Welcome to misalpav.com
लेखक: शशिकांत ओक | प्रसिद्ध:
मित्रांनो, टाईम पास चा हा विरंगुळा! घाला भर शब्दांची, अर्थ होऊ द्या खुळा!! खडा भाताचा घास तोंडात जातो तोच गालावर हात ठेवून चेहरा रागिट झालेला पाहिला की समजावे, 'खडा' लागला आहे! कधी कधी तरूणींच्या डोळ्यांची फडफड पाहिली की तरुणांना 'खडा ' टाकायची हुक्की येते. ज्वेलरीच्या दुकानातून 'खडा' ऐटीत अंगठीत खुलताना दिसतो. दगडाचा छोटा कठीण तुकडा अनेक छटांनी सामोरा येतो. त्याला 'खडू' केला की सानेगुरूजींसारखा मवाळ होऊन होऊन सर्वांग झिजवत फळ्यावर जीव देतो. ख नंतर 'ड' ला डा डकवला तर इतरांसाठी खणलेल्या खाईत कधी कधी आपल्याला कपाळ मोक्ष घडतो. डी केले तर तोंड गोड करायची शर्करा मुखी येते. पारशी बाबाजी मुंबईत उभा खडा राहीला आहे. ख ला खा चा खो दिला तर कामाची गैरहजेरी सामोरी येते. खा पुढे डी समुद्राशी सलगी करते. खु शी डा ने जमवून घेतले तर फुलावर आफत येऊन झाडाशी नाते संपते. डा मागे खो केले तर अडकाठी करून पडायची भिती वाटते. अशी ही खड्याची शब्दार्थ छटा!
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

२५ वर्षांच्या यु(व)ती चे, ३-१३! खड्ड्यात जायला उत्सुक ४ही पक्ष महाराष्ट्रच्याा मुळावर उठले आहेत. भिंगरीने हे काम खडे उभे राहून निवडणुकातून खडसवावे ही विनंती...

हातात हात गुंफून तळव्यावर उलट सुलट तळवे करत चकायला - खेळायला — सुरुवात झाली की कोणावर तरी खंडा करायचा याची तयारी होत असे.