगदी माझी घसरणारी सुद्धा सावरायला उपयोगी पडेल असं कधीच वाटलं नव्हतं. कधी, कुठ, कसं आणि कोण आपल्याला सावरेल काही सांगता येत नाही.
कठीण समय येता कोण कामास येतो अस कुणीतरी म्हटलयं.. मला विचारलच कुणी तर मी ‘रबर’ असं मात्र नक्कीच सांगेन. ;)
प्रकार:
विषय:
प्रतिक्रिया
छान लिहीले आहे...
हा हा मस्त !!
:) आवडलं ...
छायाचित्र??
(No subject)
हा हा हा.
Ay, there's the rub(ber)
अगदी हेच म्हणते! माझ्या
अरेरे!
आता काय करणार ??
मि तर तोच अर्थ धरला होता.
रब्बर ताणून हसवलंत .पुढच्या
मस्त कलंदर आणि मस्त कलन्दर
हैला! मेले! मी मकी समजून
असं का??
आता यापुढे आईडीला ओळखत
ह्ही..ह्ही..ह्ही..!
हा.हा.हा...
कठीण समय येता कोण कामास येतो
लिहायला सुरुवात केलीय हल्लीच.
तुमचं काही चुकलं नाही माझंच
रबर अर्थ पर्याय
आणखी एक आहे ना....`बॉलचं रबर'
तुमच्या आयडीतला अर्धा न बघून
@अर्धा न बघून>>> अस्स आहे
मस्त
हा हा हा, लेख तर मस्तच झालाय,
छान
हलकं फुलकं आवडलं
बटण
लेख चांगला जमलाय... बाकी
मी पण अगोदर मकीने हा लेख
निदान..
ही समस्या आहे खरी, मीही बराच
आयडी
प्लीज नीलकांताला व्य नि करुन
पँट घसरली