Welcome to misalpav.com
लेखक: संपादक मंडळ | प्रसिद्ध:
राम राम मंडळी, 'चतुष्पाद प्राणी' छायाचित्रण स्पर्धा आठला नेहमीप्रमाणेच चांगला आणि भरभरुन असा प्रतिसाद मिळाला अनेक सदस्यांनी एकापेक्षा एक सरस अशी छायाचित्र स्पर्धेत टाकली. सदस्यांनी केलेले मतदान आणि त्यातल्या निवडीच्या पद्धतीत पहिल्या पसंतीला तीन गुण, दुसर्‍या पसंतीस दोन गुण, आणि तिसर्‍या पसंतीला एक गुण अशा पद्धतीने यावेळी छायाचित्र निवडली त्यातून अनुक्रमे विजेते खालील प्रमाणे ठरले. तिसर्‍या पसंतीत काटेकी टक्कर Mrunalini आणि खान्देशी यांच्यात झाली अवघ्या दोन गुणांचा फरक राहीला होता. सर्व सहभागी सदस्य, विजेत्या स्पर्धकांबरोबर मृनालीनीचं अभिनंदन. प्रतिसादक आणि परिक्षक यांचे आभार आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा....!!! प्रथम क्रमांक : शैलेंद्र. 1 द्वितीय क्रमांक : सौरभ उप्स. 1 तृतीय क्रमांक : खान्देशी. 1
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

निकालाच्या धाग्यात विजेत्यांनी फोटो कुठे/ केव्हा काढला आणि इतर काही पार्श्वभूमी दिली तर आणखी मजा येईल.

सर्व प्रतिसादकांचे आभार. हे छायाचित्र मी गढवालमधे, उत्तर काशीच्या वर, दोडीताल ट्रेकवर काढलय. साधारण ३००० मिटर उंचीवर एक धनगरांच गाव आहे. तिथल्या एका घरातल्या बकर्या आम्हाला बघुन बाहेर डोकावल्या, त्यान्च्या चेहर्‍यावरचे व डोळ्यातले उत्सुक भाव हाच या चित्राचा प्राण आहे.

त्यान्च्या चेहर्‍यावरचे व डोळ्यातले उत्सुक भाव हाच या चित्राचा प्राण आहे. >> अगदी, अगदी! आणि त्या मागच्या दोन बकर्या जणू काही बाहेर यायला घाबरत फक्त मोठीच्या आडून बाहेर कोण आलं आहे ते बघत आहेत असंच वाटतं!

स्पर्धेत भाग घेणार्यांनी एका पेक्षा एक सरस अश्या फोटोंची मेजवानी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार. प्रथम तीन विजेत्यांचे खास अभिनंदन.

विजेत्यांचे अभिनंदन व उर्वरित स्पर्धकांना शुभेच्छा!! मिपामुळे घरबसल्या वेगवेगळ्या विषयावरचे चांगले चांगले फोटो पहायला मिळताहेत. म्हणून मिपाचे आभार मानावे तेव्हढे थोडेच!!

सर्व विजेते आणि स्पर्धकांचे अभिनंदन! वेल्लाभटाचे जलरंगात केल्याप्रमाणे वाटणारे छायाचित्र आणि विशालचा वाघोबा पण मला खूप आवडले होते. अजून एक पांढरा वाघ पण मस्त होता!

असं एक निरिक्षण नोंदवतो. अर्थात ज्याची त्याची दृष्टी आणि त्या दृष्टीला दिसणारं सौंदर्य हे सापेक्ष असलं तरी काही निर्णयाचं जाऊ दे पण काही छायाचित्रांना ते पहिल्या दुस-यात तिस-यात नसू दे पण त्यांना न्याय आणि दाद मिळत नाही, असं वाटलं. -दिलीप बिरुटे

अर्र र | जरा उशिरच झाला. मी घेतलेल्या ह्या फटूचा विचार झाला असता का? Kutra अर्थातच सर्व विजेत्यांचे आणि स्पर्धंकांचे अभिनंदन.