(ज्यांनी अजून हा चित्रपट पहिला नसेल त्यांनी आपल्या जबाबदारीवर पुढील उतारा वाचावा. )
(मी पहिल्यांदाच चित्रपटाबद्दल लिहित आहे. तेव्हा चूभूद्याघ्या)
काही दिवसांपूर्वी बीफोर सनराईज पाहत होतो. त्यातील नायक नायिकेला एका मालिकेची कल्पना सांगतो. जगभरातून ३६५ लोकांना निवडायचे आणि त्यांचा एक दिवस, त्या दिवसामध्ये ते कसे जगतात, काय करतात हे २४ तासासाठी शूट करायचे आणि दाखवायचे. यावरती नायिका पण हसते कारण आयुष्यातील त्याच कंटाळवाण्या, दैनंदिन गोष्टी परत पाहणे म्हणजे कठीण आहे.
हाच प्रकार कुणीतरी करावा अशी माझी अपेक्षा नाही परंतु अश्याच प्रकारचा प्रयत्न एखाद्या व्यवस्थेला किंवा संस्थेला चित्रित करण्याचा व्हावा असे मला वाटायचे.
कोर्ट या चित्रपटाने न्यायालयात कामकाज कसे चालत असेल हे हुबेहूब साकारण्याचा प्रयत्न केला आहे. बऱ्याच चित्रपटातून जी न्यायालये समोर आली त्यामध्ये भाषणबाजी, वकिलांचे तारखा घेण्यासाठी आजारी पडणे वगैरे वगैरे पाहायला मिळाली. पण कोर्ट याबाबतीत वेगळा आहे. इथे एकतर सत्र न्यायालय आहे आणि मोठ्याच्या मोठ्या चेंबर मध्ये खूप लोक फक्त हीच केस ऐकायला बसले आहेत असे नाही. त्यामुळे लोकांच्या दैनंदिन जीवनाच्या अगदी जवळ जाणारं हे न्यायालय आहे.
चित्रपटाची कथा एक लोकशाहीर नारायण कांबळे यांच्या भोवती फिरते. त्यांनी गायलेल्या एका गाण्यामुळे वासुदेव पवार यांनी आत्महत्या केली असा आरोप ठेवून पोलिस त्यांना अटक करतात. कोर्टात बऱ्याच तारखानंतर नारायण कांबळे यांना जामीन दिला जातो. नंतर त्यांना दुसऱ्याच कायद्याखाली परत अटक केली जाते आणि तो मुद्दा परत त्याच न्यायाधीशांसमोर येतो. पुढची तारीख देऊन कोर्टाला महिनाभराची सुट्टी पडते.एका अर्थाने इथेच चित्रपट संपतो (चित्रपट इथे संपवला असते तरी चालले असते, पण अजून काही सीन्स न्यायाधीशांच्या संदर्भात घडतात आणि मग चित्रपट संपतो.)
चित्रपट जसा जसा पुढे जातो तसे सरकारी वकील आणि बचाव पक्षाचे वकील यांचे वैयक्तिक आयुष्य दाखवले जाते. सरकारी वकील एका मध्यम वर्गीय घरातून आल्या आहेत तर बचाव पक्षाचे वकील एका श्रीमंत घरातून आले आहेत. त्यांच्या आवडीनिवडी यामध्येही खूप फरक आहे. सरकारी पक्षाचे वकील नाटक पाहायला जातात जे मराठी - अमराठी वादावरती आहे तर बचावपक्षाचे वकील एका बार मध्ये जाऊन परदेशी सहलींवर आपल्या मित्रांशी चर्चा करतात. तिथे बसून ते एक पोर्तुगीज गाणेही ऐकतात. दोघेजण आपापल्या घरच्यांसोबत जेवायला बाहेर कुठे कुठे जातात यावरही एक सीन आहे. एका बंदी आणलेल्या पुस्तकाच्या बाजूने बचावपक्षाचे वकील बोलतात तर दुसऱ्या दिवशी त्यांना लोकांच्या रागाला सामोरे जावे लागते. अश्या विविध गोष्टी दाखवत चित्रपट पुढे सरकतो. या गोष्टी objectively दाखवल्या गेल्या आहेत. त्यावरती कसलेही समालोचन चित्रपटात नाही. जो प्रेक्षक चित्रपट पाहतो आहे त्याने स्वतः त्याचा अर्थ लावणे अपेक्षित आहे.
चित्रपटातील पात्रांची निवड अतिशय उत्तम आहे आणि वास्तवाच्या जवळ जाणारी आहे. चित्रपटाचे छायाचित्रण उत्कृष्ट आहे विशेषतः रुंद आणि बर्याच वेळ चालणाऱ्या फ्रेम्स. पहिल्या काही सीन्स मध्ये एवढा वेळ चालणारी एकच फ्रेम पाहून वैताग येऊ शकतो पण पुढे पुढे त्याची सवय होते.
एकंदरीत एका कोर्ट केस च्या निमित्ताने समाज, न्यायव्यवस्था, सरकारी व्यवस्था यावरती भाष्य करण्याचे काम हा चित्रपट करतो.कुठल्या समीक्षकाने काय म्हटलंय किंवा आपले मित्र मैत्रिणी काय म्हणताहेत यावरती न जाता आपण स्वतः जाऊन एकदा अनुभव घ्यावा असा हा चित्रपट आहे!
ता.क.: काल मी हा चित्रपट कलकत्त्यात पाहिला. जेव्हा जायचे ठरवले तेव्हा वाटले कि पूर्ण थीएटर मध्ये आपण एकटेच असू आणि तसे असेल तर शो रद्द तर नाही होणार ना अशी शंका चाटून गेली. परंतु तसे काही झाले नाही. थीएटर छोटेच होते पण चित्रपट पाहायला साधारण ३० जण तरी हजर होते. हे चित्र पाहून खूप समाधान वाटले. चित्रपट संपला तेव्हा अगदी टाळ्याही पडल्या.
प्रकार:
विषय:
प्रतिक्रिया
मी पयला (इथे नाही हो...कोर्टातला )
सहीच ओ सव्यसाचीसाहेब! आवडलं.
अप्रतिम सिनेमा... दीर्घ
कालच पाहण्यात आलेला आहे........बेहद्द आवडला आहे...
आचार्य अत्रे यांच्या 'श्यामची
मी मराठी?
@चिगो साहेब , तो उतारा / लेख
अतिशय वेगळा अनुभव. खर्या
ठाणे eternity मॉल ला
मला पहायचा आहे .
चित्रपट पहावेसे वाटत होतेच पण
छान परिक्षण लिहिलेय !
जाऊ द्या चौ.को.साहेब..
ताम्बे साहेब कसले मनकवडे हो
अशा वेळी ...
म्हणे नाकात दोरी घालायची ! अन
आपल्या सारख्या बरया पैकी
हम्म :-)))
प्राईम टाईमला गर्दी नाही
भरपुर प्रसिद्धी करून
प्रत्येक सिनेमाचं एक ऑडियंस
फँड्री हा कोर्टपेक्षा चांगला
पटकथेची अपिलिंग बांधणी,
धन्यवाद !
माफीबद्दल धन्यवाद! आणि
"ओपिनियन न्युट्रॅलीटी" केंद्रस्थानी ठेवुन
फॅण्ड्री मध्ये तो एक्स फॅक्टर
शांगतो येक्स का वायझेल फॅक्तल, शांगतो
तुमचा आयडी बदलण्याची नितांत
बास्स का . . . . . . . . . . . . . . . .
(वेलेच आहात_.
येक पार्ट बी बगितला नाय ह्ये
त्या पुणे ५२ मधे पण ...
हो, होता ना !
शांतता राखा कोर्ट झोपलं आहे.
अगदी, अगदी ! पहिल्या दोन
नाही
मी गेल्या आठवड्यात पाहिला हा
सर्व प्रतिसादकर्त्यांना
उत्कृष्ठ लेख आणि तशीच चर्चा.
चित्रपटाची ओळख आवडली...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Baltimore declares emergency as Freddie Gray riots eruptछान!
छान लेख
कोर्ट विषयावर ७० साली हिन्दी
मराठी मनाला सुखावणारी . . . .