Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ऑफबीट, ऑफ द रोड ड्रायव्हिंगची वाहनं..

ग
गवि
Wed, 01/28/2015 - 11:38
🗣 281 प्रतिसाद
अन्य धाग्यात सुरु झालेली चर्चा तिथे अवांतर नको म्हणून इथे चालू ठेवण्याची विनंती करतो. प्रस्तावना अशी की मजसहित अनेकांना एसयूव्ही, एमयूव्ही, ऑल टेरेन व्हेइकल्स, ऑल व्हील ड्राईव्ह गाड्या, अधिक ताकदीचं इंजिन, ओव्हरड्राईव्ह मोड याविषयी क्रेझ असल्याचं वाटलं. अश्या "ऑफरोडरोमियों"कडे रोजच्या शहरी वाहतुकीसाठी कॉम्पॅक्ट फॅमिली कार घरोघरी असली तरी मनात कुठेतरी जीप, थार, एक्सयूव्ही, कमांडर वगैरे यांचे मांडे खाल्ले जात असतातच. यात ती लेह लडाखची एक सेल्फ ड्राईव्ह लाईफटाईम टूर करण्याचं स्वप्न असतंच पण त्याचप्रमाणे पूर्ण भारत फिरणं, जंगलात नदीनाल्यांतून प्रवास अश्याही कल्पना असतात. कोणाला भरपूर जागा हवी असते तर कोणाला भरपूर ताकद.. किंवा दोन्ही. मी काही ऑप्शन्स इथे टाकून सुरुवात करतो. बाकी चर्चा पुढे होईलच. -सफाईदार लुकवर भर असणारी टाटा सफारी. -पाहताक्षणी टुणकन उडी मारुन स्टीअरिंग व्हील हाती घ्यावं अशी गोड पण रफटफ अंतरंग असलेली महिंद्रा क्लासिक AA With thanks from www.mahindracarsindia.com -भरपूर रफनेस असलेली थार -स्कॉर्पिओ, झायलो आणि क्वान्तोचं त्रिकूट -एक्सयूव्ही५००चा अ‍ॅनिमल लुक आणि आकर्षण (बादवे, रिव्ह्यूंमधे मार खाल्लेला दिसतो) -जुनी टेंपो (आता फोर्स) ट्रॅक्स.. चक्क तेरा चौदा लोकांना आरामात वाहून नेणारी. बाहेरुन ट्रंकसारखा पोलादी लुक पण इंजिन मर्सिडिज कंपनीने बनवलेलं. -आताचा ट्रॅक्सचा अवतार - फोर्स गुरखा -फोर्स वन. प्रचंड आकार आणि तुलनेत कमी किंमत. क्रूझ कंट्रोल. स्टियरिंग व्हील कंट्रोल्स. AAA with thanks from i.ndtvimg.com ... ही वाहनं सेकंडहँड घेऊन त्यावर दुरुस्ती करुन नव्यासारखी करणं स्वस्त वाटलं तरी शेवटी महागच पडतं असा अनुभव आहे. एकूण या गाड्या ताबडल्या गेलेल्या असल्याने त्यांना सेकंडहँड घेणे म्हणजे चरकात पिळून बराचसा रस संपलेला ऊस विकत घेण्यासारखं आहे असं मला तरी वाटतं. या आणि अश्याच गाड्यांविषयी आणखी माहिती, अनुभव आहेत का? या कार्स आणि त्यांना घेऊन केलेला प्रवास यांचं अद्वैत आहे. तेव्हा कोणते प्रवास तुम्ही केलेत आणि त्यात काय अनुभव आले.. जे इतरांना कळल्याने त्यांना खूप फायदा होईल तेही सांगावेत.. (अंतर वाचणे, खराब रस्ता टळणे, जास्त सुंदर रस्ता सापडणे, जेवणाखाण्याची पंचाईत न होणे, पेट्रोलडिझेलपंपपासून दूर जाऊन अडकून न पडणे इत्यादि)

प्रतिक्रिया द्या
163907 वाचन

💬 प्रतिसाद (281)
स
स्पंदना गुरुवार, 01/29/2015 - 23:10 नवीन
Image removed. येशील कधी तू?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Fri, 01/30/2015 - 00:28 नवीन
पण काय करणार. प्रोडक्शन बंद केले भारतात...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 01/30/2015 - 06:32 नवीन
जुन्या पजेरो चा लुक मस्तं अ‍ॅग्रेसिव्ह होता...!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ब
बाबा पाटील Fri, 01/30/2015 - 07:46 नवीन
विथ माय लिनिया.फक्त २ महिने अगोदर सांगा,माझ्या अपाँटमेंट अ‍ॅडजस्ट करता येतील आणी काही कायदेशिर परवानग्या घ्याव्या लागतील त्यासाठी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Fri, 01/30/2015 - 13:07 नवीन
अगदी आनंदाने, पण कदाचित २०१६ किंवा २०१७ च्या जून मध्ये. सोबत असाल तर और भी मजा आयेगा. सेडान घेऊन लडाख जरा टफ आहे पण साहसी मोहिमा करायच्या तर त्या सोपी करण्यात मजा नाही. जमले तर मिपाचा एखादा मोठा कट्टा तिकडे झाला तर काय बहार येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील
ब
बाबा पाटील Fri, 01/30/2015 - 15:43 नवीन
मग प्रश्नच नाही,तोपर्यंत्,एखादी मजबुत एस यु व्ही आली असेल.आताही इकोस्पोर्ट आहे पण लिनिया इतका भरवसा तिच्यावर नाही वाटत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ट
टवाळ कार्टा Fri, 01/30/2015 - 19:51 नवीन
मालक...लडाख मला पण करायचे"च" आहे...फक्त १ दिवस आधी कळवले तरी मी येईन :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
श
श्रीरंग_जोशी Fri, 01/30/2015 - 04:46 नवीन
आता भारतात एकाहून एक गाड्या दिसत असल्या तरी काही वर्षांअगोदरपर्यंत भारतातले चारचाकीचे जग खूपच मर्यादित होते. अमेरिकेत नवा असताना एकाहून एक आश्चर्याचे बसत होते. भारतात ज्या गाडीला मोठ्या लोकांची गाडी समजायचो ती अमेरिकेत एकदम बजेट गाडी समजली जायची. इथे रेंटल कार्सच्या सोयीमुळे शेवी सबर्बन, जीएमसी युकॉन, मस्टँग यासारख्या गाड्या मनसोक्त चालवता आल्या. नुकतीच आम्ही दुसरी गाडी घेतली. पहिली गाडी घेताना फारसे पर्याय बघितले जात नाहीत किंवा फारसं कळतही नसतं. तर मुद्दा असा की शौक बडी चीज हैं पासून सुरुवात करून (जीप ग्रँड चेरोकी) गुमान कितना देती हैं हा विचार केला अन सीआरव्ही टुरिंग घेतली - फोटोज. Image removed. Image removed. विविध नवनवीन वैशिष्ट्यांपैकी मला सर्वाधिक आवडलेले वैशिष्ट्य म्हणजे Adaptive Cruise Control. बाकी आम्ही दर हिवाळ्यात प्रत्यक्ष रोडवर ऑफरोड ड्रायव्हिंगचा अनुभव घेतच असतो :-) .
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 01/30/2015 - 05:02 नवीन
मस्तांग चालवलीत. झक्कास....शेल्बी वाली का फोर्ड वाली. शेलबी वाली मिळाली असेल तर भाग्यवान आहात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
श
श्रीरंग_जोशी Fri, 01/30/2015 - 05:10 नवीन
अर्थातच फोर्डवाली :-) Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 01/30/2015 - 05:16 नवीन
झक्कास!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
आ
आदिजोशी Fri, 01/30/2015 - 15:58 नवीन
श्रीरंग जोशींनी ताबडतोब १ जहाज भरून इनो पाठवून द्यावे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
स
संदीप डांगे Fri, 01/30/2015 - 20:12 नवीन
आमचे ह्या प्रस्तावास अनुमोदन आहे :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी
ग
गवि Fri, 01/30/2015 - 06:20 नवीन
सीआरव्हीचा उल्लेख फारसा झाला नव्हता. एकदाच एचआरव्हीचा उल्लेख ओझरता आला होता. उत्तम केलेस श्रीरंग फोटो टाकून. एक टवेरा म्हणून वाहन होतं ते कोणत्या प्रकारात मोडतं? ते चोरांचं आवडतं वाहन म्हणून त्याला इन्शुरन्स मिळायला अडचणी येत होत्या असं वाचलं. यातून प्रवासही केला आहे. काही वाहनं की लाँच होताच टुरिस्ट टॅक्सीज बनतात. खपाच्या आकड्याच्या दृष्टीने कंपनीला फायदा होत असेलच पण स्टेट्स सिंबॉल म्हणून ती कार बाद ठरत असल्याने बहुधा जनरल पब्लिकमधे ती कमी खपत असावी. मागे द. महाराष्ट्रात राहात असताना ट्रॅक्स आणि नंतर आलेली सुमो या दोन गाड्या खाजगी मालकीसाठी कोणी घेतल्या तरी त्यांना विचित्र अनुभव यायचा. रस्त्याकडेला किंवा एसटी स्टँड परिसरात कुठेही गाडी उभी केली आणि आत स्वतः बसलेलो असलो की रस्त्यातले लोक विनाचवकशी धडाधड दारे उघडायचा प्रयत्न करत आणि गाडीत बसून घेत. वडाप गाडी आहे असे गृहीतच धरुन सर्व चालत असे. या निमित्ताने एसयूव्ही, एमयूव्ही नेमकं कशाला म्हणायचं हे कन्फ्युजन वाढलं आहे. कोणीतरी सुमो ही एसयूव्ही नाही असं म्हटलं आहे वर. तो फक्त शेप आहे की आणखी काही फीचर्सही आवश्यक आहेत?
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 01/30/2015 - 06:39 नवीन
ट्रॅक्स,सुमो, तवेरा, क्वालिस वगैरे गाड्या जरी जास्त ग्राऊंड क्लिअरन्स च्या आणि ताकदवान इंजिनं वाल असल्या तरी त्यांना एस.यु.व्ही. असं म्हणता येणार नाही ह्याचं कारण कंफर्ट आणि ऑफ रोड केपेबिलिटीज. ह्या तिन्हीमधली एकही गाडी ऑफरोड केपेबल नाही. एस.यु.व्ही. मधे महत्त्वाच्या असणार्‍या काही गोष्टी म्हणजे दमदार इंजिन, ४*४, व्हेरिएबल सस्पेंशन, उत्तम ग्राउंड क्लिअरन्स, ५ सीट्स कमीत कमी, उत्तम ट्रान्स्मिशन सिस्टीम आणि स्पोर्ट्स टायर्स.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
स
संदीप डांगे Fri, 01/30/2015 - 13:52 नवीन
सहमत. एसयूव्ही मध्ये मायलेज हा विचार नसतोच. दमदार इंजिन, त्याचा लो एंड टॉर्क, हाय एंड टॉर्क, त्यांची गुणोत्तरे. चारही चाकांवर अफलातून नियंत्रण, जास्त ग्राउंड क्लिअरन्स, रस्ता असो वा नसो पुढे जाण्याची क्षमता आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे सर्व सुविधा मिळून येणारा सर्वोच्च कम्फर्ट. यैच मंगता बाकी कुछ नाही. प्रवासी क्षमता ५ ते ८ अशी असु शकते. ह्या प्रकारच्या गाड्या फक्त ३५ लाख + सेगमेंट मध्ये मिळतात, त्याखाली विकल्या जाणाऱ्या एसयूव्ही ग्राहकांच्या डोळ्यात धूळफेक आहे. एक उदाहरण: Image removed. एमयुव्ही म्हणजे मल्टी युटीलिटी व्हेइकल म्हणजेच बऱ्याच वेगवेगळ्या कामासाठी वापरण्यास योग्य. त्यात प्रथम मायलेज, जास्तीत जास्त सामान व प्रवासी वाहून न्यायची क्षमता, लांब अंतरे चांगल्या रस्त्यांवरून दमदारपणे कापण्याची क्षमता इत्यादी गोष्टींचा समावेश असतो. प्रवासी क्षमता किमान ७+१ असली पाहीजे. इनोवा, तवेरा, क्वालीस, इत्यादी ह्या उत्तम एमयुव्ही आहेत. आता भारतीय पब्लिक चे एसयूव्ही चे वेड आणि रस्त्यांची हालत बघून जास्त ग्राउंड क्लिअरन्स असणाऱ्या एमयुव्ही भासणाऱ्या पण फक्त फुगवलेल्या आकारातल्या हॅच्बॅक येत आहेत. कारण पब्लिक ला मायलेज आणि जास्त ग्राउंड क्लिअरन्स ह्याच दोन गोष्टींचे सर्वात जास्त आकर्षण आहे. अर्टीगा हे त्याचे सर्वोत्तम उदाहरण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 01/30/2015 - 15:36 नवीन
अतिशय चांगलं उत्तर. वेल अगदी ३५ लाखांपासुन असं म्हणता येणार नाही. फॉर्चुनर आणि एंडेव्हर २५ लाखाच्या रेंजमधे आहेत आणि दोन्ही गाड्यांच्या टेस्ट्स युट्युबवर उपलब्ध आहेत. जब्राट गाड्या आहेत. फॉर्चुनर चे काही इन्क्लिनेशन टेस्टचे व्ही.डी.ओ. पहा. धडकी भरते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Fri, 01/30/2015 - 18:00 नवीन
फ़ोर्चुनर आणि एन्डेवर खरंच चांगल्या आहेत पण फ़ोर्चुनर मध्ये अंतर्गत सजावट आणि एक्स्पेडिशन मध्ये कामी येणारी आयुधे इतर वरच्या सेग्मेंट मधल्या गाड्यांच्या तुलनेत थोडी कमी पडतात. एन्डेवर ची हाताळणी तिच्या अनावश्यक लांबीमुळे टफ टेरेन, घनदाट जंगली रस्त्यांवर वर त्रास देते. बाकी प्रत्येकाचा स्वत:चा अनुभव व मत वेगवेगळे असू शकतं. वरील दोन्ही गाड्या शहरात इम्प्रेशन साठी अतिशय उत्तम आहेत. भारतीय रस्त्यांवर जबरदस्त आहेत. मायलेज, शक्ती आणि दणकटपणात त्या कुणाला हार जाणार नाहीत. पण कट्टर ऑफरोडींग ला जरा कमी पडू शकतात. सरते शेवटी चालक आणि टेरेनवरही खूप काही अवलंबून असते. नाहीतर हमर सारखी गाडीही अडकून पड्ते.. https://www.youtube.com/watch?v=Tz143TYMZx4
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
स
संदीप डांगे Fri, 01/30/2015 - 18:05 नवीन
पण त्याचवेळी टोयोटाच्या एसयुव्ही सेगमेंटमधल्या गाड्या लाइफ्सेव्हर आहेत. हे शंभर टक्के मान्य करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
प
प्रसाद१९७१ Fri, 01/30/2015 - 16:05 नवीन
गेली अनेक दशके मुजाहदीन आणि तत्सम अतिरेकी लोकांनी अफगाणीस्तान आणि आफ्रीकेत वापरलेली टोयोटा लॅंडक्रुजर चे नाव नाही बघुन आश्चर्य वाटले. टॉप गियर वरच्या एका भागात ती गाडी पाण्यात बुडवुन ठेवली होती वगैरे तरी पण क्षणात चालु झालेली दाखवली. अतिशय रगेड आणि वाळवंटापासुन कुठल्याही टरेन ला उपयुक्त.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१ Fri, 01/30/2015 - 16:12 नवीन
टोयोटा लँड्क्रुजर च्या ह्या उपयुक्ततेमुळे आणि मिलिशिया उपयोगामुळे तिच्या वर बंदी घालावी अशी पण मागणी वेळोवेळी होते. In all my field research I have observed one common instrument used by all parties to a conflict, whether rebels and governments. This is the Toyota Land Cruiser. This vehicle is manufactured for civilian purposes in Japan, but now it has become the favored weapon of war in Africa and plays an important role in enabling insurgents and governments to conduct war in their preferred manner, and also to expand their theaters of operations. It is especially widely used in dry areas such as the Sahel and Sahara and in Somalia. http://sites.tufts.edu/reinventingpeace/2013/06/22/toyota-land-cruiser-and-terror/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
प
प्रसाद१९७१ Fri, 01/30/2015 - 16:13 नवीन
Other vehicles just aren’t as reliable as the Toyota Landcruiser and no other 4WD brand has established such a robust base of mechanics and spare parts train to support their vehicles. There is a sweet Porsche Cayenne Turbo parked by the Toyota dealer in N’Djamena, but there are no mechanics that know how to work on it and parts will take forever to get here and cost a fortune!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
श
श्रीरंग_जोशी Fri, 01/30/2015 - 19:05 नवीन
मी लँड क्रुझर गाडीला केवळ शरद पवार वापरायचे म्हणून ओळखायचो. अमेरिकेत कधीच दिसली नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 01/30/2015 - 19:20 नवीन
TLC... ओ हो हो. जुन्या आठवणी जाग्या केल्यात !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
स
सुबोध खरे Fri, 01/30/2015 - 16:13 नवीन
आमचे पण एक ऑफ द रोड ड्रायव्हिंगचं वाहन शक्तिमान -- ५८८० CC पण फक्त ११० हॉर्स पॉवर पण वाटेल त्या ( आणी नसणाऱ्या पण) रस्त्यावर चालत असे. सर्व गोष्टी केवळ टिकाऊ आणी युद्धात उपयुक्त असाव्यात याच निकषाने बनवलेल्या. ११ मिमी जाड लोखंडी पट्ट्यानी बनवलेला सांगाडा. चालक आणी प्रवासी यांच्या आरामाची कोणतीही सोय नसलेला. पुण्याच्या थंडीत ६-७ अंश तापमानाला सकाळी ६ वाजता त्या बर्फासारख्या गार पट्ट्या हाताने धरून शक्तिमान मध्ये उभे राहून गोळीबाराच्या सरावाला दिघी क्याम्पला गेल्याची आठवण आजही ताजी आहे. त्या ट्रकला सस्पेन्शन नावाचा प्रकारच नाही असे वाटावे. खाली बसलो तर आपलीच हाडे आपल्याला टोचतील असे वाटे आणी उभे राहिले कि त्या लोखंडाच्या पट्ट्या धरून हात बधीर होत. तो ट्रक चालवून पहिला तर आपण हत्ती चालवतोय असा अनुभव येतो. चाकाला पॉवर स्टीयरिंग नाही लोखंडाचे चाक शक्ती लावून वाळवावे लागते. सीटला स्पंज नाही कापसाची गादी जी नेहमी "बसलेलीच" पहिली आहे. हा ट्रक चालवणे हाही एक अनुभव वेगळा असो एक गोष्ट त्यात वैशिष्ट्यपूर्ण होती ती म्हणजे इंजिनला जोडलेला कोम्प्रेसर. ज्याच्या योगाने शेतात सुद्धा टायरचे पंक्चर काढून त्यात हवा भरण्याची सोय होती.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 01/30/2015 - 16:13 नवीन
http://www.ofbindia.gov.in/products/data/military/3.htm
  • Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१ Fri, 01/30/2015 - 16:18 नवीन
ताकद फक्त ११० एचपी. कमी नाही वाटत? ते सुद्धा ट्रक ला? डॉक्टर साहेब, पूर्वी तरी पेट्रोल आणि डीजेल अश्या दोन्ही वर चालु शकणारी इंजिन असलेल्या काही गाड्या आर्मी वापरायची, कारण वेळ पडेल तेंव्हा काय उपलब्ध असेल हे सांगता येत नसे. ती पद्धत अजुन चालू आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
संदीप डांगे Fri, 01/30/2015 - 20:07 नवीन
मालवाहू ट्रकची शक्ती आणि प्रवासी गाड्यांची शक्ती जरी एचपी मध्ये मोजली जात असली तरी एक मुलभूत फरक हा टॉर्क चा असतो. शक्तिमानचे ६ लिटर चे इंजिन २५०० आरपीएम वर ११० एचपी उत्सर्जित करतो जी त्याला जास्तीत जास्ती वजन वाहून (ढकलायच्या) न्यायच्या कामी येते. त्याचवेळेस रेनो डस्टर १.५ लिटर इंजिन ३९०० आरपीएम वर १०८ एचपी उत्सर्जित करते जी गाडीला अधिक वेग देण्याचा प्रयत्न करते. दुसऱ्या प्रकारे सांगण्याचा प्रयत्न करतो. उदा.एक: डस्टर आणि शक्तिमान आजूबाजूला एका सिग्नलवर उभे आहेत शून्य अतिरिक्त भारासह. सिग्नल हिरवा झाल्यावर कुठली गाडी आधी सुसाट पुढे जाइल? उदा. दोन: शक्तिमान ट्रकमध्ये सुमारे ६००० किलोचे अतिरिक्त वजन आहे अजून त्या ट्रक चे स्वत:चे ३००० किलोचे वजन आहे. बाजूला डस्टर उभी असून तिचे स्वत:चे १८०० किलो वजन आहे. तिच्यावर सुद्धा ६००० किलोचे अतिरिक्त वजन ठेवले. आता सिग्नल लागल्यावर कुठली गाडी पुढे जाइल? उदा. तीन: शक्तिमानचा जास्तीत जास्त वेग हा ७२ किमी प्रतितास आहे तर डस्टर चा १८० किमी प्रतितास. कॅटर्पीलर: ४००० एचपी Image removed. बुगाती वेरोन : १००६ बीएचपी Image removed. पण म्हणून ४ बुगाती वेरोन लावुन तो महाकाय ट्रक ओढल्या जाउ शकत नाही. इंजिनची क्षमता आणि उर्जा ही कमी किंवा जास्त हे वाहन कुठल्या प्रकारचे आहे त्यावर अवलंबून असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sat, 01/31/2015 - 02:04 नवीन
हेचं टंकायसाठी आलो होतो. अजुन एक गोष्ट वाढवतो ह्यात फक्त. टॉर्क आणि स्पीड हे एकमेकांशी व्यस्त गुणोत्तरामधे असतात. जसा वेग वाढत जाईल तसा टॉर्क कमी होत जातो. उदा. पहिला गिअर= जास्तीत जास्त टॉर्क कमीत कमी वेग पाचवा गिअर= कमी टॉर्क आणि जास्त वेग माझ्या वाहनविश्व ह्या मालिके मधे ट्रान्स्मिशन सिस्टीम येतील त्यावेळी ह्यामधलं गणित नेमकं उलगडुन दाखविन. (ही झैरात नाही)..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
आ
आगाऊ म्हादया...... Fri, 01/30/2015 - 16:55 नवीन
कमाल धागा काढलाय. एकदम हरवायलाच झालं या गाड्यांच्या विश्वात. आपल्यासारखे अनेक जीप्सिप्रेमी आहेत हे पाहून तर जे काही भारी फिलिंग आलंय. मी आजही पहिली गाडी म्हणून जिप्सी घेऊन थोडी modify करून वापरायची स्वप्न पाहतो, पण हल्ली त्यात थार डोकावते. नवीन माहिती अशी कळली कि लहानपणी जी गाडी लई आवडायची तिचं नाव सिएरा आहे. विशेष म्हणजे xenon आवडणारे पण आहेत, माझ्यासारखे. बोलेरो पण फार आवडतेच, छान आहे चालवायला. साली ती सुमो grande का आवडली हे मात्र कळल नाहीये. XUV तर आजही ठोका चुकवून जाते. पण ती चालवली नाही कधीच, एखादी मस्त गाडी, ब्रोड टायर्स, लाईट्स, आहाहाहा...थांबवा रे थांबवा...रिकाम्या खिशाने असली स्वप्नं पाहू नयेत.
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 01/30/2015 - 18:55 नवीन
एखादी मस्त गाडी, ब्रोड टायर्स, लाईट्स, आहाहाहा...थांबवा रे थांबवा...रिकाम्या खिशाने असली स्वप्नं पाहू नयेत.
तीव्र असहमती. परिस्थिती पालटायला वेळ लागत नाही...काय माहित आज रिकामा खिसा असणारा काही वर्षात ऑडी किंवा मर्सिडिझ मधुन फिरेल. अशी उदाहरण आहेत. सो स्वप्न पहाण सोडु नका आणि ती प्रत्यक्षात आणायसाठी कष्ट घ्यायला विसरु नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आगाऊ म्हादया......
आ
आगाऊ म्हादया...... Mon, 02/02/2015 - 09:54 नवीन
पटलंय. माफी असावी! स्वप्नरंजन कंटीन्यूज....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
ब
बाळ सप्रे Fri, 01/30/2015 - 17:03 नवीन
गोव्यात कुळे गावातून दूधसागरला जाताना ऑफरोडींगचा मस्त अनुभव मिळतो.. आपली गाडी घेउन जाता येत नाही. गोवा टुरीझमच्या शंभर एक गाड्या आहेत त्यातूनच जावं लागतं.. 4x4 SUV वगैरे नाहीयेत .. बोलेरो गाड्या असतात सगळ्या.. ३-३.५ फूट खोल पाण्यातून दोनवेळा नदी पार करावी लागते.. एका ठीकाणी तर नदी पार करताना वळणदेखिल आहे. तिथे बर्‍याचवेळा गाडी घसरते. तिथे गाडी ढकलण्यासाठी १०-१५ माणसं उभी असतात पाण्यात.. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
ब
बाळ सप्रे Fri, 01/30/2015 - 17:10 नवीन
Offroading 1 Offroading 2
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Mon, 02/02/2015 - 11:25 नवीन
लोकं रोज असा प्रवास करतात ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे
ब
बाळ सप्रे Mon, 02/02/2015 - 11:58 नवीन
तिथे जंगलात फक्त दूधसागर बघायला जाणारे पर्यटक जातात.. लोकवस्ती ऑलमोस्ट नाहीच.. एखाददुसरं घर दिसलं रस्त्यात..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
ट
टवाळ कार्टा Fri, 01/30/2015 - 19:58 नवीन
अश्या गाड्या घेण्याइतका पैसा आत्ता नाहीये...आणि जवळच्या भविष्यात येण्याचा चान्स दिसत नाहीये त्यामुळे माझा पास अवांतर - अशी गाडी असणारा सासरा शोधला पाहीजे...मुलीबरोबर गाडीसुध्धा मिळेल ;)
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sat, 01/31/2015 - 02:13 नवीन
त्या जावै सेकंडहँड विकणे आहे वाल्या डीरेक्टर शी संपर्क कर रे. तिथे सासरेबुवा नै पण सासुबाई नक्की देतील पैसे ;) . बाकी एखादी मस्तांग किंवा गेला बाजार लँबो घेतलीस तर ह्या सल्ल्याचं "खमिशण" म्हणुन एक फेरी मारायला नक्की दे हो. =)) (मित्रर्हित) -अनिरुद्ध-
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ह
हेमन्त वाघे Fri, 01/30/2015 - 20:27 नवीन
जातीने शेतकरी पण सर जन्म मुंबईत गेला .पन गावाची नाळ तुटली नाही . तर अति अति पैसा आला तर ऎक शेत घेवून हा ट्रक्टर घ्यायचा म्हणतोय . लामबोर्गिनी चा! Image removed. तसेच आवडता TRUCK SUV - UNIMOG ! Image removed.
  • Log in or register to post comments
श
शिवोऽहम् Sat, 01/31/2015 - 02:44 नवीन
आमची लाडाची मैना! Image removed.
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Sat, 01/31/2015 - 15:43 नवीन
https://www.youtube.com/watch?v=NsKNK2P-JUs
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Sat, 02/07/2015 - 16:55 नवीन
ही तर आमची लाडकी हाय, पण करणार काय लयच कडकी हाय... :-(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती राजेश
य
यशोधरा Sat, 01/31/2015 - 16:21 नवीन
थारबद्दल लिहा ना जाणकारांनी. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sat, 02/07/2015 - 03:42 नवीन
बा द वे. एक प्रश्ण किंवा शंका विचारायची होती. इथे टाटाच्या एस.यु.व्ही. वापरणार्‍यांना. DiCoR आणि CRDI मधे नेमका काय फरक आहे? डिकॉर= डिरेक्ट इंजेक्शन कॉमन रेल सी.आर.डी.आय.= कॉमन रेल डिरेक्ट इंजेक्शन का डिकॉर मॉडीफाईड सी.आर.डी.आय, आहे?
  • Log in or register to post comments
ब
बाळ सप्रे Sat, 02/07/2015 - 06:57 नवीन
दोन्ही एकच.. प्रत्येकाचं आपापलं नोमेन्क्लेचर..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sat, 02/07/2015 - 07:25 नवीन
वोक्के!! वाटलचं होतं. धन्यवाद. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Mon, 03/30/2015 - 06:07 नवीन
@प्रगो @गवि @घाटावरचे भट @सर्व एस.यु.व्ही. प्रेमी http://www.cartoq.com/mahindra-thar-modified
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Mon, 03/30/2015 - 07:10 नवीन
थार कधीतरी घेईन जमले तर :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Mon, 03/30/2015 - 07:44 नवीन
घेउन टाक. हा.का.ना.का. =)) बाकी पार्टीचं विसरु नये म्हणजे झालं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Mon, 03/30/2015 - 08:56 नवीन
चायला इतके सोपे असते तर मी मिपावर थोडीच असतो ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा