Welcome to misalpav.com
लेखक: तुमचा अभिषेक | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

हा लेख वाचायचा राहूनच गेला होता की काय! गेटवेचा समुद्र म्हणजे नवं वर्ष साजरी करण्याची आमची आवडती जागा. दरवर्षी १ जानेवारीला पहाटे सूर्योदयापूर्वी गेटवेला पोचायचं. सगळी मुंबई रात्रभर दंगा करून घरी परतलेली असते, त्यामुळे गेटवेवर बहुधा शुकशुकाट.. त्यावेळी तरी असायचा. तिथल्या पाय-यांवर, किंवा कट्ट्यावर बसून वर्षाचा पहिला सूर्योदय पाहायचा! हो, गेटवेला सूर्योदय समुद्रातून होत असल्यासारखा दिसतो. मग तिथून एखाद्या इराण्याकडे ब्रुन मस्का आणि चहा, तर कधी केक. मस्त सुरुवात असायची नव्या वर्षाची.