http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune/Kaas-Pathar-Valley-Of-Flowers/articleshow/38473898.cms
चला बरं झालं .... यंदा पाऊसच उशीरा आल्याने कासचा बहर उशीरा येईल ...आणि नेहमी इतका येणार नाही ... :)
बाकी हिशेब बघा , ३ लाख माणसे आणि उत्पन्न केवळ १८ लाख ... नुसत्या प्रवेशफी प्रत्येकी ५ रुपयेनेच १५ लाख व्हायला पाहिजेत गाड्यांचे पार्किंग फी १० रु . मोठ्ठ्या गाड्यांना २० - ५० रुपये .
फोटो काढायला १० - ५० - १०० रुपये . शिवाय उपद्रव मुल्य वेगळेच !!
कशाचाही ताळमेळ लागत नाही !
आय टेल यू सगळा झोल आहे झोल !!
अजून काहीच नक्की नाही हो.
दोन वेळा जाणार आहे मी.
एकदा फॅमिलीसोबत आणि एकदा मित्रांसोबत.
पहिल्या वेळी डोळ्यात आणि दुसर्या वेळी कॅमेर्यात साठवायचे आहे कास पठाराला. :D
मागच्या आठवड्यात गेलो होतो... फारशी फुले नव्हती तेव्हा. यावेळेस सीजन्स हलले आहेत त्यामुळे बहर सुद्धा कमी आहे. आता पाऊस ओसरला आहे त्यामुळे बहुतेक नवरात्रीच्या आसपास पठारावर फुलांचे गालिचे दिसायला लागतील.
सध्या जाऊ नका . अजुन बहर आलेला नसेल . नवरात्रीत जावा , तेही वीकडेला . एरव्ही भयंकर ट्रॅफीक असते .
मी परवाच बंडा पर्वतावर वर जाऊन आलो , यवतेश्वर मंदीराच्या आलीकडे आहे ... लय जाम थ्म्डी अन वारे आहे !
पर्यटकांच्या गर्दीने कास पठार बहरले...
जागतिक वारसास्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या कास पठाराकडे आता परराज्यांतील पर्यटकांचा मोठा ओघ सुरू झाला आहे. विशेषत: सुट्टीच्या दिवशी पठारावर पर्यटकांची तोबा गर्दी होऊ लागली असून, यंदाच्या हंगामाला आता खर्या अर्थाने सुरुवात होत आहे. पावसाने उघडीप दिल्यामुळे फुले बहरू लागली असून, लवकरच पठार फुलांनी पूर्णत: आच्छादून जाण्याची शक्यता वन विभागाने वर्तविली आहे.
कास पठाराला जागतिक वारसास्थळाचा दर्जा मिळाल्यानंतर पर्यटकांचा प्रचंड ओघ सुरू झाला होता. आतातर परराज्यांतील पर्यटकांची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने फुले बहरण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. कास पठारावर पांढर्या व निळ्या रंगांची गेंदाची फुले, जांभळ्या रंगाची सीतेची आसव, गेंध, कापरू, गुलाबी रंगाचा तेरडा, नीलिमा आबोलिमा, तुतारी, हिरवी निसुरडी, सोनकी, रानवागं, पिवळा तेरडा, पंद, रानजिरे, सिरोपिया जेनी, मोरकरचुडी, कंदील पुष्प, वाईतुरा, रानहळद, भुई आम्री, स्मितिया बेगोनिया, मेंदी खरपुडी, हत्तीसोंड, भारंगा, टोपली कारवी, गारवेल, डिप कांडी, काळा गेंध, गौरीहार अशा नाना फुलांच्या छटा सध्या कास पठारावर पाहावयास मिळत आहेत. तसेच, पिवळी सोनकी, गुलाबी व पिवळा तेरडाही ठिकठिकाणी दिसू लागला आहे. सुट्टीच्या दिवशी पर्यटकांचा ओघ कमालीचा वाढू लागला आहे. पुणे, मुंबई, सोलापूर, संभाजीनगर, सांगली, कोल्हापूर, कोकण, ठाणे, सातारा यांसह मध्य प्रदेश, हैदराबाद, केरळ, आंध्र प्रदेश, गुजरातसह विविध ठिकाणचे पर्यटक कास पठारावर हजेरी लावत आहेत.
वन विभागाने पर्यटकांसाठी फुलांचा एक क्रमांकाचा ब्लॉक खुला केला होता. त्यामुळे अनेक पर्यटक आपल्या मोबाईल व अन्य कॅमेर्यांद्वारे फुलांच्या रंगछटा टिपताना दिसत होते. फुलांचे विविध रंग पाहून पर्यटकांना आपला मोह आवरता येत नव्हता. पावसाने उघडीप दिल्याने पठारावर विविध फुले फुलण्यास प्रारंभ झाला असून, येत्या आठ दिवसांत पठार आणखी बहरेल, असे वन विभागाने सांगितले.
मी ३-४ ऑक्टोबरला कास पठारावर जाऊन आले.. माणशी १०/- फीस आहे.. ती ऑनलाईनपण भरता येते.. मजा म्हणजे आपल्याला एक मेल येतो (ज्यातही नीटसे काही कळत नाही..)..त्यात तारीख वार काहिही लिहीलेलं नसतं.. त्यामुळे हे तिकिट कुठेही आणि कितीही वेळा प्रिंट करुन वापरता येऊ शकेल... अर्थात असे तिकीट काढुन आपण फकत तिथे १-२ मिनिटे वाचवतो..
आम्ही आदल्या दिवशी सातार्यात मुक्कामाला गेलो आणि ७ ला कास पठाराकडे निघालो.. त्यामुळे फारशी गर्दी नव्हती.. फुलंही फार नव्हती पण वातावरण छान होते एकदम.. तिथे थोडावेळ काढुन मग "कास-बामणोली" ला गेलो.. इकडे बोटिंग करता येते. अत्यंत सुंदर जागा आहे.. सकाळच्या वेळेस तर फारच शांत आणि थंड वाटते.. ७००-८००/- मध्ये आम्ही ५ जण १.५ तास बोटिंग करुन आलो. जवळच संगम आहे ३ नद्यांचा आणि दुसर्या बाजुला तापोळ्याला जाता येते.. आम्ही संगम आणि दत्तमंदिर पाहिले.. बोट तुम्हाला एका किनार्याला सोडते, तिथे गुहेमध्ये शंकराची मोठी पिंड आहे.. वर काळ्या दगडात बनवलेला सुंदर नंदी आहे. गणपतीचेही एक मंदिर आहे... दाट झाडी, समोर पसरलेलं पाणी... शांतता... फार छान वाटतं...
परतताना कास पठारावर चांगलीच गर्दी झाली होती.. शिवाय ऊनही खुप वाढले होते.. त्यामुळे भल्या सकाळीच कास पठारावर जाणे उत्तम...
जमल्यास फोटो टाकीन...
ठोसेघर मी आत्ता पाहुन आले.. पण फारसं पाणी नाहीये सध्या.. त्यामुळे जरा हिरमोड झाला...
फुलांच्या बहराबद्दल मला माहिती नाही.. उलट इथे कुणी सांगु शकत असेल तर मला परत जाता येईल...
प्रतिक्रिया
आज
शुभेच्छा!
हे पहा
कुणी या महिन्यात जाऊन आलंय का
मी पण येउ का? (फ्यामिली वाली
अजून काहीच नक्की नाही हो.
मागच्या आठवड्यात गेलो होतो...
सध्या
नवरात्र गुरूवारपासून आहे. (२५
सौजन्यः सामना
मी ३-४ ऑक्टोबरला कास पठारावर
फुले ?
तेव्हातरी विशेष नव्हता..
धन्यवाद
डिसेंबर महिन्यात जाण्याच्या विचारात..
ठोसेघर मी आत्ता पाहुन आले..
Pagination