भ्रष्ट ,अन्यायी आणि कुणालाही आपल्या पाशवी शक्तीने चिरडून टाकण्याची क्षमता असणारी सिस्टम आणि या सिस्टम विरुद्ध उभा ठाकलेला एक सर्वसामान्य माणूस. हा लढा अर्थातच खूप विषम आहे . पण सगळ्यात भारी गोष्ट ही की कधी कधी या युद्धात सर्वसामान्य माणूस पण जिंकू शकतो . प्रचलित सर्वशक्तिमान व्यवस्थेने कितीही आसुरी बळाचा वापर केला तरी . या लढ्यात रोजच्या अवघड जगण्याला पिचलेली आणि कुठल्याही कामासाठी चिरीमिरी द्यावी लागणारी जनता नेहमी व्यवस्थे विरुद्ध उभा ठाकलेल्या माणसाच्या मागे उभी राहते हा जागतिक नियम . नुकत्याच झालेल्या दिल्लीच्या निवडणुकीत केजरीवाल नावाच्या गळ्यात मफलर बांधून भ्रष्टाचार विरोधी आंदोलन चालवणाऱ्या ठेंगण्या इसमाला दिल्लीच्या जनतेने भूतो न भविष्यति बहुमत देऊन जनतेने हा नियम पुन्हा सिद्ध केला . अजून 'नायक' चित्रपट मला आवडला नाही असे म्हणारा माणूस माझ्या तरी पाहण्यात नाही . पण त्या अगोदर केजरीवाल यांनी आपल्या सरकारी नौकरीचा राजीनामा दिला होता . व्यवस्थेचा भाग राहूनच तिच्याशी लढणे हे अजून कितीतरी अवघड . पण कधी कधी एक माणूस हे शिवधनुष्य पेलतो आणि यशस्वी पण होतो . शेषन यांनी निवडणूक आयोगाचा कार्यभार सांभाळला तेंव्हा निवडणूक आयोग हि काय चीज आहे हे फार कमी लोकांना माहित होत . पण शेषन यांनी राबवलेल्या सुधारणा आणि निवडणुकीत होणाऱ्या अनिर्बंध खर्चाला त्यांनी घातलेला चाप यामुळे त्यांचे नाव देशातल्या घराघरात पोहोंचल . आर आर पाटील यांनी जेंव्हा ग्रामविकास खात्याचा कार्यभार सांभाळला तेंव्हा हे असल कस बिन महत्वाच खात त्यांना मिळाल म्हणून अनेकांना त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटलेली होती . पण संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान आणि इतर अनेक योजनामधून त्यांनी लोकोपयोगी कामाचा डोंगर उभा केला . आपल्या देशाच सुदैव म्हणजे आपल्याकडे प्रत्येक भागात , प्रत्येक क्षेत्रात अशी निरलस पणे काम करणारी लोक आहेत . याच लोकांपैकी एक म्हणजे प्रवीण दीक्षित . लाचलुचपत प्रतिबंध खात्याचे प्रमुख .
ऑगस्ट २०१३ मध्ये दीक्षित यांनी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याची सूत्र हाती घेतली तेंव्हा तो विभाग विनोदाचा विषय बनला होता . निष्क्रिय आणि दुर्लक्षित . एवढ्या मोठ्या महाराष्ट्रात वर्षाकाठी फ़क़्त ४०० ते ५०० लाचखोर शासकीय सेवक पकडले जायचे . चुकूनमाकून जर या विभागाने कुठली कारवाई केली तर एखाद्या नेत्याचा फोन यायचा आणि त्यांना पकडलेल्या आरोपीला सोडून द्याव लागायचं . विनोदी भाग म्हणजे लाचखोरी थांबवण्यासाठी म्हणून तयार केलेल्या या खात्याचेच अधिकारी लाच घेताना अडकले होते . या खात्यात नेमणूक म्हणजे काळ्या पाण्याची शिक्षा असा समज अधिकारी वर्गात प्रचलित होता . पण आता हे सगळ बदलणार होत . दीक्षित यांनी सूत्र हाती घेताच अनेक सुधारणा केल्या .
- लाचलुचपत प्रतिबंध खात्याचे अॅप्लिकेशन सुरु केल . त्यामुळे कुणीही घरबसल्या आपली तक्रार दाखल करू शकत . www.acbmaharashtra.net इथे हे अॅप्लिकेशनउपलब्ध आहे .
-राज्यभरातले सगळे कार्यालय एकमेकांना जोडले . त्यामुळे खात्यांतर्गत समन्वय वाढला .
- राज्यात १०६४ क्रमांकाची टोल फ्री २४ तास चालू असणारी हेल्पलाइन सुरु केली .
- ज्याप्रमाणे पूर्वीच्या काळी राजे महाराजे वेषांतर करून आणि जनतेचे प्रश्न जाणून घेत त्याप्रमाणे लाचलुचपत प्रतिबंध खात्याचे अधिकारी साध्या वेशात भ्रष्टाचाराचे आगर असणाऱ्या सरकारी कार्यालयात घिरट्या घालू लागले .
- पकडल्या जाणाऱ्या प्रत्येक लाचखोराचा फोटो आणि त्याची माहिती आपल्या फेसबुक पेज वर टाकायला सुरुवात केली . त्यामुळे भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना बदनामीची भीती सतावू लागली आहे . इच्छुकांनी ACB च फेसबुक पेज लाइक कराव .
-न्यायालयात टिकतील असे 'डिजिटल 'पुरावे गोळा करायला सुरुवात केली .
परिणाम म्हणजे केवळ मागच्या दीड वर्षात अडीच हजार लाचखोर अधिकारी पदभ्रष्ट आणि गजाआड झाले .
दीक्षित यांच्या या धडाक्याने माजलेले लोकप्रतिनिधी आणि स्वतःच्या बापाकडून पण पैसे लुबाडणारे अधिकारी यांच्यात अस्वस्थता पसरली आहे . विशेषतः जलसंपदा खात्यात आणि सार्वजनिक बांधकाम हि भ्रष्टाचाराची कुरण असणाऱ्या खात्यांच्या अधिकाऱ्यांमध्ये . काही अधिकाऱ्यांनी तर हे अति होतय अशी तक्रार नेते मंडळीकडे करायला सुरुवात केली आहे . पण स्वतः अतिशय निस्पृह असणारे आणि भ्रष्टाचाराचा एकही शिंतोडा न उडालेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस दीक्षित आणि त्यांच्या खात्यामागे खंबीर पणे उभे आहेत . दस्तुरखुद मुख्यमंत्र्यांचा हात डोक्यावर असल्याने दीक्षित पण बेधडक कारवाई करत आहेत . नुकतीच झालेली भुजबळ परिवाराची चौकशी याच निदर्शक आहे . पण दीक्षित एकटे लढू नाही शकत . त्यांना गरज आहे ते आपल्या पाठिंब्याची . कुणालाही विनाकारण लाच देण्यापेक्षा लाचलुचपत प्रतिबंध खात्याने सोपी केलेली तक्रार नोंदवण्याची व्यवस्था आपण वापरली तर आपलही या लढ्यात योगदान राहील . एक मात्र खर . ह्या अशा लोकांकडे पाहिले की सगळ काही संपल नाही हि सुखावणारी जाणीव होते .
लेखातील आकडेवारी , संदर्भ यासाठी लोकसता मधले तीन लेख संदर्भ म्हणून वापरले आहेत . हे तीन लेख (ज्यात दीक्षितांची मुलाखत पण आहे ) अजून माहितीसाठी आवर्जून वाचा .
http://www.loksatta.com/vishesh-news/maharashtra-politicians-officers-uncomfortable-due-to-several-scams-1078880/
http://www.loksatta.com/vishesh-news/an-interview-with-pravin-dixit-anti-corruption-bureau-chief-1078878/
http://www.loksatta.com/vishesh-news/irregularities-in-irrigation-scam-probe-1078879/
प्रकार:
विषय:
प्रतिक्रिया
आभारी आहे
उत्तम उपयोगी माहितीने भरलेला
.
शीर्षक वाचून माधुरी दीक्षित
नशीब.. राजीव दिक्षित नै आठवले
हॅ हॅ हॅ माधुरी दिक्षीतकडे
+१
छान माहिती.
उपयोगी लेख आवडला.
लेख आवडला आहे
छान माहिती!
छान माहिती! एकच नंबर!
सर्वाना धन्यवाद . सोमवारी
ध न्यवाद.. फार उपयुक्त माहिती...
समाधान वाटले
चांगली माहिती!
लेख आवडला
अरे
बहुतेक मध्यंतरी दीक्षितांची
श्री. दीक्षित आता महाराष्ट्र राज्याचे डी. जी. पी.....
माहितीसाठी धन्यवाद ___/\___
असे महत्वाचे लेख प्रत्येकाने
डॉ. श्रीकर परदेशी
हम आपके बहुत आभारी है|