Welcome to misalpav.com
लेखक: कपिलमुनी | प्रसिद्ध:
मानसिक त्रास काल ७ एप्रिल रोजी माझ्या आईची पुणे येथील पासपोर्ट ऑफिसची ३:४५ ची अपाँटमेंट होती. १.व्यवस्थित भरलेला फॉर्म २.रीसीट ३.आधार कार्ड ४ पॅन कार्ड ५. शाळा सोडल्याचा दाखला ६.दहावीचे बोर्ड सर्टीफिकेट ७. अ‍ॅनेक्चर डी ( लग्नानंतरचे नाव बदलल्यासाठी) ८.अ‍ॅनेक्चर ए ( जन्मगाव ) ९. लाइट बिल १०. राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक (१ वर्षा हूनही जुने) वरील सर्व मूळ कागदपत्रे आणि त्याम्च्या सेल्फ अ‍ॅटेस्टेड झेरॉक्सचे २ सेट असे नेले होते. प्रचंड गर्दी आणि २.५ तास वाट पाहिल्यानंतर नंबर आला . पहिल्या ठिकाणी सर्व कागदपत्रे तपासून "ओके" चा शेरा मिळाला पुढे दुसर्‍या काउंटरवर फोटो हाताचे ठसे घेतले . एवढे होईतो ७ वाजत आले होते. पुढील माणसाने कोणतीही माहिती न देता "insuffiecient documents" असा शेरा मारला . त्याला कोणत्या कागदपत्रांची पूर्तता करायची आहे हे विचारले असता. त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली आणि दुसर्‍या काउंटरवर पाठवले ( त्याला मराठी येत नव्हते आणि आइचे हिंदी- इंग्लिश कच्चे आहे). आणि त्याने पुढची तारीख २१ मे टाकली आणि निघून गेला. दुसर्‍या काउंटरवर तिथल्या महिलेने कागदपत्रे तपासली आणि योग्य असल्याचा निर्वाळा दिला. पण तोवर हा मनुष्य सीस्टम बंद करून निघुन गेला होता. त्या महिलेने सांगितले एकदा तुमचा अ‍ॅप्लीकेशन ऑन होल्ड स्टेटस वर गेले तर पुन्हा त्या तारखे शिवाय काहीच करू शकत नाही. या प्रकारात ८ वाजून गेले होते. प्रंचंड मनस्ताप झाला होता आणि पासपोर्ट ची पुढची तारीख २१ मे ( ४५ दिवसानंतरची) मिळाल्यामुळे बर्‍याच प्लॅनवर पाणी फिरले आणि यात कोणतीही चूक नसताना ! दुर्दैवाने या विरूद्ध कुठेही तक्रार करायची सोय नाही . फीडबॅक मधे लिहा किंवा कॉल सेंटरला कॉल करा ठराविक साच्याची उत्तरे मिळतात पण बेजबाबदार कर्मचार्यांची तक्रार करण्याची आणि कारवाईची सोय कुठेही नाही. अशा गोष्टी टाळण्यासाठी १. महाराष्ट्रात मराठी भाषिक कर्मचारी / अनुवादक असावेत. २. प्रत्येक कर्मचार्‍याने काम न होण्याचे कारण लिखित स्वरूपात द्यावे. ३. तक्रार नोंदणी आणि कारवाइ विभाग असावा (अशी दिवास्वप्ने आहेत). प्रत्येक सरकारी विभागात अशीच रड असते.
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

बाकी नागरी सुविधा केन्द्र म्हणजे राजकारणी लोकांनी त्यांच्या खास माणसांचे पोट भरण्याचे केलेली सोय आहे. मी ५० रुपयात रेशन कार्ड काढलं होतं. ते पत्ता बदलल्याने आधीच कॅन्सल करुन नवीन काढायच होतं. नुसत आधीच कॅन्सल करायला ५०० रुपये मागितले होते. मी त्याला हुडुत करुन आलो. आधीचा पत्ता आकुर्डीतला, नवीन चिखलीतला. चिखली हे पिंची महानगरपालिकेत येवुन सुद्धा रेशन कार्डाच काम करायला हवेली तालुका तहसील स्वारगेटला जावं लागत. ग्रामीण भाग पकडतात. त्यामुळेच आकुर्डीतुन चिखलीत कार्ड ट्रान्स्फर होत नव्हते. च्यामारी, प्रोपर्टी टॅक्स हिशेबात बरोब्बर महानगरपालिकेच्या हिशेबाने लावतात. पावसाळ्यात आमच्या येरीयाच चिखली नाव सार्थ होतं. असो. तो एक वेगळाच वैताग.. इथे नको.

काही प्रश्न १. प्रतिज्ञापत्र करुन मग पेपर मध्ये तशी जाहिरात देऊन ते पासपोर्टसाठी पुरावा म्हणुन दाखवणार आहे. पण जन्मदाखला बदलायची जी प्रोसेस आहे, ती सुद्धा करायची असल्यास, आज आला तस अनुभव वारंवार येऊन त्रास होण्याचीच शक्यता वाटत आहे. सरकारी कार्यालयात, कारण न देता सतत वेगवेगळ्या कागदपत्रांची मागणी करुन अडवल्या गेले तर काय करता येते? (जसे की पासपोर्ट गृहीत धरता येत नाही, स्कुल लिव्हींग आणा.. ह्या पद्धतीची मनमानी) २. मला आडुन लाच मागितली तर मी काय करु शकते?

१. मी १००/- च्या स्टॅम्प पेपरवर केलेले प्रति़ज्ञापत्र. आणि तरी तुम्ही घेवून गेला नाहीत याला जग काही करु शकत नाही. दुसरी गोष्ट मुलाच्या जन्मदाखल्यात आईचे नाव चुकले आहे(किंवा जे आहे ते कोणत्याही कागदपत्रावर नाही) त्यामुळे तेवढेच बदला. म्हणजे सगळी कागदपत्रे एकसारखी होतील. बस्स या पलिकडे काही नको आणि पेपरमधे जाहिरातीची काय गरज. तुम्ही नाव बदलत नसून. दाखल्यात करेक्शन करत आहात. लोक बेजबाबदारपणे अनेक उलटे पालटे सल्ले देतील त्याकडे दुर्लक्ष करा नाहीतर अभिमन्यू होइल

अहो हो.. स्टॅम्प पेपरच नक्की माहित नव्हतं मला कारण डोमेसाईलच्या वेळेस तिथेच प्रतिज्ञापत्र करुन त्यावर बहुदा १०/- चा स्टॅम्प लावतात. फोटोही तिथेच काढतात हे पाहिलं होतं. म्हणुन चक्कर मारुन पाहिली. तेव्हाच मला ह्या साहेबांनी सांगितलं असतं की तुम्हाला स्कुल लिव्हींग लागेल तर मी आणलं नसतं का? शिवाय स्कुल लिव्हिंगच का ह्याचं उत्तर काय?? ते नेल्यावर नवीन काही मागणार नाही कशावरुन?
त्यामुळे तेवढेच बदला. म्हणजे सगळी कागदपत्रे एकसारखी होतील. बस्स या पलिकडे काही नको आणि पेपरमधे जाहिरातीची काय गरज. तुम्ही नाव बदलत नसून. दाखल्यात करेक्शन करत आहात.
वरचं सगळं वाचुन तुम्हाला काय वाटतं? काय जास्त सोप्पं आहे? नासुकें - सरकारी रुग्णालय - महानगरपालिका - बॅक टु सरकारी रुग्णालय - मध्ये कधी तरी उपनिबंधकांसमोर जबानी - मग फायनली पापो ऑफिस की नोटरी - पेपर अ‍ॅड - पापो ऑफिस

पकडलाय मार्ग तोच योग्य आहे. दुसरं काही करायला जाल तर त्या गोंधळाच्या विचारानेही माझ्या अंगावर काटा येतोय. आपली कागदपत्रे पूर्ण ठेवा. अडचण आली तर बापाला(वरच्या साहेबाला) भेटा.

पुढच्यास ठेच मागचा शहाणा ! तुमच्या स्वतःच्या नावामधे , पालकांच्या नावामध्ये कुठे कॄ , मॄ असेल बाळकृष्ण , अमृता तर त्याचे इंग्रजी नाव तपासून पहा . काही ठिकाणी बाळकृष्ण चे स्पेलिंग balkrishna तर कुठे balkrushna तसेच अमृता चे amrita किंवा amruta असेही लिहितात. पण पासपोर्ट काढताना जर तुमच्या कोणत्याही डॉक्युमेंटवर या पैकी दोन्ही नावे असतील जसे की शाळेच्या दाखल्यावर amrita आणि मॅरीज सर्टिफिकेटवर amruta तर तुम्हाला अ‍ॅफेडेव्हिट करून द्यावे लागते. ते सुद्धा अ‍ॅनेक्शचर ई आणि ते २ पेपर मधे छापावे लागते. आणि सदर पेपर सोबत घेउन जावे लागतात. असेच तुमचे नाव वेगवेगळे कागदपत्रांवर दिपक किंवा दीपक असेल तरी करावे लागते. --------------------------------------------------------

इथ माझ्या प्रश्नावर अनेकांनी खुप मदत केली. इथे खुप माहिती मिळाली तसंच व्यनि करुनही अनेकांनी आवर्जुन माहिती दिली. ह्याबद्दल धन्यावाद!! "जन्मदाखला बदलुन मिळतोच" हे ठामपणे सांगितल्याबद्दल आशु जोग ह्यांचे विषेश आभार!! इथुन प्रेरित होऊन मी परत तालेरा रुग्णालयात जाऊन चौकशी केली तेव्हा १. मी १००/- च्या स्टॅम्प पेपरवर केलेले प्रति़ज्ञापत्र. २. मला ओळखणार्‍याने / शेजार्‍याने १००/- च्या स्टॅम्प पेपरवर केलेले प्रति़ज्ञापत्र. (दोन्ही प्रति़ज्ञापत्र "नागरी सुविधा केंद्रातुन"च करायचे) ३. दोघांचेही रेशनकार्ड - प्रभारी अधिकार्‍याला ओरिजिनल दाखवुन स्वाक्षर घेणे . ४. नावात बदलाचे पुरावे - रेशनकार्ड / लायसन्स / पॅन कार्ड / मतदानकार्ड / बँक पासबुक (ह्यात ६-७ कागदपत्रांची लिस्ट आहे पण पासपोर्ट लिहीलेला नाही..!!) ४. मा. उपनिबंधकांना विनंती अर्ज ५. मा. उपनिबंधकांसमोर जबाबी हे देऊन काम होइल म्हणाले होते. नागरी सुविधा केंद्रात जाऊन काय अनुभव आला हे इथे लिहीले आहेच. तर दोन दिवसांनी स्कुल लिव्हिंग सर्टिफिकेट घेऊन गेलो परत नागरी सुविधा केंद्रात. बरोब्बर १० वाजता गेलो तरी तिथे स्मशानशांतता होती. तिथल्या शिपायांना विचारुन आधी खात्री केली की जे साहेब पटकन सही देतात ते आज ११ पर्यंत का होइना पण येणार आहेत. मग आम्ही प्रतिज्ञापत्र करायला वरच्या मजल्यावर गेलो. १० वाजता कार्यालय सुरु होईल म्हणजे १० ला आम्ही फरशा पुसायला घेऊ असा अर्थ होतो हे मला माहित नव्हतं! शटर अर्धवट उअघदुन आत साफसफाई चालु होती. १० मिनिटांनी मग लोकच ते उघडुन आत घुसले. मी पळत जाऊन योग्य काउंटर गाठुन तिथल्या बाईला सांगितलं की आज माझ्याकडे सर्व कागदपत्र आहेत. द्या मला प्रतिज्ञापत्र. ओके म्हणुन मॅडम खुर्चीवर बसल्या. मग विचारलं की नक्की प्रॉब्लेम काय आहे. मी सांगितल्यावर म्हणे "का पण? नाव का नाही बदलत तुम्ही?" "अहो मॅडम, तसा नियम नाही कुठे. तुम्ही द्या ना" "नियम माहितीये हो.. पण तुमचं नवर्‍याशी पटत नाही का??" "अहो..... तसं काही नाहीये.. तुम्ही द्या ना" आता मला परत एकदा "बरं असतं नाव बदललेलं.." हे प्रवचन परत एकदा गरज नसताना १२६२७ व्यांदा ऐकावं लागणार काय... पण नाही.. मॅडमना तेवढयात फोन आला न मी सुटले. मग पुढची २० मिनिटं मॅडम फोनवर बोलत.. एका हातानी टाईप करत कसं बसं काम करत होत्या. १५ लोक तुम्हाला टक लावुन पहात असताना "अय्या हो.. कै तरीच बै तुमचं..!! ही ही ही... असं नाही जा... तुम्ही तर बुवा फारच फनी... ही ही ही" अस मुरके मारत, पापण्यांची पिटपिट करत कसं काय बोलता येतं देव जाणे. पण शेवटी २ प्रतिज्ञापत्र हातात आली. खालच्या साहेबांनी १५ सेकंदात त्यावर सही केली. मग संपुर्ण सेटची झेरॉक्स करुन स्वतःकडे ठेवली आणि सर्व कागदपत्र तालेरा मध्ये सबमीट केले. पोच म्हणून झेरॉक्स सेट्वर सही घेतली. हे झालं २९ एप्रिल २०१५ ला. मध्ये ३-४ चकरा मारुन शेवटी आज २७ मे २०१५ ला मनपा कडुन आदेश आला की नावात दुरुस्तीस हरकत नाही!! त्याला परत एकदा जन्मदाखला मिळावा म्हणुन अर्ज जोडला. आता ४-५ दिवसात मिळुन जातील दाखले!!! २. मला माझा पासपोर्ट रिइश्यु आणी मुलाचा नवा पासपोर्ट करायचा आहे. एकंदरीत आजवर मला माहित नसलेली माहिती जी कदाचित तुमच्याही उपयोगी पडु शकेल. अ. तत्काळ रिइश्यु साठी Annexure F (Letter Class 1 officer ) लागत नाही. आ. लहान मुलांच्या तत्काळ्साठी सुद्धा Annexure F (Letter Class 1 officer ) लागत नाही. इ. तुमचे नाव असलेले एक तरी अ‍ॅड्रेस प्रुफ लागतेच. बायकांना नवर्‍याच्या नावावरचं लाईट बिल किंवा इतर कागद चालत नाहीत. तुमचं लग्न झालय (विवाह नोंदणी) आणि नवरा अमुक ठिकाणी रहातो (अ‍ॅड्रेस प्रुफ) एवढेच ह्यातुन सिद्ध होते. तुम्ही तिथे रहात आहात हे सिद्ध होत नाही. म्हणून एकतरी अ‍ॅड्रेस प्रुफ तुमच्या नावचे हवे (सगळ्यात सोपे म्हणजे बँकेचे पासबुक) ई. मुलाचे आई/ वडील परदेशात असतील तर परदेशातल्या पालकाची संमती मिळवायला तिथल्या एम्बसी मधुन sworn affidavit मिळवावे लागते. (ह्याबद्दल अजुन माहिती असल्यास सांगावी)

सगळा लेख वाचला.. मला 11 जून तारीख मिळाली आहे. ठाणे पासपोर्ट ऑफीस... वरील सुचनांचा चांगला फायदा होईल असे वाटते.... तयारी करूनच जातो.... बघुया काय होतय...पत्नीच्या नावाच्या बदलाच्या पुराव्याबाबत माहीती मिळाली तयारी करून जातो....आल्या नंतर पुन्हा सांगतो काय झाले ते...........धन्यवाद