Skip to main content

कोळंबीची खिचडी (छायाचित्रासह)

लेखक पांथस्थ यांनी मंगळवार, 11/11/2008 22:57 या दिवशी प्रकाशित केले.
पाककृती येथुन घेतलेली आहे - कोळंबीची खिचडी १. ताजे कोळंबी मी मध्यम आकाराचे टायगर प्रॉन्स वापरले आहेत २. कोळंबी परतुन घेणे लवंग, हिरवी वेलची, दालचिनी, शहाजिरे, आल-लसुण पेस्ट, कोळंबी, हळद, गरम मसाला, तिखट, धने-जिरे पावडर हे सगळं ह्याच क्रमात तेलावर परतुन घेणे ३. तांदुळ, नारळाचे दुध, पाणी घालुन मंद आचेवर शिजविण्यास ठेवणे दोन वाट्या तांदळाला दोन वाटि नारळाचे दुध, दोन वाट्या पाणी आणि चवीनुसार मिठ. खिचडी एकदम मंद आचेवर होउ देणे. ४. खिचडी तयार ५. मारा हात काय सुटले का पाणी तोंडाला? हि पाकृ करण्यास अत्यंत सोपी आहे आणि झटपट होते. आणि चव तर काहि विचारु नका. पोट आणि डोके एकदम थंड :) तेव्हा मंडळी लागा कामाला. तुमचे रसानुभव कळविण्यास विसरु नका!!!

वाचने 9411
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

सं प लो...! शब्द नाहीत... चित्र पाहून खूप मानसिक त्रास झाला... विठ्ठला, सोडव रे बा या मोहमायेच्या दुनियेतून..! :) पांथस्थराव, आपल्याला सलाम... कोलंबीची खिचडी ही असे किती चवदार, घासाघासावर वाटे करावा जीव उदार..! :) तात्या.

पाककृती उत्तम आहे. रविवारी बनवायला हवी. परंतु छायाचित्रे देउन मानसिक छळ करु नये ही विनंती. सुक्या (बोंबील) मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)

In reply to by सुक्या

च्यायला हे बरं आहे. मागच्या वेळी आम्ही एका लेखात जेवणाची छायाचित्रे टाकली नव्हती तर लोकांचा जीव वर खाली झाला होता. आणि आता छायाचित्रे टाकली आहेत परत तेच. X( नक्की काय ते ठरवा राव! ;) - संताजी धनाजी

छायाचित्रांनी मजा आणली पांथस्थ. यापुढे अश्याच प्रकारच्या पाककृती टाका भौ!

मज्जा आली राव. एकदम झक्कास्स्स्स्स्स्स्....तोंडाला पाणी सुटते बघुन.येत्या बुधवारी नक्की कोंलबी खिचडी.... एक प्रश्न ह्यात चिंचेचा कोळ वापरावा काय? आग्या(पोटात आग लागलेला)वेताळ

पाकृ आणि ती देण्याची अभिनव पद्धत आवडली. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

पांथोबा, झकास! खातानाचा एक फोटो चढवायचास की ;) हा प्रकार करुन बघितला पाहिजे. - संताजी धनाजी

नारळाच्या दुधासाठी दुसरा पर्याय आहे का? ..... बाकी खिचडी एकदम मस्त झाली आहे!!! --अथांग सागर