Welcome to misalpav.com
लेखक: स्पार्टाकस | प्रसिद्ध:
ट्रॅप या कादंबरीवर झालेल्या आरोपांवरुन बुकगंगा वरुन विषकन्या ही कादंबरी विकत घेऊन मी वाचून काढली. ही कादंबरी ई-बुक स्वरुपात उपलब्ध आहे जी आयपॅड किंवा इतर कोणत्याही टॅबमध्ये डाऊनलोड केली जाऊ शकते. वाचताना मला स्वतःला मूळ संकल्पना आणि काही गोष्टींतील साधर्म्य जाणवलं, परंतु सगळी कादंबरीच चोरली आहे असा आरोप करणार्‍यांपैकी किती जणांनी विषकन्या वाचली आहे याबद्दल मला शंका येऊ लागली आहे. सुमारे तीन महिन्यांपूर्वी अमेरीकेच्या फुल्टन या पाणबुडीसंदर्भात एक लेख वाचनात आला. ही पाणबुडी अमेरीकन सरकारच्या अधिकार्‍यांना पत्ता लागू न देता रशियात स्मगल करण्यात आली या संदर्भात तो लेख होता. या लेखाचा आधार पकडून रशियन सरकारकडून भारताला मिळणारी अण्विक पाणबुडी कशा तर्‍हेने भारतात आणता येऊ शकते ही कल्पना डोक्यात आल्यावर या कादंबरीची मूळ संकल्पना तयार झाली. उरलेली कथा या मूळ संकल्पनेच्या भोवताली रचलेली आहे. ज्यांनी विषकन्या वाचली आहे आणि वाचलेली नाही त्यांच्यासाठी - विषकन्या कादंबरीत भारताकडे येणारी पाणबुडी ही बेरींगच्या सामुद्रधुनीतून आणि चीनच्या दक्षिणेकडून मुंबईत पोहोचते असा उल्लेख केलेला आहे. या मार्गाने पाणबुडी आणण्यात असलेला धोका ट्रॅपमध्ये स्पष्ट करण्यात आलेला आहे. सुएझ कालव्यातून ज्या पद्धतीने वाहतूक केली जाते ती कॉन्व्हॉय पद्धत याचा विषकन्या मध्ये उल्लेख कोणाला आढळला का? हे डीटेलींग मी इंटरनेटवरील माहिती वाचून केलं आहे. पाणबुडीच्या प्रवासाचं डीटेलींग करताना दोन बंदरांमधील अंतर आणि त्यासाठी लागणारा वेळ याचा अंदाज करण्यासाठी मी ही साईट वापरली - http://ports.com/sea-route/ या साईटवर आपल्या दोन्ही बंदरांचे डीटेल्स आणि पाणबुडीचा वेग ही माहिती दिल्यावर प्रवासास लागणारा वेळ दिसू शकतो. दोन्ही पाणबुड्यांच्या प्रवासाचा अंदाज घेण्यासाठी आणि डीटेलिंग करण्यासाठी मी हे तंत्रं वापरलं होतं आणि त्यावरून लागलेल्या वेळेचा अंदाज बांधला होता. विषकन्या मध्ये हे कोणाला आढळलं का? हे डीटेल्स कॉपी केले होते हा आरोप कशाच्या आधारावर केला आहे? पाणबुडीच्या मार्गाच वर्णन करताना केप ऑफ गुड होपच्या परिसरातील वादळाचा कोणता संदर्भ विषकन्या मध्ये आढळतो? मुळात विषकन्यामध्ये केप ऑफ गुड होपशी काही संबंध आला आहे का? याच पाणबुडीच्या संदर्भात उल्लेख आलेल्या वेगवेगळ्या मिसाईल्सच्या प्रकारांचा आणि अ‍ॅटॉमिक न्यूक्लीयर मिसाईलचा साधा उल्लेखतरी विषकन्यामध्ये आला आहे का? या संदर्भात इतर कोणती कादंबरी चाफा किंवा आणखीन कोणी वाचली आहे का? विषकन्या हे कथानाक वाचल्यास ते भारतात राजीव गांधी आणि पाकिस्तानमध्ये बेनझीर भुट्टो पंतप्रधान असतानाच्या काळातलं आहे हे समजून येऊ शकतं. त्या काळात उल्लेख केलेली रशियन पाणबुडी १९९० मध्येच रशियन नौदलातून निवृत्त करण्यात आली. ज्या अत्याधुनिक पाणबुडीचा ट्रॅपमध्ये उल्लेख आहे, ती आजही रशियन नौदलात कार्यरत असलेली अणुपाणबुडी आहे हे कोणाला माहीत आहे काय? मूळ संकल्पना आणि काही तपशील समान आले म्हणून संपूर्ण कादंबरी चोरली आहे असा आरोप करताना या सर्व संदर्भांचा कोणी साधा विचार तरी केला होता का? आतापर्यंतच्या माझा इतर लेखनात प्रत्येक वेळी मी वापरलेल्या संदर्भ ग्रंथांचा मूळ लेखकाच्या नावासकट मी स्पष्ट उल्लेख केलेला आहे. केनेथ अँडरसनच्या ज्या शिकारकथांचा मी अनुवाद केला आहे त्याच्या प्रताधिकारावरुन मी प्रशासनाला स्पष्टीकरणही दिलेलं होतं आणि ते मान्यं करुन प्रशासनाने या कथा पुन्हा प्रकाशित केल्या आहेत. या सगळ्या प्रकारात मला स्वत:ला आता विच हंटींगचा आणि स्कोर सेटलींगचा वास येऊ लागला आहे. या सगळ्यानंतर मिसळपावच काय, पण इतर कोणत्याही मराठी संस्थळावर काहीही लेखन करण्याची माझी इच्छा नाही, कारण ते पूर्वग्रहदूषीत नजरेनेच पाहिलं जाईल याची मला खात्री आहे. तस्मात, अखेरचा नमस्कार!
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

:))) आदुबाळ, या चारोळी सारांशाबद्दल एक मद्यकुपी तुम्हांस.. :)

प्रो-स्पार्टा लीग - नका सोडुन जाऊ ... रंगमहाल अँटी-स्पार्टा लीग - मार ही त्राटिका, रामचंद्रा सामान्य वाचक - कशी नशिबानं थट्टा आज मांडली
http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing006.gif....http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing006.gif....http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing006.gif....http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing006.gif....http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing006.gif....http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing006.gif....http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing006.gif....http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing006.gif....http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing006.gif....http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing006.gif

एक दंडवत घ्या.. काय ह्सलोय , काय हसलोय... आदूबाळ, मेड माय डे...

एकेक पाणबुडी देऊन संबंधितांचा सत्कार करण्यात येत आहे. -जेपी- आता महत्त्वाचे माझे २ पैसे. १) स्पार्टाकस यांचे इतर सर्वच लिखाण मिपावर कौतुकाने वाचले गेले आहे. विच हंटिंग आणि स्कोअर सेटलिंग मिपावर तरी नक्कीच झालेले नाही. २) एकाच पुस्तकाची २ भाषांतरे असतील तर त्यात शब्द आणि वाक्ये सारखी असू शकतील. अन्य कादंबरी बरीच प्रसिद्ध असेल असे लेखकाचे नाव 'निरंजन घाटे' पाहून वाटले. त्या पुस्तकातील उतारे मिपावर कॉपी पेस्ट करण्याएवढे स्पार्टाण्णा गतिमंद नक्कीच नाहीत. मात्र कोणत्या मूळ कादंबरीच आधार घेतला आहे हे त्यांनी सांगितल्यास बरे होईल. ३) भाषांतरात साम्य असल्याचा खुलासा वाचकांनी स्वीकारला तरी कॉपीराईट कायद्याच्या कचाट्यात सापडल्यास स्पार्टाकस यांना बराच त्रास सहन करावा लागेल, विशेषतः श्री घाटे न्यायालयात गेले तर हे उतारे त्यांच्या पुस्तकातून घेतले नाहीत हे सिद्ध करणे अवघड आहे. तेव्हा त्यांनी या वादाला इथेच पूर्णविराम देऊन पुढे वाटचाल सुरू करावी. ज्यांना ही साम्यस्थळे सापडली त्यांच्या चौफेर वाचनाबद्दल कौतुक आहेच. तसेच मिपावर कोणतेही संकट येऊ नये म्हणून सजग राहून हे सर्व प्रकरण नजरेस आणून देणार्‍यां मित्रांचे विशेष आभार. मात्र आता एकमेकांना दुखवण्याचा कार्यक्रम सर्वांनीच बंद करावा ही विनंती.

पैसा ताई शी १००% सहमत मी या कादंबरीवर मनापासुन प्रेम केलं होतं...त्यामुळे सुरुवातीला मलापण खुप धक्का बसला हा धागा बघुन पण आता खरच असं वाटतय की २ वेगवेगळ्या लेखकांनी एकाच पुस्तकाचा संदर्भ घेउन लिखाण केलं तर ते ९५% तरी एकसारखच उतरणारच.... त्यामुळे मला वाटत की आता खरच हा विषय बास करुयात. आणि हा काही अगदी खून केल्याएवढा मोठा गुन्हा नाहीये....त्यामुळे प्लीज हे आरोप प्रत्यारोप बास करुयात स्पार्टाकस यांनी यापुढे लिहायचं की नाही हा त्यांचा वैयक्तिक प्रश्ण आहे... पण त्यानी लिहित राहावं अशी मनापासुन ईच्छा माझ्यासकट ईथल्या अनेक लोकांची आहेच :-)

१. समजा न्यायालयात सिद्ध करायचे ठरवले की हे चोप्य पस्ते आहे. तर, न्यायालय ही कथा नी ते आधीचे पुस्तक दोन्ही ओळ नी ओळ वाचणार काय की त्या कामाला वाचकाम्या ठेवणार.बर वाचल्यानंतर किती दिवस लागतील ह्यावर काही निर्णय किंवा शिक्षा द्यायला. २. समजा वर काही लोक जस म्हणताहेत तसं झालेल असेल तर मला त्या वाचनातुन मिळालेला आनंद व्यर्थ कसा ? ह्यावर मला फार दु:ख झाले, धक्का बसला, अशी अपेक्षा नव्हती वगैरे, चुकीचे आहे वगैरे मला निरर्थक वाटते (हे माझ स्वतःच मत आहे). आता मिपावर नाही का प्रतिसाद देताना आपण सरळ सरळ पुलंची वाक्य कशी चोप्य पस्ते करतो(तेव्हा कोणीही काही बोलत नाही लब्बाड कुठले उम्म्म ! मी नाय ज्जा !)

मला त्या वाचनातुन मिळालेला आनंद व्यर्थ कसा ?
"त्या वाचनातून" म्हणजे सरळ सरळ "जशीच्या तशी उचललेली वाक्यांच्या वाचनातून" असं म्हणायचं असेल,तर त्या आनंदाचं श्रेय कुणाचं? ज्याचं त्याला ते श्रेय मिळालं का?

म्हणण पटलं. सम्जा दिल नाही नाव त्याने पडणारा फरक नाव दिल्याने कितपत बदलेल.समजा *वर्जिनल लेखक कै. झाला असेल तर, हे म्हणजे काही केस मधे मरणोपरांत भारतरत्न दिल्या सारखे किंवा मेल्यावर परमवीर चक्र दिल्यासारखे वाटते.(कदाचित उदाहरन चुकीचे वाटु शकते)

फरक नाव दिल्याने कितपत बदलेल
फरक तर नक्कीच पडेल. वाचकांना, लेखकाला, आणि ज्याच्या लेखनाची नक्कल झाली आहे त्यांनाही असा फरक जाणवेल. इथे लोक चिडले आहेत, याचाच अर्थ काही वाचकांना तरी नक्कीच फरक पडला आहे. स्पार्टाकस यांच्या लिहिण्याचे अक्षरशः पंखे झालेले होते असे इथे बरेच आहेत-त्यात मीही आहे. लिहिणार्‍याला फरक पडेल, कारण आपण जे लिहिलं आहे, ते खरं तर आपण फक्त टायपिंग करत आहोत - त्यामागची प्रतिभा आपली नाही हे त्याने सांगितलेलं असेल. आता तो असं दाखवतोय की ही सगळी त्याचीच प्रतिभा आहे. आणि मुळ लेखकाला फरक पडेल कारण त्याला आता माहित झालेलं आहे की कुणीतरी त्याचं लिखाण वापरून स्वतःच्या आजुबाजुची सजावट करत आहे. याचा- या माहितीचा- त्याला काय फायदा आहे, हे तर त्या व्यक्तीच्या स्वभावावर अवलंबून असेल. लेखक कै. झाला असेल तर काय हे थोडे कायदेशीर झाले. हक्क तर कुणाकडे तरी दिलेलेच असतात आताशा.

प्र १ला उत्तर : मा. न्यायालय पुस्तक वाचत बसणार नाहीत असे वाटते. पार्टीच्या दोन्ही वकीलांना कुठे कुठे चोप्य पस्ते आहे त्या प्रत्येक ओळीखाळी अंडरलाईन करायला लावतील आणि किती चोप्य पस्ते आहे त्याचा शोध मा.न्यायालय घेईल. प्र.२ रा. उत्तर : आनंद व्यर्थ जाऊ शकत नाही. मात्र आनंदावर विरजण पडू शकते. मिपावर नाही का प्रतिसाद देताना आपण सरळ सरळ पुलंची वाक्य कशी चोप्य पस्ते करतो पुलंची वाक्य सर्वश्रृत असल्यामुळे तळटीप देण्याची गरज नाही. संशोधन सिद्धांत आणि पद्धती या पुस्तकात डॉ.सदा क-हाडे म्हणतात- ”ज्ञानेश्वरीचा किंवा तुकारामाच्या अभंगाचा दाखला देतांना ज्या ओळी सर्वशृत आहेत त्यांना तळटीप देण्याची गरज नाही.

'’मऊ मेणाहुनि विष्णुदास आम्ही' ''ना.सी.फडके कलावादी होते'' ''वि.स.खांडेकर जीवनवादी होते'' ''केशवसुत हे आधुनिक मराठी कवितेचे जनक आहेत'' ही विधाने सर्वसाधारण, सर्वश्रुत, सर्वसंमत आहेत. तळटीपेत त्यांचे स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता नसते'' 

 

संदर्भ : १. डॉ.सदा कर्‍हाडे, संशोधन सिद्धांत आणि पद्धती, प्रकाशन, लोकवाङ्मय गृह,मुंबई.आवृत्ती दुसरी.पृ.क्र.१३१.

-दिलीप बिरुटे

पण मग ते सर्वश्रुत आहेत ह्याचा क्रायटेरिया काय ? आता आनंदावर विरजण पाडुन घेणे न घेणे आपल्याच हातात, बरेचसे हिंदी सिनेमे आणी मराठी सिनेमे हे ही भ्रष्ट नक्कल असतात. अक्षरशः एकीकडचा नायक जितक्या पायर्‍या चढुन खलनायकाला लात मारतो दुसरिकडे तितक्याच पायर्‍या, लाकडी कठडे, लोंबकळणार्‍या साखळ्या सारख्याच अस वाटतं पट राखुनच ठेवला होता की कॉय ?

पण मला १ प्रश्न खूप जेनुएन्लि पडला आहे सर्व जण विषकन्या विषयी बोलले पण “ गुड मोर्निंग म्याडम” मधील साम्याविषयी विषयी स्पार्टाकस यांनी काहीच स्पष्टीकरण दिलेले नाही :(

हम्म मी ललित साहित्याचा रेग्यूलर वाचक नसल्यामुळे असेल कदाचित माझी माहिती जरा कमी पडत होती असे दिसते, एनी वे एकुण हे जे काही प्रकरण आहे त्याची कायदे विषयक अकॅडेमीक सर्कल मध्ये फॅन फिक्शन म्हणून चर्चेत आहे असे दिसते. या संबंधाने गूगल शोधात दोन भारतीयांचे लेख हाती लागले त्यात झोया नफीस यांच्या लेखात फॅन फिक्शन करताचा सॉफ्ट कॉर्नर दिसून येतो आणि ते फेअरयूज कसे आहे वगैरे तर दुसर्‍या किरण मेरी जॉर्ज यांच्या लेखात भारतीय दृष्टीकोणातून अधिक डिटेल्स येताना दिसतात किरण जॉर्ज त्यांच्या लेखाची सुरवातच "Fan fiction writers, you’re walking on thin ice! " अशी करताना दिसतात. किरण जॉर्ज यांचा लेख अधिक अभ्यासपूर्ण वाटतो. बाकी इतर काही चांगले लेख आंजावर आढळले त्यांचे दुवे : इंग्रजी विकिपिडियावरील हे दोन लेख खुपच प्रायमरी माहिती देतात * Fan fiction -इंग्लिश विकिपीडिया * Legal issues with fan fiction अधिक वाचनासाठी (ब्रिटीश आणि आमेरीकन दृष्टीकोणातून) * Sequel rights: are fictional characters, plots and themes protectable?- Harbottle & Lewis * Are fan fiction and fan art legal? Lauren Davis

i am new member of misalpav. Dead man's hand series cought my attention.. thats why became member of misalpav. i want to read Trap.. but not getting link for 1st 4 parts and the last one also.. can anyone help?