Welcome to misalpav.com
लेखक: अद्द्या | प्रसिद्ध:
बारावी निकाल लागला . .खरं म्हणजे परत एकदा निकाल लागला . . मार्च ला ३ विषय . . जून ला साला १ विषय . . . " च्यायला हे केमेस्ट्री काय सुटत नाय अद्दया " . बाजूला थांबलेला माझा मित्र म्हणाला . . काही न बोलता नोटीस बोर्ड समोरून बाजूला झालो . मित्र हि होताच बाजूला . तिथून जे सुटलो ते थेट त्याच्या घरीच. . म्हणजे अगदीच काही ढ प्रकारात नवतो . बाकी विषयात होते ७५-८० . . पण केमेस्ट्री . . आयुष्यात लागलेली सर्वात मोठी पनवती होती च्यायला . विषय वाईट नाही तो . मजेदार आहे . पण काही केल्या डोक्यात घुसाय्चाच नाही . एक तर घोकंपट्टी कधी जमली नाही . प्रत्येक गोष्ट समजून घेऊन करायची मस्ती होती . पण हा विषय समजायचा हि नाही . आणि पाठ पण व्हायचा नाही . त्याच्या घरी पोचलो . नशिबाने कोणीच नवतं . काहीच बोललो नवतो . गप्प गुमान जेवायला घेतलं तिथेच . जेवता जेवता तोच म्हणाला . ' हा XXXXXXXX पित्रे पण XXXXXXX च्यायला आपल्या बापाच्या मयताला आल्या सारखा चेहरा करतो शिकवताना . घंटा कळणारे आपल्याला असं ? " मी " अरे गप्प रे . . आपण घाण केली अभ्यासाच्या नावाने . त्याची काय चूक . बाकीचे झाले न पास ? बेंचो तो मुस्तफा पण पास झाला तीज्यायला . पस्तीस तर पस्तीस . पण पास झाला . आपली तेवढी पण लायकी नाही . . तुझं सीबीएससी आणि माझी शाळेतली हुशारी . दोन्ही गेलीये गटारीत . तो : ते सोड . आई बाबांना हे सगळं कसं सांगायचं हे बघ . मार्च मध्ये केवढे गोंधळ झालेत लक्षात आहे ना ? बघू . जो होगा देखा जाएगा . . रात्री मेसेज करतो तुला . जिवंत असल्याचं कन्फर्मेशन . तू हि कर . नाही आला मेसेज कोणाचा तर दुसऱ्याने सकाळी घरी यायचं सरळ . " मी " हेहेहे . अरे इतके घोळ घातले आज पर्यंत . सगळं पार पडलं नं ? हे पण पडेल पार . फक्त एक कर . काहीही झालं . तरी उलटून उत्तर देऊ नकोस . काहीही झालं तरी आवाज कमीच ठेव . ५०% त्रास कमी होईल . तुला हि आणि त्यांना हि . . लक्षात ठेव हे . तो : सो . आपण संतपदालाच पोचलात शांत राहून . माहितीये . जेव गप्प आणि निघ घरी . मेसेज कर रात्री . काय काय झालं ते सांग . आणि डोकं शांत ठेव . . समोर बाबा असतील तुझे . प्रत्येक गोष्टीत बाप आहे तो माणूस . राग काढण्यात सुद्धा . शांत राहा . " हो . " घरी जायचं मन नवतं अजिबात . मी हुशार आहे . हा गैरसमज दूर झाला होता . १०-१२ दिवसाच्या अभ्यासावर कायम ७५+ घेत आलो होतो . पण या एका विषयाने माझी वाट लावली होती . जमिनीवर आणलं होतं मला . . संध्याकाळ पर्यंत इकडे तिकडे फिरून काढला वेळ . आणि मग घरी गेलो . . जाताना आई बाबांना कसं सांगायचं याचा विचार करून गेलो होतो . पण घरी पोचलो आणि कळलं . कि या सगळ्याची गरज नवती . माझे एक दूरचे काका येउन बसले होते . ते आमच्याच कॉलेज मध्ये प्रोफेसर पण होते . तसा काहीच उपयोग झाला नवता त्यांचा , पण वेळोवेळी येउन घरी काही न काही तक्रार जरूर करायचे . पण प्रत्येक वेळी मी पुढे येणाऱ्या मासिक परीक्षेत चांगले मार्क मिळवायचो , किंवा इतर काही तरी कुठली तरी स्पर्धा गाजवून यायचो . त्यामुळे घरात कधी त्यांना कोणी सिरीयसली घेत नवतं . मजेची गोष्ट हि . कि ते माझ्या मित्राच्या घरीही जात असत हे सगळं करायला . ऋग्वेद च्या बाबांचे ते कुठून तरी मित्र लागत होते . आणि तिथे हि हाच घोळ घातला होता या माणसाने . त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं हसू होतं . एक वेगळाच आनंद दिसत होता . कि माझा भास होता देव जाणे. आई रडत होती . मी घरी येताच खोलीतून निघून गेली . . रोज आल्याबरोबर पन्नास हजार सूचना देणारी आई . आज काहीच बोलली नाही . . तिला मी काही बोलणार तेवढ्यात . . खोलीच्या दुसऱ्या टोकाहून दोन ढांगेत माझ्यापर्यंत पोचले होते बाबा . आणि काही कळायच्या आत माझा डावा जबडा आग लागल्या सारखा गरम झाला होता . मला फक्त त्यांचा हात उठलेला दिसला होता . त्यानंतर फक्त ओठातून आणि नाकातून रक्त आलेलं जाणवलं . एक शब्द बोलले नाहीत ते . . भेलकांडत एका बाजूला पडत होतो . कसाबसा सावरायचा प्रयत्न करत असताना अजून दोन फटके बसले . . वयाच्या सोळाव्या वर्षापासून बाबा लेथ मशीन वर काम करत होते . हात पण लोखंडाचे असावेत असं वाटलं मला तेव्हा . तीन फटक्यात मी पार अडवा झालो होतो . आईलाहि कधी माझ्यावर आवाज चढवू न देणारे बाबा आज एवढे चिडले होते . कि ३ फटक्यात जवळपास गुंगी येण्या एवढं मारलं होतं त्यांनी . . पुढे बाबा काही बोलणार तेवढ्यात ते काका म्हणाले . "जाउदे रे उदय . नको मारू . . आता चिडून काय उपयोग . आधी लक्ष द्यायला पाहिजे होतं . " तेव्हा कळलं कि ते का चिडले होते एवढे . मी नापास झालो . यापेक्षा त्या काकांनी बोललेले शब्द जास्ती टोचले होते त्यांना . आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू दिसत होतं मला आता स्वच्छ . . का? अश्या लोकांना आनंद होतो दुसर्यांना त्रासात बघून . . तेव्हा काही उत्तर देऊ शकत नवतो . बाबांनी हि काही उत्तर देलं नाही . मला उचललं आणि माझ्याच खोलीत ढकलून दार बंद करून घेतलं बाहेरून . . दुसऱ्या दिवशी सकाळीच उघडलं ते . त्या दरम्यान आई बाबांचा आवाज येत होता मला . त्यांचं बोलणं ऐकू येत होतं . . पण काहीच करू शकत नवतो . चूक तर झाली होती . . पण त्या पेक्षा मला त्या माणसाचा राग येत होता . . रात्रीच कधीतरी ऋग्वेद चा फोन आला . . " आदी . वो बुढ्ढा आया था क्या तेरे घर? " मी "हा आया था . . साला खूष लाग रहा था बोहोत. जीव घ्यावा वाटत होता त्याचा . . " तो : ऐक . उद्या संध्याकाळी ७ नंतर भेट . महत्वाचं बोलायचं आहे . एक वर्ष आहे आता आपल्याकडे . माझ्या डोक्यात प्लान आहे एक . . मी : च्यायला . आज मार खाल्लाय घरी तेवढा बास मला . तुझ्या घरी येउन परत मार नाही खायचा . तो : अरे भाई . तुला कोणी काही बोलणार नाही . आणि आपण घरी भेटत नाहीये . तू ये फक्त . गौऱ्या पण येतोय . तू ये रे . बोलू आपण . मी : अबे पण कुठे येऊ ? तो : च्यायला तुझ्या . सांगावं लागतं सगळं . नेट केफे ला ये . दुसरे दिवशी घरात तर कोणी काही बोललंच नाही . अगदी मी समोर असून नसल्या सारखं वागत होते . साहजिक होतं म्हणा . मी पण जास्त काही बोललो नाही . . संध्याकाळी पोचलो तिथे . ते दोघे आधीच येउन बसले होते . . गेल्या गेल्या गौरव उठला. हा माझा Lab पार्टनर होता . नेहमी जीन्स आणि कुर्ता हा अवतार . आणि इतरही बऱ्याच गोष्टींमुळे याला मुस्तफा नाव पडलं होतं . . हा उठला आणि एकदम मिठीच मारली . . "आदी भाई . . बोहोत बुरा लगा यार . साला तू फेल कसा झाला काही समजतच नाहीये . . " 'जाउदे रे . होतात गोष्टी . तू नको मनाला लाऊन घेऊ . असो . इथे का बोलावलं ते सांग . " " ओके . मी पास झालोय . . " ऋग्वेद : च्यायला . चिडवायला आला का इथे . एवढंच करायचं होतं तर फोन वर काम झालं असतं ना " गौरव : अरे दादा . वाक्य पूर्ण होउदे . . तर . मी पास झालोय . आणि मी पुढे शिकणार नाहीये . . जमणारच नाही ते . साला बारावी पास होताना पन्नास लोकांना विचारवं लागलं . चिटस घेऊन पास झालो . बापू म्हणतो इंजिनियर हो . मी नाही म्हणालो . . दुसरा ऑप्शन . त्याच्याबरोबर फौंड्री सांभाळणे . त्यात तर इंटरेस्ट आहेच . . पण एवढ्यात नाही . . मला माझं काही तरी हवंय . आणि तुम्ही दोघे ते मला देऊ शकता . बोल मदत करणार का ? मी : गौऱ्या . मला रोज २० रुपये देतात खर्चाला . तुला फुक्लीच्या १२ हजार पोकेट मनी देतात . आम्ही काय घंटा मदत करणार तुला . ऋग्वेद : हि हि हि . उसको पेट्रोल भर के दे हफ्ता भर सेविंग कर के अद्या . मी आणि गौरव अश्या रागाने त्याच्याकडे बघत होतो . .अजून काही बोलला असता तर मेलाच असता . गाढव कायम काही तरी पांचट जोक मारायचा . आणि नको त्या वेळी मारायचा . . गौरव ने त्याचा प्लान सांगितला . मग म्हणे . मला एखादा आठवडा लागेल पैसे जमवायला . तुझी तयारी असेल तर सांग . घरी बसून काय करणार दोघे तुम्ही . . स्वतः मेहनत करून कमवू . आणि पुढे तुम्हाला शिकायचं असेल तर स्वताच्या पैश्याने शिकाल . . "सांगतो तुला २-३ दिवसात "
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

हा कॉपीकॅट दुसरा प्रतिसाद माझ्या नावाने आहे असे समजा! :-)

पुढे बाबा काही बोलणार तेवढ्यात ते काका म्हणाले . "जाउदे रे उदय . नको मारू . . आता चिडून काय उपयोग . आधी लक्ष द्यायला पाहिजे होतं . " तेव्हा कळलं कि ते का चिडले होते एवढे . मी नापास झालो . यापेक्षा त्या काकांनी बोललेले शब्द जास्ती टोचले होते त्यांना . आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू दिसत होतं मला आता स्वच्छ . . का? अश्या लोकांना आनंद होतो दुसर्यांना त्रासात बघून . . तेव्हा काही उत्तर देऊ शकत नवतो .
अशीचं लोकं जास्तं भेटतात आयुष्यात. आणि त्यांना तुमचं भलं झालं का वाईट झालं ह्याच्याशी काहीही घेणंदेणं नसतं. त्यांना फक्त गंमत पहायची असते. स्वानुभवानी सांगतो, अश्या लोकांवर वेळीच इलाज केलेला उत्तम असतो. नाहीतर आयुष्याचं नुकसान होईल असे निर्णय घ्यायला भाग पाडतात. दुर्दैवाची गोष्ट अशी असते की नेमकं ज्या वेळी मानसिक आधाराची गरज असते त्या वेळीचं हे लोकं काड्या सारुन आपल्या जवळच्या माणसांचा आधार दुर करतात. :( बाकी लेखाची सुरुवात खुपचं छान झालेली आहे. पुढचा भाग लौकर येउ द्या. -अनिरुद्ध-

अगदी खरं बोलताय . . आणि या लोकांना काहीच फरक पडत नाही . त्यांच्या डोळ्या समोर एखादा मुलगा / मुलगी आपल्या आई वडिलांपासून दूर जाणार असते . फक्त त्यांच्या बोलण्यामुळे . उलट त्याचा आनंद होतो . परत दुसरीकडे जाउन जग जिंकून आल्याच्या थाटात सांगतात सुद्धा . . "मी यांच्या घरी गेलो होतो या दिवशी . . आता कधीच तो मुलगा आपल्या घरात नीट राहू शकणार नाही . त्याला कधीच किंमत मिळणार नाही " हि वाक्यं स्वतःच्या कानाने ऐकलेत मी .

आगाऊणाचा शिक्का बसला तरी चालेल पण या "विघ्नसंतोषीं"ची जाहीर आरती झालीच पाहीजे. हितैशी मुखवटे टराटरा फाडण्यात बदनाम नाखु पर्खड्कर इब्लीस क्लासेस

छान लिहिलय. कॅप्टन जॅक स्पॅरो यांच्या मताशी सहमत. आमच्या सोसायटितही अशी व्यक्ती होती. बरोबर निकालच्या दिवशी नापासांच्या घरी जाउन पेढे मागायची व नापास झाल्याचे कळले कि खोटी सहानुभूती दाखवत ऑक्टो. मार्च साठी शुभेच्छा द्यायची. दहावीला नापास झालेला माझा मित्र म्हणायचा नापास होण्याच्या भीतीपेक्षा ह्या काकांची मला अधिक भीती वाटते. अशा लोकांमुळे नापास झालेली मुले आत्महत्याही करतात. व बर्‍याचदा ह्याचे खापर पालकांच्या माथी मारले जाते.