आणि ते पुढे म्हणाले, ' जो जन्माला येतो त्याला दुःख हे येते पण जगात आनंद ही तेवढाच आहे , मग आपण दुःखाच्या मागे का धावतो. भुतकाळातील आनंदी क्षण विसरतो, दुःखाचे क्षण मात्र लक्षात ठेवतो. आशा स्थितीत जर वर्तमानात राहीले तर त्याचा परिणाम भविष्यातील जीवनावर होतो. जर तुम्ही त्याच ठिकाणी आनंदाचे क्षण आठवले तर त्याचा परिणाम तुमच्या वर्तमान जीवनावर होईल, आणि सहाजिकच तुमचा भविष्यकाळ सुदंर आसेल, '
हे ऐकल्यावर सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसु लागला.
' आज मी काय करीत आहे ते पहा स्वतःकडे थोडे लक्ष द्या, आज मी कोणते कार्य केले त्या कार्यातून मला खरोखरच आनंद मिळाला का ? हे स्वतःला विचारा, जेव्हा तुम्हाला याचे उत्तर सापडेल तेव्हा तुमच्यात खरोखरच बदल घडेल, '
' आणि दुःखावर मात करण्यासाठी ह्याची सवय लावली पाहिजे, श्री कृष्ण गीतेत म्हणतात, ' उद्याची चिंता सोडा, ' कारण उद्या तुम्ही घडवत आहात, आज तुम्ही दुसर्याची निंदा केलात त्याचा परिणाम दुसऱ्यावर न होता जास्त करून स्वतःच्याच मनावर होतो हे लक्षात ठेवा, प्रत्येकास साधे व सरळ आयुष्य मिळालेले असते पण स्वतःच्या विचाराने मनुष्य घडतो, '
ह्या प्रवचना नंतर हसरे बाबा खुप ठिकाणी प्रसिद्ध झाले, अनेक गावातील लोक त्याचा सल्ला घेण्यास येऊ लागले. आलेला प्रत्येक भक्त हसत मुखाने बाहेर येत.
एक दिवस साधु हास्यानंद आजारी पडले, गावातील व आसपासच्या गावातील लोक त्याना पाहण्यासाठी येऊ लागले, ते हसत सर्वांना आशिर्वाद देत.
त्या दिवशी साधु हास्यानंद अंगणात बिछान्यात झोपले होते, त्याच्या भोवती गावकरी उभे होते, साधु हास्यानंद यानी हळुच आपले डोळे उघडुन गावातील लोकांना पाहिले, लगेच गावातील दोन लोक त्याच्या जवळ बसले.
सर्वांना माहिती होते की, साधु हास्यानंद काहीतरी बोलतील, आणि ते हाळु आवाजात म्हणाले, ' मी आता जास्त वेळ तुमच्या बरोबर राहू शकत नाही, त्यामुळे माझ्या मृत्यूनंतर मला आहे त्या अवस्थेत
अग्नी द्या, माझे कपडे बदलू नका, मला अंघोळ घालु नका, '
एवढे बोलून साधु हास्यानंद या जगाचा निरोप घेतला.
सर्व गाव दुःखात बुडाले.
रात्र झाली होती, साधु हास्यानंद सांगितल्या प्रमाणे त्याना आहे त्या अवस्थेत अग्नी देण्यात येणार होती.
सर्व गावकरी जमले होते, साधु हास्यानंद याचा मृतदेह त्या चंद्र प्रकाशात सर्वांना दिसत होता.
शेवटी त्याच्या मृतदेहाला अग्नी दिला आणि सर्वाना दुःख वाटले.
प्रत्येकजण अश्रू पुसत होता.
काही क्षणात त्या अग्नी तुन एक एक करीत दारू गोळा बाहेर येऊन आकाशात उडू लागले, आकाश अनेक रंगाने उजळला.
गावकरी आश्चर्य चकित होऊन पाहु लागले, ती चमक व प्रकाश पाहुन त्याची मने आनंदीत झाली.
जाता जाता साधु हास्यानंद यानी सर्वांना आनंदीत केले.
समाप्त
प्रकार:
विषय:
प्रतिक्रिया
काय उपयोग? एकाही ग खाली टिंब
ओह!
चितेतुन दारु गोळा उडु लागला?
खिक्क!!
मोजी बर्याच दिवसांनी आले; पण
कुछ जम्या नहीं. जीवनराव,
मोजी,बास करा हे शुध्दलेखन आणि
खरंच. वाघाने घासफूस खाऊ नये
अगं बाई ! पहिल्या भागात पण
संपली?
दादू
:-))
ते नी सो काय आहे ते कळळं नाय.
ही घ्या
अगायायायायाया
अरेरे
गुड गुड!
हमरे मोजी कहां गए? :(
मोजीं च्या कथेत आता राम नाहि
रांम!!
राम नाय, राम नाय...