Welcome to misalpav.com
लेखक: कपिलमुनी | प्रसिद्ध:
मानसिक त्रास काल ७ एप्रिल रोजी माझ्या आईची पुणे येथील पासपोर्ट ऑफिसची ३:४५ ची अपाँटमेंट होती. १.व्यवस्थित भरलेला फॉर्म २.रीसीट ३.आधार कार्ड ४ पॅन कार्ड ५. शाळा सोडल्याचा दाखला ६.दहावीचे बोर्ड सर्टीफिकेट ७. अ‍ॅनेक्चर डी ( लग्नानंतरचे नाव बदलल्यासाठी) ८.अ‍ॅनेक्चर ए ( जन्मगाव ) ९. लाइट बिल १०. राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक (१ वर्षा हूनही जुने) वरील सर्व मूळ कागदपत्रे आणि त्याम्च्या सेल्फ अ‍ॅटेस्टेड झेरॉक्सचे २ सेट असे नेले होते. प्रचंड गर्दी आणि २.५ तास वाट पाहिल्यानंतर नंबर आला . पहिल्या ठिकाणी सर्व कागदपत्रे तपासून "ओके" चा शेरा मिळाला पुढे दुसर्‍या काउंटरवर फोटो हाताचे ठसे घेतले . एवढे होईतो ७ वाजत आले होते. पुढील माणसाने कोणतीही माहिती न देता "insuffiecient documents" असा शेरा मारला . त्याला कोणत्या कागदपत्रांची पूर्तता करायची आहे हे विचारले असता. त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली आणि दुसर्‍या काउंटरवर पाठवले ( त्याला मराठी येत नव्हते आणि आइचे हिंदी- इंग्लिश कच्चे आहे). आणि त्याने पुढची तारीख २१ मे टाकली आणि निघून गेला. दुसर्‍या काउंटरवर तिथल्या महिलेने कागदपत्रे तपासली आणि योग्य असल्याचा निर्वाळा दिला. पण तोवर हा मनुष्य सीस्टम बंद करून निघुन गेला होता. त्या महिलेने सांगितले एकदा तुमचा अ‍ॅप्लीकेशन ऑन होल्ड स्टेटस वर गेले तर पुन्हा त्या तारखे शिवाय काहीच करू शकत नाही. या प्रकारात ८ वाजून गेले होते. प्रंचंड मनस्ताप झाला होता आणि पासपोर्ट ची पुढची तारीख २१ मे ( ४५ दिवसानंतरची) मिळाल्यामुळे बर्‍याच प्लॅनवर पाणी फिरले आणि यात कोणतीही चूक नसताना ! दुर्दैवाने या विरूद्ध कुठेही तक्रार करायची सोय नाही . फीडबॅक मधे लिहा किंवा कॉल सेंटरला कॉल करा ठराविक साच्याची उत्तरे मिळतात पण बेजबाबदार कर्मचार्यांची तक्रार करण्याची आणि कारवाईची सोय कुठेही नाही. अशा गोष्टी टाळण्यासाठी १. महाराष्ट्रात मराठी भाषिक कर्मचारी / अनुवादक असावेत. २. प्रत्येक कर्मचार्‍याने काम न होण्याचे कारण लिखित स्वरूपात द्यावे. ३. तक्रार नोंदणी आणि कारवाइ विभाग असावा (अशी दिवास्वप्ने आहेत). प्रत्येक सरकारी विभागात अशीच रड असते.
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

तुम्हाला आलेला अनुभव दुर्दैवी म्हणावा लागेल. पण मी इतक्यातच माझ्या पत्नीचे आणि आणखी २ नातेवैकांचे पासपोर्ट काढण्यासाठी पुणे ऑफिस मध्ये गेलो होतो. अर्थात मला आतमध्ये जाता आले नाही. पण तिथले कामकाज आणि एकंदरीत systeem अत्यंत सुटसुटीत आहे असे वाटले.

कुठे दट्ट्या हाणायचा ते बरोबर शोधून काढायचे अन घाव घालायचा. बरेचदा इमिजिएट वरिष्ठाकडे गेल्यास काम होते, असा अनुभव आहे. बाकी जास्त माहितीसाठी कॉलिंग मोदक..

सध्या बँकेमध्ये १५जी भरण्याचा एक प्रचंड मानसिक त्रासदायक प्रकार आहे. ह्यांना दर वर्षी तीच सगळी माहिती लागते तर ऑनलाईन सोय का नाही करत? एसबीआय म्हणजे तर हिटलरचे छलवणूक चेंबर आहे असे आमचे मत आहे बुवा. माझ्या पुढे १क ८० वर्षाची आजी होती. तिला धड काहीही कळत नव्हते आणि हे साले माजुरडे तिला इकडून तिकडे उडवून लावत होते. शेवटी सटकून मी जाम तमाशा केला तेंव्हा तिचे काम केले आणि मला जाम तंगवले. कुठलेही काम सोपे करायचे असते हे अख्या भारतात मान्य नाहीये. सतत भरपूर त्रास दिलाच पाहिजेल असा अलिखित नियम आहे. जी गोष्ट सहज होऊ शकते ती पण मुद्दामहून कशी कठीण करता येईल ह्यातच सगळी शक्ति वाया घालावाची आणि म्हणे भारत महासत्ता होणार.

वयस्कर लोकांना नवीन संज्ञा (टर्म) माहीत नसतात तेव्हा ते अडाणी म्हणून वागवले जाते. वरती लेखात अमराठी कर्मचार्‍याम्चा मुद्दा टंकायचा होता पण धाग्याचा काश्मीर झाला असता . त्यांना मराठी येत नाही ही आपली चूक नव्हे पण ते अत्यंत माजोरडेपणे वागतात.

अहो ते स.*** भ**** मराठीच आहेत हो. साल्यांना इतके डोके नाहीये की एकाच ठिकाणी काम करावे. कशाला हव्यात १० लाईन्स मला अजूनही त्या आजीचा चेहरा आठवातोय. असे हात शिवशिवत होते एक एकाला पिदाडून काढायला. असो. आमच्या विन्जनियारिग कालेजपासून ते पासपोर्ट असो वा अजून काय असो उगाचच आपले लोकांना ताटकळत उन्हात ठेवण्यात फार मजा येते असे माझे मत झाले आहे. दुसऱ्याची सोय पहावी असे कधीच कुठे बघितलेले नाहीये आणि लोकांचा त्रास कमी करावा असे तर बिलकुल कुठे धोरण नाहीये. त्यामुळे जो तो नुसता संधी मिळाली की तसाच छळून काढायला बघतो. थोडेफार अपवाद आहेत पण ते अपवादच.

हा नक्की कुठल्या बँकेचा त्रास आहे? एचडीएफसीमध्ये ऑनलाईन 15जी भरण्याची सुविधा आहे. काळ्या पैशाच्या नावाखाली बँकांचे व्यवहार किचकट करण्याची अहमहमिका सर्वच ठिकाणी सुरु आहे. केवळ एक किंवा दोन(बस्स!) बँक खाती असलेले उत्तम.

एस बी आय आणि तत्सम सहकारी बँका. खरे म्हणजे त्या आजींना पासबुक भरून हवे होते आणि १५जी भरायचा होता. पूर्वी एकाच ठिकाणी होत असे आता उगाचच इकडून तिकडे जा आणि तिकडून पलीकडे जा आणि बस बोंबलत

खरं आहे शंभर टक्के. नव्या कोर्‍या व्यवसायाचे पहिले वहिले करंट अकाऊंट उघडायला गेलो तर म्हणे दोन वर्षाचे आयटीआर आणा. मी म्हटलं बाबारे हा नवीन बिझनेस अस्तित्वात यायाच्या आधीच आयटीआर कुठून आणेन. मी काय लोन मागायला नाय आलो. तर ते म्हणे ते आम्हाला काय म्हाईत नाय. (टाईम मशीन शोधतोय.) नशीब, कोटकने प्रचंड सुविधा असलेली झीरो बॅलंसवाली स्किम देऊन खातं उघडून दिलं. बाकी कुठल्या राष्ट्रियकृत बँकांचे उपकार नको.

मी आज सकाळपासुन पासपोर्ट ऑफिस सोबत संपर्क करत आहे. (आता विषय निघालाच तर इथेही विचारुन बघते.. कुणाला काही माहिती असेल तर प्लिझ मदत करा..) माझ्या मुलाच्या बर्थ सर्टिफिकेट वर माझे नाव सासरचे लागले आहे. मी कुठेही सासरचे नाव लावत नाही. आता मुलाचा पासपोर्ट काढताना माझा नि माझ्या नवर्‍याचा पासपोर्ट ह्यावरील माझे नाव आणि बर्थ सर्टिफिकेट वरचे माझे नाव ह्यात फरक आहे. म्हणुन मग अर्थातच प्रॉब्लेम येणार. तर ह्यासाठी काय करता येईल हे विचारय्चे आहे. मला फकत मीच माझ्या मुलाला जन्म दिला आहे असे सांगणारे कोणतेही प्रुफ हवे आहे. १. कस्टमर केअर - 1800-258-1800- ह्यांनी बरीच मदत करायचा प्रयत्न केला. पण शेवटी केस त्यांच्या हाताबाहेर असल्याने रिजनल ऑफिसला जा म्हणाले. २. मग आता रिजनल ऑफिसला एवढय उन्हात कधी जा.. म्हणुन सहज मेल आयडी शोधुन मेल केला. (rpo.pune@mea.gov.in) फोनही करायचा प्रयत्न केला. (020-25675421, 25675422 ) फोन उचलला नाही पण त्यांचाच मला दुपारी कॉल आला की काय नक्की प्रॉब्लेम आहे? मी सविस्तर सांगिल्यावर मदत केली. अर्थात मला त्या ऑफिसला जावे लागणारच कारण काम तसे आहे. पण किमान मेल वाचला तरी.. शिवाय पुन्हा त्यांनी त्यावर रिप्लायही करुन ठेवला की "फोनवर बोलणे झाल्याप्रमाणे जे सांगितले आहे ते करा (!!)" ३. मी "सारथी" च्या हेल्प लाइनला ही कॉल केला. त्यांनी नीट ऐकुन मदत करायचा प्रय्त्न केला. पण काम झाले नाहीच.. एकंदरीत मलाही वाटते की तुम्ही वेब्साईट वर जाऊन इथे कंप्लेंट करा - http://passportindia.gov.in/AppOnlineProject/ccgm/ServiceRequestHomeAction

२ उपाय आहेत. १. ज्या हॉस्पिटलमध्ये तुमच्या बाळाचा जन्म झाला तिथून (तुमच्या माहेरच्या नावाखाली जन्म दिल्याचे) नवे बर्थ सर्टिफिकेट घ्यावे लागेल. माझ्या एका मित्राची हीच कथा होती. त्याला काही पैसे भरुन नवे सर्टिफिकेट मिळाले. २. किंवा तुमचा आताचा पासपोर्ट रद्द करुन तो सासरच्या नावाने रिन्यू करुन घ्यावा लागेल. मॅरिज सर्टिफिकेट व कायदेशीर नाव बदलले असल्यास तुम्हाला तात्काळ नवा पासपोर्ट मिळू शकतो.

१. हे नक्की कसे केले हे सांगाल का? कारण आता हॉस्पिटल कानावर हात ठेवेल की आमचा आता काही संबंध नाही. तरी प्रयत्न करेनच. २. हे मला करायचं नाहीये म्हणुन तर हा खटाटोप. अन्यथा गॅझेट मध्ये नाव बदलुन हा सगळा घोळ सोडवता येईल.

१. हे नक्की कसे केले हे सांगाल का? कारण आता हॉस्पिटल कानावर हात ठेवेल की आमचा आता काही संबंध नाही. तरी प्रयत्न करेनच.
तुमच्याकडे मॅरिज सर्टिफिकेट असेल तर मिळायला काहीच हरकत नसावी. थोडी खटपट करावी लागेल. तुमच्याकडे सध्या असलेले बर्थ सर्टिफिकेट तिथे दाखवून बदलून देण्याची विनंती करु शकता.
२. हे मला करायचं नाहीये म्हणुन तर हा खटाटोप. अन्यथा गॅझेट मध्ये नाव बदलुन हा सगळा घोळ सोडवता येईल.
जर तुमचा आणि नवऱ्याचा पासपोर्ट दोन्हीही लग्नापूर्वी काढले असतील तर बाळाचा पासपोर्ट मिळणे अवघड आहे. तुमचे आणि नवऱ्याचे पासपोर्टवरील आडनाव वेगळे असेल तर बाळाचा पासपोर्ट काढताना दोघांपैकी एकाच्या पासपोर्टमध्ये जोडीदाराचे नाव असणे आवश्यक आहे. अन्यथा तुम्हाला रिन्यूअल करावेच लागेल. लग्नानंतर नवऱ्याचेच नाव सर्व ठिकाणी असलेले सोयीचे पडते. तुमच्या जुन्या पासपोर्टवरचे विसे वगैरे वॅलिड राहतात. (हे त्यात्या देशाच्या कॉन्सुलेटला विचारुन घ्या) विशेषतः भारतात अतिउत्साही लोक लग्न झालेली बाई दिसली की स्वतःहून तिच्यामागे सासरचे आडनाव लावतात. (उदा. वरच्या उदाहरणातील हॉस्पिटलवाले). त्यामुळे सासरचेच आडनाव असले तर अडचणी खूपच कमी होतात. (माझ्या बायकोचे अद्याप माहेरचेच नाव सर्व ठिकाणी आहे. तरी एकदोन ठिकाणी (दवाखाना, बँक वगैरे) सासरचे नाव लावण्याचा उद्योग अतिउत्साही मंडळींकडून झाला आहे. )

१. माझे बाळांतपण प्रायव्हेट हॉस्पिटलला झाले. तिथुन माहिती भरुन सरकारी दवाखान्यात गेली न तिथे जन्मदाखला मिळाला. आता मी कुठेही गेले तरी लोक "हे आमचं काम नाही" असंच म्हणत आहेत. २. नवर्‍याच्या पासपोर्ट्वर माझे माहेरचे नाव आहे. माझ्या पासपोर्ट वर लग्नाआधी काढला असल्याने त्याचे नाव नाही. आमच्याकडे विवाहनोंदणी केलेले प्रमाणपत्र आहे. आता समजा त्यांनी हे मान्य केले की मीच माझ्यामुलाची आई आहे, तरी मला असं वाटतं की ते मुलाच्या पासपोर्टवर माझे सासरचे नाव लावतील. म्हणजे अजुन गोंधळ.. म्हणुन हा सगळा खटाटोप.. आता माझ्याकडे २ पर्याय आहेत असे वाटते. १. लोकल आणि नॅशनल पेपर मध्ये जाहिरात देणे ह्या संबंधी.. अनेकदा अशी जाहिरात देताना पाहिले आहे. २. वरचा उपाय.. आणि इतर कोणताही उपाय असल्यास त्यासंबंधी S.B Road वरील पासपोर्ट ऑफिसमध्ये एक चौकशी खिडकी आहे म्हणे (सोम-शुक्र, बुधवार सोडुन, दुपारी १२.३० पर्यंत) तिथे जाऊन अधिकार्‍यांना भेटणे आणि काही मार्ग आहे ते पहाणे.

लग्नानंतर नाव बदललेले कधीही चांगले. जर ताबडतोब प्रवास करायची शक्यता नसल्यास तुमचे नाव सगळीकडे बदलून घ्या. पेपरमध्ये जाहिरात देणे सक्तीचे नाही. मॅजिस्ट्रेट किंवा नोटरीकडे अॅफिडेविट करुन नाव बदलता येते. नंतर टप्प्याटप्प्याने पॅनकार्ड, रेशनकार्ड, बँका वगैरे सगळीकडे नाव बदलून घ्या.

अहो हेच तर.. मुळात नाव बदलणं आवश्यक गोष्ट नाहीचे.. मला माझे नाव बदलायचे नाही हा प्रमुख मुद्दा आहे म्हणुन तर मी हा खटाटोप करतेय..

मुळात नाव बदलणं आवश्यक गोष्ट नाहीचे
याबाबतीत मी कोर्टाचे वेगवेगळे निकाल, काही वकिलांची मते यावरुन प्रचंड गोंधळून गेलोय. एका वकीलाच्या मते हिंदू विवाहकायद्याखाली लग्नाची नोंदणी असेल तर बाईचे सासरचे नाव हे 'अ‍ापोआप' होते. त्यामुळे ते सगळीकडे बदलून घेणे आवश्यक ठरते. अन्यथा 'खोटे नाव' (माहेरचे) वापरल्याचा आरोप होऊ शकतो. याऊलट स्पेशल मॅरिज अॅक्टाखाली विवाह व नोंदणी असेल तर ते सक्तीचे नसते. तुमचा जुने नाव ठेवायचा हट्ट असल्यास एखाद्या वकीलाशी बोलून घ्या. मालमत्ता-वारसा हक्क व इतर नियमांसाठीही नाव बदलणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

गूगलवर शोधले असता हे एक दिसले. ही माहिती मी ऐकलेल्या माहितीशी सुसंगत आहे. यात लग्नानंतर (हिंदू विवाह कायदा) माहेरचे नाव तसेच ठेवायचे असल्यास तशी नोंद करुन घ्यावी लागते असे लिहिले आहे. त्यामुळे किचकटपणा कमी करण्यासाठी एकच आडनाव (नवऱ्याचे) असलेले चांगले http://www.lawyersclubindia.com/forum/Name-change-after-marriage-for-ladies-22623.asp#.VSUzr5NWJhZ
A. Keeping of MAIDEN NAME scenario If one has proof of relationship i.e. marriage certificate then it would see her through most of the joint investments, whereas as per Hindu Law, by default, the woman’s name changes and the husband’s name becomes her second name. So, if the woman wants to maintain her maiden name, then she should apply for the same with a Gazetted Officer. Then it gets published in the newspaper. Now let us see through the disadvantage a marriage certificate alone brings in in such cases i.e. in cases of family disputes where there are possibilities of the woman’s identity being questioned then one gets into disputes / legal cases unintendenly thus it is always better to have all papers in order B. Adopting the SURNAME scenario Many a women post marriage adopt the surname of their husband as common practice. Here what comes as logical thing to do is to keep handy the marriage registration papers.Now, legally, there are two ways to go for the name change. One is to submit a joint notarised Affidavit or a copy of the Official Government Gazette mentioning your new name. Then your husband and you would need to make a joint notarised Affidavit on Stamp Paper, signed by a Magistrate or a Notary. The affidavit also carries a joint photograph of your husband and you. This Notarised Affidavit, along with your marriage certificate, is enough to change your name at the bank, on your passport, on the Permanent Account Number (PAN) and driving licence. Here is the catch when you take the second step that is when you apply for a new passport. Then there would be a deletion of your name from the old ration card and its addition to the new one. Similarly, you have to apply for a new PAN card with the old number. This would be to avoid duplication of PAN cards. Only after you complete the whole procedure, should you proceed with purchase of assets, joint holdings and fair distribution of expenses as per Law of the land. C. Maden name LINKED TO NEW SURNAME Scenario Well this is a new trend, mostly used by celebrities and empowered women. Eg: Aishwarya Rai Bachchan. This option is more complicated as the woman has to go through the legal procedure mentioned in case A and the entire set of formalities mentioned in case B scenarios. It’s more difficult than adopting just the new surname because the Hindu Marriage Act anyway changes the name by default. Then, you are just left with some bit of paperwork for the name change. But in this scenario, it’s like adopting a new name altogether, don't you think so ! The catch here is that Law of the land permits a woman to make a choice when it comes to their surname. But when it comes to opening a joint account, joint investments or even co-owning a house, the woman may be asked to produce an Affidavit. So, it’s better to keep it handy all the time for joint propositions. But once you make a decision, there should be uniformity in all documents — be it your passport,PAN, banking papers, or even your investments. It is for you to decide whether you want to play around with your name or leave it where it was. But stick to your decision to avoid unnecessary legal and administrative hassles in the days ot come. If you have reworked your name, then you will have to keep track of all the places where you need to make the changes. Most importantly, without dealing with the possible name change, it is prudent to avoid investments whatsoever.

साधारण मागच्या १-२ वर्षापुर्वी कोर्टाचा निर्णय आला होता की आता नाव बदलण्याची काहिही गरज नाही. गुगलले असता ही लिंक मिळाली http://nlrd.org/womens-rights-initiative/news-from-high-courts-womens-rights-initiative/now-women-can-retain-their-maiden-name

केवळ लग्न झाले म्हणून नाव / आडनाव बदलणे मला पटत नाही. ही बातमी वाचून बरे वाटले. भविष्यात ज्यांना नाव आडनाव बदलायचे आहे त्यांच्यासाठी विशिष्ट प्रक्रिया असावी. केवळ लग्न झाले म्हणून मध्यनाव अन आडनाव बदलल्याचे गृहीत धरणे थांबवले जावे. ही सुधारणा कधी तरी होईल अशी आशा आहे. या विषयावरचा माझा जुना प्रतिसाद - विवाहोत्तर नाव बदलणे.

तुमच्या पासपोर्ट वर spouse name मधे नवर्‍याचे नाव टाकुन घ्या. मी आधि ते करुन घेतले आणि मग मुलिचा पासपोर्ट अप्लाय केला. तुमच्या आणि माझ्या केस मधे हा एकच फरक दिसतोय.

माझ्या नवर्‍याच्या पासपोर्टवर माझे नाव आहे. माझ्या पासपोर्टवर त्याचे टाकेन. आणि तुमच्याही केस मध्ये बर्थ सर्टिफिकेट्चा असाच घोळ होता का?

माझ्याही केस मध्ये बर्थ सर्टिफिकेट्चा असाच घोळ होता. आता मुलीच्या पासपोर्टवर माझे लग्नानंतरचे नाव लागले आहे. पण मी ते वापरत नाही. ती माझ्या Work Visa वर dependant आहे. आणि व्हिजासाठी नावात फरक होता तरी काही त्रास नाही झाला. तुमच्या नवर्‍याच्या पासपोर्टवर तुमचे नाव असेल तरीही तुम्हाला तुमच्या पासपोर्टवर नवर्‍याचे नाव टाकुन घ्यायला लगेल. खाली वाचा. If either parent holds a valid passport with spouse name endorsed, passport will be issued to the minor without any police verification. Original passport of parent(s) should be presented for the verification of particulars. If parent(s) hold a valid passport, but spouse name is not endorsed, then they must get the spouse name added in their passport. For this they have to apply for a reissue of passport and get the specified change in personal particulars. ही माहिती या बुकलेट मधुन मिळाली. - PassportApplicationformInstructionBooklet-V3.0.pdf , passport.gov.in वर नविन information booklet असेल तर त्यात काही बदल दिसतोये का ते बघा.

पिलियन रायडर ताई एक गोष्ट पहिल्यांदा तुम्ही मान्य करा जो काही घोळ झाला आहे तो तुम्ही स्वतः घातला आहे. तुम्ही जी माहिती द्याल तीच सरकारी अधिकारी फीड करणार. मग सगळीकडे एकसारखी भरण्याची जबाबदारी तुमची स्वतःची आहे. आता सांगा आत्ता नावामुळे काही काम अडते आहे का...

नाव बदलले आहे / २ नावाची व्यक्ती एकच आहे असे अ‍ॅफिडेविट आणि लोकल आणि नॅशनल पेपर मध्ये जाहिरात देणे गरजेचे आहे. गॅझेट पुरावा म्हणून मान्य करत नाहीत असा अनुभव आहे. Annexure "H" आणि Annexure "E" सुद्धा लागेल असे वाटते

बाळाच्या जन्माचा दाखला स्थानिक नगर परिषदेत / महानगरपालिकेत मिळतो.बाळाचा जन्म झाला ते इस्पितळ दाखला देणार नाही. माझ्या मामेभावाच्या बाबत असेच झाले होते, त्यात मामाचे (म्हणजे त्याच्या वडिलांचे) वापरातले नाव दिले होते कागदोपत्री मामाचे नाव वेगळे असल्याने. जन्म दाखला दुरुस्त करावा लागला. त्यासाठी मामाला प्रतिज्ञापत्रासह नवीन दाखल्यासाठी अर्ज करावा लागला.पण नाव दुरुस्त होऊन नवा दाखला मिळाला. २००५ ची घटना आहे. नवीन काही नियम आले असतील तर कल्पना नाही.

बर्थ सर्टिफिकिटे दोन असतात. १. हॉस्पिटल देते ते. त्यात "बेबी {आडनाव}" असा उल्लेख असतो. २. महानगरपालिका देते ते. त्यात पूर्ण नाव+आडनाव उल्लेख असतो. आपण कोणत्या बर्थ सर्टिफिकेटबद्दल बोलत आहात? क्र. २ चं बर्थ सर्टिफिकेट महानगरपालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयात जाऊन बदलता येईल.

दोन्ही बदलावी लागतील. हॉस्पिटलचे बर्थ सर्टिफिकेट पाहून महापालिका सर्टिफिकेट देते. हा तितकासा किचकट प्रकार नाही. मुळात काहीही खोटी मागणी नसल्याने अडचण यायची शक्यता फारच कमी आहे.

नव्या नियमा नुसार नगरपालिके कडुन मिळालेले बर्थ सर्टिफिकेट बदलता येत नाही. शिवाय अजुन प्रति हव्या असतिल तर त्यासुद्धा पहिल्यावेळी सर्टिफिकेट घेतानाच थोडी जास्त फी भरुन घ्याव्या लागतात.

ह्या निमित्ताने... पिं.चि मनपा मध्ये जन्मलेल्या बाळांसाठी ही लिंक उपयुक्त ठरावी. मी एकदा अशीच वापरुन पाहिली होती. मला माझ्या मुलाचा जन्मदाखला सापडला होत. बदल मात्र करता येत नाहीत. http://203.129.227.16:8080/BND/wicket/

तुमची आणि आमची केस अगदी तंतोतंत जुळते. फरक एव्हढाच की, आम्ही नागपुर पास्पोर्ट कार्यालयात अर्ज केला होता. मला आठवते तसे आम्ही इतर कागद्पत्रासोबत, annexure I, H, F, जोडले होते. काहीही प्रोब्लेम आला नाही, फक्त पोलिस व्हेरीफिकेशन ई. गोष्टींमुळे पासपोर्ट यायला दोन महिने लागले.

काहीही करता येत नाही. आमचंही असंच झालं होतं. हॉस्पिटलवाले नवरर्‍याचं जे आडनाव असेल तेच बाईला चिकटवून मोकळे होतात. वेळीच लक्षात आलं नाही तर काहीही करता येत नाही. शेवटी सगळ्या डॉक्युमेंट्सवर बायकोचं नाव बदलून घेणं भाग पडलं :(

अमराठीचा मुद्दा केवळ भाषा समजण्यापुरता आहे. सर्वच मराठी माणसांना इंग्रजी किंवा हिंदी येत असेल असा कसा काय गृहीत धरू शकतात ?

तुम्ही दिलेल्या कागदपत्रांच्या यादीत रेशनकार्ड आणि मतदान ओळखपत्र दिसत नाहिये. रेशनकार्ड नाही पण मतदान ओळखपत्र तरी घेतातच.(आधार कार्ड असुनही)

कपिलमुनीजी, पासपोर्टच्यासंदर्भात, ऑनलाइन अपॉइंटमेंट घेऊनच पुढे जाणं श्रेयस्कर. (परंतु ती वेळ निघून गेलेली आहे). पासपोर्टसंबंधी तक्रार येथे नोंदवावी: http://passportindia.gov.in/AppOnlineProject/ccgm/callCenterOnlineGrievance आणि येथे नोंदवावी: https://org2.passportindia.gov.in/AppConsularProject/welcomeLink या दोनही संस्थळांवर तक्रार नोंदवूनही काम न झाल्यास, पुढचा मार्ग म्हणजे: escalation. तसेच, सर्व सरकारी किंवा निम्नसरकारी कारभारासंदर्भात ऑनलाइन तक्रार करण्याचीही सोय आहे. येथे पहा: http://dpg.gov.in/Lc_ViewStatus.aspx Hope, this helps.

दुव्यांबद्दल धन्यवाद ! वरील अपाँटमेंट ऑनलाईनच मिळाली होती. हा त्रास कागदपत्रांची पडताळणी करताना झाला आहे. @ केपी रेशन कार्ड हा पुरावा ग्राह्य धरला जात नाही. मतदान ओळखपत्रावरची जन्मतारीख आणि पत्ता चुकीचा होता. पण पॅन कार्ड आणि आधार कार्ड , १ वर्षाहून जुने नोंद असेलेले पासबुक ह्या द्वारे ओळख ग्राह्य धरली जाते.

माझ्या माहितीत तरी अजुन कोणाचे रेशनकार्ड आणि पॅन कार्ड घेतल्याचे आठवत नाही. पण आधार कार्ड असुनही वोटर आयडी घेतात (स्वानुभव) म्हणून बोलले. तसेच असही दिसून आलय की 2 व्यक्ति आपापली कागदपत्रांची फाईल ( दोघांचेही सारखेच कागदपत्र हा) घेउन गेले असता , प्रत्येकाकडून काही वेगळी कागदपत्र घेतली गेली आहेत.

@पि.रा. - मुलिच्या बर्थ सर्टिफिकेट माझेही सासरचे नाव लागले आहे. आणि मी अजुन माझे माहेरचेच नाव सगळीकडे वापरते. मुलीच्या पासपोर्टसाठी या गोष्टीचा मला काही त्रास नाही झाला. पण माझ्या पासपोर्टवर नवर्याचे नाव आहे. जे मुलीच्या बर्थ सर्टिफिकेट वरही आहे. तुम्हाला अजुन माहिती हवी असेल तर मला व्य.नी. करा.

२००७ साली मुंबईत वरळीला स्वता जाऊन, सकाळी ५ वाजल्यापासून रांगेत उभे राहून (एजंटची मदत न घेता) पासपोर्ट काढण्याचा प्रयत्न केला होता. सर्व कागदपत्रांची पूर्तता करून देखील दोन महिने झाले तरी पासपोर्ट हाती लागला नव्हता. वरिष्ठ अधिकार्यांची भेट घ्यायचा प्रयत्न केला होता तरी काहीही झाले नाही, नाईलाजाने शेवटी एजंट गाठला आणि त्याच कागदपत्रांच्या जोरावर घरपोच पासपोर्ट आला. बहुतेक सर्व अधिकारी महाराष्ट्रीयनच होते.

२००३ साली वरळी ऑफिसला पासपोर्ट काढला होता. काहिही अडचण आली नाही. लाच न दिल्याने पोलिसाने 'पत्ता तंतोतंत जुळत नाही' (फक्त काही अक्षरे जुळत नव्हती) असे कारण देऊन अर्ज परत पाठवायची धमकी दिली. मला गडबड नसल्याने त्याला "पाठव परत" म्हणून सांगितले. एवढे सगळे होऊनही ६ महिन्यात पासपोर्ट घरपोच आला होता.

पुणे पासपोर्ट ऑफीस चा फारच वाईट अनुभव आला . इथे वरिष्ठ अधिकारीच खालच्यांना सामील आहेत. माझी मुलगी २ महिन्यांची होती . मी माझा पस्स्पोर्ट रिन्यू आणि तिचा नवा पासपोर्ट करण्यासाठी तत्काळमध्ये ऑनलाईन अपाँटमेंट घ्यायचा प्रयत्न केला. २ आठवडे रोज प्रयत्न करूनही अपाँटमेंट मिळाली नाही . त्यामुळे माझ्या गावाहून लहान मुलीला घेऊन पुण्याला गेले. ऑनलाईन अपाँटमेंट मिळत नसेल तर से.बा. रोड पुणे पासपोर्ट ऑफीसला जाऊन अपाँटमेंट घेऊ शकतो . कॉल सेंटरला कॉल केल्यावर त्यांनी सांगितले कि ज्यांच्यासाठी अपाँटमेंटहवी त्या व्यक्ती प्रत्यक्षात अपाँटमेंट घेताना तिथे हजार पाहिजेत . (लहान मुल असेल तर ते सुद्धा ) प्रत्यक्षात तिथे गेल्यावर मुलीला आणायची गरज नाही असे कळाले. (सगळा नुसता भोंगळ कारभार आणि आपल्याला मनस्ताप ) पुढचा प्रकार आणखी जास्त त्रासदायक होता . इथे तुम्ही प्रत्यक्ष पासपोर्ट अधिकाऱ्याला भेटता आणि तुम्हाला अपाँटमेंट मिळते . या बाईंनी मला तात्काळ पासपोर्टसाठी दोन महिन्यांनतरची अपाँटमेंट दिली . मला परदेशात नोकरीवर एका महिन्यात हजर व्हायचं होतं त्यामुळे मला एक दोन आठवड्यातली तारीख हवी होती . पण त्यांनी काहीही ऐकून न घेता माझी बोळवण केली. यानंतर अखेरचा पर्याय म्हणून एक एजंट गाठला. त्याने पैसे घेऊन याच बाईंच्या सहीचा पुढच्या आठवड्यातल्या अपाँटमेंट तारखेचा कागद दिला. ही दोन वर्षांपुर्वीची गोष्ट आहे. आता काही फरक झाला असेल तर चांगलाच आहे.

लहान मुल आणि ज्येष्ठ नागरिक ह्यांना तर "वॉक इन" सुविधा आहे ना? २४ तास आधी ऑनलाईन पासपोर्ट फॉर्म भरुन तुम्ही तिथे सकाळी बहुदा १२.३० पर्यंत जाउ शकता. बाकी एजंटने माझ्या नवर्‍याचा ३ महिने प्रिंट मध्ये अडकलेला पासपोर्ट १ दिवसात काढुन दिला होता. ही गोष्ट २ वर्षापुर्वीची.. In order to facilitate submission of passport applications at Passport Seva Kendras (PSKs), some types of services such as 'Tatkaal', Police Clearance Certificates and some distinct categories of applicants such as senior citizens, minors and differently-abled applicants are allowed to submit their duly registered online applications with ARN as Walk-in applicants. Applicants coming under these categories are also required to submit their applications online and obtain an ARN, and then visit the nearest Passport Seva Kendra (PSK) during prescribed hours (no prior appointment is required). In addition, applicants should also refer to any advisory issued by the concerned Passport Offices from time to time.

परदेशांत जाणारच असाल तर तिथे नुतनीकरण करून घेणे अतिशय सोयीचं असतं. विशेषतः युरोपात वकीलातीसाठी फार दूर जावं लागत नाही. सगळे कागद असतील तर ४ दिवसात नवा पासपोर्ट येउन जातो!