Welcome to misalpav.com
लेखक: कॅप्टन जॅक स्पॅरो | प्रसिद्ध:
बर्याचं दिवसांपासुन व्हॉट्स अॅप गृप वरती किमान ३००० वेळा कट्टा करायच्या गोष्टी चाललेल्या होत्या. गेले २-३ आठवडे हो-ना-हो-ना करता करता शेवटी काल मोदक, मी, कपिलमुनी आणि अनाहितांचा लाडोबा असे चार जणांचा कट्टा ठरला. त्याचा एक वृत्तांत लिहायचा एक माफक प्रयत्न. कट्ट्याचं आयोजनं करतानाचं माझ्याकडुन एक मोठी चुक झाली ती म्हणजे वल्लींना फोन करायचा राहुन गेला :( (वल्ली मनापासुन सॉरी!! ). अन्या दातार कोल्हापुरला गेल्यानी आणि गुर्जीं फुलराणीच्या शोधात मार्केट यार्डामधे असल्यानी येउ शकले नाहीत. ;) एक लाडोबा सोडला तर आम्ही तिघही पिंपरी-चिंचवडबद्दल अगदी पुर्ण परिचयाचे असल्याने कुठे भेटायचं हे आधीचं ठरलेलं होतं. काल दुपारी लाडोबाला फोन केला तेव्हा, "मी ना अग्गदी ३.३० ला वेळेत निघतो म्हणजे दोन अडिच तासात चिंचवड ला पोहचेन" असं म्हणाला. प्रत्यक्षात फक्त एक तासाचा उशिर करुन श्री. लाडोबा सर ठाण्याहुन निघाले. चिंचवडला उतरणार होता त्याऐवजी कपिलमुनिंनी त्याला तळेगावलाचं उतरवलं आणि गाडीत घालुन प्राधिकरणामधे आणलं. (लाडोबानी तळेगावला उतरावं म्हणुन अणाहिता चिंचवडला काळे झेंडे वगैरे घेउन उभ्या आहेत असा त्याचा समज करुन देण्यात आला असं आमच्या वि-श्वसनिय आणि गोप-निय सुत्रांकडुन समजलेलं आहे. ;) ) त्यांना थोडी वाट पहायला लावुन मी सुद्धा एक दहा-पंधरा मिनिटात तिथे भेटायला पोचलो. ह्या आधी कधीही एकमेकांना भेटलेलो नसुनही अगदी एका फटक्यामधे एकमेकांना ओळखलं. आयडीच्या नावावरुन किती फसायला होउ शकतं ह्याचा अनुभव काल परत घेतला. कपिलमुनी एखादे ४०-४५ वर्षांचे सद्गृहस्थ असतील अशी समजुत होती, हा तर चक्क समवयीन निघाला. टवाळ कार्टा इथे एवढी मस्ती करतो तर प्रत्यक्षात कसा असेल असं एक चित्र मनाशी रंगवलेलं होतं. हा प्राणी भलताचं शांत निघाला की. हाय-हेलो करुन गाड्या-बिड्या पार्क करुन समोरचं असणार्या चि.सौ.कां. गीता पावभाजी सेंटरमधे जरा श्रमपरिहारासाठी गेलो. एकमेकांशी ओळख वगैरे करुन घेतली आणि मोदकाला फोन केला. मोदक जरा कामामधे असल्याने थोडा उशिरा येणार होता. इकडे कपिलमुनि, लाडोबा आणि माझं गाड्या, मिपा आणि मिपाकर ह्यांच्यावर गप्पा रंगल्या. तीन जणांनी कॉफी, चहा आणि लेमन सोडा असा त्रिरंगी मेनु संपवला त्यानंतर बराचं वेळ वेटरचा अंत बघुन मग टेबल रिकामं केलं. दरम्यानच्या गप्पांमधे टकाला अचानक xxxताई आणि xx ताई आल्या असं एकदम सांगीतल्यावर तो जो काय दचकलाय उस्का जवाब नै बॉस!! ;) मोदक आणि आम्ही सगळे वाल्हेकरवाडीमधल्या रानमळा मधे भेटायचं ठरवलं होतं तिकडे कुच केलं. रानमळामधे जाउन स्टार्टर्स जेमतेम संपेपर्यंत बुलेटवाले मोदकबाबा बुलेटसंप्रदायी अवतारामधे प्रकट झाले आणि मग खर्‍या अर्थानी गप्पांचा कट्टा रंगायला सुरुवात झाली. गाड्या, ट्रेक्स, भ्रमंती, मिपावरचे आयडी आणि त्यांच्या सवयी, लेखं आणि अनुभव वगैरे वगैरेंचे विषय सटासट बदलले जात होते. कालच्या गप्पांमधुन "केल्याने देशाटन" ह्या म्हणीची प्रचिती आली. जरा वेळानी झणझणीत गावरान चिकनची थाळी वगैरे मागवली. चविष्ट चिकनबरोबर गप्पांची चव द्विगुणीत झाली. (लाडोबानी थोडसं हाश-हुश करत का होईना पण खाल्लं ;) ). वयोगट आणि जवळपास समविचारी असल्यानी सगळे जण पहिल्यांदाच भेटत असुनही अगदी मोकळेपणानी गप्पा मारत होते. मोदक आणि कपिलमुनी ही दोघं लोकं सतत कुठेना कुठेतरी ट्रिपला जात असतात (शेप्रेट) अशी माहिती मिळुन बरीचं जळजळं झाली. गप्पा मारत असतानाचं बुवांचा कर्वेनगरहुन फोन आला, त्यांच्याशी जरा फोनवर गप्पा मारल्या. प्रत्यक्ष नाही तरी बुवांनी सुक्ष्मदेहानी हजेरी लावली असं म्हणायला हरकत नाही. गप्पा हाणत असताना टकाला एकदम आपल्याला पुण्यात नातेवाईकांच्या घरी जायचं आहे ह्याची आठवण झाली. त्याला पुण्यात धनकवडीला सोडायची जबाबदारी मी घेतलेली होती. आणि टक्या पत्ता चुकुन चुकल्यानी ती जागा धनकवडी नसुन फुरसुंगी आहे असं बर्‍याचं उशीरा लक्षात आलं. ए बाबा, हवं तर तुला ठाण्याला सोडतो पण फुरसुंगीला वगैरे सोडणार नै ज्जा अशी धमकी दिल्यावर टक्या पार रडवेला झालेला. (अनाहितांच्या ताब्यात देतो अशी धमकी देणार होतो पण उगीचं रडला बिडला अस्ता तर काय घ्या म्हणुन मोह आवरला. ) ;) ;) ;) शेवटी त्यानी धनाजी वाकडे उर्फ स.गा. ला फोन केला आणि त्याची उतरायची सोय केली. (टक्याला आधी सगा नी येउ नको असं सांगीतलयं असं सांगुन आम्ही बराचं त्रास दिला. फायनली सगा कडे सोय झालीये हे कळल्यावर मात्र मग जरा थंडावला.) यथेच्चं जेउन प्रत्येकी तीन-तीन भले मोठे ग्लास सोलकढी ढोसली आणि हातपाय पसरुन परत गप्पा सुरु झाल्या. आठ साडेआठला ज्या गप्पा मारायला सुरुवात केलेली ते रात्री जवळ जवळ सव्वा अकरा साडे अकरा पर्यंत गप्पा कश्या रंगल्या हे समजलं सुद्धा नाही. शेवटी अगदी हाटेलमालकानी हाकलायला नको म्हणुन नाईलाजानी बाहेर पडलो. परत पार्किंगमधे बुलेट बद्दल दहा-पंधरा मिनिटं गप्पा रंगल्या. पुढे एकत्र प्रवासाचे थोडे फार बेत आखुन परत भेटायचे प्लान करुन कट्ट्याची सांगता झाली. टक्याचं पुढे काय झालं? सगानी टक्याला घरात घेतलं का? हे वाचण्यासाठी आज वल्ली, बुवा, सगा आणि टक्याचा आत्ता पुण्यात कट्टा चालु आहे त्याचा वृत्तांत वाचावा लागेल. स्टे ट्युन्ड!! असो. मिपामुळे असे विविध क्षेत्रामधले, समविचारी मित्र मिळाले ह्याचा आनंद वाटतो. मिपाकरांच्या भेटीचे असे प्रसंग वारंवार येवोत हिच एक इच्छा व्यक्त करुन धागा संपवतो.
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

फोटु टाकयचे नैत ह्या कट्ट्याचे अशी एका सदश्याची मागणी असल्यानी फोटु टाकलेले नैत. तसे गप्पांच्या नादात फोटो काढायचं राहुन गेलेलं २-३ फोटो काढले बास्स :)
पुन्हा एकदा कट्टा करा
आयोजन करा ;)

फटु नसल्याने कट्टा झाला, तसेच चिमणराव आणि टका हे दोघेजण अस्तित्त्वात आहेत यावर विश्वास ठेवणार नाही. (टकाचे पुण्यात काही खास काम होते असा सौंशय आहे. त्याचे काय झाले?)

फेस्बुकावर हेमामालिनीचा फोटो आपला म्हणून टाकणार्‍या पण माहीत आहेत. आहेस कुठे! =))

हेमा मालिनीचं ठिके हो. ती कमीत कमी सुंदर म्हातारी तरी आहे. माझा फोटो अगदी अंधळा माणुस सुद्धा मुद्दाम नाही लावणार चेपु ला =)) सो तो मीचं आहे.

फटु नसल्याने कट्टा झाला, तसेच चिमणराव आणि टका हे दोघेजण अस्तित्त्वात आहेत यावर विश्वास ठेवणार नाही. (टकाचे पुण्यात काही खास काम होते असा सौंशय आहे. त्याचे काय झाले?)
ओ पैसा टै...इथे लिहिता मी अस्तीत्वात नै...दुसर्या प्रतिसादात लिहिता की माझा फटू बघितला...ये क्या गोडा...चतुर...गोडा...चतुर जी बाकी माझे पुण्यात खास काम नव्हते...असले की तुम्हालाच घेउन जातो बोलणी करायला :)

ब्वार्र. बोलणी करायला फारसा उपयोग व्हायचा नै. मांडवात जेवायला बोलावलंस तरी पुरे! =))
ओ...बोल्णी करायला नै...समोरचे उग्गीच फाल्तू विषयावरून नखरे करायला लागले की त्यांना वठणीवर आणायला ;)

हे ठिकाण माझ्या घरापासून चालत १० मिनिटांचे अंतरावर आहे. सबब . . . . . . . . . . . . . . . . . . . . योग्य जागी सुपारी दिली आहे कॅप्टन. गपचिप नाखु

तुमचा भ्रमणध्वनी क्रमांक माझ्याकडे नाही तस्मात कळवु शकलो नाही. सुपारी अन्या दातारला दिलेली असल्यास कळवणे तो पुण्यात नै त्यामुळे ती सुपारी माझ्यापरंत पोचणं अवघड आहे :)

माझ्याकडची सुपारीची खांडं संपलीत :P असो, तर विशेष सदस्य वगळता फोटो टाकायला हरकत नसावी. पण ज्याअर्थी एक्कही फोटो नाही, त्याअर्थी कट्टा झालेला नसल्याची शंका घेण्यास भर्पूर वाव आहे.

अफवांवर विश्वास ठेऊ नकोस.
कट्टा ! अरे गफ्फा आहेत नुसत्या आणि तू भुललास असल्या भूलथापांना.
बाकीचा साक्षीदार नाखु

टवाऴजी कार्टा यांना आताच सिंहगड रस्त्यावर टेम्पोत बसवून आलो आहे.
चायला...त्या ट्येंप्यूने २ तास घेतले पुण्याच्या बाहेर पडायला :(

वा वा, मजा आली वृत्तांत वाचून. धनकवडी अन फुरसुंगी मध्ये गोंधळ होणे म्हणजे फारच बुवा. बाकी पुणे महानगराच्या विविध टोकांवरून दुचाक्यांनी कट्ट्यांना जाणे खरंच कौतुकास्पद आहे.

फो...........टूssssssssssssssssss??????

http://www.freesmileys.org/smileys/smiley-angry017.gif @गुर्जीं फुलराणीच्या शोधात मार्केट यार्डामधे असल्यानी येउ शकले नाहीत.>>> दुष्ष्ष्ष्ट! दुष्ष्ष्ष्ट! अफवाळ http://www.freesmileys.org/emoticons/emoticon-misc-001.gif ज्याकू! "ओ...चाफा काय पुडी लावलाय?" ही फुलवाल्याला विचारलेली ओळ- फुलराणी अशी ऐकू येते क्काय?? दुत्त दुत्त! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt010.gif @टवाळ कार्टा इथे एवढी मस्ती करतो तर प्रत्यक्षात कसा असेल असं एक चित्र मनाशी रंगवलेलं होतं. हा प्राणी भलताचं शांत निघाला की>> ये इक गेहेरा सच है। @दरम्यानच्या गप्पांमधे टकाला अचानक xxxताई आणि xx ताई आल्या असं एकदम सांगीतल्यावर तो जो काय दचकलाय उस्का जवाब नै बॉस!! >> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing001.gif

@तुम्ही अला नाहीत ह्याबद्दल णीषेध...>> णिषेध करनेचा हक्क काढून घेनेत येत आहे! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif आपणास सायंकाळी ८:२० मिनिटानी फोण केलेला होता,टेंव्हा आपणच मला "लै वेळ लागेल तुम्हाला...यायला!" अशे बोल्लात! आणि मलाच म्हन्ता व्हय "अला नाहीत" म्हणूण! :-/ दुत्त दुत्त http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt009.gif

कट्टा ६.३० ला चालु झाला. तुम्ही ८.३० ला कर्वेनगरहुन निघुन अजिबात वेळेत आला नसतात एवढ्या ट्रॅफिकमधुन. दु दु दु ट्रॅफिक...पुढच्या वेळी लवकर या ना. मंजे मनसोक्त गफ्फा हाणता येतील.

जल्ला हेच मन काय कल्ना नाय …. काय वो कॅप्टन सायेब? बरं न्हाय वो ह्ये ……… (सनी देओल मोड ऑन ) टका… सम्झाव इसे … सम्झाव…… ऐसे डायलाग मिपापे बहोत मिलते हाय…

आधी माहिती असतं तर तुम्हालाही कट्ट्याला बोलावलं असतं :)...सत्काराचे फोटो इथे चिकटवता आले असते :P
आणि सत्काराऐवजी कट्टा पेटला असता तर? :)