Welcome to misalpav.com
लेखक: भिंगरी | प्रसिद्ध:
ऑगस्ट महिना आला कि नव्या पिढीची धामधूम चालू होते ती फ्रेन्डशिप डे साजरा करण्याची. रंगीबेरंगी पट्ट्या हातभार बांधून दिवसभर दिमाखात फिरणार. आता तर काय तोंडावर सुद्धा काहीबाही लिहिलेलं असतं. आमच्या वेळी नव्हतं बुवा असलं काही.(इति आमची पिढी) पण तरीही माझी शाळेत असताना झालेली मैत्री आजपर्यंत टिकून आहे इ. ५ वी असताना मला खूप मैत्रिणी मिळाल्या. त्यातील एक मैत्रीण माझी जिवाभावाची कधी झाली कळलेच नाही. एकाच बेंच वर बसून वर्ग चालू असताना खुसूखुसू गप्पा मारणे,हळूच डबा उघडून खाणे अशा आमच्या गमती जमती चालत. एकमेकी शिवाय करमत नसे. (तरी बरं त्यावेळी मोबाईल फोन नव्हते) एकदा तर गंमत झाली ८ वीत असताना आमचे वीरबाला पथक कॅम्प साठी तीन दिवस बाहेर गावी गेले तिथे आमचे ४-४ जणींचे ग्रुप बनवले. मी आणि माझी मैत्रीण वेगवेगळ्या ग्रुप मध्ये विभागल्या गेलो. झालं आम्ही रडून रडून जो काही गोंधळ घातला की शेवटी आमच्या शिक्षकांनी आम्हाला एकाच ग्रुप मध्ये ठेवले आजही आम्ही हे आठवून खूप हसतो. आमची मैत्री आजही तेव्हडीच ताजी आहे. आम्ही फोनवर (हाताला काळ लागेपर्यंत) गप्पा मारतो पण खूप दिवसात जर फोन झाला नाही किंवा भेट झाली नाही तरी कामात व्यस्त असेल असे समजून घेतो. माझी दुसरी एक मैत्रीणही ५ वी पासूनच माझ्या बरोबर होती पण आमची मैत्री घट्ट झाली ती तिच्या मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर. तिचा मुलगा आणि माझा मुलगा शाळेत बरोबरच होते.त्यामुळे रोजच भेट होत होती. माझ्या मुलाकडे पाहून तिला थोडफार समाधान वाटत असे. तिचा नवरा व्यसनी असूनही ती संसाराचा गाडा हसतमुखाने ओढत होती. मुलींची लग्नं, नवऱ्याचे निधन या साऱ्याला तिने खंबीरपणे तोंड दिले. समाजात कधीही आपल्या दुःखाचे प्रदर्शन केले नाही मात्र मला जेंव्हा तिचा फोन येतो की वेळ आहे का?तेंव्हा मी कितीही व्यस्त असले तरीही ते काम सोडून तिच्यासाठी वेळ देते. तिला बरोबर घेऊन बागेतील एका शांत कोपऱ्यात घेऊन जाते. तिचा हात हातात घेऊन फक्त थोपटते.आणि मग तिचे दुःख,आठवणी डोळ्यातून वाहू लागतात. कधी कधी त्या बोलाक्याही होतात त्यावेळेस मी फक्त श्रोत्याचे काम करते.आवश्यकता असल्यासच सांत्वन करते. आणि ती पुन्हा खंबीर होऊन निघून जाते. पण या खंबीरपणाच्या बुरख्याआडची रडवेली मैत्रीण एका अदृश्य मैत्रीच्या धाग्याने जोडलेल्या मैत्रिणीलाच दिसते. आणि या साठी आम्ही कधीही एकमेकींना फ्रेन्डशिप बॅण्ड बांधले नाहीत.
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

सुंदर. सुटसुटीत मानवतेचं अचूक तरीही अपरिहार्य दर्शन घडवणारा निसर्गरम्य धागा.

ह्या वर्षीच्या मैत्रदिनाला मुलींची मैत्री कशी तोदता येईल ह्यावर चिंतन करीत आहे . ऑफीसात नुकत्याच दोन सुंदर मुली जॉईन झाल्यात ...फ्रेशर्स ... दोन्हीही सुंदर आहेत पण एकीमेकीच्या मैत्रीणी आहेत ... असं नाजुकसं नॉटी नॉटी स्माईल देतात मग हळुच एकीमेस्कींशी कुजबुजतात हसतात अन परत स्माईल देतात... दोघीही ... पण च्यायला कायम एकत्र असल्याने एकीलाही "अ‍ॅप्रोच" करता येत नाहीये . *dash1* तर ही असली मैत्री कशी तोडावी ह्यावर जाणकार अनुभवी मिपाकरांकरुन मते मागवण्यात येत आहेत *help*

राष्ट्रकाकू ज्या होत्या ना त्या चक्क सुष्मिता सेन सारख्या दिसायच्या , त्यांच्या पुढे ह्या दोघी भांडीवाडी म्हणुनही शोभायच्या नाहीत... *beee* पण राष्ट्रकाकु पुढे गेल्या ...आपणही पुढे जायला शिकले पाहिजे *bad* बाकी चर्चा भेटी अंती *secret*

आम्ही फोनवर (हाताला काळ लागेपर्यंत) गप्पा मारतो फोनवर हाताला 'काळ' कसं लागतं ते नाही समजले. काळं लागत असेल तर फोन स्वच्छ पुसून घ्या.

खरयं हल्ली प्रेम, आपुलकि व्यक्त करायचे पण दिवस ठरलेले असतात. ईनफॅक्ट त्या दिवशी अश्या प्रेमाच्या उमाळ्यांना उत येतो.

हल्ली? हे असले आपुलकि व्यक्त करायचे "ठरलेले" दिवस आपल्या (सो कॉल्ड उच्च) संस्कॄतीतसुद्धा कित्येक वर्षांपासून आहेत की ओ.

मैत्री एक सोपी व्याख्या आहे.. 'रोज आठवण यावी अस काही नाही, रोज भेट व्हावी अस काही नाही, एवढंच कशाला रोज बोलणं व्हावं अस ही काहीच नाही. पण मी तुला विसरणार नाही ही झाली खात्री, आणि तुला याची जाणिव असणं ही झाली मैत्री.' शेवटी काय हो भेटी नाही झाल्या तरी गाठी बसणं महत्वाचं. ज्यांनी हे जाणलं त्यांनी माणसातलं माणूसपण जाणल.....