Welcome to misalpav.com
लेखक: mohite jeevan | प्रसिद्ध:
समोर खिडकीतुन त्या पुस्तकवाल्या बाबुकडे पाहत होतो,काय करावे काय नको वाटत होते?हे त्याचे पुस्तक दहा रुपयाचे आसले तरी ते त्याची रोजी रोटी होती. दोन दिवसानी आम्ही ते घर सोडले,बाबाची जेथे बदली झाली तेथे आम्ही गेलो.खुपच आठवणी घेऊन गेलो,शिला जीला मी नेहमी पुस्तक वाचायला देत होतो,तेच पुस्तक ज्याच्यावर तीने मी लिहलेल्या 'आय लव्ह यु' च्या पुढे 'टु' लिहले होते.त्यामुळे ते पुस्तक आज ही माझ्याजवळ ठेवले. आज त्या शहरात मी बर्याच वर्षानी आलो,काही कामानिमित्त. त्या शहरात व परिसरात खुप बदल दिसला, पण त्या पुस्तकवाल्या बाबुच्या चेहर्यात काहीच बदल दिसत नव्हता,तो मला ओळखत नसेल पण मी त्याला चांगला ओळखतो.त्यच्या केसात व चेहर्यात बदल झाला आसला तरी त्याच्या कामा वरुन मला जसा मी खिडकीतुन पाहत होतो तसाच वाटत होता. तो पुस्तके लावण्यात गुंग होता, शिलाचे लग्न झाले आसे मला कळाले पण मला त्याचे दु:ख वाटले नाही.ते माझ्या बालपणाचे प्रेम होते.त्यावेळी दोघेही आम्ही बालक होतो. पण आज मी ठरविले की त्या पुस्तकवाल्या बाबुचे पुस्तक परत करायचे,पण कसे? पंधरा सोळा वर्षापुर्वीचे पुस्तक तो ओळखणार ही नाही आपणाला? मग मीच ठरिवले.सध्याची परस्थिती पाहता त्याला दहा रुपये देण्या ऐवजी शभंर रुपये द्यायचे. मी त्या बुक स्टाँलवर गेलो,मी एकटाच होतो त्यामुळे मी कोणत्या पुस्तकाला हात लावतो ते पाहत होता. मी त्याची नजर ओळखली व मीच म्हणालो,'काय राव पुस्तकाबरोबर पैसे ही वाटता की काय?,' तो गोधंळलेल्या नजरेन माझ्याकडे पाहिले,व म्हणाला,'म्हणजे?,' 'माझे एक मित्र येथुन पुस्तक घेतले व त्या पुस्तकात त्याना शंभर रुपये मिळाले,तेच त्यानी तुम्हाला परत करायला सांगुन गावी गेलेत,'मी म्हणालो, 'हे कसं काय?,'बाबु म्हणाला, 'ते मला माहीत नाही पुन्हा जेव्हा येतील तेव्हा त्याना विचारा,' आसे म्हणुन मी त्यच्या हातात शंभराची नोट ठेवली, 'आहो पण कोण ती व्यक्ती? नाव तर सांगा?,' आता मात्र मी सापडलो,काय सांगावे प्रश्न मला पडला, 'तेच तुम्हाला येऊन सांगतील,' आसे म्हणुन तेथुन मी निघालो, मला पुस्तक काही परत करता आले नाही पण पैसे दिल्याचे मला समाधान वाटु लागले. दुसर्या सकाळी मी ते शहर सोडुन निघालो, खुप वेळ होता,रेल्वेला म्हणुन त्या सकाळी सकाळी बाबु बुक स्टाँल कडे लाबुनच पाहीले, आज बहुतेक तो गडबडीत पुस्तकाची पाने पलटत होता, त्याची मुलगी ही पुस्तके चाळत होती. एक तासानी मी रेल्वे स्टेशनकडे जाण्यास रिक्षा केली,शेवटची एक नजर मी त्या बुक स्टाँलच्या बाबु कडे पाहिले,तर आजुन ही तो पुस्तकाची पाने पलटत होता. *
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

तीन दिवस उलटून गेल्यावरही जीवनभौंच्या धाग्याने शंभरी पार न केल्याचे पाहून एक.... वगैरे वगैरे. जीव़नभौ तुम़ लिख़ते रहो, हम़ तुम्हारे फ़ँन हय़.

संवेदनशील मनाने जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोण देणार्‍या कथा लिहीणे हा जीवनभौंचा हातखंडा आहे. अवतीभवती घडणार्‍या घटनांकडे ज्या निर्वीकारपणे ते बघतात त्याच निर्वीकारपणे ते कथा लिहीतात ह्यातच त्यांच्या लिखाणाचे यश सामावले आहे. 'अ‍ॅबस्ट्रॅक्ट किंवा अमूर्त' शैलीत कसे लिहावे ह्याचा वस्तूपाठ ठरावा अशी ही कथावस्तु साध्या साध्या घटनांमधे जीवनाची मुल्ये शोधण्याचा जो अमूर्त प्रयत्न करते तो मराठी साहित्याला अनोख्या उंचीवर नेण्याचा स्तुत्य प्रयोगच म्हणावा लागेल. असे प्रयोग करणे ही जीवनभौंची खासियत आहे. - (अ‍ॅबस्ट्रॅक्ट झालेला) सोकाजी