Welcome to misalpav.com
लेखक: संपादक मंडळ | प्रसिद्ध:
छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा ९ : " सावली" *************************************************************************************** छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १: मानवनिर्मित स्थापत्य छायाचित्रणकला स्पर्धा क्र. २: "आनंद" छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ३: ऋतु (Seasons) छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ४: उत्सव प्रकाशाचा छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ५: "भूक" छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ६: व्यक्तिचित्रण छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ७: शांतता छायाचित्रणकला स्पर्धा क्र.८ : चतुष्पाद प्राणी **************************************************************************************** राम राम मंडळी. छायाचित्रणकलेची आठवी स्पर्धा पार पडली आणि वेध लागले ते नेहमीप्रमाणेच नवव्या स्पर्धेतील विषयाचे तेव्हा यावेळच्या स्पर्धेसाठी विषय आहे 'सावली' आपापल्या भन्नाट कल्पना सावली केंद्राभोवती ठेवून उत्तम छायाचित्रे येऊ द्या. प्रत्येक स्पर्धकाला एकच प्रवेशिका देता येईल. प्रवेशिका पाठवण्याची मुदत आजपासून १५ दिवस. दिनांक २९ एप्रील २०१५ पर्यंत स्पर्धक आपल्या प्रवेशिका पाठवू शकतील. इतर सर्व नियम मात्र आधीच्या स्पर्धेप्रमाणेच राहतील! सर्वच स्पर्धकांना आणि सहभागीं मंडळींना शुभेच्छा !
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

गेल्या उन्हाळ्यामध्ये घरच्यांसोबत अजंठा-वेरूळला भेट दिली होती. ऐन दुपारी बाहेर कडकडीत उन्ह असताना, सावलीत उभं राहून निवांतपणे लेण्यांचे सौंदर्य बघत असताना काढलेला हा फोटो… स्पर्धेच्या विषयाला अनुसरून आहे कि नाही याबद्दल साशंक, फक्त चांगला वाटला म्हणून येथे चिटकवला Ellora

ठाण्याला नुकताच शिफ्ट झालो होतो. बर नव्हत म्हणुन ऑफिस मधुन लवकर घरी आलो होतो. संध्या़काळी हॉल मध्ये हा नजरा दिसला. पश्चिमेच्या खिडकीतुन जमिनिवर ऊन पडले होते, व ते भिंतीवर परावर्तित होऊन सुंदर दिसत होते. मग नुकत्याच घेतलेल्या सॅमसंग एस ने फोटो काढला. चेपु व फ्लिकार दोन्हीची लिंक देत आहे. Anuj Savali Anuj Savali

पडद्या मागचे सावलीतले कारागीर ! त्यांच्या कलाकृती तर प्रकाशात येतात पण हे अनाम कलाकार सावलीतच ! saavalee

अशाच एका रात्री रस्त्यावरच्या झाडाच्या फांद्यांची तिथल्या दिव्यामुळे पडलेली सावली. a कॅनन इओएस ७०डी एफ ४ १/५ १८ एम एम आयएसओ ६४००

प्रकाश नसेल तिथे काळोख असेल. सावली ही नेहमीच कोणत्यातरी वस्तूची असेल.

ओ काका तो फोटो का काढलात? नियमात बसत नसला तरी राहुद्या ना तिकडे. लैच आवडला होता. (लव्ह अ‍ॅट फस्ट साईट का काय ते झाले होते) पैजरबुवा,

कल्पकतेने घेतलेली चित्रचौकट! प्रतिमा आवडली. हायलाइट्स अजून थोडे सुधारायला वाव आहे.

अथक प्रयत्नांनी सापडला शेवटी…. आसनगाव येथील मानस मंदिराला जाऊन आलो तोच येताना रस्त्यात मागून ट्रक चा ह्यालोजन पडला आणि म ही आयडिया सुचली a सोनी सायबर शॉट ७०० ह्या मोबाइल ने काढलाय

कामाच्या व्याप वाढल्यामुळे यावेळी वेळेत फोटो देणे शक्य झाले नाही ! :( निकाल सुरु झाला असला तरी "विषय" म्हणुन मी काढलेला फोटू देत आहे. :) P1 कॅमेरा :- निकॉन डी-५१००

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- 'We did not touch the Pakistani aid': Quake-struck Nepal launches inquiry as Pakistan sends 'beef masala'

छायाचित्र स्पर्धा आज बघितली….एक छायाचित्र आहे माझ्याकडे आता दिल तर चालेल का? विचारतो आहे तरी छायाचित्र जोडतोय. (नियमाबाहेर आहे माहित आहे.) लक्ष्मि-नारायण मूर्तीची सावली. God's Shadow