Welcome to misalpav.com
लेखक: अत्रुप्त आत्मा | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

आपण देवकी आणि यशोदा ह्या अवस्था फक्त महापुरुषांच्या बाबतीतच का पाहाव्या? माझ्या मते त्या अत्यंत सार्वत्रिक, सहज आणि मूलभूत आहेत.
खूप सुंदर वाक्य! सगळ्या लेखनात अगदी डोळ्यासमोर चित्रं उभं केलत. हे लिखाण काकू आणि गुरुजींनाही वाचायला मिळेल अशी आशा करतो.

मी पण तेच बोलतोय. काकू आणी गुरुजींचा एखादा फोटो बघायला मिळाला असता तर खूप बरे वाटले असते. (त्यांची परवानगी असेल तर)

@हे लिखाण काकू आणि गुरुजींनाही वाचायला मिळेल अशी आशा करतो. @मी पण तेच बोलतोय. काकू आणी गुरुजींचा एखादा फोटो बघायला मिळाला असता तर खूप बरे वाटले असते. (त्यांची परवानगी असेल तर) >> आपल्या भावनांना मी (फ़क्त) आदरपूर्वक नमस्कार करू शकतो. कारण हे सगळेच लेखन काल्पनिक स्वरुपाचे आहे. आणि याला असलेला वास्तवाचा आधार ,हा कोणत्याही एका पाठशाळेचा अगर अध्यापकांचा नाही. भारतातल्या अनेक पाठशाळा (विद्यार्थ्यांसह) कमीअधिक फ़रकानि अश्याच स्वरुपाच्या आहेत. हां ... आता यातले गुरूजी आणि काकू या दोन व्यक्तिरेखा म्हणजे मी माझ्या पुरोहित मित्रांकडुन आजवर ऐकलेल्या त्यांच्या (अश्याच गुरुजि व काकुच्या ) स्वभावाचं मिश्रण आहेत. शिवाय काही गोष्टी ह्या मी त्यात,माझ्या भावाविश्वातुन आणल्या/ उतरवलेल्या आहेत. :) याखेरीज माझ्या खय्रा शिक्षण काळात मला जे ३ गुरूजी लाभले,त्यातल्या कुणाचाच स्वभाव ह्या-बंडुगुरुजिंसारखा नव्हता. तिघांमधले १ तर छडिनि भरपूर प्रसाद देणारेहि होते. आणि यांच्यापैकी कुणाच्याही सौ. (काकू)पाठशाळेशि/विद्यार्थ्यांशि जोडलेल्या नव्हत्या. असणं शक्यही नव्हतं. कारण माझ्या या दोन्ही पाठशाळा (वेदांत विद्यापीठ,अहमदनगर आणि पुणे वेदपाठशाळा,तांबडि जोगेश्वरी जवळचि,पुणे.) स्वयंसेवी संस्थांच्या मार्फ़त चालाविलेल्या होत्या(आहेत). त्यामुळे तेथील गुरूजी ,हे पाठशाळां मधे,फ़क्त शिकविण्या पुरते येत असत.(असतात) त्यांच आमच(विद्यार्थ्यांचं) नातं भावात्मक पातळिवर चांगलच होतं(आहे ही) विशेषत: पुणे वेदपाठ शाळेतले वे.मू.धुंडिराज लेले गुरूजी ..हे तर कमालीचे विद्यार्थिप्रिय गुरूजी होते. पण तरीही मी सदर लेखामालेतिल रंगविलेल्या गुरुजि काकू व पाठशाळेचं चित्र हे कोकण प्रांतातल्या पाठशाळांचं मिश्रण आहे. आपणा सर्व जणांच्या भावपूर्ण प्रतिसादांना पुन्हा एकवार नमस्कार. __/\__ ===========================[ @अगदी सांदिपनींच्या आश्रमात पोहोचलंवत. पेंद्या कोण ?>>> :-D मूळात यात कोणीही -कृष्णच नाही. :-D ===========================

मातृत्व हा गुण आहे की मूल्य? याचं उत्तर आजंही माझ्यापाशी नाही. पण तो मायाममतेचा एक असा समान धागा आहे,की ज्याला जन्मदातृत्वाचे पाश कध्धिही अडवू शकत नाहीत.. हे मात्र खरं! आपण देवकी आणि यशोदा ह्या अवस्था फक्त महापुरुषांच्या बाबतीतच का पाहाव्या? माझ्या मते त्या अत्यंत सार्वत्रिक, सहज आणि मूलभूत आहेत. फक्त त्या कुणाला लाभतील,हा मात्र त्या (अगम्य) नशिबाचाच भाग आहे..
हे लै लै भारी. :)

एकदम जबराट... मस्त वाटतंय वाचायला पाउस पडत असताना रात्री मस्त गोधडी लपेटून आजीच्या कोकणातल्या गोष्टी ऐकत बसायचो, आणि मग कधी डोळा लागायचा समजायचंच नाही, अगदी तसचं वाटतंय आत्ता :)