Welcome to misalpav.com
लेखक: अत्रुप्त आत्मा | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

हा भागही आवडला ! अरे..आत्मू..हे बघ...ध असो किंवा मा असो..जोपर्यंत मुदलात फरक पडत नाही,तोपर्यंत व्याजाचा विचार आपण कंशाला करांचा!?..आणि शेत तेच असणार...हवामान बदलंलं की पेरायला बी फक्त वेगळं येतं...इतकाच काय तो फरक. काय समजलांस!!!? आपलं काम पेरणी करणं आहे...अरे..आपण पैसे घेतो ना त्याचे! बोलके शब्द !

आमच्या लग्नातला, कानपिळीचा प्रसंग उभा राहिला. मेहूण्याला आधीच तंबी दिली होती, तू काय एकदाच कान पिळशील.पण तुझी बहिण रोज माझे कान उपटणार आहेच.त्यामुळे तिच्यासाठी तरी थोडा कान शिल्लक ठेव. त्याने बिचार्‍याने मुकाटपणे फोटो पुरता माझ्या कानाला हात लावला.आता तो माझ्या तंबीला घाबरला, की आदल्या दिवशीच्या बियरला जागला, हे त्याचे त्यालाच ठावूक. अर्थात, नंतरच्या भाऊबीजेला, बियर-पार्टीला मात्र न चुकता आला. असो, बियर पण बर्‍याच वेळा कामी येते.

छान लिहिलय हो गुर्जी! त्या मख्ख भावाचा किस्सा वाचून हसू आले. कानपिळीचा खरा अर्थ समजला. आता तुमचे लगीन कधी होतेय याची संपूर्ण मिपागाव वाट पाहतेय.

मला खरंच कानपिळीचा अर्थ माहित नव्हता. आमच्याकडे तर नवरीचा भाऊ बोटात बारीक खडा घेऊन कान पिळतो. कान चांगलाच लाल होतो. बाकी आता कानपिळी पगडीची फॅशन यायला पाहिजे.

@बाकी आता कानपिळी पगडीची फॅशन यायला पाहिजे.>>>. यात धार्मिक लोकसहभागानीच.. नविन/जुनी = आवश्यक रुढि पडेल..पडली पाहिजे.

होळकरशाही वरून आठवलं, कात्रजहून हडपसरला येत असताना वाटेत हांडेवाडीच्या आसपास एके ठिकाणी 'शिंदे-होळकर शुभविवाह' अशी पाटी वाचून क्षणभर फिस्सकन हसू आलं होतं.

गुर्जींंचे संवाद ऐकणे ही पर्वणी असते. लै भारी झालाय हा भाग.

मजेदार लिहिता . लग्नात गमतीजमती होतातच पण नवरानवरीचे वय कमी असले तर अथवा गुर्जी सांगतात म्हणून केले जाते .

मोठ्या वयाच्या नवरानवरीला पण विधींचे / मंत्रांचे अर्थ जाणून घेण्याची फारशी इच्छा असतेच असे नाही ;) लग्नसमारंभ म्हणजे लग्नाला सामाजिक आणि कायदेशीर मान्यता घेण्याचा विधी इतकेच बहुदा समजले जाते. यावरून लग्नात कोणाचा काय स्वार्थ असतो त्याबद्दल एक संस्कृत श्लोक आहे त्याची आठवण झाली पण शब्द आठवत नाहीत... विहिणीना चांगले कपडे, दागीने वगैरे घालून मिरवायला, इतरेजनांना मेजवानी ओरपायला,... असे काहीसे... श्लोकासाठी, बॅटमन यांना आवताण... बॅटमन यांना आवताण...

कन्या वरयते रुपम्। माता वित्तम् पिता श्रुतम्॥ बान्धवा: कुलमिच्छन्ति। मिष्टान्नम् इतरे जना:॥

यकदम् कर्रेट्टम् ॥ :) बघा म्हणजे. कोणाला काय हवे ते फार पूर्वीपासूनच माहीत होते की नाही ? ;) माणुसप्राणी फार पूर्वीपासूनच लै हुश्श्यार हाय :)

@पण नवरानवरीचे वय कमी असले तर अथवा गुर्जी सांगतात म्हणून केले जाते.>>> विवाहसंस्कारात चालणारे "हे सगळे प्रकार" आंम्ही लोक कधिही करायला सांगत नाही,लग्नसोहळा हा लोकसहभागानी असल्या हजारो गोष्टी घेऊन येत आलेला आहे/राहिल. चालू जमान्यातले(गेल्या१५ वर्षातले..) न वर देवाच्या ;) चपला/बुटाडं पळविणे.माळा घालताना-उचलणे..इत्यादी.. गुरुजिंनी सांगण्याचा काहि संमंध दिसतो का? :)

>>संमंध दिसतो का? मला तरी असा संमंध, देवचार, मुंजा वैगरे काही दिसलेला नाही. आता त्या संमंधाचा या संमंधाशी काही 'संबंध' आहे का ते माहित नाही. ;)