मी उच्च शिक्षणासाठी सध्या देवभूमी उत्तराखंड मध्ये आहे. समवयस्क स्थानिक लोकाशी बऱ्याच वेळा गप्पा टप्पा अर्थात हिंदीमध्ये होत असतात . राष्ट्रवादी आणि शिवसेनेची धोरणे इत्यादी विषय असतात . पण मला असे जाणवले कि शरद पवार , बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे, यांच्यापेक्षाही बहुतेकांना स्वर्गीय दादा कोंडके हे माहित आहेत आणि त्यांना त्यांच्या एकूण हजरजबाबी पणा तसेच त्यांचे दुहेरी अर्थाचे संवाद, त्यांची सेन्सार बोर्डाशी असलेली भांडणे ( पंगा) वगैरे चांगलीच माहिती आहेत.
महाराष्ट्रात काही उच्च शिक्षित सज्जनांना दादा कोंडके आपल्याला आवडतात हे मान्य करणे हे हीन अभिरुचीचे लक्षण वाटते पण इथे मात्र बरेच जण त्यांना बाप माणूस मानतात.
दादा कोंड्केचा एक पंखा म्हणून लई भारी वाटल मला
प्रकार:
विषय:
प्रतिक्रिया
उत्तराखंडात डी के माहित आहेत?
अगदी त्यांच्या अनेक
ओ भौ
नया मुल्ला पंच नमाझी होता है
आयला हे तर जबरीच की!
उगाच नाय म्हणत, batman लई
उत्तराखंडात कुठे?
आय आय टी रुरकी