Welcome to misalpav.com
लेखक: खेडूत | प्रसिद्ध:
गुटख्याचा भपकारा आला तशी पारू सावध झाली. वासामागनं आन्ना ग्रामशेवक आला. कसल्यातरी फॉर्मवर आंगटा घ्यायाचा म्हनला . येका आटावड्यात तिसऱ्यांदा आलंय. निराधार योजनेचं काम करतो म्हनतुया - बगू. जाताना म्हनला, '' काय ? आटापलं सैपाकपानी-आंगुळ ? '' नस्त्या चौकशा मुडद्याला ! *** जैवंता मेल्यावर दादा म्हनलावता वडगावला चल परत. पन पोरास्नी घिउन कुटं तेनच्यात ऱ्हानार ! आपलीच झोळी फाटकी. नगु मनलं. पेन्शल मिळंल . पर गावातल्या मानसांची नजरच लई वंगाळ ! काय वाटलं अचानक - आन गेली कासाराच्या दुकानात. फोनच्या मशिनीत त्येनंच नंबर फिरीवला. दादाचा आवाज आल्याव रुपाया टाकला. मंग आवाजच फुटंना ! नरडंच आवाळल्यागत झालं ''रडू नगं'' - कासार म्हनला - ''म्या बोलतो. '' ''काय सांगावा?'' ''त्येला मनावं- सांच्याला यिऊन लगी आमाला घिऊन जा !''
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

काकू तुम्हाला माहित असावं म्हणून एक किस्सा सांगतो पुलंचा... नवरा बायको रस्त्याने चाललेले असताना बायको सवयीप्रमाणे एखाद्या बाईत वावगं दिसलं की नवर्‍याला विचारते, "पदर पाह्यलात?" आता नवर्‍याने "हो" म्हटलं की "या वयात बरीक शोभत नाही हो हे!!" "नाही" म्हटलं की, "कुठे बघत असतात वेंधळ्यासारखं देव जाणे"...असं उत्तर असतं. आता यावरुन बायका बोलताना दोन्ही बाजूंनी बोलतात असं मी म्हणणार नाही, कारण नको तिथे जनरलायझेशन न करण्याची अक्कल मला आहे.

लाखो वर्षे जौन सुध्धा पुरुषांत बदल घडवून आणण्याची इच्चा बाळगण्याची म्हैलांची सवय कधी बदलणार असे लिहून या धाग्याचे पोटेंशियल ३००+ नेउ कै? ;)

१०० शब्दांच्या आत खूप काही सांगितलं आहे. पारू, आन्ना ग्रामसेवक, कासार आणि सांगावा मिळाल्यासरशी बहिणीच्या मदतीला धावुन येणारा दादा हे सगळेजण डोळ्यांपुढे उभे केलेत. शतशब्दकथा आवडली.

वासनाधुंद प्रवृत्ती ही कोणाची देणगी? स्त्री आणि पूरूष ही कोणाची निर्मिती? अगदी रामायण महाभारतापासून चालू आहे हे सगळं याला पर्याय नाही