पगार, वेतन, Salay..
सर्वांच्या जिव्हाळ्याचा शब्द. अगदी ठार अडाण्यालाही या शब्दाचा अर्थ पटकन समजतो.
महिन्याचे १ ते १० असे दहा दिवस पगाराचे असतात. मी जी माहिती आपल्याला देणार आहे ती आपल्यास नसल्याने आपले काहीच बिघडणार नाही मात्र माहित असल्याने 'पगार' घेताना (पगार नाही) मजा मात्र दुप्पट वाढेल..!
मित्रांनो हा कोणत्याही भाषीकाला अगदी आपला वाटणारा शब्द मुळात 'पोर्तुगीज़' आहे हे माहित आहे का आपल्याला..?
'हापूस (अल्फान्सो)' आंब्याप्रमाणेच 'पगार' हा शब्द देखील आपल्याला गोव्यातील पोर्तुगीज़ांकडून वारशात(?) मिळालेला आहे.
('हापुस' व 'पायरी' हे शब्द पोर्तुगीज 'अल्फान्सो' व 'परेरा' या शब्दांचे अपभ्रंश आहे.)
पोर्तुगीज 'पागा' या शब्दापासून 'पगार' हा शब्द सिद्ध झाला आहे व त्याचा मुळ पोर्तुगीज अर्थ 'श्रमाचा मोबदला' असाच आहे. कोळी बांधव मासेमारीला 'मासे पागणे' असे म्हणतात ते याच अर्थाने इतकेच कशाला मुंबईतील लोक खोली घेताना 'पागडी' देत, म्हणजेच मालकाला 'मोबदला' देत तोही याच अर्थाने.
'वेतन' हा शब्द चक्क वेताच्या छडी वरून आला आहे. तर कसा ?
फौऊन्टन पेनाचा शोध लागण्यापुर्वि बोरूने लिहीण्याची पद्धत होती व हा बोरू वेतापासून बनवत असत. वेतापासून तयार केलेल्या बोरूने कारकून लिखानाचे काम करीत व त्याबद्दल त्यांना जो मेहेनताना दिला जाई त्याल 'वेतन' असे नांव प्राप्त झाले.
'वेतन' या शब्दाची आणखी एक गम्मत आहे. वेताची काठी म्हणजे गवताचाचं एक प्रकार. अतिशय 'लवचीक' असणे हा या वेताचा गुणधर्म! आता बघां, नोकरदार माणसानं 'लवचीक' म्हणजे दुल-या अर्थाने 'नम्र' असावच लागतं असेच 'वेतन' शब्द सुचवित नाही का?
'पगार' हा शब्द साधारणतः शारिरीक कष्टाची कामे करणारा कामगार वर्ग उपयोगात आणतो तर 'वेतन' हा शब्द पांढरपेशे बुद्धीजीवी नोकरदार वापरतात. ही विभागणी आजही लक्षात येते.
इंग्रजी 'Salary' हा शब्द मुळ रोमन असून तो 'Salt' म्हणजे 'मीठ' या शब्दापासून तयार झाला आहे. पुर्वीच्या काळात रोमन सैनिकांना दिला जाणारा मोबदला मीठाच्या स्वरूपात दिला जाई तर फ्रान्सच्या सैनिकांना मीठ देण्याऐवजी ते विकत घेण्यासाठी 'सोल' या नांवाचे नाणे दिले जाई. है मीठ सैनिकांना त्यांच्या घोड्यासाठी उपयोगास येई. पुढच्या काळात मीठ देणे बंद झाले तरी केलेल्या कामाच्या मोबदल्यासाठी Salary हा शब्द सुरूच राहीला.
आपणं नेहेमी आपल्या मेहेनतीच्या पैशाला 'घामाचा पैसा' असे म्हणतो. आता बघा, घामाची चव खारट असते म्हणजेच त्यात 'मीठ' असते हे विज्ञान सांगते. म्हणजे 'Salary' हा मोबदल्यासाठी किती योग्य शब्द आहे नाही? आपल्या मराठीतील 'खाल्ल्या मीठाला जागणे' या वाकप्रचाराचा अर्थ आता आपल्या नीट लक्षात येईल.
गणेश साळुंखे
९३२१८११०९१
प्रकार:
विषय:
प्रतिक्रिया
या बद्दल अजुन काही माहिती
या सर्व etymologyचा स्रोत काय
मराठी व्युत्पत्ती कोश..
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि
तुम्ही म्हणताय तो विश्वकोश.
इथे पहा. "ब) योजनांतर्गत
मराठी व्युत्पत्ती कोशाचे
हां ये ब्बात! हीच माहिती हवी
आदूबाळ, सोहो स्ट्रीटच्या
काय सांगता? खरं का काय??????
हो तंर.. आहांत कुठे ?? :))))
आयला सहीच की!!!! अत्र्यांची
(डोले मिचकावणारी स्माईली
कोनाचं डोलं मिचकावनारी?
सूड्ण्यास अधिक सांगणे न लगे..
कोश
शब्दांच्या ज्ञन्मकथा मस्त
सकाळ मधल्या शब्दकथा बहुतेक यु
सकाळ मधल्या शब्दकथा बहुतेक यु
ग्रेट गणेशजी तुम्ही खरंच
घामाची चव खारट असते
खौचट
@ आता घामाची चव घेऊन बघणे आले
बोल्लास?
छान.
वेतनबद्दल असहमत आहे. हा शब्द
वेताशी संबंध लावणे कै च्या कै शी सहमत.
सहमत
वेतावरुन वेतन अंहं. कब्बी नै.
पगार शब्द पोर्तुगीजच* आहे. पण वेतावरुन वेतन अंहं ही गोष्ट कै पटेना.
पगारला वेतन शब्द सावरकरांनी दिला. (चला मराठी विकीवर)*अभारतीय शब्दकोश. रामदासस्वामी सोनार.
-दिलीप बिरुटे
अभारतीय शब्दकोश काय प्रकार
दोन शब्द.
रोचक!!! पहायला पाहिजे हा कोश,
लिहित रहा भौ! त्यानिमित्ताने
+१
व्युत्पत्तिकोश आणि इतर सटरफटर
कुलकरणी नव्हे
:)
मुळ शब्द कुळकरणी असाच आहे.
मूळ संस्कृत शब्दात ळ नाही.
ब्रह्मानंद देशपांडे यांचे मत
अर्थातच. श्रीकरणाधिपातला करण
कसं काय ?
ब्रह्मानंद देशपांड्यांनी
वेल!
पुण्याजवळचे
लोहगांवचं 'लोहेगांव' झालं,
रंजनगाँव
यझ बिहार्यांचा परिणाम हा.
मराठी ग्रामनामांचा इतिहास
विश्वनाथ खैरे
Pagination