सकाळच्यान साहेब खुशीत होते.
फायद्याचं कलम असणार हे सगळ्यांनी ओळखलं.
सायबांनी बेल मारली - केबिनमधे सगळे शिपाई जमले.
''आपल्या संस्थेत स्वच्छ्ता चांगली होत नाई.
तुमची टाळाटाळ असतेच, त्यातून आपली संस्था जुनी. खोल्यांची उंची जास्त आहे.
त्यामुळे आपण शासनाला प्रस्ताव दिलावता - व्ह्याक्यूम क्लिनर्सची गरज आहे.
त्याप्रमाणे लगेचच टेंडर पास हून पाच यंत्रं आलीयत . . सगळ्यांनी नीट बघा कशी वापरायची.
सोमवारपासनं संस्था एकदम चकाचक दिसायला पायजेल !''.
***
महिना निघून गेला
रुटीन सुरु ऱ्हायलं- घाण तशीच!
सायबानं घेतलंन सगळ्याना .
रामा तसा धीट हाय .
बोल्ला '' सायेब मशिनी आणल्या -पर ट्रेनिंग कुटं झालं!
शिवाय शिड्या, एक्स्टेशन बोर्डबी लागतील ! ''
'' म्हनतोस तेबी बरोबरच हाय - सगळ्याबर्बर ट्रेनिंगचंबी टेंडर मार्गी लावतो आजच!''
प्रकार:
विषय:
प्रतिक्रिया
अचूक झाडू-मारलाय!
+१
(No subject)
नुस्तं सर्कारी नाय...
चांगल आहे.
टेंडर उडून जाऊ नये म्हणून
उत्तम!
खासंच
वा!
किमान शब्दात कमाल परीणाम !!!
मस्तच...
मस्त!