Skip to main content

रगडा पॅटीस

लेखक आकांक्षा यांनी शुक्रवार, 07/11/2008 06:02 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः (२ जणांसाठी) पॅटीस करिता :३ उकडलेले बटाटे, हळद, मीठ, रवा. रगडया करिता : २ वाटया उकडलेला हिरवा वाटाणा, १ मोठा टोमॅटो, १ मोठा कांदा, बारिक केलेला आल - लसुण (अंदाजे), मीठ, फोडणी साहित्य, तेल, लिंबाचा रस (आवडीनुसार), चिंच खजुर चट्णी, दही. सजावटीसाठी: बारिक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, आणि बारिक शेव. कृति: प्रथम बटाटे कुसकरुन घ्यावे. त्यात मीठ, हळद घालावे व मळून घ्यावे. उभे चप्पट असा आकार देऊन कटलेट सारखे बनवुन घ्यावे. कढई मध्ये तेल गरम करुन घ्या. त्यात मोहरी टाका, तडतडली की त्यात कांदा टाका, गुलाबी झाला की बारिक केलेल आल लसुण टाका, मग टोमॅटो टाका. थोड परतुन घ्या. मग हळद, तिखट, गरम मसाला घाला. आता त्यात उकडलेले हिरवे वाटाणे घाला. मीठ घाला व पाणी घालून उकळी आणा. थोडी दाट झाली की गॅस बंद करा. आता तयार केलेले पॅटीस रव्या मध्ये घोळ्वुन तव्यावर थोडया तेलात पालटुन घ्यावे आणि एका वाडग्यात २ पॅटीस काढुन घ्यावे. त्यावर गरम केलेला रगडा घालावा. चवीनुसार चिंचेची चटणी घालावी. थोड दही घाला ( अस खाण्यात, खुप छान लागत). त्यावर बारिक चिरलेला कांदा, टोमॅटो, शेव आणि कोथिंबीर घाला आणि खायला दया. थोड चमचमीत आवडत असल्यास रगडा तिखट करा. :W

वाचने 9653
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

वा वा! अतिशय उत्तम पाकृ.. प्लीज फोटूही द्या.. तात्या.

एका राजस्थानी भैयाच्या हातगाडीवर जा !! ३-४ रगडा पॅटिस ऑर्डर करा .. आणि दाबुन चेपा !! रगडा पॅटीस आणि पाणिपुरी आमचे विक पॉइंट आहेत -टारगडा पॅटिस भोलेश्वर भेल-पाणिपुरी सेंटर, हमारे यहां शादी और पार्टी के ओरडर* लिये जाते है . (अनिल कपुर ..................... माधुरी दिक्षीत )

करणारे. मी पांढरे वाटाणे वापरते आकांक्षाताई. हिरव्या व पांढर्‍या वाटाण्यात काय नक्की फरक आहे माहित नाही पण आपण जो बाहेर र. पॅ. बघतो त्यात पांढरे वाटाणे असतात. रेवती

मी ही पांढरे वाटाणेच वापरते. खूप ठिकाणी छोले म्हणजे काबुली चण्याचा रगडाही खाल्ला आहे. तो ही मस्त लागतो. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

छानच रेसिपी. अजून येउदेत. पाणीपुरीचे गाडीवर मिळते तसे पाणी कसे बनवावे?

मी ही पांढरे वाटाणेच वापरते,आणि करायची पध्दत थोडी वेगळी आहे. मनस्वी, पाणीपुरी पेठकरांनी दिलीय बघ.. स्वाती