पिढीजात चालत आलेली गावची देशमुखी सांभाळणारा संपतराव तसा भला माणुस..सगळ्या गावचा कारभार पहात होता..
त्याच्या बद्दल कुणी वाईट-वक्कट बोलायच नाही..संपतराव सगळ्याच्या मदतीला धावायचा.
तरी त्याला स्वतःला पोर नसल्याच दुखः होत.लग्नाला पाच वर्ष होऊन गेलती..सगळे देव,तिर्थ्,डॉक्टर पालथे घालुन झाले..
देशमुखाला आपला वारसा कोण चालवणार याची काळजी लागुन राहीली..
देवान बहुतेक त्याच आईकल..उशीरा का होईना घरात पाळणा हलला..देशमुखाला आभाळ ठेंगण झाल..
योगायोगान त्या वेळेस गावात भागवत सप्ताह चालु होता..देशमुखाने..भागवतकार पुराणीक बुवांना घरी बोलवल..
बुवा आले..देशमुखाने आदरभावाने त्यांचा पाहुणचार केला..पोराला त्यांच्या पायावर घातला आणी सवाल केला..
"बुवा,बर्याच वर्षाने देवान ऐकल..काय नाव ठेवु मुलाच ..?"
बुवा प्रसन्न हसले..म्हणाले," चांगली वेळ आहे,गावात सप्ताह चालु आहेच्,तुमच्याकडे धर्मराज अवतरलाय..धर्मराज नाव ठेवा.."
देशमुखाने पुन्हा नमस्कार केला..बुवांनी तोंडभरुन आर्शिवाद दिला.
पोरगा नावाप्रमाणे धर्मराजाचा अवतार निघाला.जुगार आणी दारुत मस्त रमला..देशमुखाच्या गढीला हादरे बसु लागले..
पोराचा वांडपणा कसा थांबवता येईल याचा विचार करत देशमुखाने त्याचे लग्न करुन दिल..तरी पठ्ठ्या सुधारायचे नाव घेईना.
घरातील ठासणिची बंदुक आता खांद्याला नावुन सगळ्या गावाची ठासत घोड्यावरुन फिरत राही.
ऐके दिवशी भर बाजारात..महिपत पाटलाच्या पोराला गोळी घातली..पाटलाच पोर मरता मरता वाचल..
पण धर्मराज परागंदा झाला..देशमुखाने अंथरुन धरल..पुराणीक बुवा भेटायला आल्यावर डोळ्यात पाणी आल त्याच्या.
"बुवा,अस कस झाल हो !! काय सांगीतलत माझ्या पोराबद्दल आणी कसा हा निघाला.."
बुवा काय बोलणार..शांतपणे देशमुखाची समजुत काढु लागले..
वातावरण शांत झाल्याव एके रात्री धर्मराज गावी परत आला...
त्या रात्री....
.
.
सगळ्या भावकीने..
.
.
..भर रस्त्यावर..दगडाने..
.
.
.धर्मराजाचा अवतार संपवला.
जाता जाता- हे देशमुख वेगळे आणी ते साहेब वेगळे..
प्रकार:
विषय:
प्रतिक्रिया
वाचलंय बहुतेक हे!
होय. इथेच आधी लिहीली होती ही
फारच लवकर आटपली गोष्ट.
कथा आवडली.....
?
हेच म्हणतो
हेच म्हणतो
+३
+१७५८
गावाचं नाव बदलापूर किंवा
संदर्भं माहित नसल्याने - कथा
सहमत
सहमत
लै अवघड रुपककथा
हायला!
केवळ स्वतः देशमुख चांगले होते
मला जे वाटलं तेच असेल तर
काही कळले नाही :-(
गोष्ट म्हणून बरी आहे; आणखी
कान पिळी
@देशमुख वेगळे आणी ते साहेब
सर्वांचे आभार..