आज महामानवाची जयंती । मस्त साजरी होती आहे… हो ,होते आहे.
लेझर लाईट च्या प्रकाशात मदमस्त झालेले भीम सैनिक नाचतायेत…
मी पण एक मनापासूनचा भीमसैनिक (यात जातपात शोधायला जाऊ नका) !
त्यामुळेच मला हे सगळ पाहून वाईट वाटत.!
बाबासाहेबांमुळे मिळालेल्या व्यक्तीस्वातंत्र्य भाषास्वातंत्र्य, आणि आचारस्वातंत्र्य याचा परिपूर्ण वापर (दुरुपयोग) चालू आहें.पण विचार स्वातंत्र्य मात्र जमेल तसं आम्ही वापरतो.
बाबासाहेबांचे विचार त्यांच्या अनुयायांनी लवकरच संपवायचे चालवले आहे. गौतम बुद्ध म्हणाले होते ,"मला देव बनवु नका! "माझे विचार अवलंबा!"
पण आपण त्यांना देवाच्या जागी ठेवलं ! तिथेच बौद्ध धर्माला उतरती कळा आली.
आज बाबासाहेबांच्या बाबतीतही तसेच काहीसे झाले आहे.
त्यामुळे मला स्वर्गीय वामनराव कर्डक यांचे शब्द आठवतात. -
"भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते,
तलवारीस त्यांच्या न्यारेच टोक असते,
वाणीत भीम आहे,करणीत भीम असता,
वर्तन तुझ्या पिलांचे सारेच थोर असते. "!
प्रकार:
विषय:
प्रतिक्रिया
सहमत आहे.
आशयाशी सहमत
महामानव, महात्मा इत्यादी
बाबासाहेबांना विनम्र श्रद्धांजली.
युगपुरुष, द्रष्टा विचारवंत आणि प्रयोगशील संशोधक
अभिवादन
काही दिवसांपूर्वी यावर चार
@ गौतम बुद्ध म्हणाले होते ,
हे भयंकर आहे हे मात्र खरे.
हे पहा उत्तर दिलेले.
अश्या लोकांना पौड फाट्यावर
अगदी अगदी
+ १ ह्या बादल्या
स्फूर्ति
महामानवास विनम्र अभिवादन.
ज्यांनी
ज्या महापुरुषांच्या प्रतिमा
कुणाचीही जयंती पुण्यतिथी असो
बाबासाहेब