Welcome to misalpav.com
लेखक: अत्रुप्त आत्मा | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

एक नंबर लिहिलंय. आमच्या जीवघेण्या परीक्षांच्या आठवणींनी डोले पानाव्ले. फायनल परीक्षेतल्या सर्वात अवघड विषयाचा सिलॅबस दोन ओळींचा होता. आमचे मास्तर म्हणत, "दे कॅन आस्क यू एनीथिंग अंडर द सन!". नशीब व्हायवा नसायच्या...

बाबौ,तुमच्या व्हायव्हा पेक्षा आमच्या बर्या होत्या हो.अवघड काम,एवढं पाठांतर!तुम्ही इतकं मस्त लिहिलंय की अगदी डोळ्यासमोर उभं राहातंय सगळं.

जबरी अनुभव लिहीताय.. रत्नांगिरीला आठल्ये गुरुजींची पाठशाळा होती, आहे.. आठल्ये गुरुजी नाही आहेत आता पण नातेवाईक त्यांच्या पाठशाळेत त्यांच्याचकडे शिकलेले असल्याने त्यांचे अनुभव असेच आहेत.. लेखातल्या पाठशाळेच्या गुरुजींचा स्वभाव, शिकवण्याची पद्धत आणी विद्यार्थ्यावर माया लावून प्रवेश घेण्यार्‍या बटुला खणखणीत बंदा रुपया करून बाहेर पाठवण्याची हातोटी आठल्ये गुरुजींसारखीच.. पुढच्या अनुभव लेखाच्या प्रतीक्षेत...

लेखी म्हणा की तोंडी; जेथे केवळ "घोका आणि ओका" ही पद्धत आहे त्या सर्वच परिक्षा नीच दर्जाच्या आहेत. "शाळा-कॉलेजतून डिग्री/सर्टीफिकेट आणि नोकरीतून टक्केटोणपे खात व्यावहारीक ज्ञान" अशी सद्याची शिक्षणव्यवस्था आहे. हल्लीच्या आंतरजालयुगात कॉपी-पेस्ट प्रकारचे पुस्तकी ज्ञान (?!) तर अल्पबुद्धी मानव केवळ मिळवू शकतो असे नाही तर त्याचा उपयोग ढकलपत्रांव्दारे इतरांना दिवसांतून (किमान) दहादा छळण्यास करू शकतो ! ;) "वाचा/ऐका/पहा --> स्वतंत्र विचार करा आणि प्रश्न विचारा --> विषय समजून-उमजून घ्या --> ज्ञान व्यवहारात वापरात आणा" या सर्व पायर्‍या ज्ञानार्जनात असल्या तरच ते खरे ज्ञानार्जन होईल.

(मी दिल्लीला होतो तेव्हा )आमच्या इन्स्टित्युट मध्ये ओपन बुक एक्जॅम्स असायच्या , पुस्तके , नोट्स, चिठ्ठ्या चपाट्या घेवुन परीचपाट्यायेण्याची पुर्ण परवानगी असायची ! पण एकही प्रश्न सिलॅबस मधला पडेल तर शप्पथ ! प्रत्येक प्रश्नावर डोकं आपटायला लागायचं ... तेव्हा कसे बसे पास व्हायचो ! ( ब्यॅट्या सेम कॉलेजातील असल्याने त्याला माझ्या भावना कळतील कदाचित ) असो. नको त्या आठवणी !

आमच्या शाळेत गाईड(मार्गदर्शक) वापरायला बंदी होती कारण त्यात तयार उत्तरे असत. कसंही वेडेवाकडे लीहा पण तुमच्या मनाने लीहा असे शिक्षकांचे म्हणणे असायचे. जर उत्तर तंतोतंत गाईड्मधल्यासारखे असेल तर शून्य मार्क मिळत असत. :)

आमच्या एका कॉलेजची मला सर्वात जास्त आवडलेली पद्धत म्हणजे "हारवर्ड केस स्टडिज'. यात एखाद्या मोठ्या कंपनीच्या मोठ्या प्रकल्पातील यशाचे/अपयशाचे वर्णन आकडेमोडीसकट दिलेले असते आणि त्याचे त्रयस्थ बुद्धीने विष्लेशण करायचे असते. कोणी कॉपी-पेस्ट केले की प्रोफेसर लगेच "पुस्तकातून / आंतरजालातून कॉपी-पेस्ट आजकाल ५ वर्षांचे मुल करू शकते. त्यामुळे त्याला झीरो क्रेडिट्स आहेत. मला या केसचे तुमचे स्वतःचे विश्लेशण हवे आहे, आणि घडले ते बरोबर की चूक हे तुमच्या कारणासह हवे आहे. शिवाय तुम्ही तेथे असता तर कंपनीपेक्षा जास्त/वेगळे काय आणि का केले असते ते सांगा." असे फटकावयाचे. इतकेच नाही तर पाठ्यपुस्तकातील एखादा मुद्दा पटला नाही तर त्याला लॉजिकली खोडून टाकाण्यास मनाई नव्हती.

थोडक्यात काय घोकंमपट्टीचा जमाना आहे. विषय कीती समजलाय याची कोणाला पडली नाहीये. मार्क कीती आहेत हे महत्वाचे. मुले विद्यार्थी कमी, परीक्षार्थी जास्त होतायत.

रोचक! एमस्टॅटला ओपन बुक एक्झाम्स कधी ऐकल्याचे आठवत नाही. बाकी आम्हांला त्या नव्हत्या कधी.

काय सांगतोस काय ? तुम्हाला नव्हत्या ओपन बुक ? नशीबवान लेको तुम्ही ! मला लिनियर आणि जनरलाइझ्ड लिनियर मॉडेल्स ची ओपन बुक परीक्षा आठवुन आजही डोळ्यासमोर तारे चमकतात ... श्या: नक्कोच त्या आठवणी ! :(

क्यूआरओआरला तरी नव्हत्या. बाकी एमस्टॅट वगैरेलाही कधी ऐकल्याचे आठवत नै पण त्या लोकांशी संपर्क कमी असे.

-----> स्वतंत्र विचार करा आणि प्रश्न विचारा --> विषय समजून-उमजून घ्या --> ज्ञान व्यवहारात वापरात आणा" या सर्व पायर्‍या ज्ञानार्जनात असल्या तरच ते खरे ज्ञानार्जन होईल. सहमत..

"वाचा/ऐका/पहा --> स्वतंत्र विचार करा आणि प्रश्न विचारा --> विषय समजून-उमजून घ्या --> ज्ञान व्यवहारात वापरात आणा" या सर्व पायर्‍या ज्ञानार्जनात असल्या तरच ते खरे ज्ञानार्जन होईल.
http://www.sherv.net/cm/emoticons/hand-gestures/clapping-smiley-emoticon.gif http://www.sherv.net/cm/emoticons/hand-gestures/clapping-smiley-emoticon.gif http://www.sherv.net/cm/emoticons/hand-gestures/clapping-smiley-emoticon.gif http://www.sherv.net/cm/emoticons/hand-gestures/clapping-smiley-emoticon.gif http://www.sherv.net/cm/emoticons/hand-gestures/clapping-smiley-emoticon.gif http://www.sherv.net/cm/emoticons/hand-gestures/clapping-smiley-emoticon.gif http://www.sherv.net/cm/emoticons/hand-gestures/clapping-smiley-emoticon.gif http://www.sherv.net/cm/emoticons/hand-gestures/clapping-smiley-emoticon.gif http://www.sherv.net/cm/emoticons/hand-gestures/clapping-smiley-emoticon.gif http://www.sherv.net/cm/emoticons/hand-gestures/clapping-smiley-emoticon.gif http://www.sherv.net/cm/emoticons/hand-gestures/clapping-smiley-emoticon.gif http://www.sherv.net/cm/emoticons/hand-gestures/clapping-smiley-emoticon.gif

पदवीधर असूनही बँक स्लिप न भरता येणार्या टग्यांना काय म्हणावे या विवंचनेतला. खुली शाळा अनुभव ह्यासारखा परखड शिक्षकाचे हातचे कवतिक्/मार दोन्ही खाल्लेला.. नाखु