Welcome to misalpav.com
लेखक: ग्रेटगणेश | प्रसिद्ध:
पगार, वेतन, Salay.. सर्वांच्या जिव्हाळ्याचा शब्द. अगदी ठार अडाण्यालाही या शब्दाचा अर्थ पटकन समजतो. महिन्याचे १ ते १० असे दहा दिवस पगाराचे असतात. मी जी माहिती आपल्याला देणार आहे ती आपल्यास नसल्याने आपले काहीच बिघडणार नाही मात्र माहित असल्याने 'पगार' घेताना (पगार नाही) मजा मात्र दुप्पट वाढेल..! मित्रांनो हा कोणत्याही भाषीकाला अगदी आपला वाटणारा शब्द मुळात 'पोर्तुगीज़' आहे हे माहित आहे का आपल्याला..? 'हापूस (अल्फान्सो)' आंब्याप्रमाणेच 'पगार' हा शब्द देखील आपल्याला गोव्यातील पोर्तुगीज़ांकडून वारशात(?) मिळालेला आहे. ('हापुस' व 'पायरी' हे शब्द पोर्तुगीज 'अल्फान्सो' व 'परेरा' या शब्दांचे अपभ्रंश आहे.) पोर्तुगीज 'पागा' या शब्दापासून 'पगार' हा शब्द सिद्ध झाला आहे व त्याचा मुळ पोर्तुगीज अर्थ 'श्रमाचा मोबदला' असाच आहे. कोळी बांधव मासेमारीला 'मासे पागणे' असे म्हणतात ते याच अर्थाने इतकेच कशाला मुंबईतील लोक खोली घेताना 'पागडी' देत, म्हणजेच मालकाला 'मोबदला' देत तोही याच अर्थाने. 'वेतन' हा शब्द चक्क वेताच्या छडी वरून आला आहे. तर कसा ? फौऊन्टन पेनाचा शोध लागण्यापुर्वि बोरूने लिहीण्याची पद्धत होती व हा बोरू वेतापासून बनवत असत. वेतापासून तयार केलेल्या बोरूने कारकून लिखानाचे काम करीत व त्याबद्दल त्यांना जो मेहेनताना दिला जाई त्याल 'वेतन' असे नांव प्राप्त झाले. 'वेतन' या शब्दाची आणखी एक गम्मत आहे. वेताची काठी म्हणजे गवताचाचं एक प्रकार. अतिशय 'लवचीक' असणे हा या वेताचा गुणधर्म! आता बघां, नोकरदार माणसानं 'लवचीक' म्हणजे दुल-या अर्थाने 'नम्र' असावच लागतं असेच 'वेतन' शब्द सुचवित नाही का? 'पगार' हा शब्द साधारणतः शारिरीक कष्टाची कामे करणारा कामगार वर्ग उपयोगात आणतो तर 'वेतन' हा शब्द पांढरपेशे बुद्धीजीवी नोकरदार वापरतात. ही विभागणी आजही लक्षात येते. इंग्रजी 'Salary' हा शब्द मुळ रोमन असून तो 'Salt' म्हणजे 'मीठ' या शब्दापासून तयार झाला आहे. पुर्वीच्या काळात रोमन सैनिकांना दिला जाणारा मोबदला मीठाच्या स्वरूपात दिला जाई तर फ्रान्सच्या सैनिकांना मीठ देण्याऐवजी ते विकत घेण्यासाठी 'सोल' या नांवाचे नाणे दिले जाई. है मीठ सैनिकांना त्यांच्या घोड्यासाठी उपयोगास येई. पुढच्या काळात मीठ देणे बंद झाले तरी केलेल्या कामाच्या मोबदल्यासाठी Salary हा शब्द सुरूच राहीला. आपणं नेहेमी आपल्या मेहेनतीच्या पैशाला 'घामाचा पैसा' असे म्हणतो. आता बघा, घामाची चव खारट असते म्हणजेच त्यात 'मीठ' असते हे विज्ञान सांगते. म्हणजे 'Salary' हा मोबदल्यासाठी किती योग्य शब्द आहे नाही? आपल्या मराठीतील 'खाल्ल्या मीठाला जागणे' या वाकप्रचाराचा अर्थ आता आपल्या नीट लक्षात येईल. गणेश साळुंखे ९३२१८११०९१
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

तुमचा सीओईपीविषयीचा (सार्थ) अभिमान लक्षात घेता तुम्हांला ही माहिती रोचक वाटेल अशा अंदाजानेच ती अधिकची माहिती लिहिली.

सध्या कुलकरणी हे आडनाव दोन तर्‍हांनी लिहिले जाते.१)कुलकर्णी २)कुळकर्णी. याविषयी असे समजले होते की चांद्रसेनीय कायस्थ लोक हे 'कुळकर्णी' लावतात आणि (देशस्थ)ब्राह्मण कुलकर्णी. काही काळात हे कुलकर्णीचे 'कुल्कर्णी' झालेलेसुद्धा वाचायला मिळू शकेल. जाता जाता: 'कुलकरणी' हा शब्द मी अनेक ठिकाणी, अनेकदा वाचला आहे. माझ्या वाचनात आलेले उल्लेख कितपत जुने, किंवा जुन्यात जुने आहेत किंवा कसे, ते मात्र माहीत नाही.

विदर्भ अन खानदेशात कुलकर्णी हे आडनाव फारसे प्रचलित नाही. तिथे कुळकर्णी हेच आडनाव प्रचलित आहे. प्रत्यक्ष कुलकर्णी आडनाव असलेला मित्र लाभेपर्यंत माझा स्वतःचा असा समज होता की इंग्रजी स्पेलिंगच्या प्रभावामुळे काही कुळकर्णी लोक आपल्या आडनावाचा उच्चार कुलकर्णी असा करतात. संत ज्ञानेश्वरांचे आडनावही अशाच लोकांनी या पद्धतीने बदलले आहे ;-) . आवडीच्या विषयावरचा लेख आवडला.

हिंदीतला 'जुआँ' हा शब्द संस्कृत 'द्यूत' वरून आलेला आहे. हिंदीत 'द'चा 'ज' होणे किंवा उलट,हे सर्वसाधारण आहे. रमज़ान-रमादान, जहेज़-दहेज, द्वि वरून जुड्वाँ(हे थोडे संदिग्ध आहे, युज्- युक्त- जुडा-जुळलेले असेही असू शकेल.), जोडी, आपल्याकडे जानबा-(ज्ञानबा)-द्न्यानबा इ.

हाफशेंच्युरी निमीत्त श्री.ग्रेटगणेश यांचा सत्कार एक मिपा शब्दकोश* देऊन करण्यात येत आहे. शुभेच्छुक-जेपी आणी तमाम कार्यकर्ते. *त्यांनी या शब्दकोशातील शब्दांची व्युत्पत्ती सांगावी हि नम्र विनंती.

जोर्दार हाणुमोदन. तसेच त्या शब्दांचे प्रचलीत्+काढीव्+वाढीव अर्थ सांगावेत हि अतिनम्र विनंती. शुभेच्छुक-जेपी आणी तमाम कार्यकर्ते अंतर्गत चिमन हटेला गँग पिंचिवडकर