Welcome to misalpav.com
लेखक: कॅप्टन जॅक स्पॅरो | प्रसिद्ध:
नमस्कार मिपाकर मित्रमंडळींनो. मागे एकदा नथुराम गोडसेंच्या धाग्यावरुन बरीच शाब्दिक हाणामारी झालेली होती. त्यावेळेला काही गांधींच्या समर्थक बुद्धीवादी मंडळींनी आंधळ्या गांधीवादाखातर बरीच शाब्दिक हिंसा केली होती (अर्बन डिक्शनरीमधे हिप्पोक्रसी चा नवा अर्थ टाकता येईल काय?) असो. त्यावेळी पुरावा द्या, पुरावा द्या असा 'सत्याग्रह' काही गांधीवाद्यांनी केला होता. आपल्या मौलिक वेळातला फक्त दिड तास काढुन हे नक्की बघा किंवा ऐका. ज्या गोष्टींचे पुरावे अस्तित्वात आहेत आणि कोणालाही बघता येतील अश्या स्थितीत आहेत त्यावरुन "गांधीवादः एक थोतांड" हा मुद्दा अधोरेखित केला जाऊ शकेल. खालील मुद्दे मात्र नक्की लक्षात घेण्यासारखे आहेत. १. विशिष्ट धर्मियांचा अनुनय. (प्रकरण भाई रशिद, खिलाफत चळवळ, तुर्कस्तानच्या दोन मुल्लांनसाठी हजारो देशबंधुना तुरुंगात सडु द्यायचा अट्टाहास ई.ई.) २. अत्याचार झालेल्या भगिनीवर्गाला दिलेले सल्ले. ३. स्वतःच महत्त्व कमी होऊ नये म्हणुन क्रांतिकारकांच्या शिक्षांमधे हस्तक्षेप नं करणं. ४. स्वातंत्र्य फक्त आणि फक्त गांधींमुळे मिळालं ह्याचं शालेय ईतिहासापासुन चालु असलेल पद्धतशिर ब्रेन-वॉशिंग. धागा मला जुने वाद उकरुन काढायचे आहेत ह्या उद्देशानी काढलेला नाही. गांधीवादी असोत किंवा कट्टर विरोधक असोत, कृपया वाद टाळावा ही नम्र विनंती. आफळे बुवा: गांधी भाग-१ Charudatta Aphale: Gandhi Part 1 आफळे बुवा: गांधी भाग-२ Charudatta Aphale: Gandhi part 2 आफळे बुवा: गांधी भाग-३ Charudatta Aphale: Gandhi Part 3 गांधींच्या म्हणण्याप्रमाणे "सत्यमेव जयते" म्हणतो. :).
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

तिनही भाग ऐकले. हे सगळे खरे असेल तर काय म्हणावे कळत नाहीये… त्यावेळच्या अत्त्याचाराच्या कथा ऐकून सुन्न झालोय गांधीवाद्यांचे/गांधी प्रेमींचे याबद्दल मत ऐकायला आवडेल.

नै पन आम्ही काय म्हणतो, इतके धागे झाले तरी पण तुम्हा अडाण्यांना कसे कळत नाही की गांधी किती चूक (पक्षी : वाईट, देशविघातक, हिंदुद्वेष्टे, मूर्ख इ. इ. ) होते ते. तुम्हा लोकांची कमालच आहे.! किती म्हणजे किती कष्ट द्यायचे लोकांना नवे नवे धागे काढायचे आणि त्यावर तेच ते मुद्दे समजवायचे ? तुम्ही (सगळेच, गांधीच्या बाजूने बोलणारे आणि मध्यममार्गीदेखील) तर बर्‍यापैकी वाचक-अभ्यासक तरी पण तुम्हाला आम्ही सांगतो ते कळत कसं नाही ? देवा देवा .. अजून किती धागे आणि काथ्या कुटावा लागणार या वृषभ-बुद्धी समाजास शहाणे करण्यास कोण जाणे.!

मित्रा, महात्मा गांधीजींची आणखी एक वैयक्तिक शोकांतिका. मुलांची त्यांच्या विचारांच्या प्रभावाखाली दबून राहिल्याने झालेली घुसमट... बऱ्याच वेळी मी विमाननगरहून आगाखान पॅलेस समोरून जाताना आईला भेटायला आलेल्या मुलाला८- ८ दिवस तेथील फाटकात अडवले जात होते. कस्तुरबा बाहेर येऊन त्याला आत घेऊन गेल्या. नंतर हटवादीपणा करून मद्रासला असताना तो इस्लामी धर्मात गेल्या वर त्याला परत आणायला आईला तिथे जावे लागले होते. आदि आठवून वाईट वाटत राहते..

किर्तनकाराचे आख्यान, तद्दन प्रचारकी आणी नाटकी. गांधीजींचे तत्व ऐकण्याची जबरदस्ती ना गांधींनी केली, ना त्यांच्या सहकार्यानी. गांधीजींच्यामुळेच कदाचीत भारताची अवस्था पाकीस्तानसारखी झाली नाही.

गांधीजींचे तत्व ऐकण्याची जबरदस्ती ना गांधींनी केली, ना त्यांच्या सहकार्यानी.
नक्की. नुसती जबरदस्ती नाही, लादला गेलाय गांधीवाद.
किर्तनकाराचे आख्यान, तद्दन प्रचारकी आणी नाटकी.
गांधीवादाएवढं नक्कीच नाही.

गांधीवाद म्हणजे थोतांड वगैरे अप-प्रचार नेहमी करण्यात येतो.महात्मा गांधी ह्या व्यक्तीमागे ईतके लोक- केवळ भारतातलेच नव्हेत तर परदेशातले देखील अगदी तुमचा तो आईन्स्ताईनदेखील का आकर्षित झाले ह्याचे कारण शोधण्याचा प्रयत्न करताना ही मंडळी दिसत नाहीत. फक्त गांधींमुळेच स्वातंत्र्य मिळाले असे तेव्हाही कोणी म्हंटले नव्हते व तसे आताही कोणी म्हणत नाही.

फक्त गांधींमुळेच स्वातंत्र्य मिळाले असे तेव्हाही कोणी म्हंटले नव्हते व तसे आताही कोणी म्हणत नाही.
चला ,आता उचललेस तु मीठ मुठभर साम्राज्याचा खचला पाया असल्या कविता मोडीत काढायला हरकत नाही हे पाहुन आनंद झाला ! बाकी थोडी तरी प्रगती आहे विचारसरणीत ....हेही नसे थोडके ....!!

थोडी तरी प्रगती आहे विचारसरणीत
चला, एका पार्टीच्या विचारसरणीत थोडी प्रगती झाली. आता दुसर्‍या पार्टीच्या विचारसरणीत कधी प्रगती होणार? ;)

आता दुसर्‍या पार्टीच्या विचारसरणीत कधी प्रगती होणार?
>>> पहिली पार्टी संपुर्ण मतपरिवर्तन होवुन दुसर्‍या पार्टीस सामील झाल्यावर !! :)

आता दुसर्‍या पार्टीच्या विचारसरणीत कधी प्रगती होणार?
अहो त्यांनी गांधीवाद पूर्ण अंगिकारलाय बघितला नाहित? विरोधकांच्या हृदयपरिवर्तनावर विश्वास असल्यानेच तर हा धागा काढलाय ना? इथेच गांधीवाद जिंकला नै का?

विरोधकांच्या हृदयपरिवर्तनावर विश्वास असल्यानेच तर हा धागा काढलाय ना? इथेच गांधीवाद जिंकला नै का?
आँ ?
"शत्रुचेही हृदयपरिवर्तनकरता येते"
ह्या विचारसरणीचे क्रेडिट गांधींना ? गांधीच्या आधीपासुन "शत्रुचेही हृदयपरिवर्तनकरता येते" ही विचारसरणी अस्तित्वात आहे ...किमान हिंदुंच्यात तरी ! अंगदशिष्टाई... कृष्णशिष्टाई वगैरेंच्या अभ्यास केलेला दिसत नाहीये बहुधा ! साम दाम दंड भेद हेही ऐकले नाहीये काय ? ह्यातही पहिल्यांदा "साम" म्हणजे सामोपचार आहे ! ह्यात गांधीगिरी काही नाही उलट गांधीगिरी म्हणजे केवळ ह्यातील पहिली स्टेप आहे :) अवांतर : हिटलर आणि दुसरे महायुध्द झाले नसते तर गांधीनी विन्स्टन चर्चिल चे हृदयपरिवर्तन कसे केले असते हे पहायला मजा आली असती !

नै पन आम्ही काय म्हणतो, इतके धागे झाले तरी पण तुम्हा अडाण्यांना कसे कळत नाही की गांधी किती चूक (पक्षी : वाईट, देशविघातक, हिंदुद्वेष्टे, मूर्ख इ. इ. ) होते ते. तुम्हा लोकांची कमालच आहे.! किती म्हणजे किती कष्ट द्यायचे लोकांना नवे नवे धागे काढायचे आणि त्यावर तेच ते मुद्दे समजवायचे ? तुम्ही (सगळेच, गांधीच्या बाजूने बोलणारे आणि मध्यममार्गीदेखील) तर बर्‍यापैकी वाचक-अभ्यासक तरी पण तुम्हाला आम्ही सांगतो ते कळत कसं नाही ? देवा देवा .. अजून किती धागे आणि काथ्या कुटावा लागणार या वृषभ-बुद्धी समाजास शहाणे करण्यास कोण जाणे.!

परदेशातले देखील अगदी तुमचा तो आईन्स्ताईनदेखील का आकर्षित झाले ह्याचे कारण शोधण्याचा प्रयत्न करताना ही मंडळी दिसत नाहीत.
त्यात काय विषेश हो. रजनिश च्या मागे सुद्धा भले भले गोरे लागलेच होते की. आईन्स्टाईन ला काय जातय अमेरिकेत राहुन काहीतरी बोलायला, त्याला कुठे भोगायला लागणार होते? तो कुठला आकर्षीत होयला, २-४ ठीकाणी तोंडदेखले बरे बोलला तर लागली इथले काँग्रेस्सी नाचायला. आणि युरोप अमेरिकेत पण अगदी कमी प्रमाणात असली तरी भारतातल्या सारखी निष्क्रीय आणि खाल्ल्या घरचे वासे मोजणारे आहेतच की.

मागे एकदा नथुराम गोडसेंच्या धाग्यावरुन बरीच शाब्दिक हाणामारी झालेली होती.
एकदा? जरा मिपाचा अभ्यास वाढवा अशी फुकटची सुचना देतो. मिपावर नथुराम विरूध्द गांधी, अस्तिक विरूध्द नास्तिक, मोदी विरूध्द केजरीवाल अशा विविध धाग्यांचे अनंतवेळा दळण झाले आहे :) ह.घ्या हे वेगळे सांगणे न लागे.

ते सगळं जौंद्या. आफळेबुवा गातात बाकी मस्त. त्यांचा नाट्यसंगीताच्या वाटचालीवरचा एक कार्यक्रम आकाशवाणी पुणेवरून सादर व्हायचा तो फार भारी असे.

असे सत्तावन्न आफळे बघितले आहेत आजपर्यंत तरीही गांधींच्या तत्वज्ञानाची महती सर्वदूर पसरलेली आहेच. अशा आफळ्यांकडे दुर्लक्ष करणे सगळ्यात उत्तम.

मी या पुराव्यांबद्दल कोणीतरी काहीतरी बोलेल या आशेने कित्येक दिवस रोज हा धागा उघडून बघत आहे. पण हाय रे दैवा!! बाकी अली बंधूंबद्दल घेतलेल्या भूमिकेबद्दल मी गांधींना दोष देणार नाही. त्यांची चूक असलीच तर ही असेल की त्यांनी खिलाफत चळवळीबरोबर आघाडी केली. परंतु मला ही राजकीय अपरिहार्यता वाटते. आफळ्यांच्या कीर्तनावर धागा काढण्यासाठीच मी बराच सर्च केला होता, तेव्हा गांधींच्या या भूमिकेला माझ्या द्रुष्टीने योग्य ठरवणारे काही पुरावे माझ्या हाताला लागले होते. ते नेमके आता मिळत नाहीयेत, मिळाले की डकवतो. बाकीच्या विषयांमध्ये मात्र आफळेंचे मुद्दे मला योग्य वाटतात. एक धोरणी म्हणून गांधी बर्‍याच वेळेस चुकले आहेत. त्यांच्या भूमिकेबद्दल शंका यावी असे बरेच प्रसंग आहेत. गांधींच्या मुस्लिम अनुनयाबद्दल तर बोलूच नये असे बरेच प्रसंग सांगता येतील. मला व्यक्तिशः तो गांधींमधल्या राजकारण्याचा पराभव वाटतो. त्यांनी आपल्या राजकारणातील भविष्यकालीन धोके ओळखलेच नाहीत. त्यांना काँग्रेसमधील जनरेशन-२ ने मोठे केले, आणि त्यांच्या जीवावर आपली पोळी भाजून घेतली असे माझे मत आहे. जसे आपल्या राळेगणसिद्धीच्या गांधींबद्दल झाले तसे. बाकी गांधी त्यावेळेस असे का वागले हे सांगणे कठीण आहे. एव्हढे तेल्या-तांबोळ्यांचे पुढारी म्हणून मिरवणारे टिळक, पण वेदोक्त प्रकरणात त्यांना देखील फटका बसलाच ना.

फाळणीस अनुमोदन देऊन ज्या गांधीजींनी मुस्लिम वरचष्मा पूर्णपणे मोडून काढला त्या गांधींना मुस्लिम अनुनयाबद्दल शिव्या घालणारे लोक पाहिले की हसू आवरत नाही. =)) असो, चालायचंच.

आँ??? 'वरचष्मा पूर्णपणे मोडून काढला' म्हणजे नेमकं काय केलं?

फाळणी झाली नसती तर काय झालं असतं त्या अखंड भारतात? अगोदरच विभक्त मतदारसंघ इ.इ. चा धोशा चाललेलाच होता, टिळकांनी सांगितले की तेवढं घेऊन का होईना जर इंग्रजांशी लढणार असाल तर ठीके म्हणून. ते सगळं जर पुढं गेलं असतं तर त्रांगडं झालं असतं विचित्र. त्याजागी फाळणी झालेला का होईना, एक धर्मनिरपेक्ष भारत मिळाला हे गांधीजींचे मोठे क्रेडिट आहे. शेषराव मोर्‍यांच्या 'अखंड भारत का नाकारला' की अशाच काहीशा नावाच्या पुस्तकात ही भूमिका विस्ताराने आलेली आहे.

+१ टि़ळकांच्यावेळी लखनौ करार करावा लागला होता, विभक्त मतदारसंघ होते. फाळणीनंतर लखनौ कराराच्याही मागे भारत आला. विभक्त मतदारसंघ रद्द झाले, धर्मनिहाय आरक्षण येऊ दिले गेले नाही (व ते भारतात थांबलेल्या मुसलमानांनाही नको होते). मोर्‍यांचे लेखन ग्रेट आहे. कुरूंदकरांचेही या विषयाचे लेखन वाचनीय आहे.

धर्मनिरपेक्ष भारत म्हणजे काय भाऊ ? आज हिंदु मेजॉरिती मधे आहेत म्हणुन हा देश धर्मनिरपेक्ष आहे , इतर धर्मिय मेजॉरीतीत असलेला एक तरी धर्मनिरपेक्ष देश दाखवा ( आता लगेच तुर्कस्तान म्हणाल , पण तिथल्या खिलाफत चळवळीला मोडुन तो कमाल पाशा मुळे तो धर्मनिरपेक्ष आहे ...ज्या खिलाफत चळवळीला गांधीबाबा समर्थन देत होते ती हो =)) ) , धर्मनिरपेक्षता हा भारताचा नव्हे तर हिंदुंचा गुण आहे... हिंदुराष्ट्राचा गुण आहे...! ... जेव्हा इतर धर्मिय मेजॉरिटीमधे येतील तेव्हा पाहु भारत किती धर्मनिरपेक्ष राहतो ते ! बाकी अभ्यासासाठी : मिझोरम आणि नागालॅन्ड हे तुमच्या धर्मनिरपेक्ष भारतातील अधिकृत / डीक्लीयर्ड ख्रिश्चन स्टेट्स आहेत बरं का !!

धर्मनिरपेक्षता हा भारताचा नव्हे तर हिंदुंचा गुण आहे... हिंदुराष्ट्राचा गुण आहे...! ... जेव्हा इतर धर्मिय मेजॉरिटीमधे येतील तेव्हा पाहु भारत किती धर्मनिरपेक्ष राहतो ते !
मग हिंदू मेजॉरिटीत राहतील अशी तरतूद गांधींनी केली असेच म्हणायला नको का ;)

मग हिंदू मेजॉरिटीत राहतील अशी तरतूद गांधींनी केली असेच म्हणायला नको का
अं हं ! तेही क्रेडीट देता येणार नाही ! तेव्हाच क्लीन स्वीप फाळणी झाली असती ... हिंदु अ‍ॅबसोलुट मेजॉरीटीत आले असते तर तसे क्रेडीट देता आले असते ... देशाचा तुकडा तोडला ते तोडला शिवाय प्रॉब्लेम सोल्व्ह झाला नाहीच ...प्रॉब्लेम जिथल्या तिथेच ! कुठे आहे समान नागरी कायदा ? कुठे आहे सर्वधर्मिय घटस्फोटितांना समान अधिकार ? कुठे आहे अमर जवानच्या स्मारकाला लाथ मारणार्यांवर कारवाई करायची धमक ? कुठे आहे आसामात घुसखोरी करणार्‍यांना धडा शिकवायची हिंम्मत ? कुठे आहे तालिबान सारख्या हिंसक प्रवुत्तीशी लढणार्‍या अमेरिकेला ओपन सपोर्ट द्यायची जिगर ? कुठे आहे निर्वासित कश्मीरी पंडीतांना सुरक्षित पणे पर कस्मीरमधे पुनर्वसन करण्याची शक्ती ? येवढचं कशाला ...तर जो काश्मीर तुम्ही नकाशावर दाखवताना तो ही जिंकुन घेता येत नाही ह्याचे खरे कारण देशाबाहेर नाहे तर देशाआतच आहे! मान्य करा राव , धर्मनिरपेक्षता आमच्यात आधीपासुनच होती ...अगदी सातवाहन काला पासुन ते १८५७ च्या जिहाद मधे खांद्याला खांदा लावुन लढे पर्यंत , गांधीचेकाही क्रेडीट नाही त्याबाबत !! अवांतर : बाकी फाळणीविषयी क्लीनस्वीप फाळणी व्हाव्ही असे आंबेडकरांचेही मत होते असे ऐकुन आहे , कन्फर्म करुन कळवतो !

धर्मनिरपेक्षता आधीपासूनच होती, मात्र ती झाकोळू पाहत होती त्याचा यशस्वी प्रतिबंध गांधीजींनी केला हे मानलेच पाहिजे. असो, बाकी वाईड बॉलबद्दल बोलायचे तर औरंगजेबाच्या कृत्यांबद्दल अकबराला शिव्या घालण्यापैकी आहे हे.

धर्मनिरपेक्षता आधीपासूनच होती, मात्र ती झाकोळू पाहत होती त्याचा यशस्वी प्रतिबंध गांधीजींनी केला हे मानलेच पाहिजे.
ऑं? म्हणजे गांधींच्या समकालीन विरोधकांमध्ये धर्मनिरपेक्षता नव्हतीच की काय? अहो ज्या नथुरामने गांधींना मारले त्याचा इतिहास देखील धर्मनिरपेक्षतेचाच आहे, हां पण ती धर्मनिरपेक्षता आणि गांधी/ काँग्रेसची धर्मनिरपेक्षता यात फरक आहे. तुम्ही काँग्रेसच्या धर्मनिरपेक्षतेबद्दल बोलत असाल तर मात्र आपला पास.

मात्र ती झाकोळू पाहत होती
>>> कुणामुळे ? हिंदुंमुळे ? फाळणीच्यावेळी भारत +पाकिस्तान अशी फाळणी झालीये ... भारत + हिंदुस्तान + पाकिस्तान अशी नाही ! ह्यावरुनच कळते की धर्मनिरपेक्षता कोणामुळे झाकोलत होती ते ! अकबराविषयी मते बनावताना जोधा अकबर ह्या चित्रपटाचा आधार घेवु नये !आअकबरही औरंगजेबा इतकाच क्रुर होता होता फक्त त्याच्या लवकर लक्षात आले की इतक्या सगळ्या हिंदुंना मारणे शक्य नाही , त्याची धर्मनिरपेक्षता आगतिकतेतुन आलेली आहे स्वेच्छेतुन नव्हे ! (मुघलांच्यात धर्मनिरपेक्ष म्हणता येईल असा एकच माणुस झाला तो म्हणजे दाराशिकोव्ह )!

अकबरही औरंगजेबा इतकाच क्रुर होता होता फक्त त्याच्या लवकर लक्षात आले की इतक्या सगळ्या हिंदुंना मारणे शक्य नाही , त्याची धर्मनिरपेक्षता आगतिकतेतुन आलेली आहे स्वेच्छेतुन नव्हे !
भारीच. + १००. अकबर हा पूर्वायुष्यात फार क्रूर होता. परंतु उत्तरायुष्यात त्याला प्रेषित व्हायची इच्छा होती असे ऐकून आहे. त्यातूनच हे सारे राजकारण झाले असावे.

ल्ज्याला तुम्ही वाईड बॉल म्हणता आहात त्या बद्दल अजुन थोडे ....
समान नागरी कायदा ? सर्वधर्मिय घटस्फोटितांना समान अधिकार ? अमर जवानच्या स्मारकाला लाथ मारणार्यांवर कारवाई? आसामात घुसखोरी करणार्‍यांना धडा ? तालिबान सारख्या हिंसक प्रवुत्तीशी लढणार्‍या अमेरिकेला ओपन सपोर्ट? निर्वासित कश्मीरी पंडीतांना सुरक्षित पणे पर कस्मीरमधे पुनर्वसन?
ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या ततहाकथित धर्मनिरपेक्ष भारतात करता येत नाहीत ह्याला एकमेव कारण आहे ... एका विषिष्ठ समाजाचा विरोध / रोष होण्याची भीति ! जर भारत खरच धर्मनिरपेक्ष असता तर त्याने नक्कीच असला विरोध न जुमानता न्याय ते केले असते !! असो. अवांतर: शेनवॉर्नचा एक अप्रतिम लेगस्पिन चेंडु आठवला ... बॅट्स्मॅनने वाईड बॉल म्हणुन सोडुन दिला तो टप्पा पडल्यावर जवळ जवळ ४५ अंश वळुन मिडल स्टंपवर आदळला ...बोल्ड ! *biggrin* सोडा राव धर्मफर्मनिरपेक्षता ...आपण क्रिकेटची मॅच बघु :)

नै पन आम्ही काय म्हणतो, इतके धागे झाले तरी पण तुम्हा अडाण्यांना कसे कळत नाही की गांधी किती चूक (पक्षी : वाईट, देशविघातक, हिंदुद्वेष्टे, मूर्ख इ. इ. ) होते ते. तुम्हा लोकांची कमालच आहे.! किती म्हणजे किती कष्ट द्यायचे लोकांना नवे नवे धागे काढायचे आणि त्यावर तेच ते मुद्दे समजवायचे ? तुम्ही (सगळेच, गांधीच्या बाजूने बोलणारे आणि मध्यममार्गीदेखील) तर बर्‍यापैकी वाचक-अभ्यासक तरी पण तुम्हाला आम्ही सांगतो ते कळत कसं नाही ? देवा देवा .. अजून किती धागे आणि काथ्या कुटावा लागणार या वृषभ-बुद्धी समाजास शहाणे करण्यास कोण जाणे.!

कुठे आहे तालिबान सारख्या हिंसक प्रवुत्तीशी लढणार्‍या अमेरिकेला ओपन सपोर्ट द्यायची जिगर ?
अहो आता कराची एयरपोर्ट बॉम्बब्लास्ट नंतर खुद्द पाकिस्तानही तालिबानशी लढायला अमेरिकेला साथ देईल अशी चिन्हे आहेत ! तुम्ही घ्या तुमचे पांघरुण ओढुन तोंडावर ! =))

बादवे, माझ्या शरीराचे तुकडे होऊन मगच फाळणी होईल हे देखील त्याच गांधींचे वाक्य आहे ना? गांधींनी फाळणीला दिलेली मान्यता ही त्यांची राजकीय अप्रिहार्यता होती. आणि त्यानंतर मुस्लिम पाकिस्तानातून धर्मनिरपेक्ष भारतात येऊ इच्छिणार्‍यांची काळजी घेणे हेदेखील एक नेता म्हणून त्यांचे कर्तव्य होते, नाही का? थोडे गूगलून आणखीन थोडे दुवे देतो, जमले तर. फाळणीबद्दल मला सावरकरांचे जास्त पटते. लोकसंख्येची शांततापूर्ण अदलाबदल झाली की मगच फाळणी करावी असे काहीसे त्यांचे मत होते बहुधा. हिंदू नेत्यांमध्ये द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत प्रथम त्यांनीच मांडला बहुधा.

बाकी गांधींच्या मुस्लिम अनुनयाबद्दल - he pahaa गोपीनाथ सहा बद्दल गांधींची मते इथे वाचायला मिळतील. याच गांधींनी अब्दुल रशीद चा भाई अब्दुल रशीद म्हणून सन्मान केलेला आहे, पुढच्या ६ महिन्यातच. त्याचे पुरावे हवे असल्यास सांगा.

फाळणीस अनुमोदन देऊन ज्या गांधीजींनी मुस्लिम वरचष्मा पूर्णपणे मोडून काढला त्या गांधींना मुस्लिम अनुनयाबद्दल शिव्या घालणारे लोक पाहिले की हसू आवरत नाही. Lol असो, चालायचंच.
फाळणीनंतरच्या दंगलीत झालेल्या हिंदुच्या कत्तलीत हिंदुना शांत बसा असं म्हणणारे कोण होते? बलात्कारीत स्त्रियांना असाल तिथे सुखानी राहा किंवा तुम्ही विरोध करु नका असं सांगणारं कोण होतं? आता ह्याचे पुरावे नाहीत असं तुम्ही म्हणु शकत नाही. हा धागा मुस्लिम विरोधी नाही. हा धागा हिप्पोक्रसी विरोधी आहे. सत्तेच्या हव्यासापोटी क्रांतीकारकांचे बळी जाऊ देण्याविषयी आहे. स्वातंत्र्याच सगळं क्रेडीट स्वतःला घेण्याला आहे. पद्धतशीर पणे पुढच्या पिढीच ब्रेन वॉशिंग करणार्‍या वृत्ती विरोधी आहे. असो. चालायचचं. :)

अगदी अगदी. भारताने मिपा वाचूनच धोरणे ठरवली पाहिजेत या मताचा मी अलीकडे झालो आहे.

नै पन आम्ही काय म्हणतो, इतके धागे झाले तरी पण तुम्हा अडाण्यांना कसे कळत नाही की गांधी किती चूक (पक्षी : वाईट, देशविघातक, हिंदुद्वेष्टे, मूर्ख इ. इ. ) होते ते. तुम्हा लोकांची कमालच आहे.! किती म्हणजे किती कष्ट द्यायचे लोकांना नवे नवे धागे काढायचे आणि त्यावर तेच ते मुद्दे समजवायचे ? तुम्ही (सगळेच, गांधीच्या बाजूने बोलणारे आणि मध्यममार्गीदेखील) तर बर्‍यापैकी वाचक-अभ्यासक तरी पण तुम्हाला आम्ही सांगतो ते कळत कसं नाही ? देवा देवा .. अजून किती धागे आणि काथ्या कुटावा लागणार या वृषभ-बुद्धी समाजास शहाणे करण्यास कोण जाणे.!

खिक्क. बाकी धागा आता कुठे ग्रिप पकडू लागला आहे. त्याला ब्रेक लावू नका बर का! नाहीतर शतक कसे लागेल?