Welcome to misalpav.com
लेखक: अत्रुप्त आत्मा | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

नेहमीप्रमाणेच हशा, टाळ्या, शिट्ट्या आणि नंतर ट्रॅक बदलत लिहिलेलं मुक्तकही छान. अवांतरः
गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा । कावेरी शरयू महेन्द्रतनया चर्मण्वती वेदिका ।।
हा श्लोक पाहून एकदम रंतिदेवाची आठवण झाली. यातली चर्मण्वती म्हणजे आजची चंबळ. पुराणांतील राजा रंतिदेवाच्या पाकशाळेत व यज्ञगृहात असंख्य प्राण्यांना विधिवत् बळी दिले जात असे. त्या मृत पशूंच्या चामड्याच्या राशींपासून रक्तमांसाची एक नदीच तयार झाली. त्यामुळे ती 'चर्मण्वती' ह्या नावाने प्रसिद्ध झाली.

अजया @सुरेल मंगलाष्टकं एेकली की मात्र ते सूर डोळ्यात नकळत पाणी आणतात! >>> हा अनुभव तर अनेकदा आलाय. एकदा तर लहान मुलांच्या एका ग्रुपने,खास ताईसाठी केलेली..अशी मंगलाष्टकं अत्यंत भावपूर्ण म्हटली होती.ती आजही स्मरणात आहेत. ========================== मधुरा देशपांडे @अफाट निरीक्षणशक्ती आणि तेवढ्याच मस्त शैलीतले लेखन वाचायला मजा येते. >>> धन्स! ========================== अत्रन्गि पाउस @रेकनर .... मी फुटलो आहे हसून ... >>> =)) .. =)) .. =)) ========================== वल्ली @त्यामुळे ती 'चर्मण्वती' ह्या नावाने प्रसिद्ध झाली.>>> ऐकली आहे ही कथा. ========================== मुक्त विहारि @आता एकपात्री प्रयोग कधी?>>> बघु या कसं कधी जमतं ते! :) ========================== बोका-ए-आझम @मस्तच बुवा!व्हिडिओ कॅमे-याची नजर आहे तुमची एकदम!>>> ह्हा ह्हा ह्हा! धन्यवाद. :) ==========================
अरे हो....... लेखात एक नमूद करायचं राहिलच..त्या लिंकवर लावलेली मंगलाष्टकं मात्र या आत्मूभटानीच म्हणलेली आहेत हो!

आणखी आग्रही (प्रेमळ) मागणी.
  • या मालिकेचे पुस्तक रुपांतर झालेच पाहीजे (तेवेढेच मनोरंजनाबरोबरच प्रबोधन)
  • एकपात्री प्रयोग ही होऊ शकतो.किस्सा खुलवून सांगण्याची तुमची हातोटी आणि शैली एकदम फर्मास आहे तेव्हा मनावर घ्याच.

या मंगलाष्टकांमधे अजुन एक प्रकार असतो तो म्हणजे नावे घालण्याचा उदा. अमिताभ देशपांड्यांची लाडुली , कुडचेडकरां कडे निघाली, लाडात जीला वाढवली, ती आज किती मोठी जहाली, कुडचेडकर तिला सांभाळा, सुख देईल ती घराला, जाणार महाबळेश्वरी फिराला, लावेल दिवा वंशाला, हे असले मंगलाष्टक मी प्रतेक्ष ऐकल आहे. (नाव तेवढी बदललेली आहेत) नगरला एका लग्नाला गेलो होतो तिकडे तर गायकच बसवले होते. ते दोनतास आधीपासुनच गाणी म्हणत होते. त्यातपण ते सिनेमाच्या गाण्यांच्या चालीवर मराठी गाणी म्हणत होते. उदा. सुरेश आणि तनिष्का यांचे मिलन, स्वर्गातच बांधले यांचे बंधन, दोन्ही कुटुंबांचे रंगले संम्मेलन, अतिथिं करता सुग्रास भोजन, बघ कसा हा मांडव सजला, (चालः- चॉकलेट, लाईमज्युस,आईस्क्रीम टॉफिया - चित्रपट हम आपके है कोन?) लग्न लागताना पण हेच सुरेल (?) आवाजात मंगलाष्टक म्हणत होते. त्यात भर म्हणजे एका कुणाला तरी त्यांचे गाणे भयंकर आवडले आणि त्याने गायकांना ५०० रुपयांचे बक्षीस दिले. मी आपला जेवण कधी सुरु होतय याची वाट पहात होतो. पैजारबुवा,

आज यष्टीत बसून वाचत होतो आपला लेख. अख्खी बस वळून बघत होती कोण एवढ्या मोठमोठ्याने खिदळत आहे म्हणून! लय हसवलंत दादा! धन्यवाद!

मी पण हा भाग आत्ताच आमच्या घरच्या मेबंराना मोठ्यान वाचुन दाखवला(अर्थात कानाला हात लावुन गुरुजींच स्मरण केल) पब्लिक हसुन मरायच बाकी राहिल.

आपलं गप लगीन लावायचं सोडून हे बुवा इकडं तिकडंच बारीक नजरेनं बघत बसत्यात. काय खरं नाय!...

ह्या....कूं..........दे...........थु(?)तु.....षार.....हा..........र-ध*वला (पोर्‍या:- "बा#*@$%ला ह्याच्या! ...थु केल्यावर तुषार नाय उडनार तर काय मशाल लागनार!?? Lol ) या...शुब् ब्र ...वसतरा (?) व्रता (पोर्‍या:- मेल्यान..वस्तरा मारलन! ) यावि..........णा...वरदंड मांडीत करा ..... (पोर्‍या:- आय आय..काकानू!) याशवेत...पद..मा...सना (पोर्‍या:- Lol ..) याब्र...म्मा...** (सदर दोन अक्षरं मनातच वाचावी अशी नम्र विनंती!) शंकर..प्रब्रुति...भिर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र (पोर्‍या:- भिंगरी उडाली!) दे...वै:........सदा..........,वन(ONE)...दिता (पोर्‍या:- Lol ..) सामान.... पा....तु-सरस् वती भगवती (पोर्‍या:- काका..मरतय मी आज! Lol ..) निश्शे....श-जाड्या.......पहा (पोर्‍या:- Lol .. Lol .. Lol .. निर्वाण! )
बुवा _/\_ हसुन हसुन मराय्ची वेळ आली ओ.... (हसुन म्येलो तर माझा आत्मा बुवांना झपाटणार) =)) =)) =))

पुर्वी कार्यालयात मंगलाष्टक झाल की ते ब्यांडवाल्यांना बरोब्बर ब्यांड केव्हा वाजवायचा हे कस काय बरोब्बर कळत हे कोड मला वाटायच. तेव्हा माईक नसायचा. व गुर्जी व ब्यांडपथक यात अंतर बरच असायच. मला कुणीतरी एक माणुस ब्यांडवाल्यांना खूण करण्यासाठी नियुक्त केला असावा असे वाटायच. मी लक्ष ठेवून बघितल पण तस काही दिसल नाही.

सहिच. निरिक्षण, कोट्या, चिमटे खुपच छान. या स्वयंघोषित मंगलाष्टक गायक्/गायिकांची वधु/वरांशी जवळची ओळख नसली तरी आयत्या वेळी कसे टपकतात देवजाणे. एका लग्नात अशाच एका गायिकेकडुन गुरुजींनी माईक काढुन घेतला होता मुहुर्ताची वेळ जवळ आली होती म्हणुन. बाईंनी ३ पानी काव्य (?) लिहुन आणले होते.. एक पाण होते न होते तोच गुरुजींनी मुसंडी मारत मोर्चा सांभाळला आणि मुहुर्ताची वेळ अचुक साधली. गायिका मात्र फणकार्‍याने ष्टेजखाली निघुन गेली.

@गायिका मात्र फणकार्‍याने ष्टेजखाली निघुन गेली.>>> जाणारच! त्यांना अश्या पद्धतिनी कार्यक्रमाचा विचका उडवणं हा आपला नैतिक अधिकार वाटत असतो. एकदा मी अश्याच एका बाईंना..त्या माला वाट्टेल ते तोंड सोडून बोलल्या म्हणून अत्यंत तीव्र शब्दात बोललो होतो. तर मलाच मारायला उठली होती बया! (मग कार्यालयाच्या मॅनेजरनी मधे शिरुन अ‍ॅक्शन-घेण्याची धमकी दिल्यावर,गपगुमान ती बया परतली.) नो एंट्रीत आपल्या अंगावर येणार्‍या माजोरड्यांना,जसं आपणच त्यांना वाट-द्यावी असं वाटत असतं..तसलीच ही लोकं!

उत्कृष्ट लिखाण बर्याच लग्नात हे पाहिले आहे कि मंगलाष्टके म्हणताना मुहूर्त टाळून गेला तरी कुणालाही त्याची फिकीर नसते आणी चढाओढीने मंगलाष्टके म्हटली जातात. मूळ आठ श्लोक(/ काव्ये) असलेला हा कार्यक्रम विधिवत "लग्न" लागले हे जाहीर करण्यासाठी (सावधान --स अवधान-- लक्ष देऊन )आणी वधूवरांना आपल्या भावी आयुष्याबद्दल चार सुभाषिते सांगून उद्बोध करणे हा हेतू असलेला कार्यक्रम कुठच्या कुठे गेलेला आहे हे पाहून खेद वाटतो. ही माहिती मला आमच्या कुलगुरुनी दिल्याची आठवते. काही चूक असेल तर दुरुस्त करावी.

नाद खुळा @आणखी आग्रही (प्रेमळ) मागणी.या मालिकेचे पुस्तक रुपांतर झालेच पाहीजे.>> येस्सर! ------------------------------------------------------------------------------------------------------- खटपट्या @मस्त आत्मुदा !!आम्ही तुमच्या लग्नात मंगलाष्ट्के गाउन गोंधळ घालणार !! (बोलावलंत तर) >> नक्कीच बोलिवनार..! ..ठरलं ..तर! http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing006.gif @रेडी रेकनर प्रमाणे...>> :-/ दुष्ष्ष्ट!!!!!!!!!!!!!!!! http://www.freesmileys.org/smileys/smiley-sw007.gif ------------------------------------------------------------ ज्ञानोबाचे पैजार @त्यात भर म्हणजे एका कुणाला तरी त्यांचे गाणे भयंकर आवडले आणि त्याने गायकांना ५०० रुपयांचे बक्षीस दिले. मी आपला जेवण कधी सुरु होतय याची वाट पहात होतो. >>> ह्म्म्म्म... असले प्रकार तर इतके दवणीय पाहिले आहेत..की इथे लिहिवत सुद्धा नाही. ------------------------------------------------------------ जेपी मी पण हा भाग आत्ताच आमच्या घरच्या मेबंराना मोठ्यान वाचुन दाखवला(अर्थात कानाला हात लावुन गुरुजींच स्मरण केल)पब्लिक हसुन मरायच बाकी राहिल. >>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing002.gif चला..जाहिर वाचनाचा नारळ फुटला म्हणायचा! http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing005.gif ---------------------------------------------------- बहुगुणी @ते ध्वनिमुद्रणही श्रवणीय आणि संग्रहणीय आहे!>>> धन्यवाद जी! :) @एकपात्री कार्यक्रमाची कल्पना मनावर घ्या. >>> येस्सर! ------------------------------------------------------------------------------------ स्वॅप्स आपलं गप लगीन लावायचं सोडून हे बुवा इकडं तिकडंच बारीक नजरेनं बघत बसत्यात.काय खरं नाय!>>> =)) अहो..हे केवळ सहज झालेलं आहे..! जाणुनंही नाही आणि बुजुन तर त्याहुनंही नाही! http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing010.gif -------------------------------------------------------------------------------------- कॅप्टन जॅक स्पॅरो @हसुन हसुन मराय्ची वेळ आली ओ....>>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing016.gif @(हसुन म्येलो तर माझा आत्मा बुवांना झपाटणार) >> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing007.gif --------------------------------------------------------------------------- प्रकाश घाटपांडे @पुर्वी कार्यालयात मंगलाष्टक झाल की ते ब्यांडवाल्यांना बरोब्बर ब्यांड केव्हा वाजवायचा हे कस काय बरोब्बर कळत>> त्यांना आंम्ही तदेवलग्नं...च्या आधी जे म्हणतो..ते टोनिंगवरुन पाठ झालेले(असायचे!) --------------------------------------------------------------------------------- सुबोध खरे @उत्कृष्ट लिखाण>> मनःपूर्वक धन्यवाद! @बर्याच लग्नात हे पाहिले आहे कि मंगलाष्टके म्हणताना मुहूर्त टाळून गेला तरी कुणालाही त्याची फिकीर नसते आणी चढाओढीने मंगलाष्टके म्हटली जातात. मूळ आठ श्लोक(/ काव्ये) असलेला हा कार्यक्रम विधिवत "लग्न" लागले हे जाहीर करण्यासाठी (सावधान --स अवधान-- लक्ष देऊन )आणी वधूवरांना आपल्या भावी आयुष्याबद्दल चार सुभाषिते सांगून उद्बोध करणे हा हेतू असलेला कार्यक्रम कुठच्या कुठे गेलेला आहे हे पाहून खेद वाटतो. ही माहिती मला आमच्या कुलगुरुनी दिल्याची आठवते. काही चूक असेल तर दुरुस्त करावी.>>> सर्व काहि बरोबर आहे...फक्त आपण वर म्हटल्याप्रमाणे- मूळ आठ श्लोक(/ काव्ये) असलेला हा कार्यक्रम - असे नसून..प्रत्येकी मंगलाष्ट्कात आठ चरण असतात..म्हणून ते मंगल-अष्टक! आणि ती आठ म्हणायची नसून.. हवि तितकी कमी जास्त म्हणावित(मुहुर्ताची वेळ पाहुन) असाच संकेत आहे. ------------------------------------------------------------------------------------------------ चला....अत्ता पर्यंत लग्नाला-आलेल्या सर्वांचे आभार http://www.freesmileys.org/smileys/smiley-happy002.gif

बुवा, भाग खासच झालाय. वर लोकं म्हणतात तसं पुलं देशपांडे ष्टाईल एकपात्री होऊनच जाऊ दे!

जाम धमाल! 'या कुन्देन्दुतुषारहारधवला' आणि 'रामो: राजमणि: सदा विजयते' हे मंगलाष्टकांमधे का म्हणतात हे खरंच आजपर्यंत कळलेलं नाहीये! तसेच ते मुलीकडचे आणि मुलाकडचे हिरीरीने मंगलाष्टकांचा कलगीतुरा सुरू करतात आणि बरेचदा त्यात मुहूर्त टळून गेला तरी कोणाला भान रहात नाही हे खूपदा पाहिलं आहे!