कलादालन

माझीही फोटोग्राफी

Primary tabs

मला फोटोग्राफीमधील जास्ती काही कळत नाही. मॅन्युअल सेटिंग्ज वापरून काढलेले काही फोटो. Trial and Error करून ही छायाचित्रे काढली आहेत.

Blur effect यावा म्हणून हे शटर स्पीड कमी करून काढलेले काही फोटो.
पहिल्या फोटोमधे गाडीच्या वायब्रेशन मुळे प्लॅट्फॉर्म ही हलत होता म्हणून वरील Indicator पण blur झाला आहे.

ह्यात दिसत असलेले Light trails पण शटर स्पीडचीच करामत.

ह्यात त्या माशीचे पंख टिपण्यासाठी शटर स्पीड maximum (१/१०००) आहे. Auto focus न वापरता manual focus केला आहे.

क्लिक करेपर्यंत माशीने कलटी मारली

Auto focus न वापरता manual focus करून काढलेला अजून एक फोटु.

टारझन

अरे फारच 'चैतन्य'वर्धक फोटू रे ... माण गये भिडू ...
टोटली प्रोफेशनल फोटू वाटतात ... रेल्वेचा फोटू आपल्याला लै आवाडला भो !!

अजुन येउन देत ... आणि मेल ही करत जा .. एखादा फोटू माझ्या नावावर खपवुन थोडा भाव खाईल म्हणतो ;)

- टर्मिनेटर ( टी-८००)

चतुरंग

रेल्वेचा क्लास!
नंतरचा फलाटाला चिकटून काढलेलाही सुरेख - पर्स्पेक्टिव रेषांचा भ्रामक खेळ!
माशीचा आणि त्यानंतरचे पिवळ्या फुलांचेही पर्फेक्ट फोकस आलेत. फारच छान चित्रे! :)

चतुरंग

रेवती

आवडले. ४था व ५ वा जास्त आवडले.

रेवती

शितल

सुंदर फोटोग्राफी.
५ वा फोटो खुपच आवडला. :)

सूर्य

शटरस्पीडचा वापर करुन काढलेला लाईट रैल चा फोटो सहीच आहे एकदम. बाकीचे फोटो सुद्धा क्लासच.

- सूर्य.

गणा मास्तर

चौथा आणि पाचवा फोटो जबरदस्त
प्लॅटफॉर्मवर किती वाकला असशील कल्पना करवत नाही. असं वाटतयं की खाली उतरुन फोटो काढला आहे.
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)

लंबूटांग

अहो वाकलो नाही. कॅमेरा ठेवला होता खाली. आणि ट्रेन जाताना जाम फाटली होती की आता गेला कॅमेरा :S . पण फोटो पाहिला आणि सर्व काही विसरलो.

सहज

सगळे फोटो छान आहेत.

अनिल हटेला

सही रे फोटोग्राफी !!

आंदे और भी !!!

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

मदनबाण

झकास...ट्रेनचा फोटु फार आवडला..और भी आने दो...

मदनबाण.....

हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर.
बॅ.वि.दा.सावरकर

>>मला फोटोग्राफीमधील जास्ती काही कळत नाही.

तुम्ही तर छुपे रुस्तम निघाला की

झकासराव

मला सगळ्यात शेवटचा फुलाचा आणि शटर स्पीड कमी करुन काढलेल्या रेल्वेचा फोटु लयी आवडला. :)

................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao

श्री. लंबूटांगजी,

सर्वच फोटो मस्त आहेत. मुख्य म्हणजे स्वतःचे (कॅमेराचे नाही) कौशल्य वापरून काढलेल्या छायाचित्रांचे महत्त्व अधिकच आहे.

Blur effect यावा म्हणून हे शटर स्पीड कमी करून काढलेले काही फोटो.
'धूसर ' पार्श्वभूमीचा परिणाम साधण्यासाठी खिडकी (ऍपरचर) मोठे ठेवावे लागते. अर्थात त्याशी समतोल राखण्यासाठी झडपेचा (शटरचा) वेग जास्त ठेवावा लागतो.

जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा

लंबूटांग

शटर स्पीड १/१००० म्हणजे जास्ती आणि २.५" म्हणजे कमी असे मला वाटले. (चूक असल्यास जाणून घ्यायला आवडेल.)

मी ट्रेनचा फोटो काढताना शटर प्रायोरिटी मोड मधे कॅमेरा ठेवला होता आणि शटर स्पीड बहुधा २.५" होता. शटर प्रायोरिटी मोड मधे ऍपरचर कॅमेरा सेट करतो.

लिखाळ

७व्या चित्रातले पिवळे फूल छानच आहे. :)
-- लिखाळ.